Submitted by सावली on 24 February, 2013 - 01:30
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
नेहेमीच्या इडलीत तांदुळ घालतो त्या ऐवजी नाचणी घालायची.
मधुमेहात तांदुळ चालत नाहीत पण नाचणी चांगली असते म्हणुन तांदळा ऐवजी नाचणी वापरुन इडलीचा प्रयोग केला तर तो सक्सेसफुल झाला. कोलेस्टरोल साठी खोबरे न वापरता अक्रोड वापरुन चटणी केली तीच्याही चवी / रुपात फारसा फरक नाही वाटला. फार काही नाविन्य नाही पण शोधायला सोपी जावी म्हणुन नवी रेसिपी म्हणुन देत आहे.
इडली साठी
- दोन वाट्या नाचणी
- दोन वाट्या उडीद डाळ
चटणी साठी:
- मुठभर अक्रोड
- मिरच्या दोन तीन
- भरपुर कोथिंबिर
- मीठ चवीपुरते
- जीरे
क्रमवार पाककृती:
इडली
सकाळी वेगवेगळे भिजवुन ठेवा. संध्याकाळी वेगवेगळेच मिक्सरला वाटून घेऊन एकत्र करुन थोडावेळ ढवळुन ठेवा.
दुसर्या दिवशी सकाळी पिठ फुगुन वर आले असेल ( भारतीय हवेत )
नेहेमीसारख्या इडल्या करा.
चटणी
सर्व जिन्नस थोडे पाणी टाकुन मिक्सरला वाटुन घ्या. नेहेमीसारखी चटणी तयार होते.
अधिक टिपा:
-लागणार्या वेळात पिठ तयार करायचा वेळ अर्थातच लिहिला नाहीये.
माहितीचा स्रोत:
रेडिमेड नाचणी इडलीचे पॅकेट दुकानात पाहिलेले ते आणण्याऐवजी घरी प्रयोग करुन पाहिला. चटणी - प्रायोगिक ( खोबरे मिळत नसल्याने जपानमधे इतर विविध पदार्थ टाकुन चटणी करुन पाहिली होती त्यात अॅवोकडोची आणि अक्रोडची चांगली वाटली.
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त! बंगलोरला रागी इडली,
मस्त! बंगलोरला रागी इडली, डोसे मिळायचे. रागी (नाचणी की नाचणीसदृश) डोसे मस्त लागतात.
अक्रोड चटणी मात्र मला ठाऊक नव्हती. करुन पाहीन.
रागी म्हणजे नाचणीच. कॉमन आहे
रागी म्हणजे नाचणीच. कॉमन आहे का मग नाचणी इडली? उगाच रेस्पी लिहिली का काय...
कॉमन नाहीये. असूदेत
कॉमन नाहीये. असूदेत
रागी नाचणी एकच. अक्रोड चटणी
रागी नाचणी एकच.
अक्रोड चटणी भारीच.
अक्खी नाचणी घेतली ना? लिहिलेत
अक्खी नाचणी घेतली ना?
लिहिलेत ते बरे केलेत... प्रमाण माहिती होते. मऊ होतात का?
२:२ प्रमाण आहे म्हणून विचारतेय. रोजचे प्रमाण ३:१(इडली रवा:डाळ) घेते मी.
अक्खी नाचणी घेतली ना? >> हो
अक्खी नाचणी घेतली ना? >> हो अख्खी नाचणी.
मऊ होतात का? >> हो खुप मऊ होतात.
२:२ प्रमाण आहे म्हणून >> मला तांदळाचे हेच प्रमाण माहीत होते त्यामुळे तेच वापरले
सावली, माझ्या सारख्या
सावली, माझ्या सारख्या अडाण्यांसाठी रेसिपी राहु दे.
अक्रोड चटणी साठी खुप आभार. हा विचार कधी केलाच नव्हता.
मस्तच पण फोटु प्लीज
मस्तच
पण फोटु प्लीज
माझ्यासाठी दोन्ही पाककृती
माझ्यासाठी दोन्ही पाककृती एकदम कल्पक. अक्रोडाच्या चटणीची आयडिया तर भारीच आहे एकदम
भारी आहे, मी नाचणी फ्यान आहे,
भारी आहे, मी नाचणी फ्यान आहे, नक्की करुन बघेन पुढच्या वेळेस. फोटु टाकशील का प्लीज, जरा कळेल कशी दिसते म्हण्जे मी केलेल्या एंड प्रोडक्टशी म्याच करता येइल.
भारी आयड्या. इथे नाचणी मिळेल
भारी आयड्या.
इथे नाचणी मिळेल की नाही माहिती नाही. डाळ वाटून त्यात नाचणीचे पीठ घालून ठेवले तर फसफसेल का ?
मस्त!!!! सिंडरेला ++१....
मस्त!!!!
सिंडरेला ++१.... इथेही अख्खी नाचणी नाही मिळत.
वेगळीच रेसिपी सावली. फोटो?
वेगळीच रेसिपी सावली. फोटो?
इथे नाचणी मिळेल की नाही
इथे नाचणी मिळेल की नाही माहिती नाही. डाळ वाटून त्यात नाचणीचे पीठ घालून ठेवले तर फसफसेल का ?
येस! नाचणी डोश्याकरता मी "रागी फ्लॉवर" वापरते. मस्त पीठ फुगुन वर येत.
सावली: मस्त व्हेरिएशन. पण झंपीने व्यक्त केलेली प्रमाणाची शंका मला पण आहे.
मस्त रेसिपी! सिंडी, मी
मस्त रेसिपी!
सिंडी, मी नाचणीचे पीठ वापरुन करते. http://www.aayisrecipes.com/2006/09/21/ragi-idli/
अक्रोडाच्या चटणीची कल्पना
अक्रोडाच्या चटणीची कल्पना आवडली. नक्कीच करून बघण्यात येईल.
कल्पु, स्वाती२ धन्यवाद. करुन
कल्पु, स्वाती२ धन्यवाद. करुन बघणेत येइल
अक्रोड चटणी जरा वेगळा प्रकार
अक्रोड चटणी जरा वेगळा प्रकार वाटतोय.. करुन बघेन..
मस्त रेसिपी. चटणी पण छानच. (
मस्त रेसिपी. चटणी पण छानच. ( मूठभर आक्रोडाच्या ऐवजी, गर पाहिजे )
शिवाय सावलीची रेसिपी आणि फोटो नाही म्हणजे लता कार्यक्रमाला हजर आहे पण गाणार नाही, या घोषणेसारखे वाटले.
धन्स कल्पु, आता करुन
धन्स कल्पु, आता करुन बघेन.
अक्रोड चटणी आज करायचा विचार आहे
दिनेशदा
बरे झाले लिहीलेस. मी कधी केली
बरे झाले लिहीलेस.
मी कधी केली नाहीये नाचणी इडली. या निमित्ताने करुन बघेन. धन्यवाद सावली.
अगो +१ पण फोटु प्लीज>>>>
अगो +१
पण फोटु प्लीज>>>> +१०००
हाय्ला मस्तच!
हाय्ला मस्तच!
नाचणी इडली! मीही करून खाऊन
नाचणी इडली!
मीही करून खाऊन बघणार.
मी तांदूळ घालायचा असेल तर दोन भाग उ.तांदूळ आणि एक भाग उ.डाळ घेते, मग नाचणी : उ. डाळ पण २:१ घेऊ का? की २:२ घेऊनच करून बघू?
मंजूडी, कल्पू, झंपी तुम्ही
मंजूडी, कल्पू, झंपी तुम्ही तुमच्या एरवीच्या प्रमाणानुसार घेऊन बघा आणि इथे नक्की सांगा.
मी वरच्या प्रमाणानुसार नुकत्याच दोन वेळा केल्या. दोन्ही वेळेच चांगल्या झाल्या. ( म्हणुन तर हिम्मत करुन इथे लिहीली ) पात्रातुन काढत्यावर एकदम मऊ वाटतात , काढताना चिकटतील असे वाटते. किंचित थांबुन मग काढल्या तर चिकटल्या नाहीत. वेगळ्या प्रमाणाचा प्रयोग अजुन केला नाहीये. पुढच्या वेळेस करुन पाहिन. ( २:१ चालेल मात्र ३:१ प्रमाणात पिठ फुगेल का अशी शंका येतेय )
दिनेशदा, हे अतिशयोक्ती अलंकाराचे उदाहरण झाले की हो
पण फोटो मागणार्या सर्वांनाच, मी खाद्यपदार्थांचे फोटो काढण्यात आळस करते. त्यामुळे फोटो नाहीयेत. पुढच्या वेळेस मात्र काढायचा प्रयत्न करते.
दिसायला इडली नाचणीच्या पिठाच्या रंगाची दिसते. अख्खी नाचणी बारीक वाटली तरी तीच्या सालीचे बारीक ठिपके ठिपके दिसत रहातात.
इडल्या नाहीत, पण अख्खी नाचणी
इडल्या नाहीत, पण अख्खी नाचणी : उडीद हे २:१ या प्रमाणात घेऊन डोसे केले होते काल रात्री. मस्त झाले होते. पीठ छान आंबलं होतं. इडलीही याच प्रमाणाची करावी असं माझं मत बनलं आहे. थोडं पीठ वगळलं आहे, त्याची इडली करून बघणार नक्की
रात्रभर भिजवूनही नाचणी वाटायला तांदुळापेक्षा जास्त वेळ लागला. बराच वेळ वाटली जाईना, शेवटी उडदाची डाळही त्यात मिसळली मग छान बारीक पीठ वाटलं गेलं. नाचणी जास्त वेळ भिजवायला हवी होती का?
अरे वा, मस्त. पीठ वापरुन दोसे
अरे वा, मस्त. पीठ वापरुन दोसे तर करुन पहाणार नक्की. पीठ वापरुन इडली कोणी केली तर प्रमाण लिहाल.
चटणीची कल्पना पण झक्कास.
मस्त! करुन पाहीली, एकदम भारी
मस्त! करुन पाहीली, एकदम भारी आइडिया!! माझ्या एका मैत्रीणीला प्रेग्नंसीचा डाइबिटीस झाला आहे, तिला हा प्रकार करुन दिला, बिना तांदुळाची ईडली एकदम आवडली
सावली मी केली ही इडली थोड्या
सावली मी केली ही इडली थोड्या प्रमाणात पण काहीतरी चुकले बहुतेक. नाचणीची साले लागत होती. मी कदाचीत एकदम बारीक नाही वाटले. पीठ घेऊन करून बघू का?
काल केली होती . छान झाली होती
काल केली होती . छान झाली होती हलकी अगदी. प्रमाण एकास (डाळ) तीन (नाचणी)
Pages