पालक : एक जुडी
बटाटा : मध्यम. एक किंवा दोन
टोमॅटो : एक
तिखट, मीठ, तूप, जिरे, हिंग, आलंलसूण पेस्ट, गरम मसाला (बादशाहचा नबाबी मटण मसाला)
ही भाजी करायला अतिशय सोपी आणि तरीही अप्रतिम चवीची होते.
पालक धुऊन बारीक चिरून घेणे. बटाटे (सोलून वा न सोलून) मध्यम आकारात चिरून घेणे. टोमॅटो बारीक कापून घेणे.
कढईत (लोखंडी असेल तर उत्तम) चमचाभर तूप घालून, ते गरम झाल्यावर चमचाभर जिरे घालून तडतडून द्यावेत. हिंग घालून त्यावर पालक, बटाटा, टोमॅटो, आल्यालसणाची पेस्ट, तिखट, मीठ, गरम मसाला घालून झाकून ठेवावे. मधेच एकदा काढून जर थोडं पाणी हवं असेल तर घालावे. जरा अंगालगत रस्सा असेल तर भाजी मस्त लागते. पटकन शिजते. सगळे जिन्नस एकाचवेळी घालायचे असल्याने डोक्याला ताप नाही. बटाटे शिजेपर्यंत भाजी शिजवावी. नंतर वाटल्यास बटाटे हलकेच मोडून घ्यावेत म्हणजे जास्तीचा रस्सा असेल तर दाट होतो.
गरमागरम खावी. चपाती, पराठ्याबरोबर मस्त लागते.
१. बटाट्याऐवजी पनीरही घालता येईल. पण ते भाजी शिजल्यानंतर क्युब्ज करून घालावे. पण बटाट्याची चव जास्त मस्त लागते हा अनुभव आहे.
२. छोटे बटाटे सालासकट जराजरा काट्याने टोचून आख्खे घातले तरी मस्त लागतात.
३. मला यात बादशाहचा नबाबी मटण मसाला आवडतो, पण इतर कोणताही आपल्या आवडीचा गरम मसाला चालेल.
४. आल्यालसणाची पेस्ट अनिवार्य आहे.
मामी, करून पाहिली, मस्तं
मामी,
करून पाहिली, मस्तं झाली!
तूपाच्या फोडणीत हिंग-लसुण-तिखट सगळ्याचा स्वाद सही आला !
मी बटाटा आणि लसुण फोडणीत थोडा आधी घातला, मटन मसाला नव्हता म्हणून एव्हरेस्ट रॉयल गरम मसाला टाकला.
फोटो आणि ओरिजनल मटन मसाला वाली रेसिपी नेक्स्ट टाइम, आज इतकी भुक लागली होती, पेशन्स नाही राहिला
पालक-टोमॅटो आणि किडनी स्टोन
पालक-टोमॅटो आणि किडनी स्टोन बद्दल मामींची दुसरी पोस्ट बरोबर वाट्ते.
हे काँबो (ते ही कधी तरी)खाल्याने किडनी स्टोन होत असेल असं वाटत नाही पण ज्यांना त्रास आहे त्यांना हे वर्ज्य सांगतात, माझ्या ओळाखीत आहे काही लोकांनी हे पथ्य.
ज्याना स्टोन आहे, त्यानी खाऊ
ज्याना स्टोन आहे, त्यानी खाऊ नये... पण सर्वानी न खाल्ली तर स्टोन टळेल असे काही नाही... त्यामुळे इतरानी खावी.
मी अशीच करते. फक्त पालक जरा
मी अशीच करते. फक्त पालक जरा उशीरा ताकते. आणी लाल तिखट वापरते. आता मसाला वापरुन पाहिल
मी अशीच करते. फक्त पालक जरा
मी अशीच करते. फक्त पालक जरा उशीरा ताकते. आणी लाल तिखट वापरते. आता मसाला वापरुन पाहिल
मस्त रेसिपी. तुपाच्या फोडणीत
मस्त रेसिपी. तुपाच्या फोडणीत आलं (आणि गरम मसाला) घातलं की मस्त पंजाबी चव येते.
टोमॅटो सूप ला लोण्याची फोडणी करून त्यात फक्त आले, लाल तिखट आणि गरम मसाला परतला की ती चव येतेच.
डायरेक्ट तुपात न घालता कच्चे आले सगळ्या सामग्रीसकट एकदम घातले तर तशी चव येईल का? करून बघते.
चिन्नु, हो टोमॅटो (किंवा ढोबळी मिरची, वांगे ) आणि पालक (लोह) किडनी स्टोनला वर्ज्य पण ते स्टोन झाल्यावर किंवा तशी टेंडन्सी असल्यास. डिपॉझिट्स मुळे. स्टोन मुळात नसेल तर त्यामुळे होत नाही तो.
ंमाझ्या मैत्रिणीच्या वडीलांना
ंमाझ्या मैत्रिणीच्या वडीलांना झाले होते स्टोन्स तेव्हा त्यांच्या डॉक्टर ने टोमॅटोच्या बिया वापरण्यास मनाई केली होती, बियांनीच त्रास होतो.
संघमित्रा, तुपावर आलं
संघमित्रा, तुपावर आलं (अॅक्युअली नुसतं आलं किंवा नुसता लसूण न घालता दोन्हीची पेस्ट करून घाला) घालायचंच नाहीये. भाजी बरोबर सगळे जिन्नस घालायचे आहेत.
आज केली होती ही भाजी. चव मस्त
आज केली होती ही भाजी. चव मस्त आली होती. फक्त गरम मसाला घातला नाही, कारण तो न घालताही बरीच स्पायसी वाटली भाजी. पुढच्या वेळी आले-लसूण पेस्टचे प्रमाण कमी करून गरम मसाला घालून करून पाहणार! भाज्यांच्या लिस्टीत एका वेगळ्या चवीच्या भाजीची भर पडली! थँक्स मामी.
पंजाबी लोकांत दूध, पनीर,
पंजाबी लोकांत दूध, पनीर, पालक, टोमॅटो यांच्या अति वापरामूळे किडनी स्टोन्सचा आजार कॉमन आहे. पण दक्षिणेत, चिंचेच्या वापरामूळे तो कमी असतो.
मामी फोटु आणी रेसेपी पण मस्त.
मामी फोटु आणी रेसेपी पण मस्त. टॉमेटोची आंबटगोड चव पालकाचा तुरटपणा कमी करते, त्यामुळे अनेकदा ही भाजी एका पंजाबी शेजारणीकडुन खाल्लीय, आणी घरी पण प्रयोग झालेत. सर्वसाधारण पणे पंजाबी लोक टॉमेटो आणी दह्याचा जरा जास्तच वापर करतात ना. अमृतसर आठवले २००२ मधले.
मध्यंतरी जुन्या माबोवर पाहुन केली होती,
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/46692.html?1233185303
आता बरेच दिवसांनी तुमची कृती पाहुन परत आठवण आली. खूप धन्यवाद तुम्हाला आणी जुन्या माबोला पण.:स्मितः
बादवे दिनेशजींनी आणी चिन्नुने बरोबर लिहीलेय, पालकात खूप लोह असते, त्यामुळे तो किडनी विकारात जास्त चालत नाही.
ंMast vatatyey paakru. Karun
ंMast vatatyey paakru. Karun baghanaar.
मामी, आज केली भाजी या
मामी, आज केली भाजी या पद्ध्तीनी. छान झाली. मटण मसाला नव्हता. किंचीत चिकन मसाला आणि गरम मसाला घातला. रेसीपी बद्दल धन्यवाद.
आज ह्या पद्धतीने पालक भाजी
आज ह्या पद्धतीने पालक भाजी केली. छान झाली आहे. आवडली.
नेहेमीच्या सवयीने मी तेलाची फोडणी केली. पण लगेच तुपाचे पराठे केले. तसेच सब्जी मसाला (बहुदा एव्हरेस्टचा) घातला. बटाट्याच्या थोड्या जाड काचर्या केल्या. त्यामुळे बटाटे शिजायला कमी वेळ लागुन पालकही फार वेळ शिजवावा लागला नाही.
एकदम सोप्पा वेगळा प्रकार. धन्यवाद मामी!
मामी, काल ही भाजी केली ..
मामी, काल ही भाजी केली .. एकदम सोपी रेसिपी आहे ..
भाजी छान चटपटीत, मसालेदार झाली (नवाबी मटण मसाला न वापरता बादशहा चाच पंजाबी गरम मसाला वापरून) ..
आज मद्रासी बाळकांदे मिळतात ते
आज मद्रासी बाळकांदे मिळतात ते घालून हा पंजाबी पालक केला होता. मस्त पाकृ आहे, सोपी, झटपट होणारी आणि चविष्ट. आता वरचेवर होईल ही भाजी आमच्याकडे.
हे शीर्षक वाचून मला नेहमी
हे शीर्षक वाचून मला नेहमी वाटते की हा धागा पंजाबी parenting बद्दल असावा आणि मुलांचे संगोपन मध्ये हवा.
हे शीर्षक वाचून मला नेहमी
हे शीर्षक वाचून मला नेहमी वाटते की हा धागा पंजाबी parenting बद्दल असावा आणि मुलांचे संगोपन मध्ये हवा. >> +१११ आणि मी नेहमी विचार करते पंजाबी मायबोलीवर 'मराठी मुली' अशी मुगडाळीची मुळयाची भाजी असेल ...
सिमन्तिनी
सिमन्तिनी
मामी आज तुमच्या पद्धतीने भाजी
मामी आज तुमच्या पद्धतीने भाजी केली होती. घरच्यांना खूप आवडली. नवरा फारसा पालेभाज्या खात नाही, पण या पद्धतीने केलेली त्याला आवडली. धन्यवाद परत एकदा.
मामी, आज हि भाजी केली होती.
मामी, आज हि भाजी केली होती. मस्त लागते एकदम लेकीला पण आवडली.
हे शीर्षक वाचून मला नेहमी
हे शीर्षक वाचून मला नेहमी वाटते की हा धागा पंजाबी parenting बद्दल असावा आणि मुलांचे संगोपन मध्ये हवा. >>> रुनी,
सगळ्यांना धन्यवाद.
आज पंजाबी केल शिजणार आहे ..
आज पंजाबी केल शिजणार आहे ..
हा घ्या पंजाबी केल .. ह्याला
हा घ्या पंजाबी केल .. ह्याला आपले म्हणा!
केल केलं का??? छान. फक्त जरा
केल केलं का??? छान. फक्त जरा सुकं वाटतंय.
मामी, हो केल केलं .. माझ्या
मामी, हो केल केलं ..
माझ्या निरिक्षणात केलला अंगचं पाणी थोडं कमी असेल असं वाटतं पालकापेक्षा खखोदेजा ..
आणि माझ्या हातून पाणीही कमी झालं असेल .. पण केलच्या उग्र चवीला ही रेसिपी फारच आवडली ..
बरं बरं. मी म्हटलं केल केलं
बरं बरं. मी म्हटलं केल केलं तं केलं जरा ओलं केलं असतंस तर.....
पंजाबी केळ ? नक्की काय असतं
पंजाबी केळ ? नक्की काय असतं ते ?
पंजाबी केळ ? >> आता इंग्रजीत
पंजाबी केळ ? >> आता इंग्रजीत लिहाव तर पंजाबी काळे अस कुणी वाचेल. सशल, हे केल कशाला केल?
अवांतर जाऊ दे; भाजी छान दिसतीये, सरसो सारखी लागली का??
Pages