Submitted by दिनेश. on 21 January, 2013 - 06:28
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१ तास
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
एका माणसासाठी
माहितीचा स्रोत:
प्रयोग
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दिनेशदा मस्त कल्पना आहे .
दिनेशदा मस्त कल्पना आहे .
कोकम, भाजलेली मिरची ,हिंग व मिठ असे पाण्यात घालून ठेवून तासा-दोन तासांनी पितात त्याला गोव्यकडे फुटी कढी म्हणतात. उन्हाळ्यात मस्त वाटते प्यायला.
आम्ही बकुळीची फुले व मोगर्याची फुले माठातल्या पाण्यात घालून पाहिले आहे तेही छान लागते.
अवांतर - उकडलेली कैरीची साल पाण्यात घालून ते पाणी उन्हात ठेवून जेवढे गरम होईल त्याने लहान मुलांना आंघोळ घालतात उन्हाळ्यात. त्याला झळवणी म्हणतात. उन्हाळी आजार होऊ नये म्हणून असे करतात ..
केरळात पडिमुगम/पधिमुगम/
केरळात पडिमुगम/पधिमुगम/ पथिमुगम नावाची पावडर पाण्यात घालून ते पाणी प्यायला द्यायची पद्धत आहे. त्याने पाण्याला गुलाबीसर रंग येतो. पाण्याची चव गोड लागते आणि मुख्य म्हणजे लगेच तहान भागते. जीभेवर त्याची चवही छान येते. केरळातल्या प्रवासात मी अनेक ठिकाणी, स्नेह्यांकडे असे गरम पाणी प्यायले.
या पावडर बद्दल ही माहिती.
सिसाल्पिनिया सप्पन
एका तमिळ मैत्रिणीकडे त्यांचे
एका तमिळ मैत्रिणीकडे त्यांचे पारंपारिक ''पानकम्'' नावाचे सुगंधित, चवदार पेय प्यायले होते. पाण्यात सुंठ, बारीक केलेला गूळ आणि वेलची पूड घालून हे पेय बनवतात आणि उन्हाळ्यात किंवा इतर मौसमातही हे ''वेलकम ड्रिंक'' म्हणून किंवा पाहुण्यांचे स्वागत करताना देतात. त्याने तहान भागते व तजेला येतो.
ही त्याची रेसिपी. (या रेसिपीत लिंबाचा रसही घातलाय, परंतु पारंपारिक कृतीत लिंबाचा रस घालत नाहीत.)
अकु, मस्तच आहेत हे प्रकार.
अकु, मस्तच आहेत हे प्रकार.
सान्टा फे ऑपेरामधे काम करायचे
सान्टा फे ऑपेरामधे काम करायचे तेव्हा वाळवंटातल्या उन्हाळ्यात आजारी पडू नये म्हणून सतत पाणी प्यायला शिकवावे लागायचे. तेव्हा लिंबाची एक चकती पाण्याच्या बाटलीत घालून ठेवायची आणि दिवसभर ते पाणी प्यायचे ही सवय लागली. तहान भागते म्हणजे काय ते त्याने व्हायचे
मस्त आहेत सगळ्या कल्पना!
मस्त आहेत सगळ्या कल्पना! लिंबाची/संत्र्याची चकती घातलेले किंवा पुदिन्याचे पान चुरवडुन घातलेले पाणी मला आवडते.
पूर्वी माठातल्या पाण्यात वाळा किंवा मोगर्याची फुल घलून ठेवत असू त्याची आठवण झाली, हा लेख वाचून.>>>>+१
http://www.theyummylife.com/F
http://www.theyummylife.com/Flavored_Water
http://tonetiki.com/category/flavored-waters-and-coffee-drinks/
या लिंक्सवर अजून काही कृती आहेत.
अकु मी कधीही कुठेही गोडसर चव
अकु मी कधीही कुठेही गोडसर चव असलेलं पाणी प्यायले नाही केरळात असताना
मी जे ऐकलेलं ते कुठल्याश्या झाडाचं मुळं होतं. ते घालून पाणी उकळल्याने पाणी निर्जंतूक होतं म्हणे
अकु, तू जे पानकम लिहिले आहेस
अकु, तू जे पानकम लिहिले आहेस त्याचा शब्दश: अर्थ सरबत असाच होतो. त्याला कानडीमधे पानका म्हणतात. पण त्यामधे सुंठ चवीपुरती असते आणि मुख्य फ्लेवर हा वेलची पावडरचा असतो. लिंबूसरबत जसे आपण करतो तसे केले तरी त्यामधे सुंठ पावडर घातली जाते.
रिया., मी एका लग्नात
रिया., मी एका लग्नात त्रिचूरला, नंतर गुर्वायूरला आणि पालक्कडला असे पाणी प्यायले आहे. तेव्हा हौसेने ती पावडरही विकत घेतली होती. घरी आल्यावर काही महिन्यांत तो पुरवठा संपला आणि तसे पाणी पिणेही संपले!
नंदिनी, पानका म्हणतात कानडीत हे माहीत नव्हते! जे पानकम् प्यायले त्यात सुंठीची चव खास वेगळी लागत होती.
ओह! असो शकत तिकडे पावला
ओह!
असो शकत
तिकडे पावला पावलावर गोष्टी बदलतात
हो, तेही आहेच! पण केरळात ही
हो, तेही आहेच! पण केरळात ही पाण्यात घालायची पावडर सगळीकडे मिळते म्हणे!
ज्येष्ठमधाचे पाणी कोणी प्यायले आहे का? माझ्या ऐकण्यात ते औषधी असते म्हणे! पण तहान भागवण्यासाठी ज्येष्ठमधाच्या पाण्याचा प्रयोग कोणी करून पाहिला आहे का?
मी ज्ये म काढा पिते खोकला
मी ज्ये म काढा पिते खोकला झाला की.
भारिच
भारिच
व छानच.
व छानच.
अफलातून आयडीयाज आहेत. दिनेश
अफलातून आयडीयाज आहेत. दिनेश _/\_
किती छान कल्पना दिल्यात
किती छान कल्पना दिल्यात दिनेशदा. वाळ्याचे पाणी वगैरे विसरायलाच झाले होते.
परत सुरू करणार आता.
आज काल आमच्या हापिसातल्या
आज काल आमच्या हापिसातल्या कॅफे मधे असलं फ्लेवर्ड पाणी असतं. तिथले काही स्वादः लेमन, पाईनॅपल + पुदिना, काकडी, स्ट्रॉबेरी + सेज ई.
हे असं पाणी ऑन द गो हवं असेल तर मस्त बाटली आहे पहा.
दिनेशदा, साष्टांग नमस्कार!
दिनेशदा, साष्टांग नमस्कार!
मला लिंबाची आयडीया करायचीय पण
मला लिंबाची आयडीया करायचीय पण पाणी कोमट हवय. इथं थंडी आहे. जिरंपण मला वाटतं थंड असतं. त्यामुळे ते करू शकत नाही. कोमट पाण्याला सुगंधी करण्यासाठी काय करू? (शक्यतो लिंबु/संत्र/ पुदीना यापैकी)
पुदिना. कोमट पाण्यात
पुदिना.
कोमट पाण्यात घातलेल्या लिंबाचा वास आपण कुकरात साफ करायला लिंबू टाकतो ना कुकर शिजवताना एक्झॅक्टली तसाच वास येतो
बापरे! मग पुदिनाच बरा. नी
बापरे! मग पुदिनाच बरा.
नी थँक्स.
नी अगदी बरोब्बर....
नी
अगदी बरोब्बर.... किंवा ते भारतात रेस्टोरेंट्स मधे जेवण झाल्यावर गरम पाणी आणी लिंबाची चकती घातलेलं बाऊल येतं ना हात धुवायला तसला
श्रुती लिंबू वापर ना. कोमट
श्रुती लिंबू वापर ना. कोमट पाणी, लिंबू आणि थोडा मध हे मस्त combo आहे.
दिनेशदा, तुमच्यापासुन स्फुर्ती घेऊन काल ऑफिसच्या बाटलित orange rind घातलं थोडं. आणि एक छोटा खजुराचा तुकडा. मस्त लागलं. पाणी संप्ल्यावर तो खजुराचा तुकडा खाऊन टाकला. तो पण मस्त लागला.
मायबोलीची खासियत आहे हि,
मायबोलीची खासियत आहे हि, एखादा विषय घेतला कि त्यात फार मोलाची भर पडत जाते.
दिनेशदा,छान कल्पना!
दिनेशदा,छान कल्पना!
त्या वनस्पतीला अंबाडी
त्या वनस्पतीला अंबाडी म्हणतात हे खरंच माहीत नव्हतं. मला फक्त अंबाडीच्या पालेभाजीचे गुलाबी- कोनफळी तुरे माहीत होते.
या पेयासाठी वापरतात त्या कर्कडे या वनस्पतीची फुलं पिवळसर पांढरी असतात आणि त्यांच्या बुडाशी मधोमध जांभळा टिळा असतो. ती रंगारूपाने जास्वंदीच्या प्रकारांत बसतात. पुण्याला भोसरीच्या रस्त्यावर जास्वंदीचे असे अनेक प्रकार दिसतात. पेय बनवायला न उमललेल्या कळ्या वापरतात. त्या लालभडक असतात आणि त्यांच्या सुट्या पाकळ्या तर अगदी जास्वंदीच्या पाकळ्यांसारख्या दिसतात. पुन्हा या कर्कडे किंवा Hibiscus sabdariffa या वनस्पतीची जातही हायबिस्कस आणि घराणंही मालव्हेसी म्हणजे जास्वंदीचंच!
म्हणून जास्वंदी म्हटलं.
-उज्ज्वला दळवी.
दिनेशदा, आमच्याकडचा उन्हाळा
दिनेशदा,
आमच्याकडचा उन्हाळा रणरणीत असतो. येत्या उन्हाळ्यात आम्ही हे वेगवेगळ्या चवींचं सुगंधी जलपान करू. त्यावेळी मायबोलीकरांना भरभरून दुवाही देऊ. पण तुम्हा सगळ्यांना उचक्या लागल्या तर कुठल्या चवीचं पाणी पिऊन त्या थांबवायच्या ते ठरवून ठेवा.
-उज्ज्वला.
डॉ. उज्ज्वला, मी तूमचा चाहता
डॉ. उज्ज्वला, मी तूमचा चाहता आहे हो, तूम्ही याची दखल घेतलीत याचा अवर्णनीय आनंद झालाय मला.
दिनेशदा, नविन खास सुगंधित
दिनेशदा,
नविन खास सुगंधित (पाणी) माहिती मिळाली..
Pages