पाव वाटी काजु, पाव किलो भेंडी, एक सिमला मिर्ची, १ लहान चमचा बेसन, १० लसूण पाकळ्या, कडीपत्ता, कोथिंबीर, फोडणीचे जिन्नस, मीठ, तेल - फोडणीला व भेंडी तळण्यासाठी. थोडे पाणी.
काजु तेलात, तुपात शॅलो फ्राय करावे. एक दोन काजुचे तुकडे व २ लसूण पाकळ्या वरून टाकण्यासाठी बाजूला काढावेत. काजुची पूड करावी. लसणीचा लगदा करावा. भेंडी धुवून- पुस्प्प्न कोरडी करा. मध्ये चीर द्या. व तेलात खरपूस तळून घ्या.
काजुपूड, बेसन, लसणीचा लगदा, मीठ, कोथिंबीर थोडे पाणी घालून सारण तयार करा. तळलेल्या भेंडीत हे भरा.
गॅसवर पॅन ठेवून फोडणी करून घ्या. कडीपत्ता, सिमला मिर्चीचे तुकडे घाला. सि.मि. पुरते मीठ घाला - नाहीतर मीठ जास्त होइल. परता. मग भेंड्या घाला. झाकण ठेवा. मंद आचेवर २-३ मिनिटे ठेवा. काजुचे तुकडे, लसणाचे तुकडे घाला. अलगद परता. वरून कोथिंबीर घाला.
१. यात तिखट घालत नाही मी. आवडत असल्यास फोडणीमध्ये हिरव्या मिरच्या घालू शकता.
२. हा प्रकार स्नॅक म्हणूनही खपतो.
३. डाळ भाताबरोबर छान तोंडीलावणे होते.
व्वा, वेगळीच कृती . आज
व्वा, वेगळीच कृती . आज रेसिपीजचा धडाकाच लावला आहेस
संपदा कधीचं चाललयं ह्या
संपदा
कधीचं चाललयं ह्या रेस्प्या टाकायचं, पण आज वेळ मिळाला म्हणून.
छान. मला करता येईल, कारण सगळे
छान. मला करता येईल, कारण सगळे मिळते इथे !
मला खूप आवडते ही अशी भेंडी
मला खूप आवडते ही अशी भेंडी मसाला भरलेली
धन्स चिन्नू
फोटो का टाकत नाहीत काही लोक्स पा.कृ. त ]?????
क्या बात है....आजकाल किचन मधे
क्या बात है....आजकाल किचन मधे जोरदार वावर दिसतोय आमच्या चिन्नुचा
मस्त !!
लेकिन फोटू मंगता है यार.......
आता काय करा जयुतै, डोक्यावर
आता काय करा जयुतै, डोक्यावर पडलंच शेवटी
वा!!!
वा!!!
धन्यवाद सर्वांना. सिमला
धन्यवाद सर्वांना.
सिमला मिर्ची भाजी 'वाढवण्यासाठी' तसेच थोड्या तिखटासाठीप्ण. नाही टाकली तरी चालेल. पण सारणामध्ये थोडे तिखट घालावे.
रेसेपि मस्त आहे करुन बघेन
रेसेपि मस्त आहे करुन बघेन
संपदा +१. वेगळीच पाकृ. थँक्स
संपदा +१. वेगळीच पाकृ. थँक्स चिन्नु.
थँक यू
थँक यू