अब आप सुनने जा रहे है...
फिल्म नौजवान का ये गीत.. जिसे संगीत दिया है.. एस डी बर्मनने...
... और गीतकार है...
.... साहिर लुधियानवी...
ठंडी हवाये... लहराके आये..
================================================
ऑल इन्डिया रेडिओला 'गीतकारांचे नांव तुम्ही सांगायलाच हवेत' हा आग्रह धरून तो मान्य करायला लावणारा, एस डी बर्मन बरोबर आयुष्यातील परमोच्च यशाचा काळ घालवल्यानंतर त्यांच्यापासून विभक्त होणारा, जगातील इतर लोकांवर निस्सीम प्रेम करणारा, अमृता प्रीतम बरोबरील प्रेमप्रकरण गाजवणारा, गुरुदत्तच्या प्यासामधील गीते रचणारा, मद्यपान आणि धूम्रपान यात आयुष्य फेकून देणारा..
.... आणि... यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोचल्यानंतर 'लता मंगेशकरांनी' घेतलेल्या मानधनापेक्षा एक रुपया कायम जास्त मानधन'च' घेणारा...
साहिर लुधियानवी हा शायर आपल्या सर्वांनाच चित्रपट गीतकार म्हणून अधिक परिचित आहे.
अमृता प्रीतम 'साहिरने ओढलेल्या' सिगारेट्सची थोटके पेटवून स्वतः ओढायची. साहिरच्या मृत्यूनंतर तिचे असे म्हणणे होते की 'आता ती ओढत असलेल्या सिगारेटचा धूर ज्या जगात साहिर पोचला आहे तिथे पोचत असणार'!
जो वादा किया वो निभाना पडेगा, कभी कभी मेरे दिल मे, चलो इक बार फिरसे अजनबी बन जाये हम दोनो, तुम न जाने किस जहांमे खो गये अशी अजरामर गीते साहिर यांनी लिहिलेली होती.
अगदीच लहान असताना त्यांची परिस्थिती फार बिकट झाली होती. वडील अय्याश होते. ते एक लग्न झालेले असूनही वारंवार लग्न करायचे. साहिरच्या आईने शेवटी वैतागून साहिर यांच्यासकट घर सोडले. घटस्फोटही झाला. मात्र 'साहिर माझ्याकडे राहिला पाहिजे' ही मागणी वडिलांनी इतकी पराकोटीला नेली की ते साहिरच्या आईला म्हणाले 'हा जर माझ्याकडे आला नाही तर मी याला मारून टाकेन, तुझ्याकडेही राहणार नाही हा'!
पण काही परिचितांनी सतत साहिलवर लक्ष ठेवले व काही दिवसांनी त्यांच्या वडिलांनी तो नाद सोडून दिला. साहिरला घेऊन आई ज्या गरीब वस्तीत राहायला आली होती तिच्या शेजारून रेल्वे जायची. रेल्वेगाडी आली की छोटा साहिर आईला बिलगायचा कारण सपूर्ण वस्तीच थडाथडा हालत असायची. साहिर खूप घाबरायचा. खरे तर अत्यंत चांगल्या परिस्थितीत जन्माला आलेल्या साहिरच्या नशीबात ही गरीबी वडिलांमुळे आली. आणि याची आठवण ठेवून साहिरने स्वतःच्या आईला कधीही अंतर दिले नाही.
साहिर यांनी शिक्षण घेऊन काही काळ दिल्लीत राहून मग मुंबईकडे मोर्चा वळवला. प्राचार्यांच्या हिरवळीवर एका मुलीसोबत बसल्यामुळे त्यांना कॉलेजमधून काढूनही टाकलेले होते. साहिर यांच्या आयुष्यात अनेक प्रेमिका आल्या. मात्र त्या सर्वांमध्ये 'अमृता प्रीतम' हे नांव सर्वात वर!
इन्द्रकुमार गुजराल यांना भर मैफिलीत सरकारच्या निष्क्रीयतेवर सडेतोड प्रतिक्रिया देणारे साहिर हे एक बेफिकीर व्यक्तीमत्व होते.
साहिर लुधियानवी - लुधियाना हे त्यांचे जन्मगाव! अब्दुल हयी हे त्यांचे मूळ नांव! लुधियानावर त्यांचे अतोनात प्रेम होते, मात्र या गावात त्यांची फारशी कदर केली गेली नाही. मात्र नौजवान आणि प्यासा या हिंदी चित्रपटांनंतर साहिरने अख्ख्या भारतालाच वेड लावले. आओ की कोई ख्वाब बुने ही त्यांची कविता अत्यंत सुंदर! तल्खिया, परछाईया व अनेक काव्यसंग्रह त्यांनी लिहिले. साहिर यांचे काव्य उच्च दर्जाचे असूनही सुप्रसिद्ध असायचे व आहे. ही दोन टोके जमवणे अनेक कवींना अवघड जाते. गुलजार हे साहिल यांचे काही काळ रूममेट होते असे म्हणतात. सुरुवातीच्या काळात हलाखीची परिस्थिती आणी नंतर पैशाचा नुसता धबधबा यामुळे त्यांचे आयुष्य बरेचसे अनियंत्रीत स्वरुपाचेच होते. त्यांनी आयुष्यात लग्न केले नाही. मात्र या व्यक्तीमत्वावर आणि त्यांच्या काव्यावर अनेक स्त्रियांनी जान कुर्बान करण्यापर्यंत प्रेम केले हे मात्र खरे!
साहिर यांच्या काव्यापैकी काही मला आवडलेल्या ओळी आपल्या आस्वादासाठी!
================================================
भारत पाकिस्तानमधील युद्धाबाबत रचलेली कविता -
खून अपना हो या पराया हो
नस्ले-आदम का खून है आखिर
जंग मशरिक मे हो कि मगरिब मे (मशरिक = पुर्व, मगरिब = पश्चिम)
अम्ने-आलम का खून है आखिर (अम्ने-आलम = विश्व शान्ती)
बम घरोंपर गिरे के सरहदपर
रूहे-तामीर जख्म खाती है (रूहे-तामीर = निर्मीतीचा आत्मा)
खेत अपने जले कि औरोंके
जस्ति फाकोंसे तिलमिलाती है (जस्ति - जीस्त = जीवन)
इस लिये ए शरीफ इन्सानो
जंग टलती रहे तो बेहतर है
आप और हम सभीके आंगनमे
शम्मअ जलती रहे तो बेहतर है
============================================
२६ जानेवारी या दिवसाबाबत रचलेली कविता -
आओ कि आज गौर करे इस सवाल पर
देखे थे हमने जो वो हसी ख्वाब क्या हुवे
दौलत बढी तो मुल्कमे इफ्लास क्यों बढा? (इल्फास = गरीबी)
खुशहालिए-आवाम के असबाब क्या हुवे? (खुशहालिए-आवाम = लोक संपन्न झाले, असबाब = कारणे)
(म्हणजे 'लोक इतके संपन्न कसे काय झाले? नक्कीच कोणतेतरी लोक गरीबीच्या खाईत ढकलले गेल्यामुळे असणार)
जो अपने साथ साथ चले कू-ए-दार तक कू-ए-दार - फाशीची कोठडी)
वो दोस्त वो रफीक वो अहबाब क्या हुवे ( रफीक - मित्र, अहबाब = साथीदार)
क्या मोल लग रहा है शहीदोंके खून का
मरते थे जिनपे हम वो सजायाब क्या हुवे? (सजायाब = शिक्षा झालेले)
बेकस बरहनगीको कफनतक नही नसीब (बरहनगी - नग्नता, नग्न प्रेताला कफनही मिळत नाही आहे)
वो वादा-हाए-अतलसो कमख्वाब क्या हुवे (महागडी वस्त्रे पुरवण्याची आश्वासने)
जमहूरियत-नवाज, बशर-दोस्त, अम्न ख्वाह
खुदको जो खुद दिये थे वो अल्काब क्या हुवे
(जमहुरियत = लोकशाही, बशर-दोस्त = मानवतावादी, अम्नख्वाह = शांतताप्रिय, अल्काब = पदव्या)
ही वरील द्विपदी सुंदर आहे.
स्वतःलाच स्वतः दिलेल्या या पदव्या, जसे लोकशाहीवर विश्वास ठेवणारे, मानवतावादी, शांतताप्रिय, या पदव्यांचे काय झाले??
मुजरिम हूं मै अगर तो गुनहगार तुमभी हो
ए रहबराने-कौन खताकार तुम भी हो (रहबराने-कौम = नेत्यांनो, खताकार = चुकीचे)
==============================================
जश्ने-गालिब
इक्कीस बरस गुजरे आजादीए-कामिल को (स्वातंत्र्याला)
तब जाके कही हमको गालिबका खयाल आया
तुर्बत है कहा उसकी, मस्कन था कहा उसका (तुर्बत = कबर, मस्कन = निवास)
अब अपने सुखन-परवर जहनोंमे सवाल आया (कविताप्रेमी मनांमध्ये)
सौ सालसे जो तुर्बत चादरको तरसती थी (ज्या कबरीवर चादर नव्हती)
अब उसके अकीदतपे फुलोंकी नुमायश है (श्रद्धेच्या फुलांच्या माळा)
उर्दू के तअल्लुकसे कुछ भेद नही खुलता (उर्दू भाषेचा तर काही संबंध दिसत नाही.. मग....)
ये जश्न, ये हंगामा, खिदमत है कि साजिश है? (हा सोहळा एखादी वाईट योजना तर नाही?)
जिन शरओंमे गुंजी थी गालिब की नवा बरसो (नवा = आवाज)
उन शहरोमे अब उर्दू बेनामोनिशां ठहरी (उर्दूचे अस्तित्व संपले)
आजादिए-कामिल का ऐलान हुवा जिस दिन (स्वातंत्र्याची घोषणा)
मातूब जबां ठहरी, गद्दार जबां ठहरी (मातूब = शापीत, गद्दार = फितुरांची, अप्रामाणिकांची)
जिस अहदे सियासतने ये जिंदा जबां कुचली (अहदे सियासत = राजकीय युग, जबां = भाषा)
उस अहदे सियासत को मरहूमोंका क्या गम है? (मरहूम = मृत)
गालिब जिसे कहते है, उर्दूही का शायर था
उर्दूपे सितम ढाकर गालिबपे करम क्यों है? (भाषेला काहीच महत्व नाही, फक्त गालिबलाच महत्व??)
ये जश्न ये हंगामे दिलचस्प खिलौने है (हे सोहळे म्हणजे खेळणी आहेत)
कुछ लोगोंकी कोशिश है, कुछ लोग बदल जाये (काहींच्या मते काहींना 'बहकवू शकणारी')
जो वादाए-फर्दापर अब टल नही सकते है (आश्वासनांवर तर आता जनता शांत होत नाही)
मुमकिन है कुछ अर्सा इस जश्नपे टल जाये (या सोहळ्यातच तिला रमवा थोडा वेळ)
ये जश्न मुबारक हो, पर ये भी सदाकत है (सदाकत = सत्य)
हम लोग हकीकतके अहसाससे आरी है (सत्याच्या जाणीवेमुळे शरमलेले)
गांधी हो कि गालिब हो, इन्साफ की नजरो में
हम दोनो के कातिल है, दोनोंके पुजारी है
=======================================
गझलचे काही शेर
मै जिंदा हू ये मुश्तहर कीजिये (मुश्तहर - जाहिरात)
मेरे कातिलोंको खबर कीजिये
जमी सख्त है आस्मां दूर है (जगात अन्याय आहे, स्वर्ग फारच दूर आहे)
बसर हो सके तो बसर कीजिये (जगता आलं तर जगा)
सितमके बहुतसे है रद्दे-अमल
जरूरी नही चष्म तर कीजिये
(म्हणजे अत्याचारांना कशी प्रतिक्रिया द्यायची याचे अनेक प्रकार आहेत, दर वेळेस डोळ्यात पाणी आणलं पाहिजे असच काही नाही)
देखा है जिंदगीको कुछ इतने करीबसे
चेहरे तमाम लगने लगे है अजीबसे
(या शेरात 'चेहरे' हा शब्द जसा उच्चाराप्रमाणे मात्रांमध्ये बसलेला दिसत आहे तसा आपण मराठीत घेत नाही. या आघाडीवरच उर्दूत अनेक शेर सहज सोपे होऊन जातात.)
इस तरहा जिंदगीने दिया है हमारा साथ
जैसे कोई निबाह रहा हो रकीबसे (रकीब - शत्रू, प्रेमातील प्रतिस्पर्धी जो त्याच प्रेयसीवर भाळलेला असतो)
=========================================
परछाईयाँ -
जवान रात के सीने पे दूधिया आँचल
मचल रहा है किसी ख्वाबे-मरमरी की तरह
हसीन फूल हसी पत्तियाँ हसी शाखे
लचक रही है किसी जिस्मे नाजनी की तरह
फिजा मे धुल से गये है उफक के नर्म खुतूत (क्षितीजाच्या रेखा)
जमी हसीन है ख्वाबो की सरजमी की तरह
तसव्वुरात की परछाईयाँ उभरती है (तसव्वुरात - कल्पना)
कभी गुमान की सूरत, कभी यकीं की तरह (गुमान - घमेंड)
तुम आ रही हो जमाने की आंखसे बचकर
नजर झुकाये हुवे और बदन चुराये हुवे
खुद अपने कदमो की आहटसे झेंपती, डरती
खुद अपने साये की जुंबिश से खौफ खाये हुवे (जुंबिश - हालचाल)
तसव्वुरात की परछाईयाँ उभरती है
रवाँ है छोटीसी कश्ती हवाओं के रुखपर
नदी के साजपे मल्लाह गीत गाता है
तुम्हारा जिस्म हर इक लहर के झकोले से
मेरी खुली हुई बाहोंमे झूल जाता है
तसव्वुरात की परछाईयाँ उभरती है
=====================================
साहिर लुधियानवी (१९२१ - १९८०) एका रात्री हृदयविकाराच्या तीव्र आघाताने परलोकवासी झाले.
मै पल दो पल का शायर हूं
पल दो पल मेरी कहानी है
पल दो पल मेरी हस्ती है
पल दो पल मेरी जवानी है
असे म्हणणारे साहिर खरे तर 'पल दो पल' च्या सीमेतून बाहेर येऊन अमर झालेही!
मात्र तरीही... त्यांच्या जीवनबद्दल त्यांचे स्वतःचे म्हणणे त्यांच्याच शब्दात त्यांनी एका ओळीत लिहिलेले आहे..
ती ओळ लिहून 'सुखनवर बहुत अच्छे' चा हा दुसरा भाग संपवतो.
'ख्वाबों के आसरे पे कटी है तमाम उम्र'
धन्यवाद!
-'बेफिकीर'!
===========================================
शब्दार्थांसाठी अतिशय आभारी
शब्दार्थांसाठी अतिशय आभारी आहे. खूप खूप धन्यवाद.
जरासा शब्दश: होतोय हो अनुवाद. अजून हात फिरवावा लागेल. (शिष्टपणा म्हणून नाही म्हणत आहे. जेन्युईनली म्हणते आहे. कवितांचा अनुवाद करणे हे तसे फार जिकीरीचे काम आहे हे अगदीच मान्य.)
नाही नाही, सहज केला होता. नीट
नाही नाही, सहज केला होता.
नीट करायचा म्हंटला तर एक तर जमीन तरी वेगळी घ्यावी लागेल किंवा गद्य तरी करावा लागेल.
शराबी मधील अमिताभचे गाणे आपल्याला माहीत असेलच!
'नशा शराबमे होता तो नाचती बोतल'
किंवा दुसरे गाणे..
'हमे तो लूटलिया मिलके हुस्नवालोंने'
या वृत्तात 'कभी कभी' आहे.
मागे मी या वृत्तात एक गझल रचली होती.
भिकार डाव चला काव्य सावकार करू
उरू मरून, कहाणी सदाबहार करू
मनास दोनच पर्याय, सांग काय करू?
तुझा विचार करू की तुझा विचार करू?
पण हे वृत्त मराठीत निभवायला किंचितसे अवघड जाते. कारण मराठी भाषाच तशी आहे.
आपल्या प्रतिसादासाठी आभारी आहे. (अवांतर माहिती दिली ते बाजूला!)
-'बेफिकीर'!
@रैना.. @बेफिकिर, खूप छान..
@रैना..

@बेफिकिर,
आपण अजुन छान कराल याची खात्री आहे.. 
खूप छान.. मस्तच जमलय..
वाह... सुरेख लेख आणि त्यावरचे
वाह...
सुरेख लेख आणि त्यावरचे प्रतिसादही तेवढेच अप्रतिम
सुरेख!!
सुरेख!!
मस्त मस्त जमलीय ही
मस्त मस्त जमलीय ही भट्टी....
<<<<सुरेख लेख आणि त्यावरचे प्रतिसादही तेवढेच अप्रतिम>>>> +१००
बेफीजी मस्त भषान्तर उर्दूचा
बेफीजी मस्त भषान्तर
उर्दूचा लहेजा आणि मराठीचा बाज दोन्हीही मस्तच साधलेलय
त्रिवार मुजरा स्वीकाराच ............
क्याबात!! क्याबात ! क्याबात !!
जिथे सरळ्सरळ भषान्तर आडचणि चे तिथे असे करावेच लागणार.............हेच बरोबरय मला तरी पटतय बुवा १००%
मनस्मि १८ यांच्या लेखामुळे या
मनस्मि १८ यांच्या लेखामुळे या लेखाची आठवण होऊन हा लेखही वर आणला
बेफिकीर राव!!! आपण सनम पुन्हा
बेफिकीर राव!!!
आपण सनम पुन्हा लिहायला घेणार आहात का? खर काय ते सांगा.
आम्हाला उगाच आशेवर थेऊ नका.
धन्यवाद!!!
बाजीराव मेंगाणेंच्या
बाजीराव मेंगाणेंच्या कवितेमुळे साहिरवरील या लेखातील जश्ने-गालिब कविता आठवली.
बेफिकिर, आताच पहिले..
बेफिकिर,
आताच पहिले.. धन्यवाद.
निवडक १०त
तसव्वुरात की परछाईयाँ उभरती
तसव्वुरात की परछाईयाँ उभरती है ..
अप्रतिम परिचय.अमृताजींच्या रसिदी टिकट मधून साहिरच्या पडछाया जाणवल्या होत्या त्या या लेखात सुस्पष्ट झाल्या.धन्स.
Pages