खव्याचा पेरू, व पेरूची बर्फी [फोटो सहीत]

Submitted by प्रभा on 23 March, 2013 - 08:40
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

खवा २ वाटी, खोबरा किस १ वाटी ,काजू १०-१२, मिल्क पावडर ४-५ चमचे, पिठी साखर २ वाटी, वेलदोड्याचे दाणे व तिळ [आतील बियांसाठी] बिटाचा रस १ चमचा किंवा लाल रंग, हिरवा रंग ,केसर जायफळ स्वादासाठी.

क्रमवार पाककृती: 

प्रथम खवा थोडा गरम करावा.[ मा. वे. त १ मिनीट ठेवला तरी चालेल] बाहेर काढुन थोडा थंड करुन घ्यावा. काजूची पावडर करुन त्यात मिल्क पावडर १ चमचा , ३-४ चमचे पिठी साखर, बिटाचा रस किंवा किंचीत लाल रंग , वेलदोड्याचे ८-१० दाणॅ व चिमुट भर तिळ व अर्धी वाटी खवा हे सर्व मळून त्याचे २-३ बॉल बनवून घ्यावेत.
आता खोबरा किस, काजूची पावडर, मिल्क पावडर १ वाटी पिठी साखर थोड मिक्सर मधे फिरवून बाकी उरलेल्या खव्यात मिसळावे. त्यातील थोडा गोळा पॉलिथिनवर पुरीच्या आकारात पसरावा त्यावर लाल बॉल ठेवून हातावर घेवून पुरणाच्या पोळी प्रमाणे लाल बॉल मधे झाकावा.

त्याला थोडा आकार देवून फ्रीझ मधे अर्धा तास ठेवाव. . नंतर बाहेर काढून नीट पेरूचा आकार द्यावा.


१ चमचा दूध घेवून त्यात चिमटीभर हिरवा रंग व अर्धा चमचा मिल्क पावडर घालून पेस्ट बनवावी.
व ब्रशच्या सहाय्याने रंग लावावा. रंग वाळल्यावर परत थोडा वेळ फ्रीझ मधे ठेवावा. बाहेर काढून
फोडी कराव्यात. बर्फी तयार.

अशा प्रकारे आपण कुठ्लेही फळ व बर्फी बनवू शकतो. आता आंब्याचा पल्पही मिळतो. वरील प्रमाणे गोळा बनवून मधे पनीरच सारण भरून आंबा -- बर्फी बनवू शकतो. क्रुत्रीम रंग मुलांना चालत नसल्यास पर्याय शोधता येइल.मुलांच्या वाढदिवसाला अशा वेगवेगळ्या [पेरु, आंबा ,गाजर, कलिंगडची फोड] बनवून
पौष्टीकता व आनंदही द्विगुणीत करू शकतो. फोटो टाकतेच... आंब्याच्या दोन फोडी नमुना म्हणून
देत आहे. पाहा मग करून.

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रभाताई एकदम झकास कृती. तुमची गाजराची बर्फी पण खूप आवडली. निश्चित करणार. या पण कृतीचे जमल्यास स्टेप बाय स्टेप फोटो टाका.

वा ! मस्त आहे कल्पना. मुलांच्या वाढदिवसासाठी अशी फळे करुन द्यायची कल्पना तर छानच आहे. यावरुन अजुन एक आयडिया....अशा फळांची परडी, फळांचा घड, असे इतर प्रसंगी पण भेट म्हणुन देउ शकतो.......ओटी भरणे, दिवाळीला भेट....

दीपा खुपच छान. मस्त जमली बर कलिंगडची फोड
विद्याक, तुम्ही पण छान सुचवल. खुपच छान आहे आयडिया. मध्यंतरी मी गाजराच्या वडीचा थोडा गोळा उरला होता त्याची छोटी-छोटी फुल केली होती. छान झाली होती. फोटो नाही काढलेत. पण छान दिसतात..