Submitted by supriya19 on 14 July, 2008 - 14:06
मी प्रथमचं माझ्या २ वर्षाच्या मुलीला घेउन भारतात जात आहे. २२ तासाचा प्रवास असल्याने खुप टेंन्शन आलयं. क्रुपया काही tips देउ शकाल का? तिला coloring ची आवड फारशी नाहि. पुस्तके नेईन मी. अजुन काही tips?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
साकेत,
साकेत, वरचं सगळं वाच. उपयोग होईल त्याचा.
साकेत, माझी
साकेत,
माझी पत्नी ३.५ वर्षाची मुलगी आणि १.२५ वर्षाचा मुलगा याना घेउन एकटी भारतात गेली होती.
जाण्याआधी आम्ही स्पेशल डॉक्टरची Travel appt घेतली होती. त्यात तिने बरीच चांगली माहिती दिली.
(हे insurance कवर करत नाही.)
माझ्या मुलाला काही १५/१८ महिन्याचे आणि मुलीला ४ वर्षाचे shots आधीच दिले होते.
(त्यातले काही शॉटचे पैसे मला भरावे लागले कारण कंपनी काही विशिष्ट मर्यादेपर्यंतच पे करतात).
दोघानाही मलेरिया च्या गोळ्या कॅपसुल फॉर्म मधे दिल्या होत्या. जाण्याआधी १५ दिवसापासुन सुरु करायच्या आणि आल्यावर १ महिना दर आठवड्याला द्यायच्या असतात.
तिथे जाण्याअधी तिथे डासापासुन संरक्षक मच्छरदाणी वगैरे आणुन ठेवायचे, आणि इतर काळजी उदा. बाहेरचे पाणी द्यायचे नाही, पाणी उकळुन गाळुन घ्यायचे/फिल्टर करायचे इ.इ नेहमीच्या सुचना.
वर लिहिलेले सगळेच करतात असे नाही पण उगाच तिथे गेल्यावर धावपळ करण्यापेक्षा आधी खबरदारी घेतलेली बरी.
तुम्हाला शुभेच्छा!
सायोनारा,
सायोनारा, मनस्मी थँक यु.
मी वर दिलेली माहिती वाचून काढली व ती फार उपयोगात पडेल असे वाटते आहे.
कोणाला United and Jet Airways च्या फ्लाईटची माहिती / अनुभव आहे का?
साकेत..
साकेत.. पेडियाशुअर तुम्ही विमानातून घेउन जाउ शकता.. विमानात तुम्हाला विनंती केल्यावर दूधसुध्दा मिळेल...
युनायटेडचा वाइट नाही पण फार चांगलापण अनुभव नाही..
आम्ही मुलीला (वय ३ वर्षे) दोनदा भारतात घेउन गेलोय पण कधी कुठले वेगळे शॉट्स किंवा मलेरियाची औषधे दिली नव्हती (सांगलीत खूप डास असून सुध्दा). पहिल्यावेळी पाणी उकळून दिले पण यावेळी मुंबइ विमानतळापासूनच साधे पाणी. काहीही त्रास नाही झाला. (मुंबइ आणि पुण्यात नळाचे पाणी बर्यापैकी स्वच्छ असते). अर्थात प्रत्येकाची प्रतिकार शक्ती वेगळी असते.
मनस्मी,
मनस्मी, दीड वर्षापूर्वी पहिल्यांदा माझ्या सव्वा वर्षाच्या मुलाला भारतात घेऊन गेले तेव्हा जाण्यापूर्वी मलेरियाचा शॉट दिला होता. कॅप्सूल्स बद्दल ऐकलं नव्हतं. बरं , हे मलेरियाचे शॉटस प्रत्येकवेळी द्यावे लागतात का? मी ह्यावेळी जाईन तेव्हा तिथे पावसाळा असेल म्हणून हा प्रश्न.
सायो,
सायो, मुलाच्या डॉक्टरलाच औषधं / शॉट्सबद्दल विचारणं उत्तम. कारण प्रत्येकाची उपचारपद्धती निराळी असू शकते. बाकी पाणी बिस्लरी इ. वापरण्यापेक्षा गाळून उकळून वापरलेलंच खात्रीशीर चांगलं. बरोबर बग स्प्रे / लोशन ठेवावं डास वगैरे फार असतील तर.
जेट एअरवेजचा माझा अनुभव सगळ्याच दृष्टींनी अतिशय चांगला आहे.
पाण्यासाठ
पाण्यासाठि 'ब्रिटा पिचर' खुप उपयोगि ठरतो.. जास्तिचे फिल्टर घेवुन जायचे.
मुलांच्या
मुलांच्या मलेरिया शॉट्स किंवा औषधांबद्दल विचारताना साइड इफेक्ट्स्बद्दल पण डॉक्टरांना नीट विचारून घ्यावं. मलेरियाचं औषध घेतल्यावर काही लहान मुलांना त्रास होतो असं ऐकलंय. डॉक्टरांनी निषादला हे औषध दिल्यावर जास्त रडरड, झोपेतून उठून रडणं, बेचैन असणं अश्या गोष्टी होतात का ते लक्ष ठेवून बघायला सांगीतलं होतं.
स्वाती,
स्वाती, त्याच्या पेडिला विचारणार आहेच, पण मला परवा अचानक लक्षात आलं की हे मलेरियाचे शॉटस प्रत्येक वेळी द्यावे लागतील की नाही.
मृ, गेल्या वेळेच्या शॉटस नंतर मी तरी असं काही नोटिस नाही केलं.
मलेरियाच्
मलेरियाच्या गोळ्या खुप मोठ्या असतात्..मुलांच्या वयाप्रमाणे डोस कमीजास्त असतो..त्यासाठी दोन मोठ्या गोळ्या खरेदी करुन त्या जवळच्या "स्पेशल फार्मसी" च्या दुकानात न्यायच्या आणि त्याना डॉक्टरानी सांगितल्याप्रमाणे डोस च्या कॅप्सुल बनवायला सांगायच्या.
मला दोघा मुलांच्या मिळुन $११० खर्च आलेला. हा खर्च इन्शुरन्स कवर करत नाही.
मी मुलीला घेउन गेलो होतो तेव्हा ३ वर्षापुर्वी व आता मलेरियाच्या कॅप्सुल घेतलेल्या.
(घ्याव्याच लागतात असे नाही पण उगाच चान्स घ्यायला नको म्हणुन आम्ही घेतल्या).
मी आजच
मी आजच मुलीला डॉक्टरकडे नेले होते तेव्हा त्यानी मलेरिआच्या गोळ्या सांगितल्या आहेत. पण त्या तिला इथून निघायच्या २ दिवस आधीपासून ते परत आल्यानंतर ७ दिवसपर्यंत घ्याव्या लागतील. आणि साईड इफेक्ट्स म्हणजे मूडीपणा, चिडचिड वगैरे. मी तिकडे जवळजवळ ६ आठवडे राहणार आहे. तर इतके दिवस इतक्या लहान मुलीला सतत औषध देणे चांगले का ते समजत नाहीया.
भारतात गेल्यावर काही तात्पुरते औषध नाही का देता येत?
मनस्मी, मृण्मयी तुमच्या मुलांना ते जितके दिवस तिकडे होते तितके दिवस पूर्ण ते औषध दिले होते का?
सायोनारा, मलेरिया शॉट किती दिवस आधी दिला होता?
माझी बहीणच
माझी बहीणच तीकडे डोक्टर असल्याने तिच्या सल्ल्यानुसार मी माझ्या मुलीला नीयमानुसार गोळ्या दिल्या. टायफोयडचीच (कसे लिहणार) पण लस दिली होति तीला. खरोखरीच त्याचा उपयोग होतो..
हो, माझ्या
हो, माझ्या मुलाना मलेरिया कॅप्सुल प्रत्येक आठवड्याला दिली होती. काही त्रास झाल्याचे आठवत नाही.
साईड एफेक्ट असु शकतात पण होतीलच असे नाही.
तुम्हाला गोळी दर आठवड्याला सांगितली आहे का दररोज?
आम्ही प्रत्येक आठवड्याला १ कॅप्सुल बनाना/अॅपल सॉस बरोबर दिली होती.
तीला १ chewable
तीला १ chewable tablet रोज द्यायला सांगितली आहे. म्हणजे तीला टोटल ५१ गोळ्या घ्यायच्या आहेत.
स्वाती, तुम्ही तिकडे म्हणजे भारतात जाऊन तिथल्या डॉक्टरच्या सल्ल्याने गोळ्या दिल्या का? टायफॉईडचा शॉट U.S. मध्ये दिला की भारतात?
माझ्या
माझ्या मुलीची डॉक्टरपण मलेरियाच्या गोळ्या देते, जायच्या आधी २ दिवस चालू करायच्या आणि आल्यानंतर पण ३-४ दिवस घ्यायच्या. रोज एक गोळी. पण या chewy गोळ्या नाहीत. पाण्याबरओबर घ्यायच्या. लहानच असतात आणि माझी मुलगी लहानपणापासून गोळी गिळू शकते पाण्याबरोबर.
अजूक एक म्हणजे पेडी तिला dukarol चा डोस पण द्यायला सांगते. एक डोस जायच्या आधी ८ दिवस (नीट आठवत नाही) आणि दुसरा त्याच्यानंतर १ आठवड्याने. अशा प्रकारे हे डोस जायच्या आधीच पूर्ण होतात. हे औषध डायरिया पासून त्रास होऊ नये म्हणून आहे.
तिथे गेल्यावर तिला उकळलेलं पाणी दिलं. दूध वगैरे ती तिथलच पिते. एवढी काळजी घेतली की मग काही त्रास नाही.
फक्त तिथे तिला उष्णतेचा आणि pollution चा (तिथल्याच डॉक्टरच्या म्हणण्याप्रमाणे) त्रास झाला आणि स्किन वर rash आला. मागच्या वेळेस हे प्रकरण कमी होतं पण त्याच्या मागच्या वेळेस खूप त्रास झाला याचा. पण तिला एक्झेमाचा थोडा problem आहे. त्यामुळेही हा त्रास जास्त होत असावा.
टायफॉईडचा
टायफॉईडचा शॉट U.S. मधेच दिला. मलेरियाच्या गोळ्या देखिल U.S मधुनच..तीच्या पाण्याची मात्र कळजी घ्या. आम्ही तीला अजिबात बाहेरचे पाणी दिले नाही, २ आठ्वडे बाहेरचे काहीहि खाल्ले नाही (आम्हीदेखील..) नन्तरही तीला फारसे बाहेरचे खायला नाही पण आइसक्रीम दीले फक्त
एवढी औषधे
एवढी औषधे देणे खरोखरच गरजेचे आहे काय? कोणाला दुखवायचा हेतू नाही पण मला खरोखरच जाणून घ्यायचे आहे.
मान्य आहे की देशात गेल्यावर कोणालाच दवाखान्यात वेळ घालवायचा नसतो (कुणावर अशी वेळ येउ पण नये). माझ्या मते खरोखर आवश्यक असेल तेवढी काळजी घेतली (उकळलेले पाणी, मच्छरदाणी/क्रीम, इ.) तर पुरे. शिवाय एवढे शॉट्स देउन मुलांची प्रतिकारशक्ती कमी होते असं मला वाटतं.
आम्हीही
आम्हीही तीनदा घेऊन गेलो मुलाला .. पहिल्यांदा ११ महिन्यांचा होता तेव्हा (त्यालाही अगदी लहान असताना eczema चा त्रास होता), मग तीन वर्षांचा होता तेव्हा आणि मागच्या वर्षी साडे चार वर्षांचा होता तेव्हा .. त्याचे इकडचे regular shots सोडले तर बहुतेक पहिल्या दोन वेळेला Gamma Globulin की तसल्याच काही नावाचा shot दिला होता त्याच्या pediatrician ने .. पण बाकी कसलीही औषधं नाही दिली .. मलाही असंच वाटतं की किती किती आणि कशाची औषधं, shots द्यायचे ..
काही काही मुलांची तब्येत weak असेल तर समजू शकते .. पण शक्य असेल तेव्हा औषधं टाळावीत असं मलाही वाटतं ..
(इकडे v&c सुरू होणार असंही वाटतंय .. :p
)
मलाही खरंच
मलाही खरंच ही जास्तीची औषधं द्यायला नकोसं वाटतं. (मलेरियाचं औषध वगैरे तर अजीबातच नको .) पण ज्या वर्षी आम्ही निषादला हे अँटी-मलेरिया प्रकरण दिलं त्यावर्षी माझ्या वडलांना सेरेब्रल मलेरिया (म्हणजे नक्की काय ते माहिती नाही) झाला होता. म्हणून ही काळजी घेतली. पण त्यानंतरच्या सगळ्या भेटी असली कुठलीही औषधं न देता सुखरूप पार पडल्या.
मनीश,
मनीश, सशल
माझ्या माहितीतले बरेच जण आम्ही मुलाना जितके शॉट दिले त्यातले काहीच न करता तसेच गेले होते. त्यातील काहीना त्रास झाला काहीना झाला नाही. मला वाटते त्रास हा मुलांच्या प्रकृतीनुसार कमी/जास्त होतो. आम्ही उगाच कशाला रिस्क घ्यायची म्हणुन घेतले होते.(तेवढीच एक काळजी कमी..)
इकडे v&c
इकडे v&c सुरू होणार असंही वाटतंय >> मलाही असंच वाटत होतं ते पोस्टताना.. पण तसं इंटेन्शन नाहिये
मलेरियाच्
मलेरियाच्या गोळ्या Strong असतात तरस शक्यतो टाळाव्यात्.माझ्या मुलिला मी ५,१.५,आणी४.५ आशी घेवुन गेले मागच्या वेळी मुलगा पण बरोबर होता,वय पावणे दोन वर्श्. डॅअक्टर ने सांगीतले होते, मोठ्या शहरातच रहा. पाणी उकळुन घ्या ,बिसलरी नकोच्.डासांसाठी मी संध्याकाळी अंधार्ल्यावर खिडक्या लावुन घेत असे. मग गुड नाइट लावुन बेडरुमच्या दारं खिडक्या लावुन घायच्या. रात्री मछर दाणी लावायची. इतक पुरेसे.होते.
सायो ,पावसाळ्यात डास इतके नसतात्,उन्हाळयात जास्त असतात.
मी मागच्या
मी मागच्या वर्षी माझ्या ८ महिन्याच्या मुलाला घेऊन भारतात गेले होते आणि २ महिने राहिले होते. तिथे गेल्यावर उकळलेले पाणी देणे एवढी काळजी घेतली, ह्याच्या व्यतिरिक्त त्याला कोणतेही शॉट्स किंवा टॅबलेट्स दिल्या नव्हत्या. काही त्रास झाला नाही. डासांकरता त्याला तिथे असताना ओडोमॉस लावायचे.
विमानात मुलांकरता पाणी, लिक्विड फॉर्मुला इ. नेऊ देतात.
मी आत्ताच
मी आत्ताच मार्च-एप्रिलमध्ये जाऊन आले. आमच्या डॉनेपण ते मलेरियाचं औषध जाण्याआधीपासून ते जाऊन आल्यानंतर काही दिवस द्यायला सांगितलं होतं. पण आम्हाला त्याची आवश्यकता वाटली नाही. मुलगा मजेत होता. अगदी शेवटी त्याला जरा ताप आला होता पण तो उन्हाळ्याचा. तेव्हा मुंबईत हायेस्ट टेम्प होतं!
बाकी आम्ही कॅथेने गेलो SFOहून. खास काही आवडली नाही मला ती एअरअलाईन. पण वेळ वाचतो इतकच.
अगदी अगदी.
अगदी अगदी. माझी मुलीने तिच्या ७ वर्षाच्या जिंदगीत आतापर्यंत ५ ट्रिपा केल्यात पण कधीही कुठलेही औषध दिले नाही, इतकेच काय तर आम्ही येथल्या डॉक्टरांना पण कधी विचारले नाही. तब्येत नाजुक असेल तर हे सर्व करावे, पण बरेच लोक मुलं आणि भारत असा वेगळाच इश्यू निर्मान करतात, बरेचदा त्याची जरुरी नसते. उकळते पाणी अन मच्छरदानी असले की बास. ( अन उकळते पाणी तर इथेही देतातच की लोक, मुलं खूप लहान असताना. एवढी काळजी ती काय?)
तसेही मुलीला अन आम्हाला रस्ताच्या कडेवरची पाणिपुरी, पावभाजी खाल्ल्याशिवाय मात्र चैन पडत नाही.
आता दुसरे टिंगरु जन्मले आहे, भारत भेटीचे वारे वाहत आहेत पण मला नाही वाटत आम्ही अजुन वेगळे काही करु.
(नो इंटेशन ऑफ व्हि अॅन्ड सी
)
>> पण बरेच
>> पण बरेच लोक मुलं आणि भारत असा वेगळाच इश्यू निर्मान करतात, बरेचदा त्याची जरुरी नसते.
आवश्यकता आहे की नाही हे ठरवणं प्रत्येक आई-बापावर अवलंबून आहे केदार. त्याचा उपहास करण्यात अर्थ नाही.
नाही मृ मी
नाही मृ मी उपहास नाही करत आहे. आधीच लिहीले आहे की नाजुक प्रकृती असेल तर हे सर्व करावे.
माझे म्हणने की बाउ करु नये, काळजी घ्यावी.
वरचं ते
वरचं ते मलेरियाच्या गोळ्या प्रकरण वाचून मलाही नकोच वाटलं. तसंही उगाचच शॉटस द्यायचे जिवावरच येतात. पण तिकडे जाऊन उगाच रिस्क घ्यायलाही नको वाटतं. मी मुलीला १ वर्षाची असल्यापासून अगणित वेळा घेऊन गेले आहे पण मलेरियाचे शॉटस काही दिले नाहीत कधीच.
कायम पाणी उकळूनच प्यायलं जातं तिथे. बाहेरचं मुलं इडली नी डोश्याशिवाय काहीही खात नाहीत. शक्य झाल्यास यावेळी शॉटस शिवायच नेईन.
माझ्या पण
माझ्या पण ३ वर्षात ३ ट्रिप झाल्या कधीच कुठले शॉट घेतले नाहीत माझ्या साडे तीन वर्षाच्या मुलाने. त्याची तब्येत थोडी नाजुकच आहे, तरी तो ३ ट्रिपमधे छान होता. अॅक्वागार्डचे पाणी आणि मच्छरदानी वापरली बस.
मलापण इतके
मलापण इतके दिवस इतक्या लहान मुलीला औषध देणे जिवावरच येते आहे, त्यामुळे शक्यतोवर तिला देणारच नाही. पाण्याची काळजी तर घेणारच आहे, शिवाय पेडियाशुअर नेणार आहे त्यामुळे तिकडे जर दुध सुट झाले नाही किंवा आवडले नाही तरी हरकत नाही.
सशल, झेलम माझ्या मुलीला पण eczema आहे आणि मागच्या वर्षी तिला खूप त्रास झाला होता तिकडे. तेव्हा ती ६ महिन्याचीच होती. मुलांचे वय वाढले की तिकडे गेल्यावर (pollution, water change etc.) eczema चा त्रास कमी होतो असा काही तुमचा अनुभव आहे का?
Pages