१ कप कणिक (गव्हाचे पीठ),
१ कप रवा (बारीक / मधम),
१ टेबलस्पून ऑलिव्ह ऑइल किंवा साधं तेल
चवीला मीठ,
कोमट पाणी
पास्ता हा हल्ली बर्याच घरात आठवडा पंधरा दिवसातुन होणारा पदार्थ. आमच्या घरीही लेक आणि मी पास्ता फॅन्स. अत्तापर्यंत मी नेहमी फ्रेश पास्ता विकत आणत होते पण परवा म्हंटल घरी करुन पहावा.... आणि जमला की हो कणिक, रवा हे आपल्या घरचेच चांगल्या प्रतीचे घटकपदार्थ वापरल्यामुळे पौष्टिक आणि गॅरंटीड!
करुन बघा... सोपा आहे
कृती:
१. कणिक + रवा + मीठ एका बोल मधे घ्या. मधे खळगा करुन त्यात ऑऑ/तेल घाला. हाताने जरा एकत्र करुन घ्या आणि सर्व एकत्र गोळा होईतो थोडे थोडे कोमट पाणी घाला.
२. ओट्यावर थोडे पीठ/मैदा भुरभुरुन त्यावर हा गोळा ठेवा आणि हलक्या हाताने मळा - फार घट्ट नको किंवा अगदी सैल ही नको.
३. साधारण ७-१० मिनीटे मळुन घ्या. तयार गोळा हाताला स्मुथ लागला पाहिजे.
४. हा गोळा क्लिंग रॅप्/प्लॅस्टिक रॅप मधे गुंडाळुन कमीत कमी २० मिनीटे बाजुला ठेऊन द्या. थोडावेळ जास्त राहिला तरी हरकत नाही.
प्रकार १:
५. आता या गोळ्याचे २ भाग करा. एक भाग परत रॅप मधे गुंडाळुन ठेवा. गोळा आणि परत थोड्या पीठावर हलका मळुन घ्या आणि लाटायला घ्या.
६. पोळी लाटताना लाटणे थोडे दाबुन लाटा. आणि प्रत्येकी ३ वेळा लाटल्यानम्तर पोळी अर्धी फिरवा.
७. मधुन मधुन लागेल तसे थोडे पीठ भुरभुरवा म्हणजे पोळी ओट्याला चिकटणार नाही. अश्याप्रकारे लाटत लाटत पातळ पोळी लाटुन घ्या.
८. या पोळीला १/३ भागात दुमडुन परत एकदा मधे दुमडा. प्रत्येक वेळेस दुमडताना थोडे पीठ भुरभुरवा. अशी गुंडाळी बनवुन घ्या.
९. या गुंडाळीला आता पीठ लावलेल्या सुरीने किंवा कातण्याने कापुन घ्या. अश्याच प्रकारे दुसर्या गोळ्याची पोळी लाटुन घ्या आणि तुकडे करा.
१०. पास्ताच्या पट्या अलगद उलगडुन पीठ पसरलेल्या ट्रेमधे ठेवा.
११. पातेल्यात भरपूर गरम पाणी त्यात थोडे मीठ घालुन उकळायला ठेवा. कापलेल्या पट्ट्या त्यात हलकेच सोडा.
१२. पास्ता शिजला की हलक्या हाताने पाण्यातुन काढुन निथळुन घ्या. आणि आपल्या आवडत्या सॉस बरोबर खा
हा लेकीसाठी केलेला 'चीझी पास्ता'.
प्रकार २:
जास्त वेळ नसेल तेव्हा पुढिल प्रकारे पास्ता करता येइल.
- रॅप मधुन काढलेल्या गोळ्याची साधारण पराठ्या इतकी किंवा किंचीत थोडी अजुन जाड पोळी लाटुन घ्या
- या पोळीचे धारधार सुरीने/ कातण्याने अरुंद पट्ट्या कापुन घ्या.
- आणि वरच्या स्टेप्स ९ ते १२ प्रमाणे पास्ता शिजवुन घ्या.
हा 'बेसिल चेरी टोमेटो कॅप्सिकम पास्ता'. यात वापरलेले बेसिल, चेरी टोमेटोज आणि कॅप्सिकम घरच्या बागेतले त्यामुळे हा पास्ता अगदी फ्रेश फ्रॉम फार्म पास्ता आहे
आवडीप्रमाणे यावर पार्मजान चीझ वगैरे घालुन खावे
- इथे लिहीलय ते वाचुन खुप खटपट लागेल असं वाटतं पण करायला लागलं की पटापट होतो हा पास्ता... स्पेशली 'प्रकार २' अगदीच पटकन होतो.
- माझ्याकडे पास्ता प्रेस नाही... म्हणुन मी लाटुन केला आहे. ज्या पुस्तकातुन रेसिपी घेतली त्यात पास्ता प्रेस वापरले आहे.
- मधे जेव्हा २०-२५ मिनीटे गोळा गुंडाळुन ठेवायचा असतो तेव्हा पास्ता सॉस बनवुन ठेवता येतो... पास्ता शिजला की लकेच सॉस मधे आणि लगेच प्लेट मधे आणि लगेच पोटात
पुन्हा वर आल्यामुळे, पास्ता
पुन्हा वर आल्यामुळे, पास्ता असल्यामुळे पुन्हा उघडला बीबी.
लाजो, माझी सोप्पी रेसिपी शेअर करु? तुला आवडतेय का बघ.
वर केला आहेस तसा लिंग्विनी, फेटुचिनी पास्ता करुन शिजवून घे. रंगीत भो मि आणि झुकिनी चौकोनी चिरुन घे. लसणीच्या चकत्या करुन घे. ऑऑमध्ये लसूण परतून, भो मि परतून घे. त्यावर मीठ, पास्ता सिझनिंग,ड्राय बेझील वगैरे घालून मऊ होईस्तोवर शिजव. त्यावर जरा मऊ टोमॅटॉ चौकोनी तुकडे करुन घाल. झाकण घालून शिजव. जरा रस आटला की शिजवलेला पास्ता घालून मिक्स करुन सर्व्ह करताना चीज घालून दे. तिखटाकरता क्रश्ड रेड पेपर घालता येईल.
छान रेसिपी सायो ट्राय
छान रेसिपी सायो
ट्राय करेन.
पास्ता प्रकार, पास्ता सॉस इ...तंत्र, मंत्र आणि पाककृती कल्पना
इथे पण चिकटवशिल का ही वरची रेसिपी प्लिज?
सायो छान आहे रेसिपी, आज करुन
सायो छान आहे रेसिपी, आज करुन बघेन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी लाजोच्या methodनी होममेड
मी लाजोच्या methodनी होममेड पास्ता करून पाहिला. पण माझा पास्ता नुसत्या मीठाच्या पाण्यात घालुन शिजत नाहिये. त्यामुळे मी शेवटी सरळ कूकरमधून काढला... पण मला काय गोंधळ होतोय समजत नाहिये...कुणाला असा प्रोब्लेम आला आहे का? काय चुकत असेल?
Pages