Submitted by शांकली on 25 March, 2013 - 14:09
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
१. खिसलेली कैरी : अर्धी वाटी.
२. पांढरे कांदे : तीन ते चार
३. कैरी लोणचे मसाला : अंदाजाने
४. बारीक चिरलेला गूळ : अंदाजाने
५. मीठ : चवीनुसार
६. कच्चे तेल : १ छोटा चमचा. (ऐच्छिक)
क्रमवार पाककृती:
प्रथम कैरीचा खीस, बारीक चिरलेला गूळ, लोणच्याचा मसाला, मीठ हे एकत्र कालवून घ्यावे.
कांद्याला आपण भरल्या वांग्याला जसे काप देतो तसे काप द्यावेत. आणि त्यात वरील
मिश्रण भरावे. एका बोल मधे काढून त्यावर एक छोटा चमचा कच्चे तेल घालावे.
ह्याची चव कांदा-कैरी कोशिंबिरी सारखी (टक्कूसारखी) लागते.
ही विदर्भातली खासीयत आहे. उन्हाळ्यात तिकडे हा प्रकार नेहमी करतात.
माझ्या वैदर्भीय मैत्रीणीने हा प्रकार करून आणला होता. मी यात साखरे ऐवजी गूळ वापरला
आणि तिकडे विदर्भात कांदे बुडतील इतकं तेल घालतात असं ती सांगत होती. पण माझं काही
इतकं तेल घालायचं धाडस झालं नाही.
वाढणी/प्रमाण:
आपल्या आपल्या आवडी प्रमाणे.
माहितीचा स्रोत:
माझी वैदर्भीय मैत्रीण.
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शांकली काय हे ?
शांकली काय हे ?
एप्रिल फूल का ?
एप्रिल फूल का ?
लव्कर पाकृ टाका..
लव्कर पाकृ टाका..
खरंच छान प्रकार. योगायोग. मी
खरंच छान प्रकार.
योगायोग. मी पण कांद्याचाच एक पदार्थ लिहिणार होतो, पण काल घर बदलण्याच्या गडबडीत राहिले.
आता कसं!
आता कसं!
आधी हेच वाचलेलं का मी इथेच
आधी हेच वाचलेलं का मी इथेच कुठे तरी?
http://www.maayboli.com/node/30171
सेमच आहे का हे?
होय रिया. ती चुकून
होय रिया. ती चुकून प्रकाशचित्र मधे दिसत होती.
अच्छा! ओकेज
अच्छा!
ओकेज