Submitted by मो on 3 April, 2013 - 13:58
शाळेच्या गेट टुगेदर करता पुण्याच्या आसपास (साधारण १-१:३० तासांवर) काही ठिकाणं आहेत का? उन्हाळा खूप असल्याने आउटडोअर अॅक्टिव्हीटीज अवघड आहेत, त्यामुळे तशी ठिकाणं नाही सुचवली तरी चालतील. वॉटर पार्क पण नको.
निवांत, पंचवीस एक लोकांना सामावून घेईल अशी जागा हवी आहे.
मला सिंहगड रोडवरचं अभिरुची फार्म्स माहिती होतं, पण ते बंद झालं असं ऐकलं. गोखले मळ्याबद्दल पण ऐकलय. त्याबद्दल माहिती मिळेल का?
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मो.... अग .....
मो.... अग ..... http://www.maayboli.com/node/41972
इथे पहा .. आम्ही फेब मधे जाउन आलो. ..मस्त अहे .....गुड ल़़क ......
थँक्स सुहास्य! बाकी इतर
थँक्स सुहास्य!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बाकी इतर माहितगार पुणेकर्स, तुम्हीही ठिकाणं कळवा.
मो, सूर्यशिबीर म्हणून एक
मो,
सूर्यशिबीर म्हणून एक पुण्याजवळ आहे. खाली साईट बघ.
http://www.suryashibir.in/home.html
मो , गोखले फार्म आळंदी रोडवर
मो , गोखले फार्म आळंदी रोडवर आहे.भोसरी पासुन ५-६ किमी. त्याच्या आधी साईबाबा मंदिर आणी बालाजी मंदीर पण आहे. गोखले फार्मपासुन २-३ किमी आळंदी आहे. आळंदी लोणीकंद रोडवर तुळापुर आहे संगमावर.
सकाळी १०-११ पर्यंत साईबाबा मंदिर आणि बालाजी मंदिर करुन गोखले फार्म मधली खादाडी करा. ३-४ पर्यंत तिथच पेरुच्या बागेत पडी मारा. मग संध्याकाळी आळंदी / तुळापुर करुन पुण्यात परता.
तुळापुरच संगमेश्वराच मंदिर संध्याकाळी ७ वाजता बंद करतात.
मोराची चिंचोली हा पण येक बरा ऑप्शन होउ शकेल.
माझ्या माहितीप्रमाणे अभिरुची
माझ्या माहितीप्रमाणे अभिरुची आहे चालू, पण वेगळ्या रूपात :
http://ravikarandeekarsblog.blogspot.in/2011/11/abhiruchi-mall-multiplex...
बहुतेक एका गटगला काही मायबोलीकर जमले होते या ठिकाणी.
देशपांडे फार्म्स, मुळशी हेही
देशपांडे फार्म्स, मुळशी हेही गटगसाठी चांगले असल्याचे ऐकून आहे : http://www.deshpandefarmspune.com/about.htm
निंबुडाच्या बाफवर बर्याच
निंबुडाच्या बाफवर बर्याच ठिकाणांची माहिती आहे.
हो नीरजा +१.
हो नीरजा +१.
धन्यवाद लोक्स. नीधप, थँक्स.
धन्यवाद लोक्स.
नीधप, थँक्स. निंबुडाचा बाफ शोधते. मला वाटलं होतं तिचा बाफ मुंबईजवळच्या ठिकाणांकरता आहे.
मला जागेचं नाव आठवत नाही पण
मला जागेचं नाव आठवत नाही पण सिंहगडाच्या पायथ्याशी एक जागा आहे जिथे जेवन पण मिळतं आणि रहायला थोड्या खोल्या पण आहेत. गेल्या भारत वारीत तिथे गेलो होतो ३-४ तास. जेवण बरं होतं पण त्यादिवशी हवा फारच छान आणि भुरभुरणारा पाउस होता त्यामुळे वातावरण अतिसुंदर होतं.