पापलेट/ सुरमयी/ बांगडा/ जीताड/ रावस, बांगडा असा कोणताही मासा अडवा चीर देऊन ( मासे आणताना मासेवाल्याला सांगा भरला करायचा आहे, तो योग्य पद्धतीने चीर देतो ), लसून ८-१२ पाकळ्या, २ मिरच्या, कोथिंबीर, खोवलेला नारळ , हळद १/४ चमचा, लिंबाचा रस २ चमचे, मीठ चवी नुसार, मासा बांधायला पुडाचा दोरा, २ चमचे तेल.
मासा आतून, बाहेरून स्वच्छ धुवा, निथळत ठेवा. त्याला हळद, थोडे मीठ आणि लिंबाचा रस हे चोळून ठेवा.
आता खोबरे, मिरच्या, लसून, कोथंबीर, मीठ ह्याची हिरवी चटणी करा. पाणी अजिबात घालु नका.
आता ही चटणी माशाच्या पोटात भरा ( आडवी चीर दिलेल्या भागात). आता पुडाच्या डॉ-याने हा मासा X आणि | असा बांधून घ्या.
साधारण १० मिनिटांनी पॅन मध्ये २ चमचे तेल टाकून गरम करायला ठेवा. पॅन गरम झाले की आच मंद करा. त्यावर हा बांधलेला मासा ठेवा. झाकण ठेऊन ५-७ मिनिटे ठेवा. नंतर झाकण काढून भातीय ( भात वाढायचे ) घेऊन त्यावर अलगद मासा घ्या, दुस-या उलथन्याने हळूच उलटा करून पॅन वर टाका. पुन्हा झाकण ठेऊन ५-७ मिनिटे ठेवा, झाकण घाला.
आता आच बंद करा. हळूच प्लेट मध्ये मासा घ्या. कात्रीने वरचा दोरा कापून टाका, तो प्लेट मधून बाजूला काढा, आणि ताव मारा भरल्या माशावर !
( फोटो नंतर )
भरल्या माशाचा अजून एक कांदा टॉमेटोचा प्रकार आहे तो ही लिहेन
असा सेम भरला मासा माझी एक
असा सेम भरला मासा माझी एक मैत्रीण बनवायची पण ती तो मासा केळीच्या पानात गुंडाळून मग पॅनमधे ठेवायची. कायच्या काय टेस्टी लागायचा तो मासा.
जबरदस्त
जबरदस्त
वाह मस्तच
वाह मस्तच
मस्तच...
मस्तच...
मस्तच!! फोटो प्लिझ अवलतै
मस्तच!!
फोटो प्लिझ अवलतै
भातीय... नवा शब्द मिळाला.
भातीय... नवा शब्द मिळाला.
मस्त एकदम तोंपासु फोटो टाका
मस्त एकदम तोंपासु
फोटो टाका लवकर
कोकणाचे वेध लागलेत त्यामुळे
कोकणाचे वेध लागलेत त्यामुळे माशे आठवताहेत, पण केले नाहीत त्यामुळे फोटो नेक्स टाईम.
नंदिनी हो ग हो. केळीचे पान नाहीतर हळदीच्या पानात तर फारच भारी गेला बाजार कर्डळही चालते. अन मग तेलाला पूर्ण चाट दिलीतरी चालते. चूल, निखारा यात हे ठेवले तर स्वर्गसुखच !
दिनेशदा, टिपिकल सीकेपी शब्द :)... टोप, लंगडी,कालथा, साणशी, कढलं,बुडकुलं, चंबू,...
मस्तच एकदम.. तोंपासु..
मस्तच एकदम.. तोंपासु.. बरे झाले फोटो टाकला नाही ते.
वा मस्तच! तोंपासु.....
वा मस्तच! तोंपासु.....
अवल, तुझी पाकृ वाचताना माझ्या
अवल, तुझी पाकृ वाचताना माझ्या नणंदेच्या हातच्या भरल्या पापलेटाची आठवण झाली. रचाकने फोटो टाकला नाही म्हणून धन्यवाद
भातीय... नवा शब्द
भातीय... नवा शब्द मिळाला.-------खरच!
अवल ,
एकदम मस्तच !
तोंपासु बरे झाले फोटो टाकला
तोंपासु
बरे झाले फोटो टाकला नाही ते.<<<<<+१.
मस्त! अवलताई, कांदा-टोमॅटो चा
मस्त! अवलताई, कांदा-टोमॅटो चा पण प्रकार लवकर लिहा ना!
मी मासे तळताना कधी झाकण ठेवत
मी मासे तळताना कधी झाकण ठेवत नाही. कारण मला वाटते की वाफेचे पाणि त्यात पडेल.
फोटो टाकले तर घरचा पत्ता
फोटो टाकले तर घरचा पत्ता द्यावा लागेल.
अवलचे नाव आणि भरला मासा
अवलचे नाव आणि भरला मासा शिर्षक वाचल्यावर मला भरतकामाचा काही प्रकार आहे असं वाटलं
वा मस्तच. मी मागे अशी भरल्या
वा मस्तच.
मी मागे अशी भरल्या पापलेटची पाकृ टाकली होती.
मी हल्ली जास्त तेल खायचे नाही म्हणून केळीच्या पानात गुंडाळूनच मासे पॅनमध्ये तळते.
वाह ossammm
वाह ossammm