सायकल ..आयुष्याची सोबतीण

Submitted by सम्राट on 15 May, 2012 - 15:43

आपल्या पैकी प्रत्येकजण लहानपणी सायकल वर स्वार झालच असणार , काहीजण अगदी विद्यालय , महाविद्यालय आणि अगदी म्हातारपणा पर्यंत सायकल ची सफर सोडत नाही ....आणि का म्हणून सोडावी ?

सायकल चे तसे फायदे अनेक आहेत, सायकल वर आपण अगदी किमान २० किलोमीटर चा प्रवास करणे शक्य असताना आपण मोटर सायकल वापरतो , पेट्रोल साठी पैसे खर्च करतोच करतो .आणि पर्यावरणाला हि इजा पोहोचवतो , सायकल नियमित चालवल्यामुळे आपले स्वास्थ्य हि चांगले राहते .

तर मग आपण गट बनवून सायकल च्या सहली का नियोजित करत नाही............. चला मित्रांनो सायकल ला पुन्हा जवळ करुया ...सायकल ..माझी सायकल

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चला, कुथे जाउऊया सहलीला...मि रोज साय्कल्च चलावते. आरामात.

सध्या पाय मोडल्याने सायकल चालवू शकत नाही.. पण तरीही मी सायकलचा आनंद रोज लुटतो... बनके पंछी गाये प्यार का तराना, हे गाणे रोज बघतो.. सायकल आवडणार्‍या सर्वाना हे गाणे समर्पित..

http://www.youtube.com/watch?v=ZKZYniG-4wk

मी सध्या नुकतीच सायकल घेतली आहे. त्यामुळे जोरदार सायकलिंग सुरु आहे. बरेच वेळेस ऑफीसला तर घेऊन जातोच पण शक्य झाल्यास विकांताला एक मोठी चक्कर मारून येतो. उन्हाळा संपायची वाट पाहतोय

मी पण माझी बाईक विकून टाकून गियर वाली सायकल घेण्याच्या विचारात आहे ,तुमची ३३००० ची सायकल काय म्हणतेय?
रुपया घसरलाय ,लवकर पैसा एक्स्चेंज करून घ्या सम्राट भाऊ....................................................

मला मोटरबाईक नीट चालवता येत नाही त्यामुळे मी सायकलच वापरतो .दररोज दहा बारा कीमी चालवतो. असे पंधरा वर्षे करत आहे .अजुनही चांगल्या वेगळ्या प्रकारच्या सायकल्स चालवायला आवडतात.

सुइंईईईइइइइ !झुप्प, झुप्प, झुप्प. हुश्श्श ! थांबली एकदाची माझी सायकल.

माझ्याकडे निरनिराळ्या प्रकारच्या, कलरच्या आणी कंपन्यांच्या सायकली होत्या. उदा. बीसए, हर्क्युलीस, हिरो अजुन काय म्हणू नका राव. भन्नाट मज्जा केली, कारण आमच्या २ नातेवाईकांची सायकल्चीच दुकाने होत्ती ना ! माझ्या तिसर्‍या वाढदिवसाला पप्पांनी पिन्की कलरची सायकल घेतली, तेव्हा मी सारखी ट्रिन्ग ट्रिन्ग ट्रिन्ग असा आवाज करत, सायकल चालवत अख्ख्या कॉलनीभर हिंडायची. अगदी पावसात सुद्धा धम्माल केली.

लोणावळा, खंडाळा, जव्हारघाट, माळशेज सगळे सायकलगृपबरोबरच केले. आता अठवले की वाटते जावे आणी सायकलवर अख्ख्या दुनियेची मुशाफिरी करुन यावी. पण हाय!!!

हायेरे वो दिन क्युं ना आये, जाजा के ऋतु लौट आये.

काही हि म्हणा , सायकल वर आपण ग्रुप बनवून फिरायला गेलेच पाहिजे, बाजारपेठेत जाण्या साठी तरी किमान सायकल हि प्रत्येकाने वापरावीच ....

सायकल, मेरी आपकी सब कि सायकल ..............
मोठेपणी बालपणाचा १० % अनुभव .सायकल

हल्लीच माझ्या नवर्‍याने देखील गियरवाली सायकल घेतली आहे. अगदी लहान मुलासारखा त्या सायकलच्या बाबतीत पझेसिव झाला आहे. सध्या रोज सकाळी उठुन कधी गेट वे ऑफ इंडिया,वरळी सीफेस असे दौरे चालू असतात. जिथे जातो तिथे आपला सायकल सोबतचा फोटो काढुन फ्रुफ म्हणुन दाखवायला आणतो(तसा आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवनार नाही हे त्याला पक्कं ठाउक आहे Proud ). तुम्ही सायकलवरुन सहलीला जाणार असाल तर मलाही सांगा म्हणजे तो देखील तुम्हाला जॉइन होइल.

माझ्या मोठ्या भावाला सुध्दा सायकलि॑गच॑ वेड आहे. कॉलेजला असताना तो एन सी सी मार्फत कारगिल शहीदा॑च्या स्मरणार्थ काढलेल्या सायकल रॅलीमध्ये सहभागी झाला होता (सन २०००). स॑पूर्ण महाराष्ट्रातून (एन सी सी बटालियन) केवळ १६ मुला॑ना त्या॑च्या शारिरीक क्षमता॑ची चाचणी घेऊन सहभागी करण्यात आल॑ होत॑. त्या॑नी केवळ १२ दिवसा॑त १६७० कि.मी. सायकलने प्रवास केला. त्यादरम्यान त्या॑नी कारगिल शहिदा॑च्या घरी जाऊन त्या॑च्या कुटू॑बीया॑ची विचारपुस केली व त्या॑च्या तत्कालिन स्थितीचा आढावा एन सी सी बटालियनला व त्या॑च्याद्वारे सरकारला पाठविण्यात आला.
वर उल्लेख केलेल्या उपक्रमाने माझ्या भावाच्या छ॑दाला राष्ट्रीय भावनेची जोड मिळाली आणि त्यामुळे त्याचा आन॑द द्विगुणित झाला.

मी पण ऑफिसमध्ये येण्या-जाण्यासाठी सायकल वापरतो. रोज ताशी २२-२४ किमी चालवणे होतेच. मुख्य म्हणजे वेळ वाचतो आणि व्यायामपण होतो.

- (हौशी सायकलस्वार) पिंगू

मला या मार्चमध्ये सायकल घेऊन एक वर्ष होईल...या वर्षभरात भरपूर सायकल चालवली...१००० किमी पेक्षा जास्तच....एक सिंहगड ट्रिप मारली, एकदा १०० किमी ची राईड केली....
फिटनेस तर वाढला आहेच पण मुळात सायकल चालवायला खूप मज्जा येते....बाकी सगळेजण धूर काढत ट्रॅफिकमधून गाड्या काढत असताना आपण आपल्या सायकलवर सुसाट जात असतो तो काही आनंद वेगळाच....

आशु, मित्राकडे आराम करत असलेली २१ गियरची सायकल सरावासाठी आणि मुख्य म्हणजे रोज जमतंय कां ते पडताळण्यासाठी घेऊन आलो. रोज १५+ किमी सायकलींग होतंय. सायकलींगच्या प्रेमात पडलोय.

रेसींग सायकल नसेल तर पाय फेंगडे होतात असं निरिक्षण आहे. त्यामुळे जास्त सायकलींग करू नये. Happy