फ्लॉवरला हिंन्दी भाषी गोभी असे म्हणतात.सध्या गोभी बाराही महिने मिळते.पण थंडीत मिळणार्या गोभीची चव छान असते.तेव्हा गोभी भाजीचे निरनिराळे प्रकार,पराठे,तिखट मोठ्ठ्या करंज्या,भजी,कचुमर /कोशिंबीर,लोणचे,पॅटीस ,गोड खीर असे निरनिराळे प्रकार करतात.त्यापैकी एक प्रकार -गोभीचा शाकाहारी खिमा आहे.अगदी साधा,करायला सोप्पा,मसाले नाहीत त्यामुळे मूळ चव टिकवणारा असा प्रकार आहे.त्यासाठी लागणारे साहित्य असे मोजकेच आहे:--
गोभी.
फोडणीसाठी [कमी प्रमाणात] तेल.
मोहोरी-जिरे-हिंग-हळद.
हिरव्या मिरच्या मधुन चिरुन घ्या व एका मिरचीचे २ तुकडे चिरुन घ्या.
मीठ.
चवीनुसार मिरेपुड.
खवलेले ओले खोबरे.
वरुन घालायला लिंबाचा रस व बारीक चिरलेली कोथिंबीर.
गोभीचे तुरे तोडुन घ्या.
गॅसवर एका पातेलीत पाणी गरम करायला ठेवा.पाणी उकळले कि गॅस बंद करुन त्यात थोडे मीठ आणि गोभीचे तुरे घाला.चमच्याने एकदा ढवळुन घ्या व पातेलीवर झाकण ठेवा.
१५ मिनिटांनी पातेलीतले पाणी एका चाळणी/रोळीतुन गाळुन घ्या.
गोभीचे तुरे थंड झाले कि किसणीवर किसुन घ्या किंवा सुरी,विळीवर बारीक चिरुन घ्या.
मी फुड प्रोसेसर वर बारीक केले आहेत.
गॅसवर एका कढईत फोडणीसाठी तेल गरम करायला ठेवुन त्यात मोहोरी-जिरे-हिंग घाला.
आता त्यात हळद ,मिरचीचे तुकडे,कढीलिंबाची पाने हाताने तोडुन टाका.त्यावर लगेचच बारीक केलेला गोभी घालुन चमच्याने छान परता.चवीनुसार मीठ,मिरेपुड आणि खोबरे घालुन पुन्हा एकदा परता.झाकण ठेवुन एक वाफ आणा.
लिंबाचा रस व कोथिंबीर घालुन पुन्हा एकदा परता्.
अगदी मेणचट न शिजवता थोडेसे कच्चे राहिले पाहिजे.
खिमा तयार आहे.पोळी/भाकरी बरोबर तसेच नुसताच खायला फार मस्त लागतो.वरुन शेव घातलेली असली तर वाह ,क्या बात है !!!!
मस्त! मी असाच करते . सगळा
मस्त!
मी असाच करते . सगळा शिजल्यावर मस्त राजवाडी मसाला टाकून ताजं दोन चमचे ताजे लोणी घालून परतते.
मस्त ...आजचा मेनु हाच ....
मस्त ...आजचा मेनु हाच ....
छान
छान