मज्जा वाटतेय ना नाव वाचून ? पण अचारी म्हणजे कुक नाही.. अगदी मराठीत सांगायचे तर चिकन लोणचे मसाला. मूळचा उत्तर भारतीय प्रकार आहे हा.
नॉर्थकडे कश्याचीही लोणची बनवतात आणि तिही मोहरीच्या तेलात.
पण आपल्याला जर राई के तेल की खुशबु पसंद येत नसेल तर तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही तेल जSSSSरा सढळ हाताने वापरा.
पाउण किलो चिकन मध्यम आकाराचे तुकडे करून
३ टेबल्स्पून तेल मोहरीचे किंवा कोणतेही जे आवडेल ते खाद्य तेल. (आपल्याला शक्य होईल व आवडेल तसे आणि तितके जास्त तेल)
जिरे, पिवळी मोहरी, कलोन्जी, बडीशेप आणि मेथ्या प्रत्येकी १ टी स्पून.
(हल्ली हे सर्व साहित्य मिसळलेले पंचफोरण ह्या नावाने मिळते. ते पंचफोरण असेल तर एक मोठा चमचा भरून)
३-४ हिरव्या मिरच्या
२ टेबल्स्पून आलं लसूण पेस्ट
१ टि स्पून हळद, १ टेबल्स्पून लाल तिखट, चवीप्रमाणे मिठ
१/२ कप ताजे घट्ट दही
लिंबाचा रस एक टेबल्स्पून
२ मध्यम आकाराचे कांदे बारिक चिरून
२ मध्यम आकाराचे टोमॅटो
मुठभर कोथिंबिर
चिकन चे तुकडे स्वच्छ धुउन त्याला चवीप्रमाणे मिठ, हळद, लाल तिखट आणि आलं लसूण पेस्ट लाउन घ्यावी. मग एक चमचा तेल आणि अर्धा कप घट्ट दही टाकून सगळ्या चिकनच्या तुकड्याना व्यवस्थीत लाउन चिकन झाकून ठेवावे.
मग एका जाड बुडाच्या पॅन मध्ये थोडेसे तेल टाकून त्यावर बारीक कापलेला कांदा गुलाबीसर होई पर्यंत परतुन घावा. मग आच बंद करून कांदा थोडा गार करायला वेगळ्या डिश मध्ये काढावा.
कांदा आणि टोमॅटो मिक्सर मध्ये बारिक वाटून दोन्हीची एकत्र प्युरी करुन घ्यावी.
मग पॅन मध्ये कांदा टोमॅटो ची ही गुलाबीसर केशरी प्युरी टाकुन मध्यम आचेवर परतुन घावी. मिश्रण शिजत आले की रंग बदलू लागतो. आता त्यावर मॅरीनेट केलेले चिकन चे तुकडे टाकून परतून घावे. चिकन ला दही लावल्याने परतत असताना थोडे तेल सुटू लागेल. मग एक कपभर किंवा आपल्याला हवे तसे थोडे अधिक पाणी घालावे. चिकन शिजत आल्यावर दुसरीकडे फोडणीच्या पळीत दोन चमचे तेल टाकून त्यात फोडाणीचे सामान.. पंचफोरण जरासा हिंग आणि उभ्या चिर दिलेल्या अक्ख्या हिरव्या मिरच्या घालून चुरचुरीत फोडणी करावी.
चिकनवर ही फोडणी घालून जरा स्वाद मुरण्यासाठी एक वाफ काढावी. आच बंद करावी
जेव्हढे आंबट आवडत असेल त्याप्रमाणे लिंबाचा रस घालावा. गरमागरम रोटी/ फुलक्यांसोबत खायला आचारी मूर्ग तयार !!
हे चिकन सर्व्ह करायच्या बराच आधी काही तास बनवुन ठेवले तर जास्त चविष्ठ लागते. मोहरी मेथ्या कलोंजी चा स्वाद चांगला मुरतो.
दही घातल्याने ग्रेवीला दाटपणा येतो. पण थोडी तेलकट होतेच.
ओ अॅडमिन प्रादेशिक मध्ये उत्तरभारतीय ऑप्शन नाहिये का ? का ?
ही रेसिपी घरात चिकन बनवायचा
ही रेसिपी घरात चिकन बनवायचा वसा घेतलेल्यांकडे पास केली जाईल.
फोटो भारी आला आहे. इथले बोनलेस, स्किनलेस चिकन वापरतेस का?
लै भारी रेसिपी! नक्की करून
लै भारी रेसिपी! नक्की करून बघणार!
भारी आहे, आचारी आलू केला
भारी आहे, आचारी आलू केला खाल्ला आहे, चिकन चा प्रयोग करणेत येईल
सायो अगं इथे चिकन विंग्ज्स
सायो अगं इथे चिकन विंग्ज्स कापून वापरले आहेत.
परंतू एरव्ही होल चिकन कापून देण्याचा वसा घेतलेले आमच्या घरीच आहेत
वा !!! ............ तोंडाला
वा !!!
............ तोंडाला पाणी सुटलय
मस्त पाककृती. वैभवराव
मस्त पाककृती.
वैभवराव तुम्हीपण
नॉर्थकडे कश्याचीही लोणची बनवतात >>> आजचं एका दिल्लीकराच्या टिफीनमधील सिमला मिर्चचं लोणच खाल्लं
ग्रेव्हीमधलं आचारी चिकन
ग्रेव्हीमधलं आचारी चिकन खाल्लं नाहीये, पण टिक्का प्रकारातलं आचारी चिकन ऑल टाइम फेव्हरिट आकरुन्हे सुद्धा आवडेल घरी.
झकास पाककृती! फोटोपण ला.गा.
झकास पाककृती! फोटोपण ला.गा. ला.
वैभवराव तुम्हीपण >>>>> कुणला
वैभवराव तुम्हीपण >>>>>
कुणला सांगू नका काय हे आपल्यात्लं गुपीत !!!!
_______________________
मी टोमॅटोचं लोणचं खाल्लय............कुणी सांगेल का कसं करायचं.????
मस्तं !
मस्तं !
अचार/अचारी हवयं आचारी
अचार/अचारी हवयं आचारी नव्हे.
बाकी तुमचे कार्य महान आहे.
असं आहे होय विचार आचार केलाच
असं आहे होय
विचार आचार केलाच नाही. माझं द हिंदी इस कच्च आसींग
केलं दुरुस्त. धन्यवाद !
मस्त रेसिपी, प्र.चित्र!!
मस्त रेसिपी, प्र.चित्र!!
भारी दिसतंय शानचा अचारी
भारी दिसतंय शानचा अचारी मसाला पण मस्त आहे.
मस्तं!
मस्तं!
फोटो कातील आहे. रेस्पी सोपी
फोटो कातील आहे. रेस्पी सोपी वाटते आहे. करण्यात येईल.
छान प्रकार. दुष्मन देशात पण
छान प्रकार.
दुष्मन देशात पण फार लोकप्रिय आहे. त्यांचा तयार मसाला मिळतो,
तोंपासु रेसिपी. उत्तरांचलला
तोंपासु रेसिपी.
उत्तरांचलला एका धाब्यावर पाहिला होता हा प्रकार.
फोटो कातील आहे>>>>शुगोल +१
एकदम यम्मी दिसतय! घरच्या
एकदम यम्मी दिसतय!
घरच्या चिकनखाऊंसाठी करुन खिलवण्यात येइल
फोटो खतरा. आचारी आलू करण्यात
फोटो खतरा. आचारी आलू करण्यात येइल. चिकनवाल्यांना हवी असल्यास रेसिपी देण्यात येइल.
एक हैदराबादी मैत्रिण भारतातून येताना चिकन, मटण अशी लोणची आणायची. भात , एखादं लोणचं आणि दही असा तिचा नेहमीचा डबा असायचा. नाव वाचून तसा काही प्रकार आहे की काय असं वाटलेलं. एकुणात भारतभरातले लोकं कशाची पण लोणची घालतात .
,दुष्मन देशात पण फार लोकप्रिय
,दुष्मन देशात पण फार लोकप्रिय आहे. त्यांचा तयार मसाला मिळतो,,,,, अगदी अगदी,,,
इन्डोनेशियाला माझ्या पाकिस्तानी विद्यार्थिनीने मला हा आणी बरेच मसाले दिलेहोते.,खूप्पच वेगळी आणी सुपर टेस्टी होते मसाले.
डॅफोडिल्स ची रेस्पी ही मस्त दिस्तीये..
फोटो सहि, मस्त तेलाचा तवंग
फोटो सहि, मस्त तेलाचा तवंग आलाय
<<दुष्मन देशात पण फार लोकप्रिय आहे. >> +१
आमच्या गावात एक रेस्तराँ आहे, रावळपिंडीवाल्याचं; चाबूक चिकन अचारी (आणि चिकन निहारी) बनवतो. खुप वाईट वाटतं फाळणी झाल्याचं...
आमच्या गावात एक रेस्तराँ आहे,
आमच्या गावात एक रेस्तराँ आहे, रावळपिंडीवाल्याचं<<<<< कुठलं?
तंदूर - पॉवर्स फेरी रोड
तंदूर - पॉवर्स फेरी रोड
मस्तच!
मस्तच!
एरव्ही होल चिकन कापून
एरव्ही होल चिकन कापून देण्याचा वसा घेतलेले आमच्या घरीच आहेत >>>
बाकी रेसिपी एकदम तोंपासू.
मस्त दिसतंय. करून पाहीन.
मस्त दिसतंय. करून पाहीन.
खाद्यपदार्थ आणि फास्ट बॉलर्स
खाद्यपदार्थ आणि फास्ट बॉलर्स ह्या दोन गोष्टींसाठी फाळणी टळली असती तर बरं झालं असतं असं नेहेमी वाटतं.
ह्युस्टन ला एक पाकिस्तानी बफे रेस्टोरंट आहे. केवळ त्या जेवणासाठी आणि त्या खीरीसाठी पाच तास ड्राईव्ह करून तिथे गेलो होतो दोन वेळा. त्याच भागात केळीच्या पानावर ऑथेंटिक साउथ ईंडियन जेवण मिळण्याचं ठिकाण आहे. पैसा, वेळ सगळं वसूल
<<खाद्यपदार्थ आणि फास्ट
<<खाद्यपदार्थ आणि फास्ट बॉलर्स ह्या दोन गोष्टींसाठी फाळणी टळली असती तर बरं झालं असतं असं नेहेमी वाटतं. >>
अॅड गुलाम अली अँड मेह्धी हसन टु दॅट...
काल ह्याच Veg Version केल.
काल ह्याच Veg Version केल. त्या मुर्ग च्या ऐवजी भाज्या घेतल्या. झकास टेस्टी झाली होती भाजी
Pages