BMM 2013 च्या व्यासपीठावर प्रशांत दामले यांच्याबरोबर खुसखुशीत गप्पा.

Submitted by अजय on 4 February, 2013 - 09:25

मराठी रंगभूमीवर केलेल्या १०,७०० प्रयोगांनंतर गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्स मधे नोंद झालेले लोकप्रिय अभिनेते प्रशांत दामले यांना जवळून भेटण्याची आणि त्यांच्याशी गप्पा मारण्याची संधी बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या १६ व्या अधिवेशनात.

Prashant_Damle_SlideNewB_sm.jpghttp://bmm2013.org/hasya-masti.html

अधिवेशनाची नावनोंदणी सुरु आहे
http://bmm2013.org/registration-welcome.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजय,

हा वृत्तांत नसून जाहिरात आहे. अशा प्रकारे मायबोलीवर पूर्वप्रसिद्धी देणे कितपत उचित आहे? माझ्या मते हे चुकीचे नाही. मात्र यासाठी वेगळे उपवर्गीकरण उपलब्ध असणे आवश्यक वाटते. म्हणजे पूर्वप्रसिद्धी, वृत्तांत, प्रचि, कला इत्यादि. तसेच प्रशासकांकडून काही आवाहन वगैरे आल्यास बरे पडेल.

अर्थातच प्रशासकांचे आणि वाचकांचे काय मत आहे ते अजमावून पहावे.

आ.न.,
-गा.पै.

गामा,
'BMM 2013 बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन २०१३' हा विभाग ह्याच साठी आहे.
ह्या विभागात BMM 2013 बद्दल माहीती दिली जात आहे.

गामा_पैलवान,
तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे. ही जाहीरातच आहे. आणि "'BMM 2013 बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन २०१३' या ग्रूपमधेच ती करतो आहे.

पण केवळ मी प्रशासक आहे म्हणून कुठलीही जाहिरात करत नाही. मायबोली या संस्थेलाही यातून फायदा होत असेल (केवळ अजय या व्यक्तीला किंवा त्या व्यक्तीच्या आकांक्षांना नाही) तरच आपण असे उपक्रम करतो आणि मी नेहमीच मायबोलीला त्यातून काय मिळणार याचा विचार करतो.

मायबोलीच्या माहेरी, (आणि जगाच्या या भागातल्या विद्येच्या माहेरी) म्हणजे न्यू ईंग्लंड भागात जुलै २०१३ मधे मायमराठीचा एक मोठा उत्सव होणार आहे. सार्‍या जगातून हजारो मराठी माणसं, बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या या उत्सवात सामील होण्यासाठी येणार आहेत. थोडक्यात "माझी मायबोली आज आली माहेराला" असं वातावरण तिथं असणार आहे. आपल्या माहेरी आलेल्या या मराठ्मोळ्याचं स्वागत आपण मायबोलीकरांनी नाही करायचं तर कुणी? मायबोली.कॉम ही या उत्सवात सामील होणार आहे. म्हणून आपण मायबोलीवर ही जाहिरात करतो आहोत. त्या निमित्ताने मायबोलीकरांचं एक गटग ही होईल अशी आशा आहे. तुम्ही येऊ शकलात तर तुम्हालाही भेटायला आवडेल.

जाता जाता: ही पहिलीच वेळ नाही. १९९७ साली याच भागात झालेल्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनाबद्दलची माहिती/वृत्तांत तेंव्हा अस्तित्वात असलेल्या एकमेव मराठी साईटवर दिसत होती, तिचं नाव होतं मायबोली.कॉम. प्रशांत दामले यांच्याच नाटकाची जाहिरात "बोस्टनमधले चार दिवस प्रेमाचे", तेंव्हा मायबोलीवर झळकली होती.

नव्या बांधुया रेशिमगाठी, जपण्या अपुली मायमराठी !

अजय,

आपली 'असुनि खास मालक घरचा...' अशी अवस्था केल्याबद्दल दिलगीर आहे. लहानपणी दोनेक वर्षांचा होतो तेव्हा काकांकडे गेलो असतां त्यांना तुम्ही कोण असा प्रश्न पुसला होता. काय करणार जित्याची खोड...!

आपलं मनोगत आवडलं. जुन्या आठवणींना उजाळा दिल्याबद्दल आभार. बृहन्महाराष्ट्र मंडळाचं अधिवेशन म्हणजे एक महागटग दिसतंय. तन्निमित्त एखादा विशेषांक किंवा विशेष पृष्ठ काढल्यास अधिक रंग भरेलसं वाटतं.

मला भेटायला तुम्हाला आवडेल असं म्हणता? बघा, पुन्हा एकदा नीट विचार करा! Wink बर्‍याच लोकांच्या कृष्णसूचीत (ब्लॅकलिष्टीत) जाऊन पडाल बरे! Proud

बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनास शुभेच्छा! Happy

आ.न.,
-गा.पै.

हे असले बृहन्महाराष्ट्रातले कार्यक्रम बघितले की एक प्रश्न पडतो की मराठी प्रेमाचे उमाळे येण्याचं कारण म्हणजे 'मराठी येणारी आपल्या खानदानात आपली शेवटची पिढी असणार आहे' हे वास्तव तर नव्हे?

खरा मराठी गूण ... Wink आपण काही करायचं नाही आणि
चार हजार लोक एकत्र येऊन उद्योग, भेटीगाठी, करमणूक इत्यादी करतात त्यात काड्या घालू पहायच्या.

मराठी प्रेमाचे उमाळे येण्याचं कारण म्हणजे 'मराठी येणारी आपल्या खानदानात आपली शेवटची पिढी असणार आहे' हे वास्तव तर नव्हे?>> किंवा आपल्या खानदानातील पिढीला मराठी येणारे आपण मोजकेच नसून एक मोठा मानवसमूह त्यात आहे नि आपण त्याचाच एक वारसा आहोत, अशी आपलेपणाची जाणीव करून देणे हे असेल. तुम्हाला कुठल्या नजरेतून बघायचेय त्यावर आहे.

लोला,
या अभिप्रायाबद्दल खरंच खूप धन्यवाद. अशा प्रकारचे फीडबॅक आयोजकांना मिळणे आवश्यक आहे. जे कार्यक्रम ठरले आहेत त्यात बदल झाले नाही तरी जे अजून ठरायचे आहेत त्यांच्या निवडीसाठी याचा फायदा होऊ शकेल.

दुसरं असं की आधीचा BMM चा इतिहास पाहिला तर ६६-७०% लोक दर अधिवेशनाला नवीन असतात. कारण ते त्या गावाच्या आसपास असणार्‍या गावातून आले असतात. त्यामुळे त्यांना सगळंच नवीन असतं.

अजय,

तुमचे सगळेच प्रतिसाद आवडले. धन्यवाद व शुभेच्छा!

>>>किंवा आपल्या खानदानातील पिढीला मराठी येणारे आपण मोजकेच नसून एक मोठा मानवसमूह त्यात आहे नि आपण त्याचाच एक वारसा आहोत, अशी आपलेपणाची जाणीव करून देणे हे असेल. तुम्हाला कुठल्या नजरेतून बघायचेय त्यावर आहे.<<<

असामींशी सहमत.

तसेच परदेसाईंशीही!

अधिवेशनाला प्रत्यक्ष उपस्थित रहाणे हा या लोकांकरता नवीन अनुभव असू शकतो. पण अलिकडे अधिवेशनातल्या मुलाखती आणि इतर काही कार्यक्रम ऑनलाईन पहाता येतात. गेल्या दोन वेळचे लोकांनी पाहिलेही.
तसंच अधिवेशनाला येणारे ७०% लोक दरवेळी नवीन असतात म्हणून तेच तेच केले तरी चालते हे काय मला पटले नाही. दुसरे मराठी कलाकारच नाहीत की काय असं वाटेल..

(मग निदान प. नानाला तरी परत बोलवायचं.. Happy )

२००१ च्या कॅलगरीच्या अधिवेशनात डॉ. अभय बंगांना की-नोट स्पीकर म्हणून बोलावलं होतं. त्यांना बोलवा की परत. काय अप्रतिम भाषण केलं होतं त्यांनी! त्या वेळी फक्त १५००च्या आसपास उपस्थिती होती. म्हणजे खूपच लोकांनी ते मिस केलेलं आहे.

>दुसरे मराठी कलाकारच नाहीत की काय असं वाटेल..

येणार येणार दुसरे मराठी कलाकार (जे आधी आलेले नाहीत असे) येणार. नक्की ठरलं की सांगतो.

आशा भोसलेंचा कार्यक्रम मात्र परत नक्कीच नको आणि अजिबात सराव न करता सादर केलेली सुयोगची नाटकं पण नकोत फिलीला सुयोगवालेच आले होते ना.

अधिवेशनाला मनःपूर्वक शुभेच्छा Happy
[आम्हाला काय येता यायच नाही, माझ्या बाईक/सुमोने करू शकायच्या प्रवासाच्या टप्प्याबाहेरचा हा पल्ला आहे! शिवाय अमेरिकी "डिपार्टमेण्ट" आम्हाला प्रवेशू देईल याचीही शाश्वती नाही. मोदीन्ना नै त्यान्नी अडवलं ते? Wink त्यातून मुम्बईस ब्रीचक्यान्डी पाशी पहाटेपासून लायनित उभारणे माझ्याच्याने शक्यही नाही, सबब तिकडे येणे क्यान्सल! Proud ]

>>>> हे असले बृहन्महाराष्ट्रातले कार्यक्रम बघितले की एक प्रश्न पडतो की मराठी प्रेमाचे उमाळे येण्याचं कारण म्हणजे 'मराठी येणारी आपल्या खानदानात आपली शेवटची पिढी असणार आहे' हे वास्तव तर नव्हे? <<<<<
नाही, वास्तव तस नसावं! उलट अस तर नाही ना की येत्या पाचपन्चवीस वर्षात भारतातील, महाराष्ट्रराज्यातील "मराठी भाषिक" जनजातीला त्यान्नीच त्यान्च्या कर्माने, त्यान्च्याच भूमित राहून गमावलेली त्यान्चीच "मराठी" भाषा पुन्हा सुयोग्य स्वरुपात शिकवण्याकरता कुठे तरी जपुन ठेवली जात आहे, अन ते ठिकाण आहे अमेरिका? व अमेरिकेत गेलेले मराठी बांधव?
निदान संस्कृत भाषेबद्दल तरी हेच चित्र कमीअधिक स्वरुपात दिसून येते आहे.

बायदिवे, >>>'मराठी येणारी आपल्या खानदानात आपली शेवटची पिढी असणार आहे'>>><<<
हे वाक्य 'आपल्या खानदानात मराठी येणारी आपली शेवटची पिढी असणार आहे' असे लिहिले तर जास्त अचूक व अर्थवाही होईल नाही का? Wink
[हे असे वाचले की वाटते की मराठी जाणणारी शेवटची पिढी बहुधा केव्हाच वर पोचली हे, गचकली हे, शिल्लक आहे तो कचरा! Proud असो.]

संगीत मानापमानचा प्रयोग उत्तर अमेरिकेत पहिल्यांदाच होतोय. माझ्या माहितीप्रमाणे ते सगळे १२ कलाकार (मुख्य २-३ कलाकार सोडून) या आधी आलेले नाहीत.

पण त्या मुख्य २-३ कलाकारांच्या नावावर तुम्ही कार्यक्रम खपवताय ना? ते यात नसले तर आणलं असतं का हे संगीत मानापमान? Happy
जाऊदे झालं.

काही सांगू नका राव. अगदी ऐनवेळी थोडी ड्वालरची बिदागी टाकली, रहाण्याचा आणि येण्या-जाण्याचा खर्च केला की हे 'मराठी मातीतले' कलाकार इथले पुर्वनियोजीत कार्यक्रमाला टांग देउन तिकडे पळून जातात. आणि मग तिथं झालेल्या कार्यक्रमाचा पुस्तकी वृत्तांत प्रसिद्ध झाला की ज्यांच्या घरी ते उतरले ते खालच्या आवाजात प्रेक्षकांच्या फर्माइशी पुर्ण न करता ते कसे शॉपींग करायला पळाले ते सांगतात. Happy

माझ्या स्वत:च्या घरी पुष्कळदा कुणीतरी कलाकार रहायला असतात. काही १-२ अपवाद वगळता मला नेहमीच सगळ्यांचा खूप चांगला अनुभव आला आहे. त्यांना जवळून पहायला मिळाल्यामुळे त्यांच्याही अडचणी मी समजू शकतो. आपण जेंव्हा गॉसीप करतो तेंव्हा ते बहुदा एकांगी असतं आणि खरं खोटं काय आणि मसाला लावलेलं काय हे सांगायला ते कलाकार तिथे नसतात.

पण त्या मुख्य २-३ कलाकारांच्या नावावर तुम्ही कार्यक्रम खपवताय ना? ते यात नसले तर आणलं असतं का हे संगीत मानापमान? >> माझ्या माहितीप्रमाणे उत्तर हो आहे लालू. हे नाटक संगीत नाटक आहे म्हणून आणण्यात आलेले आहे अशि माहिती आहे. चु.भू.दे.घे.

हा कार्यक्रम ६ वाजता सुरू होणार होता. Track 2 ला काय गडबड झाली कोण जाणे पण आधीचं नाटक अजून चालूच होतं (उदार्णार्थ एक). खरं तर सकाळचे दोन्ही कार्यक्रम (उ उ वि, ढोलकी....) वेळेवर सुरू होऊन संपले होते. तरी उ. ए. लांबलं. (मधल्या वेळात काय झालं माहीत नाही).

५:४५ पासून प्र.दा. मुलाखतीसाठी गर्दी जमू लागली. 'मेलांज' लांबल्याने तिकडे बरेच प्रेक्षक उ. ए. चालू असताना घुसले. बरं आले तर आले, पण समोर एक प्रयोग चालू आहे, त्याचा मान ठेऊन कोणताही आवाज न करता बसावे ते ही नाही. मी दाराजवळची सीट सोडून नाटक पहायला पुढे उभा राहीलो. पण गोंगाट कमी होत नव्हता. शेवटी बाहेर पडलो. असाम्याने बाहेर जाऊ दिलं.. पण बायको नंतर कधीतरी हॉलमधे शिरली हे मला माहीत नव्हतं. परत वळलो, तर 'गडाचे दोर' केव्हाच कापले होते.
असाम्या, आणि बाकीचे स्वयंसेवक 'गडाचे दरवाजे' अक्षरशः लढवत होते. आत बसायला जागा नसूनही बरीच लोकं त्यांच्याबरोबर हुज्जत घालत होती. त्यात चिल्यापिल्याना कडेवर घेऊन आत घुसू पाहणार्‍या एक दोन मातोश्री ही पाहिल्या. दया आली स्वयंसेवकांची.
मग एक घोषणा करण्यात आली,' आधीचा कार्यक्रम संपल्या नंतर दारवाजे उघडण्यात येतील,'. उ. ए . चालूच होतं. मग त्याच गोंगाटात उ. ए. संपलं. आणि कळलं की आतली मंडळी 'प्र.दा.' ला थांबणार असून कुणीच बाहेर येणार नाहीत. त्यामुळे आतले आत आणि बाहेरचे बाहेर.
मग बाहेर secuirty, Fire Marshal इत्यादी घोळ. शेवटी मी कंटाळून मेलांज कडे गेलो.
१० मिनिटानी योगिनी पण आली. म्हणाली 'हास्यमस्ती' म्हणण्यासारखं काहीही नाहीय तिकडे.
हा कार्यक्रम ३५ मिनिटात आटपण्यात आला, आणि लगेच पुन्हा Repeat झाला. पण तोपर्यंत सगळी हवा निघून गेली होती..... लगेच जेवण सुरू झाल्याने मग मी Repeat लाही गेलो नाही...