Submitted by बागुलबुवा on 3 August, 2010 - 13:43
मला मोबाईल हॅन्डसेट घ्यायचा आहे. माझ्या अपेक्षा अश्या आहेत.
1. दोन सिम्स, एकदम चालु असलेली.
2. नेट कनेक्टिव्हीटी असावी.
3. कॉर्पोरेट / सोबर लुक
4. फोनबुक, समस व इतर बॅकअप घेण्याची सोय.
5. फेसबुक, जीटॉक व मेल्स पहाण्याची सोय.
6. क्लिअर साउंड.
7. एक्स्पान्डेबल मेमरी
8. वर्ड, एक्सेल व इतर ऑफिस फाईल्स बघता येण्याची सोय.
9. चांगला सर्व्हीस बॅकअप
मला चांगले मॉडेल सुचवू शकाल काय ? साधारण काय बजेट ठेवावे ?
नेट वापरण्यासाठी (सोशल साईट्स व मेल्स साठी) कोणत्या सर्व्हिस प्रोव्हायडरची सर्व्हीस चांगली आहे ?
यापूर्वी तत्सम प्रश्न विचारला गेला असल्यास कृपया त्याची लिंक द्यावी.
तसेच घरी वापरण्याकरता नेट सर्व्हीस कुणाची घ्यावी ?
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नाही हो.............एक आयओन
नाही हो.............एक आयओन आहे दुसरा एसएल आहे...........फरक आहे दोघांमधे
@ उदयन.. अहो बजेट अजून थोडसं
@ उदयन..
अहो बजेट अजून थोडसं वाढवू शकत असाल तर HTC One X च घेऊन टाका की.
आणि ION किंवा SL मध्येच ठरवायचे असेल ION घ्या कारण प्रोसेसिंग पॉवर थोडीशी कमी असली तरी स्क्रीन मोठी आहे आणि बॅटरी बॅकप थोडे जास्त आहे.
अहो बजेट अजून थोडसं वाढवू शकत
अहो बजेट अजून थोडसं वाढवू शकत असाल तर HTC One X च घेऊन टाका की. >>>>> आयओन त्यापेक्षा जास्त आहे.....
.
Xperia Ion २९-३० पर्यंत
Xperia Ion २९-३० पर्यंत आहे.
HTC One X ३०-३२ पर्यंत आहे.
मायक्रोमॅक्स a100 हा मोबाईल
मायक्रोमॅक्स a100 हा मोबाईल कसा आहे? do u hv any idea
ए११० वापरतोय. भन्नाट आहे.
ए११० वापरतोय. भन्नाट आहे. ए१०० चा प्रोसेसर ड्युअल कोअर नाहिये बाकी सेम आहेत १०० आणि ११०
मयूरी, ११० मधे ८ एम्पी कॅमेरा
मयूरी, ११० मधे ८ एम्पी कॅमेरा आहे, अन किम्मत तितकीच आहे. १०१०० पर्यंत मिळेल.
ईब्लीस ए १०० मध्येही ८ मेपिच
ईब्लीस ए १०० मध्येही ८ मेपिच आहे. फक्त ड्युअल कोअर अव्हढाच फरक आहे दोघात.
ए१०० पेक्षा ए९० बराय. पण डिसप्ले साईज कमीये आणि मेपि देखील
बाबु, http://www.gsmarena.com
बाबु,
http://www.gsmarena.com/micromax_a100-4933.php इथे
Camera Primary 5 MP, 2592х1944 pixels, autofocus, LED flash असं लिहिलंय.
त्या ए ११० साठी चांगले कव्हर
त्या ए ११० साठी चांगले कव्हर कोणते? त्या कॅमेर्याचे भिंग असे बाहेर काढले आहे त्यांनी. खाली ठेवायला भिती नाही वाटत का? पालथा ठेवला तर स्क्रीन खराब होईल
माय मिष्टिक. ए९० मध्ये आहे ८
माय मिष्टिक. ए९० मध्ये आहे ८ मेपि.
कव्हर मोबाईलबरोबरच घेतलं मायक्रोमॅक्सचं.
http://www.ebay.in/itm/Grey-Transparent-S-Line-Back-Cover-Case-Micromax-...
वर आहे तसं
धन्यवाद
धन्यवाद
सोनि xperia ray कसा आहे? आणि
सोनि xperia ray कसा आहे? आणि किति पर्यंत आहे?
उदयन, मी मागच्या आठवड्यात
उदयन,
मी मागच्या आठवड्यात यातला S घेतला, Processor 1.5 Ghz Dual Core आहे बाकी सगळं सारखं आहे..
http://www.sonymobile.com/in/products/phones/xperia-s/
मी अस ऐकलय कि मायक्रोमॅक्स
मी अस ऐकलय कि मायक्रोमॅक्स च्या हार्डवेअर चा मोब. जुना झाल्यावर प्रोब्लेम होतो ते
मी पण ए ११० वापरतेय. मस्त
मी पण ए ११० वापरतेय. मस्त आहे.
मला सांगा i boll Andi
मला सांगा i boll Andi 5c,किंवा Andi 4.5q कसा आहे?
ए११० ८ मेगापिक्सेल म्हटले तरी
ए११०
८ मेगापिक्सेल म्हटले तरी तितकी छान क्वालिटी नसते फोटोची.
घेतल्यापासून १ महिन्याच्या आत फोन चा माईक मेला. कंपनी रिप्लेस करून देणारे म्हणे. अजून आलेला नाहिये.
]i boll Andi 5c,किंवा Andi
]i boll Andi 5c,किंवा Andi 4.5q कसा आहे?
@ मउ मी आत्ताच गेल्या
@ मउ मी आत्ताच गेल्या महिन्यात iball andi5h घेतला .. १० हजारात मस्त आहे, मोठी स्क्रिन साईज, ड्युएल सिम, front n back camera, 8 megapixel cha camera, icecream sandwich 4.0.4, १ जीबी रॅम, ४ जीबी स्टोरेज, टच स्क्रिन ही अगदी स्मूथ आहे ....
drawback च म्हणायचा झाला तर battery लवकर चार्ज होत नाही,
आत्ताच काही दिवसांपुर्वी लोकसत्ता का म्.टा मधे चांगला रिव्ह्यू आला होता .
actullly mala i boll Andi 5c
actullly mala i boll Andi 5c ghyayacha aahe but ha phone I BALL cha asalyane bhiti vatate
माझ्या नवर्याने आत्ताच
माझ्या नवर्याने आत्ताच samsang galaxy s dues घेतला आहे पण त्याचि बॅटरि एका दिवसातच संपते ; असे का होत असेल?
जास्त फंक्शन अस्ल्यामुळे पावर जास्त लागते का? जाणकारांनि सांगावे.
अग अवि तो android असल्याने
अग अवि तो android असल्याने त्या मोब. ला जास्त पावर लागते
तितकी छान क्वालिटी नसते
तितकी छान क्वालिटी नसते फोटोची.>> नुसतेच पिक्सेल वाढवल्याने ८ मे पि, पण सेन्सर तोच टूकार आणि छोट्टुसा ..
तसही मोबाइलच्या कॅमेर्यावर माझा फारसा विश्वास नाहीचे...
अॅन्ड्रॉइड फोन्सची बॅटरी लवकर संपते हे मात्र खरं/
एक अनुभव शेअर करतोय.
माझा एचटीसी एक्सप्लोरर आहे. त्या बजेट मधील बेस्ट फोन म्हणुन घेतला.
साउन्ड उत्तम आणि टच सेन्स अप्रतिमच.
मध्यंतरी मी गाडीवरुन पडलो तेव्हा मोबाइलची स्क्रीन क्रॅक झाली.
एचटीसीचं ऑथोराइज्ड सर्व्हीस सेन्तर कॅम्पात कुठेतरी आहे.
मी राहतो चिखलीत. म्हणुन नाइलाजाने पिम्परीत जाउन दुरुस्त करुन घेतला.
८५० रु घेतले त्याने स्क्रीन चेन्ज्चे
पण एवढं करुनही आधीचा टच फील नाहिये.
शिवाय एका सर्टन येरीयात टच चालतच नाही. एस आणि डी जिकदे असतो तिथे.
दुरुस्त करणार्याच म्हणणं आहे मोबाइल फॉरमॅट करुन परत ओ एस टाका. त्याला १५०० रु.
मी हुडुत करुन आलोय.
हे फॉरमेट करणे आणि नवीन ओ स टाकणे हे एवढं कटकटीच आहे का?
अग अवि तो android असल्याने
अग अवि तो android असल्याने त्या मोब. ला जास्त पावर लागते>>> पण त्याचा काय उपयोग? कृपया मला सांगा कारण या बाबतित मी खरचं अडाणि आहे
मोबाइल वर android असल्याने
मोबाइल वर android असल्याने जास्त पावर लागते >> हे चुक आहे, पहिल म्हणजे बॅटरी कीती mAh ची आहे, आणि स्क्रीन कीती मोठी आहे, आणि तुमचा वापर कीती आहे, यावर अवलंबून आहे.
शिवने लिहील्याप्रमाणे बॅटरी
शिवने लिहील्याप्रमाणे बॅटरी वापरावर आणि टाईप (mph)वर अवलंबुन असते. टच स्क्रीन मोठा असेल तर जास्त बॅटरी लागेल पण त्याचप्रमाणे वॉलपेपर काय ठेवलाय, Setting मध्येStay Awake mode on आहे का, Brightness किती आहे, Sleep Timeकाय आहे अश्या बर्यच गोष्टी चेक कराव्या लागतील. बेस्ट म्हणजे No Wallpaper, complete Black background. तसेच स्मार्ट फोन मधील फाईल मॅनेजर किंवा टास्क मॅनेजर मधे जाऊन background ला चालू असलेले टास्क clear करावेत. १-२ दिवसातुन फोन पुर्ण बंद करुन १० से. चालू करावा. android फोन असेल तर Advance Task Killer नावाचे अॅप डाऊनलोड करुन ते वापरत चला. तसेच दुसरे मुख्य कारण फोन कसा वापरता: any streaming ( you Tube, radio, on line gamimg) always eats up your battery. Video Shooting, grafiic games also causes battery issue. त्याचप्रमाणे Wi-Fi, Bluetooth ह्या गोष्टी, नुसते ऑन असेल आणि वापरत नसतानाही, बॅटरी खातात. if option is available, then Go in Setting and check Power/ Battery Usage.
झकासराव, HTC One S (Dont know whats similar model in India)चा Camera मला सर्वात आवडला. मोबाइल फॉरमॅट करणे म्हणजे फॅक्टरी रिसेट असेल तर ते एकदमच सोपे आहे. आणि त्यात ओ स टाकावी लागत नाही. कारण फोन रिसेट केल्यावर जसा तुम्ही घेतला होता त्या पदाला येतो. फक्त फोनवरील डेटा (whatever stored on phone: contacts, photos, app) नाहीसा होईल. जर अगदी पुर्ण नविन ओ स टाकायची असेल तर (IC to Jellybean वगैरे) तर गुगला/युट्युबा की. कितीतरी मटेरियल मिळेल. फक्त तुम्हाला आत्मविश्वास असेल तरच करा; नाहीतर phone will be paper weight.
आई कडे रिलायन्सचा एलजी चा
आई कडे रिलायन्सचा एलजी चा ६१०० (CDMA) फोन आहे सध्या. बरेच वर्ष झाले वापरुन. आता नविन फोन घ्यायचा झाला तर रिलायन्सचा CDMA फोनच घ्यावा लागेल का? नंबर सेम ठेवायचा आहे. रिलायन्सचे किंवा कुठलाही GSM फोन घेतला तर सेम नंबर ठेवता येईल का? भारतात नंबर पोर्टेबिलिटि available आहे का? मी ऑनलाईन फोन विकत घेवुन पाठवायच्या विचारात आहे, कुठलि रिलायेबल वेबसाईट आहे का फोन घ्यायला?
तो android असल्याने त्या मोब.
तो android असल्याने त्या मोब. ला जास्त पावर लागते>>> >>>>>>>>>> कदाचित तुम्हाला बॅटरी कॅलिब्रेशन करण्याची गरज आहे.
मोबाईल जेव्हा कंपनीकडून पॅक केला जातो तेव्हा त्याची बॅटरी साधारण ५०% चार्ज केलेली असते आणि फोनच्या मेमरी मधे देखिल ५०% चार्ज मेमरी सेव्ह असते. फोन पॅक करण्याच्या वेळेपासुन तुमच्या हातात फोन पडे पर्यंत जो काळ जातो त्यामधे बॅटरी काही प्रमाणात डिस्चार्ज होते पण फोन मेमरी चार्जींग ५०% च दाखवते, अर्थात २५-३०% actual चार्ज आणि डिस्प्ले वर ५०%
हा प्रॉब्लेम ओव्हरकम करण्यासाठी तुमचा फोन पुर्णपणे स्वःताहून बंद होईपर्यंत डीस्चार्ज होऊद्या. बॅटरी लो ईडिकेशन आले तरी फोन चार्ज करायचा नाही. फोन बंद झाल्यावर पुन्हा फुल चार्ज करा, त्यानंतर बॅटरीचा पर्फॉर्मन्स नक्कीच सुधारेल Good Luck
भारतात नंबर पोर्टेबिलिटि
भारतात नंबर पोर्टेबिलिटि available आहे का?>>>>> आहे, पण किती उपयोगाची याबद्दल शंका आहेत.
माझ्या पोस्टपेड व्होडाफोनचे वापरापेक्षा बिल जास्त येत होते म्हणुन मी व्होडाफोन सर्वीससेंटरला प्रिपेड करायला सांगितले. त्यानीं त्याचे रू७००/- चार्ज सांगितल्यावर मी त्यानां नंबर पोर्टाबीलीटीच्या ऑप्शन बद्दल सागितले कारण नवीन नंबर घेण्यासाठी देखिल आजकाल काहीच चार्ज लागत नाहीत.
त्यावर त्यांचे ऊत्तरः काहिही उपयोग नाही, आमच्याकडेच कितीतरी नंबर पोर्टाबीलीटीचे फॉर्म पडून आहेत
So Priya७, good luck
धन्यवाद आहना! नंबर
धन्यवाद आहना! नंबर पोर्टाबीलीटी जस्ट एक ऑप्शन म्हणुन विचारले जर दुसरा कॅरिअर आईला हवा असेल तर्,मोस्ट्लि रिलायन्सच ठेवेल. फोन CDMA च घ्यायला लागेल का? जो कि मला काहि प्रॉब्लेम नाहिये घ्यायला. पण तिच्याकडे एक GSM फोन पडुन आहे म्हणुन विचारले तोच वापरता येईल का रिलायन्स साठि सेम नंबर ठेवुन? मला भारतातील मोबाईल कंपन्यांचि फारशि माहिति नाहि. थोडे सर्च केले ऑनलाईन पण टेक्नोलॉजी चेंज विषायी वेगळी वेगळि माहिति सापडलि.
i boll Andi 5c,किंवा Andi
i boll Andi 5c,किंवा Andi 4.5q कसा आहे?
प्रिया७ - रिलायंस सिडीएमए >>
प्रिया७ - रिलायंस सिडीएमए >> जीएसएम ला पण नंबर पोर्ट करावा लागतो. फक्त ते एकाच कंपनीत होत अस्ल्याने जास्त गडबड होत नाही ईतकेच...
शिव,mbhure ,आहना आभारि आहे
शिव,mbhure ,आहना आभारि आहे
गेली दोन वर्षे Nokia E5वापरते
गेली दोन वर्षे Nokia E5वापरते आहे. मला प्रचंड आवडतो माझा फोन.
मध्यंतरी पाणी जाऊन बंद पडला होता. तो दुरुस्त झाला, पण कॅमेरा बंदच आहे. शिवाय हल्ली जरा त्रास देतो आहे.
त्यामुळे, नव्या फोनच्या शोधात आहे. E५ ची बरोबरी करू शकेल , मला E5ची उणीव भासू देणार नाही. असा फोन सुचवा. बजेट १००००पर्यंतच आहे. (आमी गरीब मान्सं :फिदी:)
१. मुख्य वापर संपर्कासाठीच करायचा आहे.
२. शिवाय, गाणी ऐकणे, कामचलाऊ फोटो काढणे आहेच.
३. इंटरनेटाचा नेटाने वापर असतो. त्यामुळे, नेटस्पीड चांगला हवा.
४. ड्युएल सिम फोन नको आहे.
५. स्क्रीनसाइज जरा मोठी असली तर बरे.
या अटींमध्ये बसेल असा कोणता फोन आहे का?
टचस्क्रिन घ्यायचा आहे का?
टचस्क्रिन घ्यायचा आहे का? सॅमसंगला पर्याय नाही. आणि नेटवापर असेल तर अॅन्ड्रॉईडला पर्याय नाही. सॅमसंग+अॅन्ड्रॉइड भरपूर स्मार्टफोन आहेत तुझ्या बजेटमधे.
धन्स मंजू.
धन्स मंजू.
मी E5 वापरलेला नाही. पण
मी E5 वापरलेला नाही. पण माझ्या requirements प्राची सारख्याच आहेत, फक्त मला ड्युअल सिम हवा आहे. आता?
ड्युअलसिममध्ये बरेच ऑप्शन्स
ड्युअलसिममध्ये बरेच ऑप्शन्स आहेत. Samsung galaxy Y Duos छान आहे.
मला ड्युअल सिम नको आहे, त्यामुळे, बरेच कमी पर्याय आहेत.
मला अजून एक शंका आहे. सॅमसंग
मला अजून एक शंका आहे.
सॅमसंग गॅलेक्सी वाय मध्ये contacts, sms हे मेमरी कार्ड वर सेव्ह करता येतात का?
मी असं ऐकलंय की ते फक्त फोन मेमरीवरच सेव्ह करता येतात आणि they cant be transferred to any other cell, nor can be downloaded to PC.
तसेच, they have a memory limit for number of contacts/sms.
मंजू.. १०००० पर्यंत अगदीच कमी
मंजू.. १०००० पर्यंत अगदीच कमी पर्याय आहेत सॅमसंग मध्ये...
यात्र्या, १००० च्या वर नंबर्स
यात्र्या, १००० च्या वर नंबर्स होते माझ्याकडे. पीसीवर स्पेसिफिक सॅफ्टवेअरमध्ये किंवा आऊटलुकमध्ये बॅकअप घेता येतो. नंबर ऑफ कॉन्टॅक्टवर लिमिट नाहिये बहुधा. मॉडेल नंबर काय आहे नक्की तुझा ? Samsung Galaxy Y S5360 ?
HTC बद्दल काय मत आहे?
HTC बद्दल काय मत आहे?
सॅमसंग गॅलेक्सी वाय मध्ये
सॅमसंग गॅलेक्सी वाय मध्ये contacts, sms हे मेमरी कार्ड वर सेव्ह करता येतात का?
मी असं ऐकलंय की ते फक्त फोन मेमरीवरच सेव्ह करता येतात आणि they cant be transferred to any other cell, nor can be downloaded to PC
<<<
Y Duos सुंदर आहे.
फोनबुकचा ब्याकप घेणे अत्यंत सोपे आहे. फोनबुकातच ऑप्शन असतो, एक्स्पोर्ट करण्याचा. ती कॉण्टॅक्ट फाईल मेमरी कार्डावर टाकली, की सरळ ब्लूटूथने दुसर्या फोनवर टाकता येते. व कोणत्याही इतर अँड्रॉईडवर तर घेताच येते. नोकियावरही घेता येते. (अनुभवाने सांगतोय )
नेहेमीच्या वापरासाठीचे कॉण्टॅक्ट मात्र फोन मेमरीतच सेव्ह करायचे असतात, कार्डावर नाही. फारच इच्छा असेल कार्डावरच सेव्ह करण्याची, तर फोन रूट करून घेता येतो, पण मग तो फोन कधीकधी पूर्ण मरू शकतो
लिमिट म्हणजे इन्टरनल मेमरीची साईझ. ढीगभर अॅप्स अन गेम्स टाकलेत तर मग जास्त काँटॅक्ट रहाणार नाहीत..
नोकिया ल्युमिया ५१० कसा आहे?
नोकिया ल्युमिया ५१० कसा आहे?
अॅन्ड्रॉईड सिन्क मॅनेजर,
अॅन्ड्रॉईड सिन्क मॅनेजर, मोबोरोबो, गो बॅकअप हि फ्रीवेअर्स आहेत बॅकअपसाठी
नो आयडीया. नोक्या बिल्कुल
नो आयडीया.
नोक्या बिल्कुल आवडत नाही मला. आयुष्यात एकदाच घेतला होता, तो १५ दिवसांत दान देऊन टाकला होता.
एच टी सी........ सर्वात छान
एच टी सी........ सर्वात छान आणि बिनतक्रारीचा फोन आहे........त्याचा टचस्क्रिन हा अॅपल पेक्षा ही जास्त चांगला आहे
पुढच्या दानाच्यावेळी मला
पुढच्या दानाच्यावेळी मला कॉन्टॅक्ट करा. मी मॉडेलही सांगेन कुठचं दान करायचं ते
पुढच्या दानाच्यावेळी मला
पुढच्या दानाच्यावेळी मला कॉन्टॅक्ट करा. मी मॉडेलही सांगेन कुठचं दान करायचं ते >> मी तर मॉडेलही सांगणार नाही. जो दान कराल तो घेइन
Pages