कुर्रम कुर्रुम पोहे

Submitted by वर्षू. on 13 May, 2013 - 21:47
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

दोन मोठ्या वाट्या - जाडे पोहे
पावभर फ्रेश मटर
१ मोठा बटाटा- सोलून, काचर्‍या करून.( फार पातळ नकोत)
दीड इंच / आवडीनुसार आलं
दीड टीस्पून जिरे
१ हिरवी मिर्ची
१ टे. स्पून तूप
हळद, धन्याची पावडर, मीठ - ऐच्छिक

क्रमवार पाककृती: 

एका गॅस वर जाड बुडाच्या भांड्यात कोरडे पोहे टाकून मंद आचेवर कुर्कुरीत भाजायला ठेवा.
गॅस च्या दुसर्‍या शेगडीवर कढईत तूप तापवा.
मग अर्धा टीस्पून जिरे घाला . तडतडले कि त्यावर आलं+ १ टीस्पून जिरे+ हिरवी मिर्ची ची वाटून घेतलेली पेस्ट घाला.
थोडी परतल्यावर हळद्,धन्याची पूड घाला.
नीट परतल्यावर मटर आणी बटाट्याच्या फोडी घाला. नीट परतून झाकण ठेवून वाफेवर शिजवा.
भाजीत थोडंही पाणी घालायचं नाहीये.
भाजी शिजत आल्यावर मीठ घाला.
भाजी पूर्ण शिजेपर्यंत दुसर्‍या शेगडीवरचे पोहे कुरकुरीत होतील.
आता एका खोल बशीत पोहे आणी भाजी न मिसळता ठेवा.. (हे काम खाणारा स्वतःच करेल Happy )
सकाळचा किंवा दुपारच्या चहाबरोबरचा झटपट नाश्ता रेडी!!

वाढणी/प्रमाण: 
दोन जणांकरता
अधिक टिपा: 

बटाटे जर्राशे मोडेस्तोवर शिजवावे. कोरड्या पोह्यात नीट मिक्स करून खाण्यास सोपे होते.
वरून गरमागरम चहा या नाश्त्याची लज्जत आधिकच वाढवतो.

माहितीचा स्रोत: 
कलकत्ता वासी बिहारी मैत्रीण
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

...

थांकु थांकु सर्वांना
सामी..भाजी करताना तूप छानपैकी टाकलं , . कि अप्रतिम चव येते.. Happy
तेल अजिबात नको..

वर्षू ताई
Kind of diet chiwada, rt?
थोडसं तिखट मीठ घातलं की झाला डा चि?
छान आहे कॉम्बो! Happy

असे पोहे छोल्याबरोबरही मस्त लागतात. आवड असेल तर दाणे आणि हिरवी मिरची बारिक चिरून थोड्या तेलात परतून पोह्यावर घ्यायचे.. extra topping.

मी पण बिहारी मैत्रिणीकडेच खाल्ले होते.