राजस्थानी भरली भेंडी

Submitted by वर्षू. on 11 April, 2013 - 23:48
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

अर्धा किलो कोवळ्या भेंड्या
भाजक्या जिर्‍याची पूड, शोपेची पूड, धन्याची पूड्,थोडं अमचूर
थोडा गरम मसाला ,हळद्,तिखट्,मीठ- अंदाजे आणी आवडीनुसार प्रमाण घेणे
फोडणी करता तेल
लहान चमचा कलौंजी
१ टेबल स्पून बेसन
लहान कांदे-२,३

क्रमवार पाककृती: 

१) सर्व मसाला ( कलौंजी + कांदे वगळून) नीट एकत्रित करून भेंड्यांमधे भरून घ्या. उरलेला मसाला बाजूला राहू द्या.
२) तेल गरम करून फोडणीत कलौंजी टाका.
वरून कांदे घालून जरा वेळ परतून बेसन घाला.. बेसन मंद आचेवर खरपूस गुलाबी रंगावर भाजा.
३) आता भेंड्या अ‍ॅड करा. उरलेला मसाला ही वरून टाका. कोरड्या वाटल्यास अजून तेल ही अ‍ॅड करा.
४) थोड्या परतून , मंद आचेवर झाकण ठेवून शिजवा.
५) मधून मधून हलक्या हाताने परता..

गरम फुलक्यां बरोबर आणी कोशिंबीरी सोबत सर्व करा..

वाढणी/प्रमाण: 
तीन जणांकरता
अधिक टिपा: 

हलक्या हाताने न परतल्यास अश्या दिसतील तुमच्याही भेंड्या Proud

माहितीचा स्रोत: 
संजीव कपूर
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी भेंडी इथेच करून बघणार. तिथे आलो तर ओन्ली ऑथेंटिक चायनीज स्पेशल रेसिपीज. उत्तर भारतातील 'चिंजाबी' (चायनीज पंजाबी श्टाईल) खाऊन कंटाळलोय. Happy

भेंडी ऑल टाईम फेव्हरेट .मस्त आहे रेसिपी. फोटो तोंपासु Happy

अर्धा किलो भेंडीची भाजी पंधरा मिनिटांत होईल ? मला भेंडी चिरायलाच तेवढा ( किंवा थोडा जास्तच ) वेळ लागेल. मग प्रत्येक भेंडीत मसाला भरायचा म्हणजे अजून खूप वेळ. तासाच्या आत काही होत नाही माझी अशी भाजी. तासाभरात भाजी-पोळी-भात-आमटीचा सगळा स्वयंपाक उरकतो असं म्हणणार्‍यांबद्दल मला फार आदर वाटतो.

भेंडीची भाजी झाकण ठेवून शिजवायची नाही नाहीतर भाजीला तार येते अशी एक अधोरेखित करुन सांगितलेली टिप लक्षात आहे त्याप्रमाणे भेंडी नेहेमी परतूनच शिजवली आहे. ह्यात तर आंबटपणासाठी लिंबू, चिंच, आमचूर असेही काही नाही. आता एकदा झाकण ठेवून शिजवून पाहायला हवी Happy

अमेय.. ये चिंजाबी स्टाईल क्या है... बाप्रे चायनीज्+पंजाबी?? तौबा!!तौबा!!! Lol
आश्चर्य वाटेल ऐकून पण इथे चायनीज लोकं भेंडीला रानटी भाजी म्हणून अजिबात डिसकार्ड करतात..
इतर रानटी प्राणी जेवणात चालत असले तरी .. Happy

अगो.. भेंडीवर झाकण टाकून शिजवणे मलाही जर्रा खतरनाक वाटलेलं आधी.. पण या भाजीत तेल थोडं जास्त असल्याने त्या तारा बिरा अजिबात सुटत नाहीत..

मस्त फोटो. क्या याद दिलाई, आता करतेच. Happy
अगो, आमचा कुक यात आमचूर पावडर घालायचा आणि झाकण न ठेवता शिजवायचा. :).
इंद्रधनू, मी पण ही भाजी मुलींना देताना बाईट साईज मधे कापून द्यायचे. कारण कोवळ्या घेतल्या तरी वातड व्हायच्या नाहीत पण सहज तोडता येत नसत, पोळीबरोबर बाईट साईज करायला गेलं की मसाला बाहेर येऊन भेंड्या पचकत असत. Happy

मवा.. यू आर राईट..
थोडं अमचूर
थोडा गरम मसाला हे दोन इन्ग्रेडिएंट्स राहीले लिहायचे.. आता अ‍ॅड केलेत Happy

इथे चायनीज लोकं भेंडीला रानटी भाजी म्हणून अजिबात डिसकार्ड करतात..
इतर रानटी प्राणी जेवणात चालत असले तरी .. >>> हाहाहा

मस्त आहे रेसिपी आणि सोपी पण.

जो -एस .. तू भी??? Happy
चिन्नु, दाण्याच्या कुटानं , राजस्थानी भेंडीला बहुतेक मराठी टच येईल.. Wink

आश्चर्य वाटेल ऐकून पण इथे चायनीज लोकं भेंडीला रानटी भाजी म्हणून अजिबात डिसकार्ड करतात..
इतर रानटी प्राणी जेवणात चालत असले तरी .. >>>> एकदम गागुच्काच की! Proud

मस्त, भेंडी आवडती त्यामुळे करून पाहणारच

माझ्याहि मनात हाच विचार आला. पण कोवळ्या भेंड्या कुठल्या नि वातड कुठल्या हे कसे समजणार? शिवाय घरात बेसन कुठले, मैदा कुठला, शिंगाड्याचे पीठ कुठले हे कळेना. सौ. ला फोन केला तर म्हणे, खबरदार स्वैपाकघरात काही लुडबूड कराल तर, नसता आवरायला कहार, नि नासाडी.

मी माझी स्वतःची रेसिपी वापरली, (म्हणजे बायकोला सांगणे, हे कर) पण तिने साफ नकार दिला, आधी मला कुणी नव्या रेसिपी शिकवायला नको, नि भेंडी तर मला मुळीच आवडत नाही, मी करणार नाही.

वर राजस्थानचा काय संबंध हे कळले नाही. बहुतेक राजस्थान मधे जाऊन करायची म्हणून राजस्थानी. त्याच न्यायाने, कदाचित् थोडेफार फरक करून, हीच कृती, बंगाली भेंडी, पंजाबी भेंडी यांनाहि लागू पडेल. महाराष्ट्रीयन ही अशीच असते, पण जरा, इतर देशाचे नाव लिहीले, तरच महाराष्ट्रीय खातील.

Light 1

स्लर्प...
मी पन करणार अशी भेंडी..

Pages