Submitted by admin on 22 March, 2013 - 00:13
यंदाचा (२०१३) वर्षाविहार हा आपला ११वा ववि आहे.. दहा वर्ष दणक्यात झालेल्या या उपक्रमात आता नवीन काहितरी भर टाकली पाहिजे , याचं स्वरुप बदललं पाहिजे असा विचार आहे. पण काय आणि कसं ते नक्की ठरलेलं नाही...
या करता आवश्यक गोष्ट म्हणजे नवीन संयोजक आणि त्याचबरोबर नवीन कल्पना...आणि त्याला पुरेसा वेळ मिळावा म्हणून आजच धागा सुरू करत आहोत.
तर मायबोलीकरांनो,
यंदाच्या ववि संयोजनात भाग घ्यायला आवडणार असेल तर तुमचं नाव या धाग्यावर कळवा.
संयोजनात भाग घ्यायला जमणार नसेल तरी हरकत नाही. पण तुम्हाला ववि कसा हवा आहे?...काही नवीन कल्पना ? लोकेशन्स ? स्वरुप, आवडणार्या नावडणार्या गोष्टी ? हे सांगू शकता. चांगल्या कल्पना आल्या तर त्याचा या वविमध्ये नक्कीच अंतर्भाव करता येईल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
यावर्षी नाशिककरांसाठी गाडीची
यावर्षी नाशिककरांसाठी गाडीची सोय करा बुवा.
अहमदनगर जवळ सुचवले असते पण
अहमदनगर जवळ सुचवले असते पण तिथे पाऊस कधी पडायचा ववीचा??
भंडारदरा एक चांगले ठिकाण आहे! मुंबई पुणे नाशिककरांसाठी
नंदिनी वर्षा विहार हे नाव
नंदिनी
वर्षा विहार हे नाव आहे पावसाळ्यात होणार्या मायबोलीकरांच्या गटग ला.
यात महत्वाच आहे मायबोलीकरांच गटग जास्तीत जास्त लोकांना सामावुन घेता येइल अस ...
नाव काय आपण देउ ते ... नाव ठेवण्यात माबोकरांचा हात कोण धरणार ...
प्राची तुम्ही नाशिककरांची सोय
प्राची तुम्ही नाशिककरांची सोय करा ... संयोजक गाडीची सोय करतील
कमी जण जरी असले तरी सुरुवात होण महत्वाच आहे ... नंतर हळू हळू आकडा वाढेल की...
नाशिककरीता सोय होत असल्यास
नाशिककरीता सोय होत असल्यास आमचे पावणेतीन मेंबर गृहीत धरा
प्रचंड बोअर होईल त्यामुळे.
प्रचंड बोअर होईल त्यामुळे. <<<+१
जेवण झाल्यावर श्रमदान किंवा भटकंती किंवा ओपन जागी खेळले जाणारे खेळ या गोष्टी करणे अवघडच
जेवणानंतर फारतर दोन ते अडिच तास हातात मिळतात
जेवणानंतर सगळेच 'खेळ' या
जेवणानंतर सगळेच 'खेळ' या प्रकारात मोडणारे उपक्रम ठेवण्यापेक्षा एखादा गाण्याचा कार्यक्रम (मागच्या वर्षी कसा वस्त्रहरणाचा प्रयोग केला होता) केला तर? आपल्याकडे किती छान छान गायक (श्यामली), वादक (वैभ्या) आहेत.. अर्थात या सगळ्यांची मोट बांधणं कितपत शक्य आहे आणि प्रॅक्टिस किती होऊ शकेल हा प्रश्न आहे, पण तरी एक सहज सुचलं म्हणून
मंजिरी +१० थोडक्यात मोठ्यांचे
मंजिरी +१० थोडक्यात मोठ्यांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम
नाशिककरीता सोय होत असल्यास
नाशिककरीता सोय होत असल्यास आमचे पावणेतीन मेंबर गृहीत धरा>>> बघा, झाली सुरुवात.
नेमेची येतो पावसाळा आणि
नेमेची येतो पावसाळा आणि त्याआधी वविच्या चर्चा.... चांगले आहे.
मला नकारार्थी पोस्ट टाकायला अजिबात आवडत नाही, त्यापेक्षा गप्प बसणे बरे वाटते, पण वरची केदारची पोस्ट वाचुन अगदीच राहावले नाही म्हणुन लिहितेय.
मी आजवर दोन वविना हजेरी लावली. रविवारच्या सकाळी मायबोलीकरांबरोबर थोडीफार मस्ती करुन झाल्यानंतर दुपारी मस्तपैकी तुडूंब जेवल्यावर छानशी डुलकी यायच्या वेळेसच नेमके सांसचे कार्यक्रम सुरू होतात. अर्थात कार्यक्रमात भाग घ्याच असा हट्ट नसतो त्यांचा पण साधारण सगळ्यांनी भाग घ्यावा अशी अपेक्षा असते. कारण वर लिहिल्याप्रमाणे आपल्या नेहमीतल्या ओळखीच्या सोडून इतर मायबोलीकरांशी ओळख होण्यास त्यांचे कार्यक्रम हातभार लावतात. पण मला भरल्या पोटी असले काही जमत नाही आणि केवळ या कारणामुळे मी परत वविच्या वाटेला गेले नाही.
मला टीका वगैरे अजिबात करायची नाहीय, जे चाललेय ते चांगलेच चाललेय, फक्त मला ते झेपत नाही इतकेच.
जेवणानंतर सगळेच 'खेळ' या
जेवणानंतर सगळेच 'खेळ' या प्रकारात मोडणारे उपक्रम ठेवण्यापेक्षा एखादा गाण्याचा कार्यक्रम (मागच्या वर्षी कसा वस्त्रहरणाचा प्रयोग केला होता) केला तर? >> +१
मायबोलीवर कित्येक हरहुन्नरी लोकं आहेत. काही आयडिया
१. फोटोग्राफी प्रदर्शन - आपले निवडक फोटोंचे प्रत्यक्ष प्रदर्शन - कित्येक मायबोलीकर फोटो काढतात. काहींनी आयडीने आपले फोटो आणून एका कोपर्यात मांडावेत. ही त्या व्यक्ती साठी एक सुरूवात असू शकते.
२. गाणे (मंजिरीने लिहिल्यासारखे)
३. एखादा छोटासा प्रयोग.
४. एखादा विषय घेऊन त्यावर ओपन चर्चा. विषय माबोवरचा जुनाही असू शकतो. पण प्रत्यक्षात मत मांडताना लोकं इंटरनेटवर जशी हुर्यो करतात तसे न करता योग्य ते मत मांडतील.
५. काही Impromptu गोष्टी
लोक एकत्र जमविन्याला विरोध नाही तर त्यांचे विविध ग्रूप करून ग्रूप निहाय खेळ खेळन्या पेक्षा नविन काही झाले तर त्याची मजा जास्त येईल. ज्यांना गाणे ऐकायचे ते ऐकतील, चर्चेत भाग घ्यायचा तर घेतील नाही तर निवांत कोणाशी गप्पा मारतील. उद्देश निवांतपणा.
नाशिककरीता सोय होत असल्यास
नाशिककरीता सोय होत असल्यास आमचे पावणेतीन मेंबर गृहीत धरा>>> बघा, झाली सुरुवात.
प्राची या वेळेसच्या संयोजनाचं मग थोडं मनावर घ्या. मदतीला आहेतच सगळेजण.
प्राची या वेळेसच्या संयोजनाचं
प्राची या वेळेसच्या संयोजनाचं मग थोडं मनावर घ्या.>>> मी नसणारे नाशकात जुलैमध्ये
नाहीतर खरंच मी केले असते काहीतरी. मागील वर्षीही जमले नाही. रेव्युंना कॉन्टॅक्ट करून सुरुवात केली होती मी, पण मग माझेच बारगळले. 
तसे बाकिच्यांचे होऊ नये, म्हणून सुचवले मी.
दोन वर्षे नाशकात असूनही वविला जाणे जमले नाही.
काही सोय होते आहे असे दिसल्यास रोमातलेही आयडी येतील पुढे.
ज्या ठिकाणी त्या हॉटेल /
ज्या ठिकाणी त्या हॉटेल / रिसॉर्ट इ. चे आयते सांस्कृतिक कार्यक्रम असतात अशा ठिकाणीही ठेवता येऊ शकतो ववि!
ज्याला ते पाहायचे आहे त्याने पाहावेत, उरलेल्यांना भटकंती / वामकुक्षी / गप्पा-टप्पा-दंगा / फोटोग्राफी इ.इ. यांपैकी काहीही करता येऊ शकते.
(अर्थात ऐन पावसाळ्यात असे सांस्कृतिक कार्यक्रम त्या ठिकाणी होतात का, तेही पाहावे लागेल!!)
थोडक्यात मोठ्यांचे विविध
थोडक्यात मोठ्यांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम > खूप चान्गला पर्याय आहे. वस्त्रहरणाचा प्रयोग पाहून हेच मनात आले होते. आपल्याकडे खूप चांगले कलाकार आहेत. रोज माबो वर ऑनलाईन न येणार्यांना याबद्द्ल माहीत नसते म्हणून आपल्यातीलच कलाकारांनी कार्यक्रम सादर केले तर मस्त होईल.
यासाठी ववी सोडून एक वेगळे माबो गॅदरींग पण करता येईल.
मी केदारच्या मतांशी सहमत आहे.
मी केदारच्या मतांशी सहमत आहे. पण तरीही, एकुण ८०/९० (तुलनेत) अपरिचित लोकांचा गट हाताळण्यासाठी त्यास कशा ना कशात गुंतवुन ठेवणे आवश्यक हे ही खरेच. आजवर सांस्कृतिक समिती ते काम इमानेइतबारे चोखपणे करत आली आहे.
मात्र वरिल साधना यांचे अनुभवाशीही सहमत. मी तर दरवेळेस (माझ्या वैयक्तिक कारणांमुळे) बाइकवरुन येऊन पुन्हा परत जायचे वेध धरत असताना या वयात खेळ वगैरे सहभागि मधे होऊ शकतोच असे नाही, पण मी अपवाद असेन.
पण आजवर जे झाले ते चाम्गलेच झाले आहे.
माझ्या मते;
१) सर्वप्रथम, माबोकर वविनिमित्ताने एकत्र येतात हाच मुळी एक मोठा "सामाजिक उपक्रम" आहे, त्याव्यतिरिक्त उगा कुठे दिखाव्या वा तत्कालिक मानसिक समाधानापोटी कुठेतरि जाउन झाडूबिडू मारणे/खड्डे खणणे वगैरे कामाला लागण्याची गरज नाही. ती कामे वर्षातिल बाकीचे ३६४ दिवस करता येतातच. हा माबोचा ववि आहे, माबोचाच ववि राहूदे, त्यात कृपया ओढूनताणून "सामाजिक बान्धिलक्या" वगैरे घसडवू नकात.
२) यंदा, जर सांस्कृतिक समितीचे खेळ वगैरे नकोच असेल तर एक करता येईल, आधीच सुचित करुन, माबोकर, त्यांचे पाल्य यांच्या कलाकृतीचे प्रदर्शन भरवता येईल. हव तर विक्रीही! हे थोडेसे "काळा घोडा" प्रदर्शनाच्या कल्पनेवर सुचतय. किंवा कॉलेजेस मधे नाही का? ग्यादरिन्गच्या वेळेस फनफेअर असायचे? तसेच काही स्टॉल्स्/खेळ्/वस्तू वगैरे उपस्थित माबोपैकी निवडक आधी नोंदविलेल्यान्ना ही संधी मिळेल, हव तर त्यांचेकडून संयोजनानिमित्त काही अधिकची फी जसे की प्रत्येक टेबल मागे १०१ रुपये वगैरे घेता येईल. माझी खात्री आहे, की एकतर माबोकर इतके हरहुन्नरि आहेत, की स्टॉल अपुरे पडावेत. दुसरे असे की बाकी माबोकर त्यातिल कुठेही जाउन आनंद लुटू शकतात. हे एक प्रकारचे लहान स्वरुपाचे "व्यावसायीक" प्रशिक्षणच असेल ज्यात माबो कर पालक्/बालक सहभागि होऊ शकतात.
कुणी कलाविषयक प्रात्यक्षिक दाखवू शकेल, तर कुणी ऑन दी स्पॉट फोटो / चित्र काड्।उन देऊ शकेल, तर कुणी जागच्याजागी अभिनय शिकवुन करवुन घेऊन त्याची क्लिप देईल. किती किती काय काय प्रकारे हे करता येईल. यामुळे माबोकरांच्या सूप्त वा पूर्णप्रशिक्षित गुणांचे दर्शन इतरान्ना होईलच, पण ववि हे अशा प्रकारच्या सादरीकरणाचे व्यासपीठ बनू शकेल. (दरवेळेस, अन फक्त अन फक्त "स्टेज डेअरिन्ग" म्हणजेच व्यक्तिमत्वविकास असे काही नसते, एका ठरविलेल्या स्टॉलच्या मागे उभे रहाणे, अन आलेल्या "गिर्हाइकांना" यशस्वीपणे तोन्ड देणे हे देखिल तितकेच महत्वाचे आहे. असो.
बाकीच्यान्नी आपापले विचार माण्डा,
फक्त जर असे स्टॉल मान्डायचे ठरल्यास मी मात्र एखादा पोपट घेऊन येईन म्हणतो!
वा, वा सुरुवातीला वविचे
वा, वा सुरुवातीला वविचे वातावरण तयार झाले आहे
हा माबोचा ववि आहे, माबोचाच
हा माबोचा ववि आहे, माबोचाच ववि राहूदे,
पाहीजेतेवढे अनुमोदक घ्या...
लिंबु, तुझ्या कल्पनेवर आधारित
लिंबु,
तुझ्या कल्पनेवर आधारित 'मायबोली फनफेअर' असा स्वतंत्र उपक्रमही सुरू करता येऊ शकतो.. त्यासाठी ववि चा जेवणानंतरचा वेळ तुटपुंजा पडेल असं वाटत नाही का?
माझेही दोन पैसे... नवीन
माझेही दोन पैसे...
नवीन सुचवताना काही गोष्टीत बदल होणे मला शक्य दिसत नसल्याने त्या गोष्टी मी गृहित धरल्यात. त्याही व्हेरिएबल्समधे आल्या तर अजून बरंच सुचवता येईल.
गृहित गोष्टी
१. एकच दिवसाची सकाळी घरातून निघून संध्याकाळी घरी परतण्याची ट्रिप.
२. मु आणि पु सोडून असलेल्या माबोकरांसाठी अन्यायकारक आहे हे मान्य पण 'जास्तीची मेजॉरिटी' करून मु आणि पु दोघांना मध्यवर्ती असे ठिकाण.
नवीन काय....
१. सांस्कृतिक समितीच्या गेम्सचा कालावधी अर्ध्यावर आणणे - त्या कार्यक्रमांची गरज, उपयुक्तता, दर्जा सगळंच मान्य आहेच पण ट्रिपच्या मूडमधे गेममधला आपला सहभाग संपल्यावर खुर्चीवर 'हाताची घडी तोंडावर बोट!' मोडमधे बसायला कंटाळा येतो. एकतर भिजणे, तुडुंब जेवण हे सगळं अंगावर आलेलं असतं त्यामुळे शांत बसणे म्हणजे बसल्या जागी पेंगणे होतं (माझंतरी) .
२. छोटी छोटी तासाभराची गमतीशीर आर्ट-क्राफ्ट वर्कशॉप्स आधीपासून अनाऊन्स करता येतील आणि त्यासाठी सायनिंग आधीच करता येईल. आणि तासाभरात घडवलेल्या वस्तू मांडता येतील.
३. छोटी छोटी आयत्यावेळची स्किटस सादर करता येतील.
मला संयोजनात मदत करायची आहे.
मला संयोजनात मदत करायची आहे.
मस्त आहे ववि
मस्त आहे ववि
गेल्या दहा वर्षातल्या ववीचे
गेल्या दहा वर्षातल्या ववीचे फोटो/ व्हीडिओज आहेत का संयोजकांकडे? असतील तर त्यातुन अर्ध्याएक तासाचे मस्त स्लाईड्/व्हीडीओ प्रोजेक्शन करता येईल.
मध्यवर्ती ठिकाण "मुंबई "असेल तर यायला नक्की आवडेल
.
.
मंजिरी, स्वतंत्र फनफेअरच्या
मंजिरी, स्वतंत्र फनफेअरच्या वा अन्य काही, हा नंतरचा विषय होईल. जेवणानंतरची वेळ पुरेशी ठरेल. ३ तासापेक्षा जास्त वेळ लागणार नाही. जे सहभागि कलाकार्/स्टोल धारक अस्तील, ते काहीवेळ पाण्यात बागडणे टाळून अन त्यान्चे बारा/पन्धरा कोर्सचे जेवण न करता जरा लौकरच आटपते घेउन, मान्डामान्ड करतील, जेव्हा बाकीचे जण खेळून / जेवून येतिल, तेव्हा सर्व तयार असेल. किती टेबल्स्/प्रकार यान्च्या सन्ख्येवर आपण मर्यादा ठेऊ शकतो. सर्वाधिक प्रतिसाद ज्या स्टॉलला मिळतील, किन्वा अन्य काही निकषाने समारोपाच्या केवळ पंधरा मिनिटे चालवायच्या कार्यक्रमात बक्षिस/आभारप्रदर्शन वगैरे करू शकतो. एखाद वर्शी हे करुन बघायला हरकत नसावि.
वर नीरजेने सान्गितलेले "गमतीशीर आर्ट-क्राफ्ट वर्कशॉप्स " देखिल करता येईल.
बाकी, वेळ मिळत नसतो, काढावा लागतो हे नव्याने सान्गायला नकोच, नै का?
वविच्या वेळी कृत्रीम पावसाची
वविच्या वेळी कृत्रीम पावसाची व्यवस्था असावी!
लिम्बुभाव, सांस ची जबाबदारी तुम्ही घ्या भो!
लक्षात घ्या की एकूण सन्ख्या
लक्षात घ्या की एकूण सन्ख्या जर १०० असेल, अन एक चतुर्थांश (२५) जणान्नी १० ते १५ टेबल्स्/स्टॉल्स मान्डले तर बाकी ७५ जणान्ना प्रत्येक स्टॉलवर पाच मिनिटे या हिशेबाने ७५ मिनिटात भेट देता येऊ शकेल, दुसर्या शब्दात, उपलब्ध वेळ ३ तास (१८० मिनिटे) धरला, तर प्रत्येक स्टॉलकरता १० मिनिटे धरुन जास्तीतजास्त १८ स्टॉलला परवानगी देता येईल. अर्थात वरील नीरजेच्या थीम प्रमाणे काही असेल, तर वेळेचे गणीत कमीजास्त करून स्टॉल्सची संख्या ठरविता येईल.
अहो तिन तास फार झाले.
हां, मात्र स्टॉल धारकच, "आम्हाला नै ब्वॉ दुसर्या कुणाचे काहीच बघायला मिळाले" असे कुचकुचले तर त्याला नाईलाज असेल. स्टॉल घेतानाच, जोडीला कुणि घेऊन, याबाबतची तजवीज, अथवा त्याग त्यान्ना करावा लागेल.
इम्याजिन करा, की कुणा स्टॉलवर कुणी आर्टपेपर/ड्रॉइंगपेपरवर वॉटर/ऑईलकलरच्या फास्ट चित्रांचे प्रात्यक्षिक दाखवतोय, कुणी स्केचेस दाखवतोय, कुणाचे भरतकाम/शिवणकामाचे ढीगभर नमुने उपलब्ध आहेत, कुणी कोल्डड्रिन्कच्या बाटलीच्या बुचात काठी-दोरिला बान्धलेलई रिन्ग अडकवायचा खेळ घेऊन आहे तर कुणी चेंडूने ग्लास पाडायचे घेऊन बसलाय, कुणी जागच्या जागी फोटो काडून देत आहे, तर कुणी स्केच काढून देत आहे, कुणी एकपात्र/द्विपात्रि नाटुकली सादर करतय, माझ्यासारखा कुणी पोपट घेऊन बसलाय....
>>> लिम्बुभाव, सांस ची
>>> लिम्बुभाव, सांस ची जबाबदारी तुम्ही घ्या भो! <<< नको, त्यापेक्षा सासूच्या भूमिकेतच बरे आहे
तिन तास फार झाले.>>>>>> आणि
तिन तास फार झाले.>>>>>> आणि कोणी गाद्या टाकून बसला असेल तर, तिथे क्यू लागला असेल अर्धा अर्धा तासाच्या झोपेसाठी, कारण तुडुंब जेवण अंगावर आलेलं असेल तोपर्यंत
मग नाही पुराचा वेळ. 
तिन तास फार झाले.>>>>>> आणि
तिन तास फार झाले.>>>>>> आणि कोणी गाद्या टाकून बसला असेल तर, तिथे क्यू लागला असेल अर्धा अर्धा तासाच्या झोपेसाठी, कारण तुडुंब जेवण अंगावर आलेलं असेल तोपर्यंत मग नाही पुराचा वेळ. >>:P
Pages