टॅको शेल्स साठी:
१ कप मक्याचे पिठ
१ कप मैदा
मिठ चवीनुसार
तळण्यासाठी तेल
सॅलड साठी:
आईसबर्ग लेट्यूस
कोबी- हिरवा/जांभळा
रंगीत सिमला मिरच्या
मक्याचे दाणे
सफेद कांदा
टॉमेटो
मेयोनीज
मिरपुड
एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल
ड्राईड ओरिगानो
किसलेले प्रोसेस्ड चिज
टॉमेटो केचप
मस्टर्ड सॉस
मिठ
वर दिलेल्या साहित्यापैकी कुठलेली सहज मिळेल ते आणि आवडेल ते आणि आवडीच्या प्रमाणात घ्यावे. फक्त लेट्यूस, मेयोनीज, मिरपुड हवेच.
टॅको शेल्स:
१ कप मक्याचे पिठ (कॉर्नफ्लोर नाही), १ कप मैदा, मिठ व थोडेसे तेल घेऊन कणके प्रमाणे मळून घ्यावे व लगेचच लाटून तळायला घ्यावे. छोट्या-छोट्या गोल पुर्या लाटून मंद आचेवर गडद सोनेरी रंगावर तळून घ्याव्या.
कढईतून बाहेर काढल्या काढल्या पुरी हातावर एका स्वच्छ नॅपकीन वर घेऊन तिच्या मधोमध लाटण्याने दाब द्यावा. काही सेकंदातच शेलचा आकार तयार होईल. हे काम जरा काळजी पुर्वक कापडाची जाड घडी घेउन आणि जलद करावे. अशा प्रकारे सर्व शेल्स बनवून घ्यावेत.
सॅलडसाठी चिज, केचप व मस्टर्ड सॉस सोडून सर्व साहीत्य एकत्र करुन घ्यावे. हे मिश्रण टॅको शेल्स मधे भरुन वरुन आवडी प्रमाणे चिज, केचप, सॉस घालून सर्व्ह करावे.
१) शेल्स चे पिठ मळून जास्त वेळ ठेवल्यात पिठ तवत जाते व ह्या कामासाठी निरुपयोगी होते.
१) शेल्स ४-५ दिवस आधी करुन ठेवता येतात.
२) थोडे हेवी बनवण्यासाठी शेल्स मधे सुरवातीला तंदूर पनीर, चिकन चे लहान लहान तुकडे ठेऊन वरून सॅलड घालावे.
छान प्रकार. मला टॅको शेल्स चा
छान प्रकार. मला टॅको शेल्स चा प्रयोग करायचा आहे एकदा.
वॉव..................मस्त
वॉव..................मस्त लागणार..............नक्की करुन बघेन....धन्यु
टॅको शेल्स:
टॅको शेल्स:
वॉव! काय भारी दिसतयं..
वॉव! काय भारी दिसतयं.. रंगीबेरंगी!!
सल्प...............
सल्प...............
लय भारी.....
लय भारी.....
मस्त रेसिपी.. फोटो एकदम
मस्त रेसिपी.. फोटो एकदम तोंपासु आहे
वॉव.. सहीच आहेत हे टॅकोज.. -
वॉव.. सहीच आहेत हे टॅकोज..
- पिंगू
वा, एकदम तों पा सू .....
वा, एकदम तों पा सू .....
मस्त टेंप्टिंग दिसतायत सॅलड
मस्त टेंप्टिंग दिसतायत सॅलड स्ट्फ्ड टॅकोज
घरी कधी बनवले नाहियेत टॅकोज..... प्रयोग करावा का?????
कसलं भारी दिसतंय! मस्तच एकदम
कसलं भारी दिसतंय! मस्तच एकदम
मी हे आयते सॅलड खायला कधीही
मी हे आयते सॅलड खायला कधीही तयार आहे! फोटो भन्नाट!
मस्त दिसतंय. एकदम तोंपासु!
मस्त दिसतंय. एकदम तोंपासु! फोटो टाकलात हे काम बेष्ट केलेत.
वॉव!!!!
वॉव!!!!
थँक्स मित्र मैत्रिणींनो! खुप
थँक्स मित्र मैत्रिणींनो!
खुप आवडलं सगळ्यांना आणि फोटो बघून बरीच मागणी पण आली आहे...अर्थात रेडिमेड
लाजो ताई, तुम्ही असं विचारताय्..तुमच्या साठी तर बाये हात का खेल आहे
सहीच
सहीच
तोपांसु
तोपांसु
छान! शेलचा आकार देणे नाजूक
छान! शेलचा आकार देणे नाजूक काम वाटतेय.
वॉव मस्तच!!! नक्की करुन बघणार
वॉव मस्तच!!! नक्की करुन बघणार
कॉर्न फ्लोर आणि मक्याचे पीठ
कॉर्न फ्लोर आणि मक्याचे पीठ यात काय फरक आहे?
टॅको शेल्स घरी करायचे नसतील तर रेडीमेड मध्ये हेल्दी (न तळलेले) ऑप्शन काय आहे?
वीकेण्ड्ला येणार्या पाहुण्यांसाठी करायचा विचार आहे. पण शक्यतो तळण नको!
मक्याचे पिठ म्हणजे मकई का आटा
मक्याचे पिठ म्हणजे मकई का आटा म्हणतात ना ते...पिवळ्या रंगाचे असते. आता दोघांमधला शास्त्रीय फरक नाही सांगू शकणार मी. दिनेशदांना माहिती असेल. असे छोट्या फुलक्यांसारखे टॉर्टीया बनवून पण रॅप करता येतात. अर्थातच ते रोल सारखे नरम होतात आणि ह्या किस्पी टेस्टची मजा येत नाही.