बर्फाचे तुकडे
कोकाकोला
लिंबू
पुदिन्याची पाने
उंच ग्लास
दारवा ५ व्हाइट दारवा
१. व्हाइट रम
२. सिल्व्हर टकिला
३. व्होडका
४. जीन
५. ट्रिपल सेक किंवा कॉइंत्रु किंवा व्हर्माउथ/ व्हर्मूथ( vermouth) (शक्यतो ऑरेंज लिक्योर्स)
ग्लासच्या कडेला जेमतेम मीठ लावून घेणे.
उंच ग्लासात २/३ पातळीपर्यंत बर्फाचे तुकडे भरायचे.
मग काचेच्या स्टररवरून एकेक अल्कोहोल सोडायचे.
पाचही अल्कोहोल्सचे प्रमाण १:१:१:१:१ असे हवे.
नवखे असाल तर प्रत्येकी १५ मिलि च घ्या. मिडियम टॉलरन्स असेल तर २० मिलि चालेल. टाकी असाल तर ३० मिलि प्रत्येकी घ्यायला हरकत नाही.
दारवा ग्लासात स्थानापन्न झाल्यावर मग हळूहळू कोक सोडायचा. फुगायला जागा राहील इतपत. लिंबाचे चार थेंब टाकायचे.
गार्निशला एकदोन पुदिन्याची पाने.
ग्लासला लिंबाची चकती खोचायची.
आणि मग चांगभलं!!
आपण प्यायलेल्या दारूची मजा आपल्यालाच मिळायला हवी. इतरांचे मनोरंजन हा हेतू नाही त्यामुळे बॉटम्स अप करायचं नाही. हळूहळू पित जायचं. पाची द्रव्यांपैकी प्रत्येकाची वळणे, चवी ओळखत घोळवत ग्लास संपवायचा.
यानंतर चुकूनही ड्रायव्हिंगच्या फंदात पडायचे नाही. आपला टॉलरन्स वाला इगो चपला काढल्यासारखा बाजूला ठेवायचा.
आपला टॉलरन्स वाला इगो चपला
आपला टॉलरन्स वाला इगो चपला काढल्यासारखा बाजूला ठेवायचा>>>
छान लिहिल आहेस.
हा भलताच फेमस प्रकार दिसतोय.
आंतरजालावर ह्याच्याविषयी बरच वाचलय.
लै भारी. चांगभलं + १ असल्या
लै भारी. चांगभलं + १
असल्या पाच कडक दारवा (सासवा हा शब्द का आठवतोय बरं ?) प्याल्यावर गाडीमध्ये न बसताही ड्रायव्हिंग घडेल
टकीला सोडून बाकी चार आहेत, टकीला मिळवून नक्की करून बघणार.
फोटो ?
केश्वि मोड ऑन: नी, यामधे चहा
केश्वि मोड ऑन:
नी, यामधे चहा कुठे वापरलाय
केश्वि मोड ऑफ.
केश्विनी
पाचवी दारू + लिंबू + कोक याची
पाचवी दारू + लिंबू + कोक याची जी चव होते ती आइस टी च्या जवळ जाते म्हणून आइस टी.
बाकी शंकरपाळ्यांमधे शंकर नसतो आणि गुलाबजाम मधे गुलाब नसतो...
न व ख्यांच्या प्रंमाणात हा
न व ख्यांच्या प्रंमाणात हा चहा बनउन बघणेत येईल, ते ग्लास फ्रॉस्ट करण्याची एक पद्धत असते तेही लिहणार का?
अमेय, सध्या यातली एकही दारू
अमेय, सध्या यातली एकही दारू घरात नाहीये त्यामुळे फोटु लगेच मिळणे शक्य नाही. केलं होतं तेव्हा फोटु काढण्याइतका धीर नव्हता.
बाकी शंकरपाळ्यांमधे शंकर नसतो
बाकी शंकरपाळ्यांमधे शंकर नसतो आणि गुलाबजाम मधे गुलाब नसतो... << बरोबर आहे. आणि वरच्या कॉकटेलमधे तरी लंब बेट कुठाय?
जोक्स अपार्ट. योग्य कंपनी मिळाल्यास अवश्य करून बघण्यात येईल.
ग्लास फ्रॉस्टींग - अगदी सोपे
ग्लास फ्रॉस्टींग -
अगदी सोपे प्रकरण आहे. या कॉकटेलसाठी पूर्णपणे ऑप्शनल. दोन प्रकार असतात.
१. बर्फाळ फ्रॉस्टींग - बर्फाच्या चुर्यामधे रिकामे ग्लासेस खुपसून ठेवायचे तासभर. ग्लास भरायच्या जस्ट आधी रिमला मीठ किंवा पिठीसाखर किंवा इतर फ्लेवर पावडर हल्केच लावायची.
२. फ्लेवर फ्रॉस्टींग - लिंबाचा रस किंवा फळांचे ज्यूस किंवा सिरप्स मधे ग्लासाची गोल कड बुडवायची. ते किंचित कोरडे व्हायला आले की मीठ, पिठीसाखर, फ्लेवर पावडर यापैकी कशात तरी ती कड परत बुडवायची. जास्तीची पावडर हलकेच झटकून टाकायची.
<<यामधे चहा कुठे वापरलाय
<<यामधे चहा कुठे वापरलाय >>
हे प्यायल्यावर 'लंब' आणि 'बर्फाळ' होऊन झोपून उठल्यावर दुसर्या दिवशी उतारा म्हणून काळा 'चहा' प्यावा लागत असेल कदाचित.
ह्म्म्म्म.. पाकृ वाचताना लै
ह्म्म्म्म.. पाकृ वाचताना लै मजा आली..
ह्यातल्या सगळ्या दारवा बाजारात १५ मिली ह्या मापात मिळतील काय? कारण एकदा जास्त विकत आणल्या तर नंतर रोजच विकत आणाव्या लागतील
सुपर्ब....वी़केंड चा प्लान
सुपर्ब....वी़केंड चा प्लान ठरला..
अरे बापरे, फार भन्नाट प्रकरण
अरे बापरे, फार भन्नाट प्रकरण दिसतयं हे! मजा आली वाचताना
(निदान ;)) ग्लास फ्रॉस्टींग करून बघायला हवे!
(No subject)
कृती दिलचस्प आहे. दारवांऐवजी
कृती दिलचस्प आहे.
दारवांऐवजी काय टाकता येईल, नॉन अल्कोहोलिक?
दारवांऐवजी काय टाकता येईल,
दारवांऐवजी काय टाकता येईल, नॉन अल्कोहोलिक?
मग कसली गंमत राहिली?????
एक्दम बेसिक प्र्श्न, बर्फाचा
एक्दम बेसिक प्र्श्न, बर्फाचा चुरा कसा करायचा ?
कृती दिलचस्प आहे.>> नशीब
कृती दिलचस्प आहे.>> नशीब त्यात गझलियत आहे असे नाही म्हणालात
(No subject)
मग कसली गंमत राहिली?????
मग कसली गंमत राहिली????? <<<
एक्झॅक्टली!!
बर्फाचा चुरा कसा करायचा.. माहित नाही. मी करत नाही. मला बर्फाळ फ्रॉस्टींग वाले ग्लास आवडत नाहीत. त्यापेक्षा सरळ बर्फाचे तुकडे भरावेत ग्लासमधे आणि फ्रोझन ड्रिंक करावं.
चुरा बनवणे कुणाला माहित असेल तर प्लीज सांगा म्हणजे मार्गारिटा गोळा, कामाकाझे गोळा अशी मज्जा करता येईल
नंदिनी, केश्विनी मोड
नंदिनी, केश्विनी मोड
अप्रतिम कॉकटेल !! माय
अप्रतिम कॉकटेल !!
माय फेव्हरीट !!
२ लॉन्ग आयलॅन्ड आईस टी घेतले की टांगा पलटी ...(आणि अजुन एक घेतले की) घोडे फरार !!
(दारवांऐवजी काय टाकता येईल, नॉन अल्कोहोलिक?
>>> विदिपा , तुम्ही दुध , हळद , एक चमचा मध , सुंठ आणि वेलेदोडा घाला दारवांच्या ऐवजी )
सामान्यांची एका ग्लासातच
सामान्यांची एका ग्लासातच टांगा पलटी होते.
मस्त पाकृ. टीपा तर अतिशयच
मस्त पाकृ. टीपा तर अतिशयच आवडल्यात. पाकृत चहा सापडला नाही. 'उतरल्यावर' पुन्हा एकदा शोधण्यात येईल.
मामी,कुठे चढून बसली आहेस?
मामी,कुठे चढून बसली आहेस?
प्राची ... बाकी
प्राची ...
बाकी शंकरपाळ्यांमधे शंकर नसतो आणि गुलाबजाम मधे गुलाब नसतो... >>> क्या बात है!
तुझी ही कॉ कृ वाचून
तुझी ही कॉ कृ वाचून मार्गारिटा गोळा आठवला , म्हणूनच बर्फाचा चूरा हवा होता.
भन्नाट.
भन्नाट.
मस्त लिहिलयस.
मस्त लिहिलयस.
सह्हीच! वाचुनच 'हाय'!!!
सह्हीच! वाचुनच 'हाय'!!!
लिखाण पण एकदम भारी
आणि मग चांगभलं!!<<
एका दिवसात ३-३ झिंगलाला रेसिप्या.....पब्लिक चा विकेंड एकदम सार्थकी लागणार दिसतय
व्होड्काची पाणीपुरी लिहावी
व्होड्काची पाणीपुरी लिहावी का?
Pages