१) २ वाट्या मैदा
२) दीड टेबलस्पून बेकिंग पावडर
३) १ वाटी पिठीसाखर
४) १०० ग्रॅम प्लेन चॉकलेट
५) १०० ग्रॅम (अन्सॉल्टेड) बटर
६) व्हॅनिला इसेन्स- १ टेबलस्पून
७) १ वाटी दूध
वाटी- नेहेमीच्या जेवणातली आमटीची वाटी.
मूळ रेसिपीमध्ये सर्व प्रमाण 'ग्रॅम'च्या हिशोबात होते. हवे असेल, तर तेही देईन.
ग्रॅम-टू-वाटी करताना मी मापातही बदल केले आहेत.
१) मैदा आणि बेकिंग पावडर तीनदा चाळून घेणे
२) डबल बॉयलर पद्धत वापरून चॉकलेट वितळवून घेणे
३) चॉकलेट पातळ होईपर्यंत बटर भांड्यात हलक्या हाताने फेटून घेणे.
४) चॉकलेट वितळलं की ते बटरमध्ये मिक्स करणे.
५) पिठीसाखर बटर्-चॉकलेटमध्ये मिक्स करून वितळवून घेणे
६) इसेन्स घालणे
७) मैदा घालून क्रम्ब्ज करणे
८) थोडे थोडे दूध घालून मिश्रण फेटणे.
९) केक पॅन मैदा-तूप लावून तयार करून घेणे
१०) मायक्रोवेव्ह असेल, तर कन्व्हेक्शन मोडवर १८० डिग्रीवर ३० मिनिटे बेक करणे. साध्या ओव्हनमध्ये तेच तापमान.
१) तयार केकवर चॉकलेट सिरप ओतून खावे मी काहीही सजावट केलेली नाहीये. आवडीप्रमाणे आयसिंग वगैरे करू शकता.
२) अनसॉल्टेड बटर नाही मिळाले (भारतात) तर अमूल बटरही चालेल. त्याचा खारेपणा केकमध्ये उतरत नाही. ते नको असेल, तर साजूक तूपही चालेल, पण त्याने चव जरा वेगळी येईल.
३) अंडी नसल्यामुळे केकचे मिश्रण सतत आणि जरा जास्त फेटावे.
४) केक आतून थोडा मॉइस्टच राहू द्यावा. गरम केक आणि त्यावर चॉक सिरप खाणे हा चांगला अनुभव असतो
धन्यवाद अदिती. तुझी पोस्ट
धन्यवाद अदिती. तुझी पोस्ट पाहून जीव मेझरिंग स्पूनमध्ये पडला!
कोको पावडर घातलेल्या केकपेक्षा हा चांगला लागतो. छान चॉकोलेटची चव आली.>>> येस. अनुचमोदन.
फोटो काढला नाहीस का?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ह्याला चॉकलेट सिरप घातल तर
ह्याला चॉकलेट सिरप घातल तर चालत का? का ते बेकींग करताना जळेल?![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
करुन बघायच्या विचारात आहे.
सिरप वरून घालतात सजावटीसाठी
सिरप वरून घालतात सजावटीसाठी वगैरे. बेक करतानाच घालावं का, ह्याची कल्पना नाही![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
भारी आहे कृती आणि दोन्ही
भारी आहे कृती आणि दोन्ही केक्स.
अजून कुणी ह्यात बोटभर गाजराच्या तुकड्याचा कीस घालून 'व्हेरिएशन' नाही केले का ? पौष्टिक यु नो![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
>>> बोटभर गाजराच्या तुकड्याचा
>>> बोटभर गाजराच्या तुकड्याचा कीस घालून 'व्हेरिएशन' नाही केले का ? पौष्टिक यु>>><<
ते तुमच्यासाठी ठेवले असेल. तुम्हीच करून इथे टाका नवीन रेसीपी म्हणून.. 'माझे स्वःताचे प्रयोग' सांगून व नावही ईंग्लिश द्या..कंसात काहीतरी लिहा. मग टीरपी ज्यास्त वाढेल.. "फिंगरइंच कॅरेट इन चॉकलेट केक( वूईथ पौष्टीक टच)".
नाहीतर लेख पाडा विनोदी लेखन म्हणून..." करायला गेले बोटभर कॅरेट.......
पूनम, कालही केक बिघडला.
पूनम, कालही केक बिघडला.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
बाजूने चांगला भाजला गेला होता. वरून तर अगदी 'भुई भेगाळली' झाला होता. आणि मध्यभागी सगळा तसाच कच्चा?![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
मागच्या वेळीही असेच झाले होते.
काय चुकले असेल?
नाही म्हणायला बाजूबाजूने दोन्दोन इंचाचे तुकडे पडले चांगले, चवीला चांगला झाला होता. जरा साखर कमी चालली असती.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
प्राची पुढच्या वेळी थोडा मोठा
प्राची पुढच्या वेळी थोडा मोठा (पसरट) केक टीन वापरून बघ. लहान आकाराच्या केक टिन मुळे बरेचदा असं होतं.
मला बनवता येईल का ? मीही
मला बनवता येईल का ? मीही संपूर्ण शाकाहारीच आहे. पण बनवता काहीच येत नाही.
केक अजिबात अवघड नसतो किरण.
केक अजिबात अवघड नसतो किरण. नक्की बनवता येईल. फक्त पहिल्यांदा बनवत असलास, तर कोणातरी एक्सपर्टच्या देखरेखीखाली बनव म्हणजे झालं, म्हणजे केक बिघडणार नाही.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अरे.. गुपचुप शिकायचंय
अरे.. गुपचुप शिकायचंय![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
अच्छा! मग बनव बिनधास्त!
अच्छा!
मग बनव बिनधास्त! बिघडला तरी कोणाला समजणारे? चांगला जमेस्तोवर खाऊच नाही घालायचा कोणाला ![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मस्त रेसिपी....आज
मस्त रेसिपी....आज केला...ओव्हन मधे मस्त झाले मफ्फिन्स पण मावे मधला केक करपला.......काय झाले असेल? सेम मिक्शर...सेम टाईम्..मावेचच पॉट...
धन्स पोण्रिमा....पर्फेक्ट प्रमाण्...वाटीमुळे फारच सोपे झाले करायला....
काल मी याच पदधतीने केक केला
काल मी याच पदधतीने केक केला पण ओवनमध्ये ठेवला १५ मिनीटांनी फुगला एवढा की मला वाटले आता बाहेर येईल आणि नंतर काय झाले काय माहित धपकन खाली बसला एवढा कि जेवढे सारण होते तेवढा झाला
आणि त्या साच्यामध्ये काढायला गेले तेव्हा तुकडे पडले असे का झाले असेल ![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
अविगा: माझा असा अंदाज आहे की
अविगा: माझा असा अंदाज आहे की बेकिंग पावडर जास्त झाली असावी. त्याने आधी खूप जास्त फुगतो आणि मग वाफ गेल्यानंतर धप्पकन बसतो.
तुकडे: कोरडा झाला का? बटर कमी घातलं होतं का?
दिड चमचा (पोहे खाण्याचा
दिड चमचा (पोहे खाण्याचा चमचा)बेकिंग पावडर आणि अमुलचे १०० ग्रम बटर,थोडा सोडा पण टाकला होता
माप तर तेच दिसतं आहे. मग का
माप तर तेच दिसतं आहे. मग का चुकला, कळत नाहीये! सॉरी!![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी तीनदा तरी केला आहे वर दिलेल्या मापानेच. व्यवस्थित झाला आहे अजूनपर्यंत तरी. टचवूड!
१८०डिग्रि वर बेक जास्त झाले
१८०डिग्रि वर बेक जास्त झाले का ?
अविगा: मध्ये मध्ये अवन उघडून
अविगा: मध्ये मध्ये अवन उघडून बघत होता का?
नाहि
नाहि
अविगा मझ्या पन घरि ये मला केक
अविगा मझ्या पन घरि ये मला केक बन्वायला शिकव.
हे माझे मफिन्स! पहिल्यांदाच
हे माझे मफिन्स!
पहिल्यांदाच करत असल्याने सर्व प्रमाण निम्याने घेतले आणि १ वाटी मैद्यात बरोबर एक ट्रे भरला... फक्त माझे मफिन्स २५ मिनिटातच झाले! कदाचित सिलीकोन मोल्ड्स मुळे असेल! पण खूप सोप्पी आणि हमखास होणारी रेसिपी!! धन्यवाद पौर्णिमा!
गायत्री मस्त दिसतायेत मफिन्स
गायत्री मस्त दिसतायेत मफिन्स![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मावे. सेफ अशा काचेच्या
मावे. सेफ अशा काचेच्या बाऊल्मधे बेक केला तर चालेल का हा केक?
धन्यवाद रिया!
धन्यवाद रिया!
गायत्री मस्त दिसतायत
गायत्री मस्त दिसतायत मफिन्स..!
उद्या करुन बघणार आहे हा केक.
उद्या करुन बघणार आहे हा केक. एगलेस केक कधी केला नाहिये म्हणून धास्ती वाटतेय पण ही कृती आणि इथले प्रतिसाद वाचुन हा केक करायचं ठरवतेय.
एक शंका: आज केक केला आणि उद्या संध्याकाळी खायचा असेल तर कापयच्या आधी मावेत थोडासा गरम करुन मग त्यावर चॉकोसिरप ओतलं तर चालेल का? की मावेत पुन्हा वॉर्म केला तर ड्राय होईल?
आत्ताच केक केला ह्या रेसिपी
आत्ताच केक केला ह्या रेसिपी प्रमाणे . मस्त जाळीदार झाला आहे. धन्यवाद पूनम, रेसिपी आणि टिप्स दोन्ही एक नंबर . ह्यापपूर्वी मी केलेले एगलेस केक्स मलाच आवडले नव्हते. उद्या बाबांचा वाढदिवस आहे , म्हणून भीतभीत उद्योग केला.
Pages