Submitted by saakshi on 9 December, 2011 - 02:34
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
चिक्कू - ४ (विकत घेताना गोड आहेत असे पाहून घ्यावे)
साखर - ८ चमचे
दूध - २ कप (थंड असल्यास उत्तम)
क्रमवार पाककृती:
१. चिक्कूची साल काढून छोटे छोटे तुकडे करून घ्यावे.
२. चिक्कूचे तुकडे अर्धा कप दूध आणि ३ चमचे साखर घालून मिक्सरमधून बारीक thick पेस्ट करून घ्यावी.
३. नंतर उरलेले दूध आणि साखर घालून पुन्हा मिक्सरमधून काढावे.
४. मस्त चिक्कू मिल्कशेक तय्यार!!!!!! पिऊन टाकावा....... आत्मा तृप्त!!!!!!!!!
वाढणी/प्रमाण:
२ जणांसाठी
अधिक टिपा:
दूध थंड घेतले तर मिल्कशेक तयार झाल्याबरोबर गट्टम करता येतो....... पुन्हा फ्रिजमध्ये ठेवून वाट बघावी लागत नाही....
माहितीचा स्रोत:
स्वप्रयोग
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माझी कृती १. चिक्कू, साखर आणि
माझी कृती
१. चिक्कू, साखर आणि प्रमाणानुसार चॉकलेट बोर्नव्हिटा...अगदीच वेगळी चव हवी असेल तर एक चमचाभर ब्रू कॉफी सुद्धा मस्त लागते...
आधी हे सगळे मिश्रण मिक्सरमध्ये घालून एकजीव करून घ्यायचे आणि मग नंतर पुन्हा अर्धा कप घालून त्याची पातळ पेस्ट करून घ्यायची...
त्यानंतर मग पुन्हा भरपूर दुध घालून फेसाळ असा चिक्कू शेक तयार.....
अजून थाट हवा असेल तर ग्लासात मिल्कशेक घातल्यावर एक चॉकलेट आईस्क्रीमचा एक स्कूप....
बाहेर या मस्तानीसाठी ९० रु मोजावे लागतात...
पण मला एक सांगा की आधी पेस्ट
पण मला एक सांगा की आधी पेस्ट करून घेतल्याने कन्सिस्टंसी येते का की काही अधिक मिसळावे लागते
मी जेंव्हा जेंव्हा प्रयत्न केलाय तेंव्हा जरा वेळाने चिकू व दूध वेगळे होतात ....सेडिमेंटेशन होते
यासाठी काही करता येईल काय ?? लवकर पिऊन टाकावे >>हा उपाय सोडून
आशुचँप ची रेसीपी जाम यम्मी आहे करून बघणारच !!!
शेक साठी वापरायचे दूध
शेक साठी वापरायचे दूध फ्रीजरमधे ठेवून बर्फ करून मग डायरेक्ट मिक्षर मधे ढकलावे. मस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्त गार शेक तयार होतो. (आमच्याकडे ४६+ टेंपरेचर जाऊ शकते उन्हाळ्यात..
)
वैभव - असे व्हायला
वैभव - असे व्हायला नकोय...चिक्कू आणि बाकी मिश्रण मिक्सरमध्ये घालून पार त्याचे गरगुटं झालं की मग अगदी थोडे दूध घालायचे...अर्धा कप...आणि पुन्हा एक अर्धा मिनिट घुसळायचे की छानशी पेस्ट तयार होते....
सगळ्यांना आवडते का माहीती नाही पण मी दुधावर येणारी दाट सायसुद्धा सगळीच्या सगळी घालतो...त्याचा पण छानसा क्रीमी फेस येतो..अर्थात किंचीत ओशटपणा जाणवतो पण सायखाऊंना त्याचे काही वाटणार नाही....
इब्लिस - पण मग शेक पिताना बर्फाचे खडे आल्यासारखे होतात. आणि अतीगार शेक पिल्यामुळे दातात कळ जाते ती वेगळीच....
अर्थात ४६+ टेंपरेचर ला तसे फार वेळ राहणार नाही ही गोष्ट वेगळी
हीहीही. ४६+ ह्येच सांगून
हीहीही. ४६+ ह्येच सांगून र्हाय्लो नं भाऊ?
सायीने चिकटपणा नाही येत का ?
सायीने चिकटपणा नाही येत का ? चिक्कु पण चिकट असतात थोडे. त्यासाठी आम्ही थोडा बर्फाचा चुरा घालतो.
असो, हा एक अत्यंत आवडता प्रकार आहे. गेली काही वर्षे भारतात जातो तेव्हा जमेल तेव्हा, जमेल तेवढा हाणते
नाही येत...भरपूर घुसळली की
नाही येत...भरपूर घुसळली की मस्त त्याचे क्रिमसारखेच होते. अर्थात वर लिहील्याप्रमाणे ओशटपणा जाणवतो..(सगळ्यात शेवटी मिक्सर साफ करताना तर फारच)
अत्यंत आवडता प्रकार. मीही
अत्यंत आवडता प्रकार. मीही saakshi सारखाच करते चिक्कू शेक.
आता आशुचँप सारखा करून बघेन
चिक्कूच्या बी जवळ एक पांढरा
चिक्कूच्या बी जवळ एक पांढरा पदार्थ असतो तो काढून टाकायला पाहिजे. त्याने दूध कधी कधी नासते.
चिक्कूच्या सुकवलेल्या कापा पण मिळतात, त्याचे मिल्कशेक पण छान होते.