१ वाटी नवीन तांदूळ धुवून घेणे
१/२ वाटी मूगाची डाळ
२ वाटी किसलेल गूळ (किंवा तुमच्या गोडाच्या आवडीप्रमाणे)
४ वाटी दूध
२ टे. स्पू. ओल खोबर (ऑप्टनल आहे नाही घातल तरी चालत)
१ टे स्पू. काजू
१ टे. स्पू. मनुका
१/२ टि.स्पून वेलची पावडर
२ टे.स्पू. साजूक तूप
मूगाची डांळ कोरडीच गुलाबी होईपर्यंत मंद गॅसवर भाजून घ्यावी.
१ टे.स्पू. तुपात काजू आणि मनुका तळून घ्या.
त्याच उरलेल्या तुपात तांदूळ थोडेसे परतवावे नंतर मुगाची डाळ घालून थोड ढवळा.
४ वाटी दूध, ओल खोबर घालून मिडियम फ्लेमवर शिजू द्या.
डाळ आणि तांदूळ शिजून मिश्रण घट्ट झाल की त्यात किसलेला गूळ घाला.
मिश्रण मंद फ्लेमवर ठेवा. घट्ट झाल की त्यात काजू व मनुका घाला.
गॅस बंद करून पोंगलमध्ये वेलची पावडर व साजूक तूप घाला.
कविन | 5 February, 2013 - 07:30नवीन
टिपा: १) ह्यासाठी नवीन तांदूळ वापरावा, जुना वापरल्यास दुधाचे प्रमाण वाढवावे जरुरी प्रमाणे
२) मुगाची डाळ हलकेच गरम होईल इतपत भाजावी. रंग बदलतोय न बदलतोय इतपतच भाजावी. जर जास्त भाजली गेली तर एकतर मिक्सी मधून भरड काढून मग मिक्स करावी तांदुळात किंवा वेगळी शिजवून घेऊन मिक्स करावी
आरती आता ह्या टिपा वर अॅड कर ट्राईड अॅन्ड टेस्टेड म्हणून
छान वाटतोय प्रकार हा!
छान वाटतोय प्रकार हा!
.
.
के अंजली धन्यवाद.
के अंजली धन्यवाद.
आरती मस्त दिसतोय प्रकार.
आरती मस्त दिसतोय प्रकार. गुळामुळे गोड पदार्थाला वेगळीच चव येते.
बरं ते डाळ आणि तांदुळात दूध गरम करून घालायचं की आहे त्या टेम्प चं?
आरतम्मा, मस्त आहे बगा तुमचं
आरतम्मा, मस्त आहे बगा तुमचं पोंगल.
दक्षिणा, दूध आहे त्या टेम्पच
दक्षिणा, दूध आहे त्या टेम्पच घालायच.
माधव
छान रेस्पी आरती. मी दुधात
छान रेस्पी आरती. मी दुधात शिजवत नाही कधीच. गूळ घातल्यावर दुध फाटतं.
शिजवल्यावर गूळ घालते.
दुध+गूळाची चव छान येत असणार. पाहते करून. खोबरं पण कधी घातलेलं नाहीये.
संक्रांतीच्या पोंगल-प्रसादात हमखास तिळकूट असतोच.
चिन्नु, गूळ आणि दूध एकत्र
चिन्नु, गूळ आणि दूध एकत्र नाही घालायच. तांदूळ आणि डाळ प्रथम दुधात शिजवून घ्यायची. दूध पूर्ण आटल्यावर गूळ घालायच. चव छान लागते.
ओके, नेक्स्ट टाईम. नाहीतर तूच
ओके, नेक्स्ट टाईम. नाहीतर तूच बोलव करून
आजच ये खायला
आजच ये खायला
हे बरयं. काल केलेस आणि मला आज
हे बरयं. काल केलेस आणि मला आज बोलावतेस काय गं?
छान आहे हा प्रकार. यावर्षी
छान आहे हा प्रकार. यावर्षी घरी होतो तर आमच्या शेजारी पार्थसारथी मामींनी आणून दिला होता.
चिन्नु उरलेला संपवायला आज
चिन्नु उरलेला संपवायला आज बोलवत आहे.
तू येशील तेव्हा पुन्हा बनवू सोपा तर आहे.
दिनेशदा तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद पण तुम्ही न.मु. येऊन ईकडे काहीच खबरबार नाही दिली म्हणून राग. आम्ही आलो असतो जागूच्या घरी तुम्हाला भेटायला.
अतिशय तृप्त करणारा आहे हा
अतिशय तृप्त करणारा आहे हा प्रकार! करायला सोपा, रुचकर, घरात जिन्नस सहज मिळतील असा आणि पटपट होणारा. कर्नाटकात बर्याचदा खाल्ला आहे.
अरुंधती +१. सुरेख लागतो अगदी.
अरुंधती +१.
सुरेख लागतो अगदी. नणंदेच्या सासुबाईंकडुन शिकले होते. आता बर्याच दिवसात केला नाही. बरी आठवण झाली. धन्यवाद आरती.
अकु, रैना धन्स.
अकु, रैना धन्स.
शनिवारी केलं मी हे. एकदम
शनिवारी केलं मी हे.
एकदम यम्मी यम्मी. तुपात तळलेल्या बदामाचा स्वाद अफ्फाट लागतोय.
पण मला डाळ तांदुळ वगळता बाकीच्या जीन्नसांचं प्रमाण डबल लागलं. मुगाची डाळही बराच वेळ झाला बोटचेपी होतच नव्हती. असं का झालं असावं?
शनिवारी केलं मी हे. एकदम
शनिवारी केलं मी हे.
एकदम यम्मी यम्मी. तुपात तळलेल्या बदामाचा स्वाद अफ्फाट लागतोय.
पण मला डाळ तांदुळ वगळता बाकीच्या जीन्नसांचं प्रमाण डबल लागलं. मुगाची डाळही बराच वेळ झाला बोटचेपी होतच नव्हती. असं का झालं असावं?
मूगाची डाळ जास्त भाजली गेली
मूगाची डाळ जास्त भाजली गेली असेल.
फोटो छान आला आहे.
वाफाळलेला गरम.थंड किंवा
वाफाळलेला गरम.थंड किंवा मुद्दान उरवलेला शिळा कसाही असो .माझ्या अत्यंत आवडीचा.बरेच दिवस झाले खाल्ला नाहीये. सेल्लप्पन नांवाचे तामीळ शेजारी होते.त्यांच्याकडुन नेहमी भरपूर प्रमाणात येत असे.पोंगल साठी खास मद्रासहुन आणलेला गूळ वापरायचे .
सुलेखाताई तुमच्या
सुलेखाताई तुमच्या प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद,
मी मुद्दाम जास्त करते मलापण शिळा थंडगार खूप आवडतो.
हो आरती डाळ थोडी जास्त भाजली
हो आरती डाळ थोडी जास्त भाजली गेली होती (करपली नव्हती पण थोडी जास्त भाजली गेली होती) कदाचित तांदुळ पण जुना असल्याने दुध जास्त लागलं असेल. जे काही असेल, टेस्ट एक्दम सह्ही होती. रिपीट टेलिकास्ट करत रहावे अधुन मधुन असं वाटण्या इतकी मस्त होती. लेकीला तितकसं अपील नाही झालं पण आम्ही दोघांनी मनसोक्त हादडलं.आणि मलाच टेस्ट इतकी आवडली की इतर कोणालाही नसतं आवडलं तरी पदार्थ रिपिट झालाच असता
कविन, पोंगलसाठी नविन तांदूळ
कविन, पोंगलसाठी नविन तांदूळ वापरायचा जूना अजिबात नाही.
टिपा: १) ह्यासाठी नवीन तांदूळ
टिपा: १) ह्यासाठी नवीन तांदूळ वापरावा, जुना वापरल्यास दुधाचे प्रमाण वाढवावे जरुरी प्रमाणे
२) मुगाची डाळ हलकेच गरम होईल इतपत भाजावी. रंग बदलतोय न बदलतोय इतपतच भाजावी. जर जास्त भाजली गेली तर एकतर मिक्सी मधून भरड काढून मग मिक्स करावी तांदुळात किंवा वेगळी शिजवून घेऊन मिक्स करावी
आरती आता ह्या टिपा वर अॅड कर ट्राईड अॅन्ड टेस्टेड म्हणून
कविन तळटीप मध्ये तसच उचलून
कविन
तळटीप मध्ये तसच उचलून टाकते.