यंदाच्या मातृदिनी माता म्हणजे जन्मदात्री हा दृष्टिकोन न ठेवता मातृत्त्वाची संकल्पना व्यापक करून मातृस्वरुप असणार्या व्यक्तींचा गौरव करून हा मातृदिन साजरा करावा अशी संयोजकांची कल्पना होती. त्या कल्पनेला अनुसरून उपक्रम आखले गेले.
दुधावरच्या सायीप्रमाणे नातवंडांना जपणारी, नातवंडांवर अपार प्रेम करणारी, स्निग्ध हृदयाची आजी हे ही मातृत्वाचचं एक रूप नाही का! तर ही आजीदेखील आता काळानुसार बदलते आहे. स्वतःला कणखर बनवते आहे. काळाच्या पुढे जाऊन विचार करणार्या, कर्तृत्त्ववान आज्यांबद्दल लिहीले जावे ह्या अपेक्षेने उपक्रमाची आखणी केली गेली. 'ग्रँडमॉम्स गोईंग स्ट्राँग!' च्या रूपाने अशी संधी मिळाल्यावर या संधीचे अक्षरशः सोने करीत आपल्या अतिशय तडफदार, आनंदी, जिद्दी, उत्साही, प्रेमळ अशा आज्यांशी अनेक जणांनी परिचय करून दिला. प्रत्येकाच्या मनाच्या एका कोपर्यात कुठेतरी आजीबद्दलच्या असलेल्या सुरेख आठवणींना हे असे शब्दरुपात बांधले गेले आणि त्यातूनच अतिशय प्रेरणादायी, स्फुर्तिदायक असा हा धागा तयार झाला.
आईच्या गैरहजेरीत आईच्या ममतेनं मुलांचे संगोपन करणारे अनेक आधुनिक नंद-यशोदा इथे आपल्याला भेटले. कित्येकांच्या जडणघडणीत ह्या नंद-यशोदांचा देखील मोलाचा वाटा आहे. ह्या उपक्रमाच्या निमित्ताने अशा स्नेहल नंद-यशोदांच्या आठवणींची पुन्हा एकदा उजळणी झाली आणि त्यांच्याबद्दल भरभरून लिहून त्यांच्याप्रती वाटणारी आपुलकी तसेच कृतज्ञता अनेकांना व्यक्त करता येऊन त्या सर्व मातृस्वरूप व्यक्तींचा ह्या मातृदिनी सन्मान केला गेला.
पण असे हे नंद-यशोदा सगळ्यांनाच भेटतात असे नाही. बाळाच्या जन्मानंतर काही वेळेस त्याच्या संगोपनासाठी आईला नोकरी /व्यवसायातून बाहेर पडावे लागते. हा काळ कुणासाठी काही महिने असतो तर कुणासाठी काही वर्षं असतो. या काळात किंवा या काळानंतर परत अर्थार्जन करण्याचा आई जेव्हा विचार करते तेव्हा बाहेर जाऊन नोकरी तर जमणे शक्य नाही पण आपण घरीच आपल्या एखाद्या अंगभूत गुणाचा किंवा कलेचा वापर करून एखादा स्वतःचा व्यवसाय सुरू करावा का असेही विचार मनात येत असतात. पण ह्या सगळ्याची सुरूवात कशी करावी, कुठून करावी ह्याबद्दल संभ्रम असतो. अश्या आयांसाठी खास अनुभवी उद्योजकांकडून मार्गदर्शन व्हावे ह्या हेतूने "आईला उद्योजिका व्हायचंय" हा उपक्रम मांडला गेला. अनेक जाणकारांनी अतिशय छान सविस्तर माहिती दिली. तसेच अनेक उपयुक्त कानमंत्रही मिळाले. परंतु स्वानुभवाचे बोल तिथे येणं जे अपेक्षित होतं त्याबाबत किंचित निराशा मात्र झाली. उदाहरणार्थ, एखादा व्यवसाय मी कसा सुरु केला, पहिले पाऊल कसे उचलले, व्यवसायात काय अडचणी आल्या अणि त्यावर कशी मात केली? भांडवल कसे जमवले त्याचप्रमाणे व्यवसाय करताना एक आई म्हणून काही वेगळ्या अडचणी आल्या का? असल्यास त्या कश्या सोडवल्या? ह्याबद्दल लिखाण यावे असे वाटत होते. अर्थात उपक्रमांचे धागे बंद होणार नसल्याने असे अनुभव नक्कीच वाचायला मिळतील अशी आशा आहे.
''आजोळ'' या अतिशय व्यावसायिक स्वरूप असलेल्या अन् तरीही तेवढयाच मायेने मुलांचं संगोपन करणार्या पाळणाघराबद्दल सर्व मायबोलीकरांना ओळख करून दिल्याबद्दल प्राजक्ता_शिरीन यांना खास धन्यवाद! या मुलाखतीतून बर्याच पालकांना पाळणाघराची निवड कशी करावी याचा अंदाज आला असेल अशी खात्री आहे. त्याचप्रमाणे सौ. मोनिका कुलकर्णी यांनी दिलेल्या सुस्पष्ट अन माहितीपूर्ण उत्तरांतून तसेच प्रकाशचित्रांवरून काहींना पाळणाघर कसे सुरू करावे व ते व्यावसायिकरित्या कसे चालवावे याची देखील प्रेरणा मिळाली असेल.
या मातृदिनाच्या उपक्रमांत सहभागी होऊन लिखाण करणार्या तसेच भरघोस प्रतिसाद देऊन ते यशस्वी करणार्या सर्व मायबोलीकरांचे संयोजक मंडळातर्फे मनःपूर्वक आभार! त्याचप्रमाणे संयोजकांच्या विनंतीस मान देऊन मौलिक मार्गदर्शन करणार्या अनेक उद्योजक मायबोलीकरांचे विशेष आभार!
आणि नेहमीप्रमाणेच संयोजकांच्या मनातील उपक्रम साकार करण्यासाठी तांत्रिक बाजू बळकटपणे सांभाळणारे अॅडमिन यांचे खास आभार!
.
.
सुरेख आयोजन आणि विषय.
सुरेख आयोजन आणि विषय. संयोजकांचे आणि संयुक्ता व्यवस्थापनाचे आभार.
खूप सुंदर उपक्रम. खूप शिकायला
खूप सुंदर उपक्रम. खूप शिकायला मिळाले. very inspiring! thank you
मस्त उपक्रम. संयोजकांचे आभार.
मस्त उपक्रम. संयोजकांचे आभार.
चांगला उपक्रम. हा इथेच न
चांगला उपक्रम. हा इथेच न थांबवता सर्व अनुभवांचे संकलन, थोडेसे पुनर्लेखन इ इ करून पुस्तिका/इ-बुक करता येईल का?
उपक्रम चांगला होता. मला
उपक्रम चांगला होता. मला ग्रँडमॉम्स वाचायला सगळ्यात जास्त आवडलं. एकदम प्रेरणादायी होतं सगळ्यांच्या आज्यांबद्दल वाचणं.
खूप सुंदर उपक्रम.
खूप सुंदर उपक्रम.
सायो +१
सायो +१
छान उपक्रम, संयोजकांचे आभार!!
छान उपक्रम, संयोजकांचे आभार!!
खुप छान
खुप छान उपक्रम!!
ग्रँडमॉम्सबद्दलचा धागा तर एकदम कल्पक होता.
मस्त विषय.
मस्त विषय.
उपक्रम छान झाला, नेमकेच पण
उपक्रम छान झाला, नेमकेच पण सुंदर कार्यक्रम. प्रत्येकाला लिहिता येईल असे विषय आणि मुद्दे होते.
उद्योजिका बाफवर अजून थोडी चर्चा व्हायला हवी होती असे वाटले. आज्जी बाफ आणि यशोदा बाफ दोन्ही आवडले.
वेगळे उपक्रम होते यावेळी
वेगळे उपक्रम होते यावेळी मातृदिनानिमित्य. सगळेच आवडले. सर्व प्रतिसादही उत्तम, त्यामुळे वाचनीय झाले सर्व धागे. धन्यवाद.
उपक्रमाच्या सुयोग्य
उपक्रमाच्या सुयोग्य आयोजनाबद्दल अभिनंदन.
उद्योजिका बाफवर अजून थोडी
उद्योजिका बाफवर अजून थोडी चर्चा व्हायला हवी होती असे वाटले. आज्जी बाफ आणि यशोदा बाफ दोन्ही आवडले. >>> +१
छान उपक्रम. वेळेअभावी सगळं वाचुन झाले नाही. पण एकुणच यावेळेचे सगळेच विषय कल्पक वाटलेत.
उप्क्रम आवडले.
उप्क्रम आवडले.
छान उपक्रम. सौ. कुलकर्णींची
छान उपक्रम.
सौ. कुलकर्णींची मुलाखत आणि आजीचा धागा वाचायला आवडला.
उपक्रम आवडला. संयोजकांचे
उपक्रम आवडला. संयोजकांचे अभिनंदन.