Submitted by अजय on 21 February, 2013 - 11:24
पद्मजा फेणाणी-जोगळेकर यांची अनेक गाजलेली भाव-चित्रपटगीते, बंदिशींवर आधारित गाणी खुद्द त्यांच्याच आवाजात ऐकण्याची ही नामी संधी!! अधिवेशनाची आणि या Banquet Dinnerचीही नावनोंदणी सुरु आहे.
http://bmm2013.org/ipc-padmaja.html
या कार्यक्रमाची अधिक माहिती आणि मेनू इथे पाहता येईल.
http://bmm2013.org/banquetdinner.html
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
म्हणजे लोक जेवण करणार आणि
म्हणजे लोक जेवण करणार आणि पद्मजा फेणाणी त्यावेळेला गाणार? खूप गोंधळ नाही होणार का?
>> म्हणजे लोक जेवण करणार आणि
>> म्हणजे लोक जेवण करणार आणि पद्मजा फेणाणी त्यावेळेला गाणार?
मलाही हाच प्रश्न पडला.
गोंधळ होणार नाही. हे ज्याला
गोंधळ होणार नाही. हे ज्याला फॉर्मल सीट डाऊन डिनर म्हणतात अशा प्रकारचे असेल. तुमचे टेबल अगोदरच पूर्वनियोजीत असेल. अधिवेशनातल्या इतर जेवणापेक्षा याची व्यवस्था वेगळी असेल. तुमच्या जेवणाच्या टेबलावर तुम्हाला वाढले जाईल. आणि सगळे उपस्थित एकाच वेळेस जेवण सुरु करतील.
अशा प्रकारचे जेवण आणि असा कार्यक्रम (अधिवेशनाच्या पूर्व संध्याकाळी) या अगोदरच्या बहुतेक सगळ्या अधिवेशनातही होते आणि कुठलाही गोंधळ न होता ते पार पडले आहेत. सहसा जेवण संपत आले/संपले की कार्यक्रम सुरु होतो. आणि तुम्ही तुमच्याच जागेवर बसून त्याचा आनंद घेता.
या कार्यक्रमाचे तिकिट वेगळे आहे. आणि सभागृहाची क्षमता फक्त ८०० लोकांपर्यंत मर्यादित आहे.
दोन्हीवर अन्याय.
दोन्हीवर अन्याय.
नाही, गोंधळ म्हणून नाही, पण
नाही, गोंधळ म्हणून नाही, पण मला तरी व्यक्तिश: ते परफॉर्मरसाठी अपमानास्पद होत असेल असं वाटतं नेहमी. अर्थात त्यांनी आमंत्रण स्वीकारलं तेव्हा त्यांना त्याची कल्पना असणार. आणि असे कार्यक्रम होतात हेही खरं.
(मग मत कशाला दिलं? राहवलं नाही म्हणून. )
सहसा जेवण संपत आले/संपले की
सहसा जेवण संपत आले/संपले की असे कार्यक्रम सुरु होतात. आणि तुम्ही तुमच्याच जागेवर बसून त्याचा आनंद घेता
ओह ओके ओके.
ओह ओके ओके.
'हात वाळेपर्यंत गप्पां'च्या
'हात वाळेपर्यंत गप्पां'च्या धर्तीवर आता हात वाळेपर्यंत मनोरंजन!
फॉर्मल डिनर आहे तेव्हा
फॉर्मल डिनर आहे तेव्हा काटेचमचे वाळेपर्यंत होईल.
स्पष्ट मत मांडत असल्याबद्दल
स्पष्ट मत मांडत असल्याबद्दल क्षमस्व पण मला ही संकल्पना अजिबात आवडली नाही / आवडत नाही. फक्त गाणंच नाही तर कुठलीच लाईव्ह कला सादर होताना लोकं खातायंत आणि त्यांचं लक्ष विचलीत झालेलं बघता बघता कलाकाराने सादरीकरण करावं हे अन्यायकारक, ( प्रेक्षक सुजाण नसतील तर ) अपमानास्पदही वाटतं.
सहसा जेवण संपत आले/संपले की
सहसा जेवण संपत आले/संपले की असे कार्यक्रम सुरु होतात. आणि तुम्ही तुमच्याच जागेवर बसून त्याचा आनंद घेता >>> ओके, ही पोस्ट नंतर वाचली
फॉर्मल आहे म्हणून काय झालं?
फॉर्मल आहे म्हणून काय झालं? पुर्या, पराठे, नान सुरीनं कापून, करीत बुडवून काट्यानं तोंडात ढकलायला मराठमोळ्या जनतेला काहीच कसं वाटत नाही??
तुडुंब जेवणानंतर ब्रह्मानंदी टाळी लागण्याच्या बेतात असलेल्या मंडळींसमोर जीव तोडून कला सादर करावी लागणं दुर्दैवी आहे.
या कार्यक्रमाची अधिक माहिती
या कार्यक्रमाची अधिक माहिती आणि मेनू इथे पाहता येईल.
http://bmm2013.org/banquetdinner.html
ए इथे टीपी करू नका. गल्लेवाले
ए इथे टीपी करू नका. गल्लेवाले झाले म्हणून काय झालं? किती लाद्या ठेवतील शिरावर?
अजय
आता खरंच टीपी नको इथे.
सॉरी. अजय संतपदाला पोचले आहेत
सॉरी.
अजय संतपदाला पोचले आहेत याचा पुन:प्रत्यय आला.
हे म्हणजे जेवणाचा स्वाद आणि
हे म्हणजे जेवणाचा स्वाद आणि गाण्याची दाद एकाच मापात !
(संदर्भ: " वरणाची उकळी आणि हास्याची उकळी एकाच मापात"--- इति पु. ल. )
मला मेनुच(मराठी अधिवेशनाला
मला मेनुच(मराठी अधिवेशनाला प.न्जाबी मेनु का असेल!!??) आवडला! कन्स्पेट मला आवडत नाही! कारण वरची सगळिच लागु पडयातत..
असो शुभेच्छा!
चित्र मराठी मेनूचं आणि मेन्यू
चित्र मराठी मेनूचं आणि मेन्यू वास्तवात पंजाबी आहे.
मराठी मेनूला अजून फॉर्मल सीट डाउन डिनर टेबलवर जाण्याइतकं ग्लॅमर नाही.
चपली कबाबचा फोटो आणि रेसिपी अधिवेशन संपल्यावर टाका इथे.
जेवताना गाणं हि कल्पना चुकीची
जेवताना गाणं हि कल्पना चुकीची आहे असे मा. स्प. प्रा. म. आहे.
दोन्हीचा अपमान आहे.
(पंजाबी जेवण असल्याने स्टॅटस वाढते):फिदी: परत मराठी माणसं कशी मिळून मिसळून वागतात खातात ह्याचे लक्षण दिसते. आजकाल सगळ्याच ठिकाणी हि फॅशन आहे, मराठी कार्यक्रमात पंजाबी जेवण. गुजराती साडी नेसून येतो मग.
सध्या इतकेच (मत) पुरे.
हा मेनू फक्त पद्मजा फेणाणी
हा मेनू फक्त पद्मजा फेणाणी यांच्या कार्यक्रमाला आहे. बाकी ३ दिवस मराठी मेनू आहे.
इथे अधिक पहा
http://www.maayboli.com/node/41079