बर्फाचे तुकडे
कोकाकोला
लिंबू
पुदिन्याची पाने
उंच ग्लास
दारवा ५ व्हाइट दारवा
१. व्हाइट रम
२. सिल्व्हर टकिला
३. व्होडका
४. जीन
५. ट्रिपल सेक किंवा कॉइंत्रु किंवा व्हर्माउथ/ व्हर्मूथ( vermouth) (शक्यतो ऑरेंज लिक्योर्स)
ग्लासच्या कडेला जेमतेम मीठ लावून घेणे.
उंच ग्लासात २/३ पातळीपर्यंत बर्फाचे तुकडे भरायचे.
मग काचेच्या स्टररवरून एकेक अल्कोहोल सोडायचे.
पाचही अल्कोहोल्सचे प्रमाण १:१:१:१:१ असे हवे.
नवखे असाल तर प्रत्येकी १५ मिलि च घ्या. मिडियम टॉलरन्स असेल तर २० मिलि चालेल. टाकी असाल तर ३० मिलि प्रत्येकी घ्यायला हरकत नाही.
दारवा ग्लासात स्थानापन्न झाल्यावर मग हळूहळू कोक सोडायचा. फुगायला जागा राहील इतपत. लिंबाचे चार थेंब टाकायचे.
गार्निशला एकदोन पुदिन्याची पाने.
ग्लासला लिंबाची चकती खोचायची.
आणि मग चांगभलं!!
आपण प्यायलेल्या दारूची मजा आपल्यालाच मिळायला हवी. इतरांचे मनोरंजन हा हेतू नाही त्यामुळे बॉटम्स अप करायचं नाही. हळूहळू पित जायचं. पाची द्रव्यांपैकी प्रत्येकाची वळणे, चवी ओळखत घोळवत ग्लास संपवायचा.
यानंतर चुकूनही ड्रायव्हिंगच्या फंदात पडायचे नाही. आपला टॉलरन्स वाला इगो चपला काढल्यासारखा बाजूला ठेवायचा.
अगं लिही की. करायचीये ती एकदा
अगं लिही की. करायचीये ती एकदा मला.
हाहाहा.....वोडका मधे हिरवी
हाहाहा.....वोडका मधे हिरवी मिरची कट करुन टाकली तर मस्त चव लागते...... ट्राय करुन पहा........ पाणीपुरी मधे हेच वोडका चं एडीशन करता येइल नै???
आणि मग चांगभलं!! >>> , भारीय
आणि मग चांगभलं!! >>> , भारीय रेसिपी , एकदम ढिंच्याक ढिच्यांग !
>>इन्ना | 4 April, 2013 -
>>इन्ना | 4 April, 2013 - 08:15
व्होड्काची पाणीपुरी लिहावी का? >> काय हे!!! पाणीपुरीत असं काही बाही घालून तिचा अपमान करुन वाट लावू नका गं बायांनो.
बेष्ट लिहिल्येस एकदम,
बेष्ट लिहिल्येस एकदम, नीधप!
आणि मग चांगभलं!! >>>
सायो + १.
मस्त लिहिलयसं, नी
मस्त लिहिलयसं, नी
हायला... जाम मस्त लागेल हे...
हायला... जाम मस्त लागेल हे... ३० मिली x ५ = १५० मिली!!! अन वर कोक... वा! झ्कास!!
नी तो कॉ च्या कृंचा धागा काढच...
बर्फाचा चुरा: स्वच्छ् धुतलेला
बर्फाचा चुरा: स्वच्छ् धुतलेला टर्किश नॅपकिन घ्यायचा. त्यात बर्फाचे क्यूब्ज टाकायचे. मग वरून नेपकिनचा अर्धा भाग ओढायचा. ( बर्फावरून) मग लाट्ण्याने जाम बदडून काढायचे.(बर्फाला) जितके जास्त बदड्णार तितके एकसंध चुरा होईल. चुरा ग्लासांमदध्ये घातल्यावर तो नॅपकिन कोणाच्यातरी मागे जाऊन झट्कायचा. सूक्ष्म बर्फाचे तुकडे गार गार लागून ती व्यक्ती शहारते.
व्होडका पाणीपुरी दिल्लीला एका
व्होडका पाणीपुरी दिल्लीला एका सरदार लग्नात प्यायलो होतो.. व्होडकामध्ये बारीक चिरलेल्या मिरच्या-मिरी वगैरे घातली होती आणि ती एका पिंपात भरुन ठेवली होती.. शेजारी पुर्यांचा पुडका होता.. पुरी फोडायची, पिंपाची तोटी उघडून व्होडका भरायची आणि गट्टम.. फार काय खास लागत नाही...
कृती खुपच tempting दिसतेय
कृती खुपच tempting दिसतेय (असं काही पिण्याचा फारसा अनुभव नसताना ;-)) मलाही साधनाप्रमाणे प्रश्न पडलाय की वरिल ५ जिन्नस १५ मिली कुठे मिळतील?
एक भोळा प्रश्न: दारवा हा मराठी शब्द आहे?
अश्विनीमामी : एकदम
अश्विनीमामी : एकदम भारी.
व्होडकाची पाणीपुरी लय भारी लागते, आम्ही एकदा पार्टीत ठेवली होती. चाट आयटम पहाताच वितळणारी काही माणसे असतात त्यांनी धावू धावू संपवली आणि मग जी काय विमाने टेक ऑफ पोझीशनला आली काय सांगावे.. अलौकिक मज्जा आली
वोडका मधे हिरवी मिरची कट करुन
वोडका मधे हिरवी मिरची कट करुन टाकली तर मस्त चव लागते..<<
बेटा, तुम जिस स्कूलमे पढते हो वहाके हम हेडमास्टर रह चुके है!
अमा, करून बघणेत येईल. कुणाच्या तरी मागे टॉवेल झटकण्याची मजा लै भारी..
नी तो कॉ च्या कृंचा धागा काढच...<<
एक धागा नको आता वेगवेगळ्याच टाकूया रेस्प्या.
दारवा हा मराठी शब्द आहे?
दारवा हा मराठी शब्द आहे? <<
दारू हा माझ्या माहितीप्रमाणे मराठीच शब्द आहे. त्यामुळे अनेकवचनही मराठीच असावं बहुतेक
मस्तं !
मस्तं !
मोहितो घालून चांगली लागेल
मोहितो घालून चांगली लागेल बहुतेक पापु.
झकास कृती लिहिली आहेस. हे
झकास कृती लिहिली आहेस.
हे माझेही सर्वात आवडते कॉकटेल. अर्थात दुसर्याने आयते बनवून दिलेलेच प्यायला आवडत असल्याने करुन बघणेत येण्याची शक्यता नाही. पण निदान आपल्या पोटात नक्की किती दारवा, नक्की किती प्रमाणात पोचल्याने मज्जा आली हे तरी आता नक्की कळेल
व्होडका पाणीपुरी ठीकच. टिल्ल्यापिल्ल्यांना त्यात भारी मजा वाटते.
वोडका मधे हिरवी मिरची कट करुन
वोडका मधे हिरवी मिरची कट करुन टाकली तर मस्त चव लागते..<<
बेटा, तुम जिस स्कूलमे पढते हो वहाके हम हेडमास्टर रह चुके है!
>>>
मिरची किंवा दारू - दोन्हीपैकी काहिही जास्त झालं तरी दुसर्या दिवशी जाम वाट लागते
हा हा हा मस्त लिहिलय कालच
हा हा हा
मस्त लिहिलय
कालच ऑफिस मध्ये एकजण याविषयी बोलत होता आणि आता हा लेख, मजा आली वाचायला
दोन्हीपैकी काहिही जास्त झालं
दोन्हीपैकी काहिही जास्त झालं तरी दुसर्या दिवशी जाम वाट लागते <<
अक्षरश:... ईट वन्स एंजॉय ट्वाइस!
शर्मिला, नो प्रॉब्लेम. तू खादडीचं बघ, मी पिदडीचं बघते..
बाकी शंकरपाळ्यांमधे शंकर नसतो
बाकी शंकरपाळ्यांमधे शंकर नसतो आणि गुलाबजाम मधे गुलाब नसतो...>>
खरा मनस्वी भक्त, देवळांत
खरा मनस्वी भक्त, देवळांत जाताना प्रत्येकवेळी चपला बाहेर काढुनच जातो.
आयला, आम्ही म्हणतो कि चपला
आयला, आम्ही म्हणतो कि चपला घालुन जाऊच नये, अशा कार्याकरता....
असो, या रेसिपी मध्ये तकिला नाहि मिळाली (आयत्यावेळेला) तर जॅक डॅनियल (किंवा तत्सम व्हिस्कि) घालुन बघा. मोजक्याच घोटानंतर विमानाची घरघर सुरु होईल...
व्वा! त्वरीत करून बघण्यात व
व्वा! त्वरीत करून बघण्यात व पीण्यात ) येइल.
बर्फाचा चुरा : काही मिक्सर मध्ये क्रश आईस असा ऑप्शन असतो ना !
ईट वन्स एंजॉय ट्वाइस! >>>
ईट वन्स एंजॉय ट्वाइस! >>> मिरची खाऊन ?
tempting कृती. पण मी पित नाही
tempting कृती. पण मी पित नाही नवर्याला दाखवावी का?
तो नॅपकिन कोणाच्यातरी मागे जाऊन झट्कायचा. सूक्ष्म बर्फाचे तुकडे गार गार लागून ती व्यक्ती शहारते.>>> कसलं मस्त वाटेल
दारूचे अनेकवचन दारवा
बेटा, तुम जिस स्कूलमे पढते हो
बेटा, तुम जिस स्कूलमे पढते हो वहाके हम हेडमास्टर रह चुके है! >>>>>>> ते मला माहित आहे.... जनरेशन गॅप आहे ना तितकी..
जस्ट किडिंग नी दी..... मला ते
जस्ट किडिंग नी दी..... मला ते आवडतं म्हणुन शेअर केलं...
दारवा हा शब्द घरात पण
दारवा हा शब्द घरात पण ऐकलाय......आजी , आत्या बोलायच्या असले शब्द.....' दारवा प्यायला हव्यात नुसत्या '....
काकू काकवा, दारू दारवा. परवा
काकू काकवा, दारू दारवा.
परवा व्हॅलेंटाइन डे च्या आठव्ड्यात पॉपटेट मध्ये एक भिकार मॉकटेल प्यायले. परफेक्ट पार्ट्नर म्हणे. काय तर खस सिरप आणि पायनापल ज्यूस. एक दुसर्याला मारते असे झाले.
अक्षरश:... ईट वन्स एंजॉय
अक्षरश:... ईट वन्स एंजॉय ट्वाइस! >>>>>> Buy one, Get one Free असं म्हणायचं आहे का तुला ?????
Pages