Submitted by वर्षू. on 11 April, 2013 - 23:48
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
अर्धा किलो कोवळ्या भेंड्या
भाजक्या जिर्याची पूड, शोपेची पूड, धन्याची पूड्,थोडं अमचूर
थोडा गरम मसाला ,हळद्,तिखट्,मीठ- अंदाजे आणी आवडीनुसार प्रमाण घेणे
फोडणी करता तेल
लहान चमचा कलौंजी
१ टेबल स्पून बेसन
लहान कांदे-२,३
क्रमवार पाककृती:
१) सर्व मसाला ( कलौंजी + कांदे वगळून) नीट एकत्रित करून भेंड्यांमधे भरून घ्या. उरलेला मसाला बाजूला राहू द्या.
२) तेल गरम करून फोडणीत कलौंजी टाका.
वरून कांदे घालून जरा वेळ परतून बेसन घाला.. बेसन मंद आचेवर खरपूस गुलाबी रंगावर भाजा.
३) आता भेंड्या अॅड करा. उरलेला मसाला ही वरून टाका. कोरड्या वाटल्यास अजून तेल ही अॅड करा.
४) थोड्या परतून , मंद आचेवर झाकण ठेवून शिजवा.
५) मधून मधून हलक्या हाताने परता..
गरम फुलक्यां बरोबर आणी कोशिंबीरी सोबत सर्व करा..
वाढणी/प्रमाण:
तीन जणांकरता
अधिक टिपा:
हलक्या हाताने न परतल्यास अश्या दिसतील तुमच्याही भेंड्या
माहितीचा स्रोत:
संजीव कपूर
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आहाहा... कसली तोंपासु
आहाहा... कसली तोंपासु दिसत्येय तयार डिश!!!!
ताजी भेंडी मिळाली तर नक्की करुन बघेन
मला सुद्धा आवडेल खायला
मला सुद्धा आवडेल खायला
वर्षू ताई, कलौंजी म्हणजे
वर्षू ताई,
कलौंजी म्हणजे
म स्त आहे ..भेंडी आवडते
म स्त आहे ..भेंडी आवडते त्यामुळे केलि जाइल ...
मस्त. फोटो तोंपासु
मस्त. फोटो तोंपासु
माधवी. कलौंजी म्हंजे
माधवी. कलौंजी म्हंजे कांद्याच्या बिया.. कोणत्याही ग्रोसरी शॉप मधे विचार..
हो, ही रेसिपी पाहिली तेंव्हाच वाटलं खूप टेस्टी लागेल..
खर्रच, खूप छान लागते...
वर्षू, तिथे चीन मध्ये बरे
वर्षू, तिथे चीन मध्ये बरे राजस्थानी भेंडी!
मी इथे राजस्थानात असून पण मला नाही मिळाली!
मस्त रेसिपी, पण ते कलौजी काय?
अर्र.. कृष्णा.. कलौंजी नही
अर्र.. कृष्णा.. कलौंजी नही पता??? ( आप को पी एस ओ पी नही पता च्या चालीवर वाचणे )
कलौंजी म्हंजे कांद्याच्या बिया..
अर्र.. कृष्णा.. कलौंजी नही
अर्र.. कृष्णा.. कलौंजी नही पता??? >>>
आम्ही त्याला कांद्याच्या बियाच म्हणतो ना!
कलौंजी म्हंजे कांद्याच्या
कलौंजी म्हंजे कांद्याच्या बिया >> मी तर पहिल्यांदाच ऐकले. फोटो आहे का कशा दिसतात बघायला?
मस्त.
मस्त.
माधवी, ही बघ कलौंजी-
माधवी, ही बघ कलौंजी- कांद्याच्या वाळक्या बिया .. गरम मसाल्याच्या विभागात सापडतील
बंगाली जेवण आणी त्यांची लोणची कलौंजी बिना अधुरी असतात..
वॉव थॅन्क्स वर्षू ताई. माझ्या
वॉव थॅन्क्स वर्षू ताई. माझ्या ज्ञानात भर पडली. आता मी बघते! बंगाली लोणची पण बघते
मस्त, भेंडी आवडती त्यामुळे
मस्त, भेंडी आवडती त्यामुळे करून पाहणारच
थोडं बेसन परतुन घाल्ते मी,
थोडं बेसन परतुन घाल्ते मी, नाहीतर फार तेलकट वाटते.
ह्यात भरा भरी नको अस्ले तर भेंडीचे पातळ काप करुन तळुन घ्यावे,, आणि बाकी मसाला वरुन घालावा!
कंदा अन भेंडी बरोबरीने घेतल्यास "भेंडी दो प्याझा"
वर्षु ऐन जेवणाच्या वेळेला
वर्षु ऐन जेवणाच्या वेळेला कसले गं हे तोंपासु फोटो टाकतेस? कुफेहेपा?
मस्त अहे... एकदम... नेक्स्ट भारत वारीत माझ्या घरी करून दे मला...
अजुन एक टीपः मी भेंडीचे बाईट
अजुन एक टीपः मी भेंडीचे बाईट साईज कट करते.. नाहीतर पोळीशी खतान भयानक वात्तड प्रकार होतो. तुटता तुटत नाही भेंडीचा तुकडा.
इन्द्रधनु, बेसन परतायचेच आहे
इन्द्रधनु, बेसन परतायचेच आहे खमंग..
दक्षी, सोने नक्की नक्की नक्की.... वादा !!!!
यम्मी आणि सोपी पाककृती.
यम्मी आणि सोपी पाककृती.
इन्द्रधनु, अगा कोवळ्या
इन्द्रधनु, अगा कोवळ्या भेंड्या लिहिल्यात ना मी त्या च्च घ्यायच्या... वात्तड नै कै
मस्त रेसिपी..
मस्त रेसिपी..
हो खुप छान होते ... मला खुप
हो खुप छान होते ... मला खुप आवडते
वॉव सहीच
वॉव सहीच
वॉव वर्षू मस्त रेस्पी! मी
वॉव वर्षू मस्त रेस्पी!
मी पण अशीच करते. पण कलौंजी नाही वापरत. जनरल स्वयंपाकातच. पण आता मुद्दम आणीन!
आणि हो..............मुझे कलौंजी पता हय!
मस्त प्रकार.. घरी आहेत सगळे
मस्त प्रकार.. घरी आहेत सगळे मसाले. ट्राय करतोच.
( मी तिकडे आलो तर उपाशी राहणार नाही तर ! )
सही रेसिपी. फोटो पण भन्नाट!
सही रेसिपी. फोटो पण भन्नाट!
वॉव! सही आहे तो फोटो. ह्या
वॉव! सही आहे तो फोटो. ह्या प्रकारे करून बघायला हवी भेंडी.
वावा "जान कुर्बान" अगदी !!!!
वावा "जान कुर्बान" अगदी !!!!
मस्त रेसिपी. यात तीळ /
मस्त रेसिपी.
यात तीळ / तिळकूटही मस्त लागतं.
मानुषी दिनेश दा.. नक्की
मानुषी
दिनेश दा.. नक्की नक्की.. बिंदास या... नो डर...
Pages