टॉर्टिया (कॉर्न, होल व्हीट- जे आवडत असतील ते)
रंगीत भोपळी मिरची-१
झुकिनी- १/२
लसणीच्या पाकळ्या- २
श्रेडेड मॉझरेल्ला चीज- लागेल त्या प्रमाणात
पेस्टो सॉस- पाऊण वाटी- स्प्रेड करण्यापुरता
सिझनींगकरता- ड्राय बेसिलची पानं, पास्ता सिझनिंग, क्रश्ड पेपर,
ऑऑ- १ छोटा चमचा.
चवीप्रमाणे मीठ.
भोपळी मिरची आणि झुकिनी अगदी बारीक चौकोनी चिरुन घ्यायची. लसूणही बारीक चिरुन घ्यायची. सॉसपॅनमध्ये ऑऑ घेऊन त्यात लसूण, बारीक चिरलेल्या भाज्य्या परतून वाफ काढायची. जरा मऊ वाटल्या की त्यात चवीप्रमाणे मीठ, सिझनिंग घालून घेऊन गार होऊ द्यावं.
गरम तव्यावर टॉर्टिया जरा शेकून घेऊन त्यावर पेस्टो सॉस पसरवून घ्यावा. त्यावर चीज आणि भाजीचं मिश्रण पसरुन घेऊन अर्ध्यात फोल्ड करुन चीज वितळेपर्यंत शेकून बाजूला ठेवावा. गार झाल्यावर मध्याभागी कापून घेतल्यावर मुलांना खायला सोपा होईल.
भाज्या नको असल्यास नुसता पेस्टो+ चीजही चांगलं लागेल चवीला. चिकन हवं असल्यास घालूनही चांगलं लागेल बहुतेक.
(इथे टाकायचा विचार नसल्याने फोटो काढलेला नाही)
सायो, इंटरेस्टींग .. केसडिया
सायो, इंटरेस्टींग ..
केसडिया माझीही अगदी आवडती शॉर्टकट रेसिपी ..
पेस्टो घालायचं डोक्यात आलं नाही कधी ..
मस्त !
मस्त !
सशल + १. करुन बघेन
सशल + १. करुन बघेन
सायो, सही! यात मीट घालायचं
सायो, सही!
यात मीट घालायचं झालं तर कुठलं आणि त्याला काय करून घालावं म्हणजे चांगलं लागेल?
मीट घालायचं झाल्यास चिकन
मीट घालायचं झाल्यास चिकन चांगलं लागेल असा अंदाज आहे. मी घालून पाहिलेलं नाही अजून.
मृ माझी मैत्रीण रोटीसेरी चिकन
मृ माझी मैत्रीण रोटीसेरी चिकन घालते कसिडिया मधे. बरेचदा ती पुल्ड रोटिसेरी चिकन मॅरिनेट करून घेते. तिला विचारून सांगते तुला.
मृण, क्विझनोज सब मध्ये टर्की
मृण, क्विझनोज सब मध्ये टर्की स्लाईसेस आणि पेस्टो बुलेट / टॉर्पिडो मिळायचं ते मला खूप आवडायचं. त्यावरुन माईल्ड चवीचं कुठलंही मीट चांगलं लागेल पेस्टोबरोबर असं वाटतं - चिकन, टर्की, टिलापिया वगैरे.
मस्त! केसेडिया हे प्रकरण
मस्त!
केसेडिया हे प्रकरण मुलांच्या पोटात भाज्या ढकलायला बेस्ट आहे
मला रोस्टेड व्हेजिटेबल्स + मोझरेला + सन ड्राईड टोमेटो हे कॉम्बो पण आवडते
सोया ग्रॅन्युल्स + चीज घालुन केलेला केसेडिया देखिल लेकीला चिकन आहे असे सांगुन खिलवला आहे
श्रेडेड BBQ चिकन, स्लाईस्ड सॉसेजेस, खिमा सुद्धा चांगले लागते... इति कलिग (अत्ताच विअचारले कलिग ला)
ह्या रेसिपीचं इंडियन व्हर्जन
ह्या रेसिपीचं इंडियन व्हर्जन करायचं झाल्यास हे कसं वाटेल?
मस्त आहे पेस्टो घालायची
मस्त आहे पेस्टो घालायची कल्पना
पेस्टो घालायचं डोक्यात आलं नाही कधी .>>>+११
ह्या २-३ दिवसातच करुन बघेन
मस्त आहे रेसिपी. नक्की करणार!
मस्त आहे रेसिपी. नक्की करणार!
सायो, मेराभी 'केसादिया' फेव
सायो, मेराभी 'केसादिया' फेव प्रकार आहे ..
मी याकरता फ्लोअर तॉर्तियाज घरीच बनवते. फेटा चीज, चेडर चीज,कॅप्सीकम,कोथिंबीर्,आलापीनो मिर्च्या,ब्लॅक ऑलिव्ज वापरते. रेडी केसादिया साल्सा बरोबर सर्व करते..
पण तुझी पेस्टो सॉस ची आयडिया खूप आवडली.. एक वेरिएशन मिळालं..
चिकन केसादिया आमचा फेवरिट. पण
चिकन केसादिया आमचा फेवरिट. पण पॉप टेट्स मध्ये जाऊन आयते खाण्याचा. मस्त प्रकार.
वा!! कसेडिया तर आमचा
वा!! कसेडिया तर आमचा सगळ्यांचा फेव्हरेट...
केसेडिया हे प्रकरण मुलांच्या पोटात भाज्या ढकलायला बेस्ट आहे>>> +१
मी पनीर, बेबी-कॉर्न, सिमला मिर्ची ह्या भाज्या रोस्ट करून घालते..
पार्टी मध्ये हिट मेन्यु.. लहान मुलांना तर हे कॉम्बिनेशन फार आवडते...:)
सायो, आता पुढच्या वेळेस पेस्टो नक्की घालुन बघणार..
कृपया चित्र द्यावेत. बघायला
कृपया चित्र द्यावेत. बघायला आवडेल. काही इन्ग्रेडियन्ट्स माहीतच नसल्याने हा पदार्थ कसा असेल, दिसेल, लागेल हे समजलेच नाही, म्हणून चित्राची विनंती.
बेफिकीर, हे असं. आतलं सारण/
बेफिकीर, हे असं. आतलं सारण/ मिश्रण आवडीनुसार बदलता येऊ शकतं. हा फोटो नेटवरुन घेतला आहे.
मी नेहमीप्रमाणे भाजी - पोळी
मी नेहमीप्रमाणे भाजी - पोळी करते. आधी भाजी करुन घेते मग पोळी भाजुन होत आली की अर्ध्या भागावर भाजी +चीज टाकुन मुडपते अन चीज वितळेपर्यंत दोन्ही बाजुंनी थोडी भाजते. सोप्पं अन वेगळं काही करत बसायची गरज नाही.
प्राडी, अगो, थँक्स! रोटेसरी
प्राडी, अगो, थँक्स!
रोटेसरी चिकन/ग्रिल्ड लेमन चिकन आणि पेस्तो असं काँबिनेशन चांगलं लागावं.
मस्त! पेस्टो भयंकर आवडतो. आता
मस्त! पेस्टो भयंकर आवडतो. आता हा प्रकार करून बघेन.
भारी प्रकार आहे सायोनारा,
भारी प्रकार आहे सायोनारा, चित्राबद्दल धन्यवाद! उघड आहे की अतिशय स्वादिष्ट असणार.