Submitted by मृण_मयी on 15 February, 2013 - 12:02
"घर, मृण्मयी, तुझे हे; ही पंढरी सुखाची"
मग त्यास का न येई सर परकरी सुखाची?
डोळ्यांत आसवांचा होता खडा पहारा
शिरली कशी कळेना स्वप्ने तरी सुखाची
चटके परिस्थितीचे दिसता नये कुणाला
लिहिली अशीच जाते कादंबरी सुखाची
केव्हा तरी अम्हाला दे दूध, तूप, लोणी
का कोरडीच कायम ही भाकरी सुखाची?
(ताकावरी निवावी तृष्णा जरा दुधाची)
बघते सजीव चित्रे पडद्यावरी सुखाची
करवून फार घेते आजन्म ती परिश्रम
सोडून देत आहे मी चाकरी सुखाची
तृप्ती तनामनाची, कर्तव्यपूर्ततेची
याहून काय व्याख्या साठोत्तरी सुखाची?
छातीत 'सज्जनां'च्या भरली असेल धडकी
बसले लिहावयाला मी वासरी सुखाची
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
करवून फार घेते आजन्म ती
करवून फार घेते आजन्म ती परिश्रम
सोडून देत आहे मी चाकरी सुखाची
वा वा
चटके परिस्थितीचे दिसता नये कुणाला
लिहिली अशीच जाते कादंबरी सुखाची
छानच
सुबक गझल झाली कवी मृण्मयी. गझलेच्या गदारोळात एक नवे नांव (की जुनेच?) आणि एक गुणी गझल पाहिल्याचा आनंद मिळाला.
माध्यान्ह जाळणारी देती अनेक गझला
ही मात्र देत गेली आसावरी सुखाची
कळावे
गंभीर समीक्षक
करवून फार घेते... खूप छान.
करवून फार घेते... खूप छान. आवडली बर्का.
गंस, तुमचा प्रतिसादही छान.
Khup sundar
Khup sundar
आवडली. शिरली कशी कळेना
आवडली.
शिरली कशी कळेना स्वप्ने तरी सुखाची
हे सुंदर!
सुबक गझल >>> +१
सुबक गझल >>> +१
छान , भिडणारी गझल. 'आहे मनोहर
छान , भिडणारी गझल. 'आहे मनोहर तरी...' या ओळींची आठवण झाली.
छान गझल. "डोळ्यांत आसवांचा
छान गझल.
"डोळ्यांत आसवांचा होता खडा पहारा
शिरली कशी कळेना स्वप्ने तरी सुखाची"
"करवून फार घेते आजन्म ती परिश्रम
सोडून देत आहे मी चाकरी सुखाची"
हे शेर अधिक आवडले.
सुरेख बांधली
सुरेख बांधली आहे...पूर्वार्धातल्या द्विपदी फार आशयघन झाल्यात...पु.ले.शु.
ज्जाम आवडली अजून गझल
ज्जाम आवडली
अजून गझल येवूद्यात खूप छान लिहिता तुम्ही
बर्याच शेरांमध्ये रदीफ
बर्याच शेरांमध्ये रदीफ समर्पक आहे
ही पंढरी सुखाची">>>> यावरून
ही पंढरी सुखाची">>>>
यावरून माझा एक जुना सुटा शेर आठवला
किती हो पंढरीराया सुखाची पंढरी तुमची
इथे आई असे माझी इथे आहेत बाबा , जी
पुनःप्रत्ययाबद्दल धन्यवाद
डोळ्यांत आसवांचा होता खडा
डोळ्यांत आसवांचा होता खडा पहारा
शिरली कशी कळेना स्वप्ने तरी सुखाची
चटके परिस्थितीचे दिसता नये कुणाला
लिहिली अशीच जाते कादंबरी सुखाची
करवून फार घेते आजन्म ती परिश्रम
सोडून देत आहे मी चाकरी सुखाची
>> खूप आवडले हे शेर..
एक मिसरा कंसात का आहे ?
करवून फार घेते आजन्म ती
करवून फार घेते आजन्म ती परिश्रम
सोडून देत आहे मी चाकरी सुखाची
पहिली ओळ मी अशी वाचली मग मलाच वैयक्तिकरित्या जास्त आवडली
करवून फार घेते आजन्म ते परीश्रम ...(सोडून देत आहे मी चाकरी सुखाची)
<<<डोळ्यांत आसवांचा होता खडा
<<<डोळ्यांत आसवांचा होता खडा पहारा
शिरली कशी कळेना स्वप्ने तरी सुखाची>>>
व्वाह! व्वाह! किती सहज! आवडली