माझ्या एका मित्राची व्यथा .....................
मोबाईल फ्रिक्वेन्सी ८०० ते १६०० हि काही जणांना जाणवू शकते. असे लक्षात आले आहे कि मोबाईल फ्रिक्वेन्सी च्या रेडियेशन मुळे शहरातील पक्षी नाहीसे झाले आहेत.मोबाईल च्या रेडियेशन चा आपल्या शरीरावर परिणाम होत असतात. म्हणूनच सांगतात कि फोन वरच्या डाव्या खिशात ठेऊ नका. पेट्रोल पंपावर मोबाईल वापरू नका. कित्येक सेन्सिटिव्ह इलेत्रोनिक वस्तूंच्या जवळ मोबाईल वापरू देत नाहीत.
मनुष्याच्या कानांची आवाज ऐकण्याची क्षमता २० ते २०,००० HZ (Max २० KHz ) असते. मोबाईल हे साधारणतः ८०० ते १८०० MHz (१०,००,००० HZs = १ MHz ) फ्रिक्वेन्सी मध्ये चालतात म्हणजे मनुष्याच्या ऐकण्याच्या क्षमतेपेक्षा फारच जास्त. मोबाईल जर tv जवळ ठेवला तर रिंग येण्याअगोदर कळते....
मोबाईलचे येणारे तरंग मी ऐकू शकतो अशी माझी खात्री पटू लागली आहे. अनेक वेळा मित्रांना बोललोय, तुला आता फ़ोन येतोय आणि त्यांचा फ़ोन वाजतो. हे ऑल द टाईम होत नाही पण या पायात माझं डोकं फ़ुटायची वेळ आली आहे. मी अनेक प्रकारे हे चेक केलं. माझ्या केबिनमधे मी एकटाच असताना मला डोक्यात व्हायब्रेशन्स ऐकू येतात. पण मोबाईलवर काहीही येत नाही. ................
आता हे बराच वेळ सहन केलं की मी मोबाईल बंद करुन बघतो. तेव्हा शांत शांत असतं. मोबाईल सुरु केला की पुन्हा तो डोक्यात जातो ...
पूर्वी मी नुसतंच सहन करायचो आता लक्षात येऊ लागलंय. काही उपाय?
कदाचित Phantom Vibration Syndrome असेल का?
डॉक ला दाखवा..
डॉक ला दाखवा..
अती मोबाईल वापरण्याचे परिणाम
अती मोबाईल वापरण्याचे परिणाम आहेत... गरजेपुरताच वापरणे- वायफळ गप्पांसाठी नको.
त्यातही निळा दात व हेडफोन चा वापर शक्यतो नकोच.
सकाळचा गजर म्हणुन मोबाईल
सकाळचा गजर म्हणुन मोबाईल डोक्याजवळ घेऊन झोपु नये.
रेडिएशनच्या बाबतीत फोन
रेडिएशनच्या बाबतीत फोन मॅन्युअलमध्येच सूचना असतात ना.
>>>> रेडिएशनच्या बाबतीत फोन
>>>> रेडिएशनच्या बाबतीत फोन मॅन्युअलमध्येच सूचना असतात ना. <<<< हो अस्तात की, फक्त त्या सहज वाचता येण्याकरता एक तर तुमच्याकडे जाड बहिर्गोल भिन्ग हवे, अन धीर हवा.
शिवाय त्या सूचनान्मधे, वर मान्डलेल्या प्रश्नाबाबत काहीही नस्ते!
भिडेसाहेब, वापर कमि करणे, अन्गापासून मोबाईल दूर ठेवणे इतपतच उपाय सध्यातरी शक्य दिसताहेत. योग म्हणतो ते देखिल करा.