खिम्याचे पॅटीस

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 20 March, 2013 - 05:15
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

पाव किलो खिमा
२ कांदे चिरुन
२ चमचे आल,लसुण, मिरची, कोथिंबीर पेस्ट
हिंग पाव चमचा
हळद १ चमचा
१ ते २ चमचे मसाला (लाल मिक्स मसाला/मटण मसला)
१ चमचा गरम मसाला
दिड ते दोन चमचे मसाला किंवा १ चमचा लाल तिखट
चविनुसार मिठ
अर्ध्या लिंबाचा रस
शॅलोफ्राय करण्यासाठी तेल

कव्हर साठी
१ किलो बटाटे
ब्रेड स्लाईस
रवा
मिठ

क्रमवार पाककृती: 

खिमा :
१) प्रथम खिमा स्वच्छ धुवून घ्या. त्याला आल्,लसुण्, मिरची. कोथिंबीरची पेस्ट लावून थोडा वेळ मुरवत ठेवा.
२) भांड्यात तेल टाकुन त्यावर कांदा गुलाबी रंगाचा होई पर्यंत शिजवून घ्या.
३) शिजलेल्या कांद्यावर हिंग, हळद, मसाला घालून परतवा.
४) ह्या मिश्रणावर खिमा घालून पुन्हा चांगले परतून घ्या व अगदी थोडे पाणी घालून भांड्यावर झाकण ठेउन खिमा शिजू द्या. खिमा भांड्यात शिजायला अर्धा ते पाऊण तास जाईल. कुकरमध्ये १० मिनीटांत शिजेल. फक्त कुकरमध्ये केल्यास पाणी आजीबात घालू नये.
५) मधुन मधुन खिमा परतवत रहा. शिजण्यासाठी पाण्याची गरज भाजल्यास ताटावरील थोडे पाणी त्यात टाकून परतवा व परत ताटात नविन पाणी वरून वाफेसाठी ठेवा. भांड्यातील खिमा शिजल्यावर त्यावर मिठ, गरम मसाला घाला, लिंबाचा रस घालून चांगले परतवून घ्या व एक दणदणीत वाफ येऊद्या. खिम्यात जर पाणी असेल तर ते आटू द्या.
झाला खिमा तयार.

कव्हरः
१) खिमा शिजता शिजताच एकीकडे बटाटे उकडून घ्या. कुकरमध्ये १ ते २ शिट्टीत शिजतात.
२) बटाटे गरम असतानाच सोलून चांगले स्मॅश करून घ्या.
३) ब्रेड स्लाईसचे तुकडे करून ते मिक्सरमध्ये फिरवून घ्या.
४) ह्या मिस्करमधुन काढलेल्या ब्रेडच्या चुर्‍यावर थोडे पाणी मारा व तो मळून घ्या.
५) आता तो स्मॅश केलेल्या बटाट्यांमध्ये मिसळा.
६) ह्या मिश्रणामध्ये आता चवीनुसार मिठ घालून ते एकजीव होई पर्यंत चांगले मळून घ्या.

पॅटीस :
१) बटाट्याच्या मिश्रणाचा लिंबा एवढा किंवा तुम्हाला आवडेल त्या साईझचा गोळा करून घ्या.
२) त्याची मोदकाला करतात तशी वाटी करा.
३) त्या वाटीत १ चमचा खिमा भरा.

४) आता ही वाटी हलक्या हाताने मोदकाप्रमाणे वरच्या बाजूला वळवत बंद करून पॅटीस बनवा.
५) हे पॅटीस रव्यामध्ये हलक्या हाताने घोळवा.

५) तापलेल्या तव्यावर थोडे तेल सोडून हे पॅटीस मध्यम आचेवर शिजवा. एक बाजू साधारण ४-५ मिनीटे शिजवून दुसरी बाजू तेवढीच शिजवा. परतल्यावर पुन्हा एकदा तेल सोडा म्हणजे पॅटीस खरपूस होतात.

हे पॅटीस गरमागरम सॉस सोबत खा.

वाढणी/प्रमाण: 
प्रत्येकी २ तर सहज संपतात.
अधिक टिपा: 

ऑगस्ट २०१२ च्या माहेर ह्या अंकात ही पाकृ प्रसिद्ध झाली आहे.

* जर पॅटीस वळण्याची कसब असेल तर ब्रेड नाही टाकला तरी चालेल. नुसता बटाटा स्मॅश करून त्यात मिठ घालून चांगले पॅटीस वळता येतात.
* कोणताच मसाला नसेल तर १ चमचा मिरचीपूड घालू शकता.
* खिम्यामध्ये मटार, फ्लॉवरही घालता येतात वाढवण्यासाठी.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लाजो Lol तेही छान होतात. माझ्या श्रावणीला दोन्ही प्रकार तितकेच आवडतात.

दिनेशदा, भाऊ, विजय, पराग, अमेय धन्यवाद.

मस्त ! तोपासु. माझी अगदी आवडती डिश. फक्त मी ब्रेड्+बटाट्याच्या आवरणात खिमा भरल्यावर ते फेसलेल्या अंड्याच्या मिश्रणात बुडवून मग रव्यात घोळवुन शॅलोफ्राय करते.

मस्तच रेसिपी!!

मी खीमा करून पेस्ट्री पफ मधे घालते आणी खीमा पटीस बेक करते. अगदी झकास होतात.आता हे ही करून बघते.

तुझ्या रेसिपीच मट्ण केलेल आणी खूपच छान झालेल. फोटो काढ्लाय पण कसा पोस्टायचा ते काही केल्या जमत नाहिये....

फोटो मस्तच आहेत .. Happy

एव्हढ्या कौशल्याने स्टफ न करताबटाटे / ब्रेडक्रम्ब्ज् त्यातच (खिमा किंवा कुठलंही दुसरं सारण) मिसळले तरीही होऊ शकेल ना? फक्त त्याताला "कटलेट्स / कबाब" म्हंटलं की झालं .. Wink

"आज काय एक मासो सोडणत नाय दिसता.. 'जागू' बाफ झालो का काय? ". आज 'मासे' हा विषय 'गजाली'वर इतका रंगला कीं तिथल्या मान्यवर 'परदेसाई'नी उत्स्फुर्तपणे त्यावर केलेली ही कॉमेंट !

जागू भारीये हे. या विकांताला नक्की. आमच्या समोरच्या काकू यात मध्यभागी एक उकडलेलं अंड पण घालायच्या. आधी अंड, त्यावर खीमा, त्यावर बटाट्याची पारी, वर रवा. त्या बहुतेक तळत असत. पन हे शॅलो फ्रायच बरयं. आणि सर्व्ह करताना मधून उभं कापायचं, म्हणजे सगळे लेअर्स दिसतात.

जागू खतरनाक......मी हे फक्त विकतच खाल्लेत :):)लोलाच्या पद्धतीने करून पाह्यला हवं. पॅटीस मोड्ण्यात माझा हात कूणी धरू शकणार ना।ही Wink

जबरा...पण मला ती बटाट्याची पारी काहि केल्या जमणार नाहि, जरी जमली तरी त्यातून हमखास खिमा बाहेर डोकाऊन बघेल याचि खात्री, त्यामुळे पास Wink

भाऊ Lol

सगळ्यांना धन्यवाद.

हे अंड्यामध्ये घोळूनही करतात पण मला रव्याचा कुरकुरीतपणा आवडतो.