काजू, आक्रोड व बदाम मिक्सरमधून अर्धे बोबडे ग्राइंड करून घ्या. खजूर स्वच्छ धुवुन घ्या. कोरडा करा. खजुरातील बिया व नाके काढून टाका.
नॉन स्टिक पॅनमध्ये अर्धा चमचा साजुक तूप घालून त्यावर साफ केलेला खजूर घालून १ मिनिट छान परतून घ्या. त्यानंतर १ मिनिट झाकण ठेवा. गॅस बंद करा.
खजूर मायक्रोवेव्हमधेही गरम करू शकता.
खजूर मऊ झालेला असेल. तो थंड होण्याआधी पटकन काजू,बदाम,आक्रोड (हे भरड वाटलेले), बेदाणे, मिल्क पावडर, मारी बिस्किटांचा चुरा हे सर्व घालून हे मिश्रण छान मिक्स करा. हळूहळू हाताने मळून घ्या. चटके बसतील पण .....!
त्या मळलेल्या गोळ्याच्या पोळपाटावर/जाड प्लॅस्टिकवर लोळ्या(दांड्या) करून घ्या. या लोळ्या फ्रिजमध्ये ठेवा. गार झाल्यावर छोटे छोटे तुकडे करा.
करायला खूप सोपा व अत्यंत पौष्टिक असा हा पदार्थ आहे. व ड्राय फ्रूट्स चे प्रमाण थोडे कमी जास्त झाल्यास पदार्थ बिघडत नाही. एकादा इन्ग्रेडियंट नसला तरी चालते. अर्थातच खजूर हा मुख्य इन्ग्रेडियंट आहे.
मिश्रण जितके छान मळाल तितक्या दांड्या सफाईदार होतील आणि तुकडेही एकसारखे आणि सुबक कापले जातील.
फोटो कसे टाकायचे? कुणी
फोटो कसे टाकायचे? कुणी सांगेल का---
फोटो कसे टाकायचे? कुणी
फोटो कसे टाकायचे? कुणी सांगेल का---
फोटो कसे टाकायचे? कुणी
फोटो कसे टाकायचे? कुणी सांगेल का---
इंटरेस्टींग आहे .. ग्रॅहॅम
इंटरेस्टींग आहे ..
ग्रॅहॅम क्रॅकर चा चुरा वापरून बघायला पाहिजे ..
स्लाईस करायच्या आधीचा फोटो सॉसेजेस् सारखा दिसतो ..
स्लाईस करायच्या आधीचा फोटो
स्लाईस करायच्या आधीचा फोटो सॉसेजेस् सारखा दिसतो ..>>>>>>>>>
हं....सशल ते मिश्रण खूप मळून मग त्याचे रोल केले ना म्हणून तसं दिसतय!
मानुषी ताई छान आहे कृती
मानुषी ताई छान आहे कृती (पुण्यात खजूर रोल मिळतात त्याची आठवण झाली)
ग्रॅहॅम क्रॅकर ची कल्पना छान आहे सशल
मारी पेक्षा छानच लागतील.
मस्त आहे गं हा प्रकार नक्की
मस्त आहे गं हा प्रकार नक्की करून बघीन. फोटो एकदम तोंपासू आलेत.
अनु३ शांकली....धन्यवाद! करून
अनु३ शांकली....धन्यवाद! करून पहा.
एकदम झक्कास प्रकार आहे आणि
एकदम झक्कास प्रकार आहे आणि विशेषतः झेपणेबल आहे. करून बघणारच. धन्यवाद मानुषी.
अर्धे बोबडे .... अतिशय आवडला हा शब्द!
मी केलेला हा प्रकार ! मस्तच
मी केलेला हा प्रकार ! मस्तच लागतो मानुषी!
मानुषी... यम्म दिस्तोय
मानुषी... यम्म दिस्तोय प्रकार..बरं झालं फोटू डकवलेस ते.. माझ्या आवडत्या दहात ..
मामी.........करून बघ. लाराला
मामी.........करून बघ. लाराला आवडेल. आणि चॉकोलेटात डिप करायची लाजोची आय्ड्याही कर. आणि हो............अर्धे बोबडे, लोळी, नाकं यावर खूप मस्त (उद्बोधक) चर्चा झालीये बघ वर! या पोरीबाळी पण ना....................................
अमया धन्स.
वर्षू ठांकू गं!
माबोवर डायरेक्ट पिकासावरून http://www.maayboli.com/imceफोटो टाकायला जिस्प्याकडून शिकले. सांगलीवरचा छान लेखही लिहिला . छान फोटोही डकवले. जिप्सी कडे रिक्षा पाठवली. पण तो "रानवाटा"त
हरवलाय.
असो................तर म्हणून ही जुनीच रेस्पी नव्याने!
काय टेम्पटींग दिसतंय......
काय टेम्पटींग दिसतंय...... नक्की करुन बघणार
मी वाचल्याबरोबर करुन बघीतले.
मी वाचल्याबरोबर करुन बघीतले. थोडे अंजीर होते ते पण वाटुन, तुपावर परतुन मिक्स केले. खुप छान झाले आहे फज. हिट आहे रेसिपी. अतिशयच पौष्टिक आणि साखरविरहित स्वीट म्हणुन खुप आवडले सगळ्यांना. थँक्स रेसिपीसाठी.
मानुषी,प्रकार आवडला!
मानुषी,प्रकार आवडला!
खूप सोपा पदार्थ आहे.
खूप सोपा पदार्थ आहे.
हे मस्त होतं अगदी. गटगला
हे मस्त होतं अगदी. गटगला वृंदाताईंनी करून आणलं होतं. नेमकं बेताचं गोड, चविष्ट आणि पौष्टिक!
मी ह्याची लिंक वसंतावर देणार
मी ह्याची लिंक वसंतावर देणार होते.
दे की.
दे की.
केव्हाची शोधतेय ही रेसिपी.
केव्हाची शोधतेय ही रेसिपी. करून बघायचीच आहे.
Pages