Submitted by जागू-प्राजक्ता-... on 23 January, 2013 - 14:58
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
क्रमवार पाककृती:
निवडलेली टेंगळी पाण्यातुन चांगली धुवून काढा.
भांड्यात तेलावर कांदा गुलाबी रंगावर तळून घ्या. त्यावर हिंग, हळद्,मसाला घालून परता. ह्या मिश्रणावर टेंगळी, वांगी घाला व मध्यम आचेवर वाफेवर चांगली शिजू द्या. (चांगली वाफ येण्यासाठी भांड्याच्या ताटावर पाणी ठेवा.) वांगी शिजली की त्यावर मिठ, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर घालून परत एक वाफ द्या आणि गॅस बंद करा.
ही आहे तयार टेंगळी सुकट.
वाढणी/प्रमाण:
३ ते ४ जणांसाठी
अधिक टिपा:
टेंगळी सुकट ही भिळजे ह्या माशांपासुन बनविली जाते. ही रश्यापेक्षा सुकीच जास्त चांगली लागते. वांगे हे ऑप्श्नल आहे. नाही घातले तरी चालते. पण कुठल्याही सुक्या माश्यांमधे वांगे चविष्ट लागते.
सुके मासे १) सुकी करंदी/सुकट - http://www.maayboli.com/node/39289
मासे/मटण/चिकन/अंडी फॅन क्लब - http://www.maayboli.com/node/23836
माहितीचा स्रोत:
आई
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छे छे. कुठल्याही इसेन्सने
छे छे. कुठल्याही इसेन्सने सुकटाचा वास जाण्यासारखा नाही.
तयार झालेल्या प्रकरणांचा पण वास झेपण्यासारखा नसतो.
नीरजा जाऊदे चल. तुझ्या
नीरजा जाऊदे चल. तुझ्या मिस्टरांना खाऊ घालू आपण. त्यांना मासे आवडतात अस म्हणाली होतीस ना तू.
जागुतै ते नाव मस्त आहे.
जागुतै ते नाव मस्त आहे. रेसीपी तर असणारच.
मी तर ठरवलय पुढच्या जन्मी
मी तर ठरवलय पुढच्या जन्मी जागूच्या पोटीच जन्म घेईन
अश्विनी मामी धन्स. अवल माझ्या
अश्विनी मामी धन्स.
अवल माझ्या लेकी, ये मी तुला बाऊ भरवते.
जागु आपन आगरी मानस
जागु आपन आगरी मानस बोलल्यानन्तर आपल्याला सुखी मच्छी आव्दने साहजिकच आहे.
वा! जागु, मस्त रेसिपी.
वा! जागु, मस्त रेसिपी. याबरोबर भाकरी ही हवीच. माझ्यासाठी पण २ भाकर्या टाक. मी पण येते. चालेल ना?
तुशपी विद्या ये लवकर.
तुशपी
विद्या ये लवकर. :स्म्ति:
Pages