Submitted by जागू-प्राजक्ता-... on 23 January, 2013 - 14:58
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
क्रमवार पाककृती:
निवडलेली टेंगळी पाण्यातुन चांगली धुवून काढा.
भांड्यात तेलावर कांदा गुलाबी रंगावर तळून घ्या. त्यावर हिंग, हळद्,मसाला घालून परता. ह्या मिश्रणावर टेंगळी, वांगी घाला व मध्यम आचेवर वाफेवर चांगली शिजू द्या. (चांगली वाफ येण्यासाठी भांड्याच्या ताटावर पाणी ठेवा.) वांगी शिजली की त्यावर मिठ, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर घालून परत एक वाफ द्या आणि गॅस बंद करा.
ही आहे तयार टेंगळी सुकट.
वाढणी/प्रमाण:
३ ते ४ जणांसाठी
अधिक टिपा:
टेंगळी सुकट ही भिळजे ह्या माशांपासुन बनविली जाते. ही रश्यापेक्षा सुकीच जास्त चांगली लागते. वांगे हे ऑप्श्नल आहे. नाही घातले तरी चालते. पण कुठल्याही सुक्या माश्यांमधे वांगे चविष्ट लागते.
सुके मासे १) सुकी करंदी/सुकट - http://www.maayboli.com/node/39289
मासे/मटण/चिकन/अंडी फॅन क्लब - http://www.maayboli.com/node/23836
माहितीचा स्रोत:
आई
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जागु, माझा पहिला नंबर
जागु,
माझा पहिला नंबर माश्याच्या या धाग्यावर
तयार डिश मस्तच दिसतेय एकदम.
वाव तोँपासू
वाव तोँपासू
अरे वा ! तयार डिश मस्तच
अरे वा ! तयार डिश मस्तच दिसतेय.
मी सिंगापूरात पाहिलाय हा मासा , असे वाटते. कॉलिंग आशु२९.... असतो ना ग शिंग शाँगला ?
कुठल्याही सुक्या माश्यांमधे
कुठल्याही सुक्या माश्यांमधे वांगे चविष्ट लागते. >>> अरे वा! हे मला माहित नव्हतं.
टेंगळी>>> आम्ही ह्याला मासे
टेंगळी>>> आम्ही ह्याला मासे सुकट म्हणतो. आणि त्या माशांना बिलज्या
मस्त तोंपासु पाकृ.
जागु मस्तच !!!!!!! तोंपासु
जागु मस्तच !!!!!!! तोंपासु
हाय दिल जान सब
हाय दिल जान सब कुर्बान.............!
मला तर काहीच माहिती नाहिये
मला तर काहीच माहिती नाहिये असो पण जागूची डिश म्हणल की आपोआपच रेस्पी वाचली बघितली जाते
प्रकरण दिसण्यावरुन तरी चविष्ट वाटतय. जाणकारांनी आणि चव घेतलेल्यांनी सांगा रे.
मस्त.. तोपासु..
मस्त.. तोपासु..
मस्त! तोंपासू अगदी रच्याकने
मस्त! तोंपासू अगदी
रच्याकने >>>पण कुठल्याही सुक्या माश्यांमधे वांगे चविष्ट लागते. <<< हे वाक्य असे हवे होते >>> कोणतेही सुके मासे कोणत्याही भाजीला चविष्ट करतात <<<
जागु,तोंपासु! सस्मित.......
जागु,तोंपासु!
सस्मित....... आमच्या भागात पण बिलज्या म्हणतात.
जागु... ही टेंगळी सोडे,अंबाड
जागु... ही टेंगळी सोडे,अंबाड जशी थोडा वेळ पाण्यात भिजवतो तशी भिजवून ठेवायची नसते का?(कांदयावर टाकण्याआधी?)
दक्षिणा, जाई, प्रिंसेस,
दक्षिणा, जाई, प्रिंसेस, प्रिती, सस्मित, नुतन, तृष्णा, शुभांगी, दिपु अवल अंशा धन्यवाद.
आमच्याइथेही बिलजे आणि भिळजे दोन्ही म्हणतात.
अंशा मी दोन्ही भिजवत नाही तशी गरजच नसते. शिजवल्यावर ते नरम होतातच.
बर्याच दिवसांनी ! मी इथे पण
बर्याच दिवसांनी !
मी इथे पण असेच सुकवलेले मासे बघितले आहेत. (नाव बघितले नाही.)
सध्या या जन्मी तरी शाकाहारी
सध्या या जन्मी तरी शाकाहारी रहाण्यातच भरपूर रस असल्याने पुढचा जन्म जागुची किंवा अवलची शेजारीण म्हणून मिळाल्यास बरा.:फिदी: म्हणजे माशांचा विचार करता येईल्.:फिदी:
टुनटुन पुढच्या जन्मी आम्ही
टुनटुन पुढच्या जन्मी आम्ही शाकाहारी झालो तर?
दिनेशदा हो बर्याच दिवसांनी वेळ काढुन येते हल्ली.
मस्त दिसतंय सुके मासे नेहेमी
मस्त दिसतंय
सुके मासे नेहेमी बघते आणि पुन्हा ठेवून देते...हिंमत होत नव्हती. आता हिंमत आलीये तुझी रेसिपी बघून
प्रतिभावान मत्स्यकृती
प्रतिभावान मत्स्यकृती निष्णातिका जागू,
दृष्य स्वरुपात समोर आलेला पदार्थ खचितच जीभ चाळवत आहे. मात्र थोडासा प्रयत्न करून त्यातील रॉ मटेरिअल 'टेंगळी सुकट' यास एखादे बरे पर्यायी नांव दिलेत तर क्लिक्सही वाढतील व मायबोलीची वाचक संख्या अकरा लाखावरून साडे अकरा लाखावर जाईल असे आम्हास वाटते. अभिनंदन व शुभेच्छा!
कळावे
गंभीर समीक्षक
सह्हीच. तयार सुकट कसली
सह्हीच. तयार सुकट कसली दिसतेय. भाकर्या झाल्या की बोलाव गं जेवायला ......
जागू, आम्ही याला बल्याची सुकट
जागू, आम्ही याला बल्याची सुकट म्हणतो.
मस्त आहेत.
गं.स. , बल्याचे सुकट नाव कसं आहे?
असं दिसतं होय सुकट. फोटोतच
असं दिसतं होय सुकट.
फोटोतच बघू शकते. प्रत्यक्ष बघण्याची हिंमत नाही बा
जयवी गंभिर समिक्षक आपल्या
जयवी
गंभिर समिक्षक आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
मामी तु ये गरम गरम भाकरी तव्यावरुनच काढून देते.
साती अग बल्याची सुकट म्हणजे वाकटी ना. बले मोठे असतात.
नीरजा पण तू तयार प्रत्यक्ष पाहू शकशील.
हायला सॉलिड लागतात हे. छॉटी
हायला सॉलिड लागतात हे.
छॉटी बुटकी काटेरी वांगी मस्त लागतात.
वांगं-कोलंबी, वांगं -जवळा, वांगं-सुकट,वांगं-बोंबील वगैरे सासू-सूनेचे नातं आहे, तुझ्यावाचून करमेना... जमेना.
पुढच्या जन्मी आम्ही शाकाहारी
पुढच्या जन्मी आम्ही शाकाहारी झालो तर? >> मग आम्ही रेस्प्या टाकून तुला बाटवून टाकू, हाकानाका
मी तर ठरवून टाकलंय, नेक्स्ट जन्मात मासेहारी होईनच होईन
पुढच्या जन्माची कशाला वाट
पुढच्या जन्माची कशाला वाट बघायची..
मी तर ठरवून टाकलंय, नेक्स्ट
मी तर ठरवून टाकलंय, नेक्स्ट जन्मात मासेहारी होईनच होईन. >>> हायला दक्षे. पुढल्या जन्मात तू बकरी-बिकरी झालीस तर पुन्हा जन्मभर हळहळत बसशील. त्यापेक्षा, कल करे सो आज कर......
म स्त .. घरी आहे आता केले
म स्त .. घरी आहे आता केले जाईल...
अस पण करतातना ( सुके तव्यावर भाजुन + कांदा + तिखट + मिठ + कोथिंबीर )
हो ना मामी, मी बकरी झाले तर,
हो ना मामी, मी बकरी झाले तर, मी मासे खाण्याऐवजी मलाच लोक खाऊन टाकतील कापून.
पण तू तयार प्रत्यक्ष पाहू
पण तू तयार प्रत्यक्ष पाहू शकशील <<
छे. सुकटाचा वास कोण सहन करणार?
वांगं-कोलंबी, वांगं -जवळा,
वांगं-कोलंबी, वांगं -जवळा, वांगं-सुकट,वांगं-बोंबील वगैरे सासू-सूनेचे नातं आहे, तुझ्यावाचून करमेना... जमेना.
झंपी
दक्षे तुला पुढचा जन्म नाही घ्यावा लागणार. ह्याच जन्मात होणार तु. माझे धागे अटेंड करुन तू अर्धी मांसाहारी झाली आहेसच.
मामी
नीरजा मग तुझ्यासाठी मी तुझ्या आवडीचा इसेन्स घालून देईन. अग आणि हा वास रेसिपी तयार झाल्यावर खमंग लागतो.
Pages