Submitted by नंदिनी on 11 August, 2011 - 08:36
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
२० मिनिटे
लागणारे जिन्नस:
सज्जिगे म्हणजेच रवा
१ वाटी भाजलेला रवा
१/४वाटी दही
१ कांदा बारीक चिरून
२ हि. मिरची बारीक चिरून
थोडी कोथिंबीर आणि कढीपत्ता
मीठ चवीनुसार
तेल
आणि एखादे केळीचे अथवा तत्सम पान.
क्रमवार पाककृती:
प्रथम रवा आणि इतर सर्व साहित्य (तेल आणि केळीचे पान सोडून) एकत्र करून घ्या.
त्यामधे लागेल तसे पाणी (असल्यास ताक) घालून घ्या. कन्सिस्टन्सी साधारणपणे घट्ट पिठल्यासारखी आली पाहिजे. खूप पातळ करू नका. सुमारे अर्धा तास पीठ तसेच ठेवून द्या.
नंतर केळ्याच्या पानाला थोडेसे तेल लावून त्याची छोटी तळहाताएवढी रोटी थापून घ्या. (फार मोठे थापल्यास तव्यावर टाकताना मोडेल.)
आता केळ्याचे पान तव्यावर उलटवून घ्या. केळीचे पान काढून घ्या. आणि रोटी दोन्ही बाजूने खरपूस शेकवून घ्या.
नारळाच्या चटणीबरोबर सर्व करा,
वाढणी/प्रमाण:
अंदाजे १० रोटी होतील.
अधिक टिपा:
१. खूप जाड रवा वापरू नका.
२. सॉस किंवा लोणच्याबरोबर पण मस्त लागतात.
माहितीचा स्रोत:
सौ. राव आंटी. मी याच्याकडे तुळू पदार्थ बनवायला शिकतेय. :)
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाटेत पडतं >>> केश्वे, तू
वाटेत पडतं >>> केश्वे, तू बैठकीच्या खोलीत थालिपीठ थापून मग स्वयंपाकघरात जातेस का तव्यावर टाकायला ?
गरम तवे उलटे/सुलटे कसेही एकदम
गरम तवे उलटे/सुलटे कसेही एकदम गार पाण्याखाली वगैरे धरू नका गं. आमच्याकडे पोचटून डिस्फिगर झालेले बघितलेत. कोटिंगचीही वाट लागते असं करून - डोळ्यांना दिसली नाही तरीही. आणि ते हेल्दी नाही.
इथे अधिक माहिती आहे.
>>
It's essential to let the cookware cool completely before washing; immersing a hot pan in cooler water could permanently warp and ruin it.
<<
तवा कास्ट आयर्नचा असेल तर
तवा कास्ट आयर्नचा असेल तर चालेल का ही पद्धत ? ( किती तो अट्टहास ! सॉरी )
कोटिंगचीही वाट लागते असं करून - डोळ्यांना दिसली नाही तरीही. आणि ते हेल्दी नाही. >>> ह्यासाठी तरी टाळले पाहिजे तव्यावर थालिपीठे थापणे. जड जाईल पण प्रयत्न करेन. थँक्स स्वाती.
कास्ट आयर्नवर तर अजिबात नको.
कास्ट आयर्नवर तर अजिबात नको. फुटेल!
मला वरचे सर्व जालीम उपाय
मला वरचे सर्व जालीम उपाय वाचून प्रश्न पडलाय की तुम्ही थालीपीठं करता की धिरडी घालता? किती असं मऊ भिजवता पीठ? झिपलॉक किंवा दुसर्या प्लास्टिक बॅग्ज् का वापरत नाही थालीपीठं थापायला?
(प्रत्येक थालीपीठानंतर तवा धुवून घेणं, उलटा नळाखाली धरणं .. किती ही मेहेनत!)
बापरे. मी कधी वापरलाच नाहीये.
बापरे. मी कधी वापरलाच नाहीये. घ्यायची इच्छा आहे खूप दिवसांपासून.
आता अजून प्रश्न विचारायची हिंमत नाही
सशल
सशल
माझी पद्धत लिहते(च)! पहिले
माझी पद्धत लिहते(च)!
पहिले थालिपिठ गार तव्यावरच लावायचे बाकिच्या.न्साठी एखादा पेपर-टॉवेल(बाउन्टीचा स्ट्रओन्ग असतो)पाण्याने ओला करायचा एका प्लेट मधे ठेवायचा मग त्यावर जरा तेल पुसटसे लावायचे पीठाचा गोळा घेवुन ओल्या हाताने
थालिपीठ लावायचे अगदी पातळ थालिपिठ लावता येतात.थापुन झाले की पुर्ण पेपर-टॉवेल तव्यावर उपडा घालायचा वरुन पाणि लावायचे आणि अलगद पेपर-टॉवेल काढुन घ्यायचा.
साधा कापडी रुमाल पण वापरता येईल .
गरम तवा(कुठलाही) कधीच
गरम तवा(कुठलाही) कधीच डायरेक्ट पाण्याखाली धरु नये.तव्याची वाट लागते.
मुलिंनो स्वाती म्ह्णतेय तशी
मुलिंनो स्वाती म्ह्णतेय तशी तव्याची वाट लागेलच गरम तव्यावर गार पाणी ओतून. वर पुन्हा तवा तापवायचा वेळ वाया जाईल... उर्जा वाया जाईल.
मी जाड प्लॅस्टिक वर थालीपिठ थापून हातावर घेउन मग तव्यावर टाकते. केश्वी म्हणते तसे मी ही एका वेळी तीन तवे ठेउन थालीपिठे करते घरात सगळी मंडळी असतील तर. एकदम सुपरफास्ट
मुलींनो ज्यांना प्लॅस्टीक पेपर जळतो.. ओला रुमाल आवडत नाही ( माझ्यासारखे) त्यांनी एकदा जाड अॅल्युमिनियम फॉईल वर थालिपिठे थापून ट्राय करा. एकदम सोपे.
थालीपिठे थापयचा कंटाळा आला असेल तर पिठ पातळ कंसिस्टन्सी करुन छोट्या ऑम्लेट पॅन मध्ये टाकते भरकन आणि मस्त गोल च्या गोल थालीपिठे .. रवा उत्तपा वगैरे बनतात.
आता एकदा नंदिनीच्या सज्जीगे करुन पाहिन
दोन तव्यांवर केलं मधे बरोबर
दोन तव्यांवर केलं मधे बरोबर वेळ घेऊन तर तव्यावर पाणी घालून गार करायची गरज पडत नाही. फारतर एकदा ओलं कापड फिरवायचं.
दोन तव्यांवर केलं मधे बरोबर
दोन तव्यांवर केलं मधे बरोबर वेळ घेऊन तर तव्यावर पाणी घालून गार करायची गरज पडत नाही. फारतर एकदा ओलं कापड फिरवायचं.>>> +१
सिंडे, ओट्यावरुन तव्याकडे जाणारी वाटही माझ्यासाठी बिकट ठरते कारण मी थालिपिठाची भाजणी सैल भिजवते थालिपिठं दडदडीत होऊ नयेत म्हणून. गेल्यावर्षी वविला मी, मनिषा लिमये आणि आशुतोष उशीरा गेलो होतो तेव्हा वाटेला खायला करुन घेतली होती. ती पटपट व्हावीत म्हणून घट्ट भिजवली आणि प्लॅस्टिकवर थापून केली तर खुसखुशीत न होता दडदडीत झाली. त्या दोघांनी कसं बसं एक एक खाल्लं. मलाच बाकीची ४ येता जाता तुकडे तोडत कशीबशी संपवायला लागली. दोघंही किती आग्रह केला तरी खाईचनात . आता कानाला खडा. सैलच भिजवायचं.
नंदिनी, त्यापेक्षा एक फोटो
नंदिनी, त्यापेक्षा एक फोटो टाकला असतास तर?? बेटर स्टिल, व्हिडियो टाक!
इतकं सगळं वाचून अजूनही मला मूळ कृतीच्या पीठाची कन्सिस्टन्सी काय असावी ते कळलंच नाहीये धिरड्याइतके पातळ नको, पण थालिपीठाइतके घट्टही नको असे वाटतेय. पण ह्या दोन्हीच्या 'मधली' म्हणजे नक्की कशी?- ते बहुतेक केले, तरच कळेल!
खरंच! केश्वे, एक रविवार
खरंच!
केश्वे, एक रविवार माझ्याकडे ये. 'तव्याशिवाय थालिपीठं थापणे' गटग करूया. गॅस फुकट जाण्याच्या नुसत्या कल्पनेनेच जीव जळतोय माझा.
चालेल अगं दुसरा तवा अगदी
चालेल अगं दुसरा तवा अगदी गार नाही करायचा. थापता येण्याजोगा झाला तरी पुरे. म्हणजे पुन्हा पुन्हा पुर्ण तवा गरम करण्यासाठीचा गॅस फुकट नाही जात. अर्थात तसं जमायला स्किल लागतं. मलाही ते बर्याच दिवसांनी जमलं होतं. नशिब, लग्नाआधीच जमलं
बघायला हवं करुन. इंटरेस्टिंग
बघायला हवं करुन. इंटरेस्टिंग वाटतोय हा प्रकार
अश्विनी, थालिपिठाचं पीठ
अश्विनी, थालिपिठाचं पीठ भिजवताना मोहन घालत नाहीस का? घालून बघ.
अश्वे.. थालिपीठाची भाजणी पार
अश्वे.. थालिपीठाची भाजणी पार गुळगुळीत दळल्ये का कणकेसार्खी तर दडदडीत होतात थालिपीठं.. जरा सरसरीत दळून घे म्हण्जे मस्त हलकीफुलकी, खुसखुशीत होतील थालिपीठं नाहीतर स्वाती_आंबो़ळे बाईंची मोहनाची आयडीया मस्तय ती वापरुन बघ एकदा..
असो.. रोटीच्या रेस्पीवर थापीची चर्चा....
स्वाती, मोहन घालते गं. मेधा,
स्वाती, मोहन घालते गं.
मेधा, सरसरीतच दळून आणते.
पण तरी मला सैलच भिजवावी लागते भाजणी. सैल म्हणजे पोळ्यांच्या भिजवलेल्या कणकेपेक्षा थोडी सैलसर. म्हणजे मस्त खुसखुशीत होतात.
असो.. रोटीच्या रेस्पीवर थापीची चर्चा.... >>> मी हे परवापासून लिहायचं टाळतेय
आता उद्या सज्जिगे रोटी करणार.
सैल म्हणजे पोळ्यांच्या
सैल म्हणजे पोळ्यांच्या भिजवलेल्या कणकेपेक्षा थोडी सैलसर.>>> अव्वा! मग तुटणारच. कणकेपेक्षा घट्टा हवी भाजणी आणि पोळीपेक्षा जाड हवं थालिपीठ. (हम छोडेगा नै जी!)
मी हा प्रकार इंस्टंट उत्तपा
मी हा प्रकार इंस्टंट उत्तपा म्हणून करते.
मी हा प्रकार नेहमी करते, पण
मी हा प्रकार नेहमी करते, पण पद्धत वेगळी आहे..
जाड रव्याऐवजी मी कायम बारीक रवा घेते , न भाजलेला... त्यात ताक किंवा निम्मे दही, निम्मे पाणी, कांदा, कढीलिंब, हिंग मीठ आणि मिरचीचे बारीक तुकडे घालून १५ मिनिट ठेवते. साधारण डोश्याच्या पीठा पेक्षा थोडे घट्ट ठेवते.... डोश्याचा तवा/नोन स्टिकघेऊन त्यावर छोट्या डावाने पसरवून घालते..आणि चमच्याने थोडे पातळ तूप कडेने सोडते..१-२ मिनिटे झाकून ठेवल्यावर खमंग वास सुटतो, मग हळूच उलट करून दुसर्या बाजूने भाजून घेते.. अप्रतिम लागतात..आणि अगदी टिपिकल कर्नाटकी बाळ कैरीच्या लोणच्या बरोबर तर फारच चविष्ट लागते! माझ्या पीएचडी च्या गाईड सासरच्या कर्नाटकी आहेत, त्यांच्याकडून शिकले हि रेसिपी..
Pages