माहिती हवी आहे

Submitted by दमहाजन on 1 February, 2013 - 16:31

नमस्कार, मला एक विचारायचे आहे की अमेरिकेत जाताना चेक्ड इन बॅगेजमधे व केबिन बॅगेत काय काय खाऊ व डाळी वै. आपण घेउन जाउ शकतो? मला ३ महिने कामासाठी जायचे आहे तर बेसिक मसाले आणि इतर जरुरी सामान स्वयंपाकासाठी न्यायचे आहे. मी वेस्ट कोस्ट ला San Jose जाणार आहे. कस्टमचा काहि त्रास न होता नेता येइल असे सामान मला सुचवा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिरे/मोहोरी, लोणची आणलि आहेत का विचारतात बर्‍याचदा. बाकि खरे तर सगळे मसाले,डाळि, तांदुळ,लोणचि इथे मिळतात. कॅबिन बॅगेत सुद्धा स्नॅक्स ठेवता येतिल.

कॅबिन बॅगेत ड्राय स्नॅक्स नेलेले चालतात.[ चिवडा, लाडू, चकल्या, पुरणपोळ्या/गूळ्पोळ्या वगैरे]. कोणतेही नाशीवंत जिन्नस, बिया [ मोहरी,जिरे. अळीव, खसखस वगैरे.] चेक इन बॅगेत किंवा कॅबिन बॅगेतूनही न्यायला परवानगी नसते.
लोणची, तेल, सर्व डाळी, धान्य इथे मिळतं.

तिकडे बे एरिया च्या बाफवर लिहीलेले होते, ते वाचले की नाही म्हणून येथे कॉपी करतोय

दमहाजन - यातील बर्‍याच गोष्टी येथे विकत मिळतील. कस्टम्स वाले काय काढून टाकतील याबद्दल काहीही सांगता येत नाही. कोरड्या पदार्थांना शक्यतो प्रॉब्लेम येत नाही असा आत्तापर्यंतचा अनुभव आहे, पण येथील बर्‍याच जणांकडून विविध पदार्थ काढायला लावल्याचाही आहे. केबिन बॅग मधे द्रवपदार्थ शक्यतो आणू नका.

दमहाजन, सॅन होजे तसेच त्या बाजुला भरपूर ईंडियन ग्रोसरी स्टोअर्स आहेत, तिथे सर्व गोष्टी मिळतात.
बरोबर सामानात लोणची, बिया, कुठल्याही प्रकारची धान्ये वगैरे आणु नका.
कोरडा खाऊ बरोबर आणता येइल.
कस्टममधे तुम्हाला सर्व बॅगा उघडुन दाखवायला लावतील व आतील सामान चेक केले जाईल या तयारीने पॅकींग करा.

माझ्या मैत्रिणीची लेक सॅन फ्रान्सिस्कोला लॉ कॉलेजमध्ये उच्च शिक्षणासाठी येत आहे.‌ ती रहायला जागा शोधत आहे. कुणी आहे का आपलं तिथे?

तिच्या लेकीला कुठला भाग सुरक्षित आहे ही माहिती आणि भाड्यानी जागा कशी शोधायची ही माहिती हवी होती. धन्यवाद.