Submitted by अविगा on 1 November, 2012 - 07:06
कोणाला तेल पोळ्या बनवाच्या कश्या ते माहित आहे का?
(पुरण टाकुन)
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कोणाला तेल पोळ्या बनवाच्या कश्या ते माहित आहे का?
(पुरण टाकुन)
दिनेशदा, हाजिर हो! एक धागा
दिनेशदा, हाजिर हो!
एक धागा होता बहुदा. सापडला तर सांगते!
लय भारी लागतात कशाला आठवण
लय भारी लागतात कशाला आठवण करून दिलेय घरी कोणालाच येत नाहीत
म्हणजे काय?
म्हणजे काय?
अरे ह्या साठी सेपरेट बीबी नका
अरे ह्या साठी सेपरेट बीबी नका काढु.. मला येतात तेलावरच्या पोळ्या .. देते पाकृ विपुत ( थोडे दिवस थांबा पण )
केदार२० खरच खुप छान लागतात
केदार२० खरच खुप छान लागतात ....मलाहि खुप आवडतात.....म्हणुन पाककृती मागते....
दिपालि लवकर पाककृती सांगा....
आंबा खाल्लि तर खातच रहाल...
सिंधुताई सकपाळ चित्रपट पहा,
सिंधुताई सकपाळ चित्रपट पहा, त्यात आहे ( पण चुकलीय ! )
दिपालि,दिनेशदा पाककृति दिली
दिपालि,दिनेशदा पाककृति दिली नाही
http://marathifestivecooking.
http://marathifestivecooking.blogspot.com/ ईथे एक रेसीपि आहे.
हि लिंक माझ्याकडे ओपन होत
हि लिंक माझ्याकडे ओपन होत नाहि.
आमच्या घरी तेल पोळ्याच(तशी
आमच्या घरी तेल पोळ्याच(तशी पद्धत आहे) करतात.
तेल पोळ्यांना पुरण थोडं कमी गोड करावं लागतं नाहीतर पोळी लाटताना पुरण बाहेर येतं.
कणीक अगदी मऊ मळावी लागते. आधी नॉर्मल मळावी आणि मग तिला आपटून(हो कणकेचा गोळा परातीत जोरजोरात आपटायचा!) मऊ तिंबून घ्यावी लागते. (पुरण आणि कणीक यांचा मऊपणा सारखा हवा असं जाणत्या बायका सांगतात!)
मग चपात्याचा तवा शेगडीवर उलटा ठेवायचा आणि त्याला थोडं तेल लावून घ्यायचं.
मग साधी पुरणपोळी करताना जसे उंडे करून घेतो तसेच पुरण भरून उंडे करावेत. पुरण थोडं कमी भरावं.
मग पोळपाटावर एक मोठा चमचा तेल पसरवून घ्यावे. लाटण्यालाही थोडे तेल लावून घ्यावे.उंड्याला हातावरच थापून छोट्या पुरीएव्हढा आकार द्यावा. मग पोळ्पाटावर ठेउन हळूवार हाताने लाटावे.
लक्षात ठेवा, लाटताना पोळी उलटायची नाही. पोळीला हळूहळू गोल आकार देत जावे.
पोळी लाटून झाली की पोळीच्या वरच्या बाजूला लाटणे ठेऊन त्यावर पोळी गुंडाळून घ्यावी, म्हणजे लाटण्याभोवती पोळीचा रोल करावा(हे खूप सांभाळून करावे अन्यथा पोळी चिकटून बसण्याची शक्यता. तेल योग्य असल्यास चिकटत नाही)
पोळीचा आपल्या बाजूचा भाग तासाच रिकामा ठेऊन, तव्यावर टाकताना तो सर्वात आधी टाकून मग लाटणे फिरवून तव्यावर रोल उघडत जावे(हुश्श्य!! हे करणं सोप्पं आहे, समजावणं कठीण!)
थोड्या वेळाने पोळी बाजूने सुटतेय का ते पहावे आणि पलटावी. खरपूस भाजून घ्यावी.
ही पोळी जास्त गोड नसल्याने आमच्या भागात गुळवणीसोबत खातात.
हा प्रकार सासरी आल्यावर पहिल्यांदा केला, खाल्लाही
तेंव्हा अगदीच जमायच्या नाहीत, आत्ता संक्रांतीला मात्र उत्तम जमल्या.
(दीड वर्षांची practice!)
धन्यवाद साक्शि रवा वैगरे
धन्यवाद साक्शि
रवा वैगरे टाकतात का कडकपणा येण्यासाठि?
अविगा, मी नाही पाहिलं कधी रवा
अविगा, मी नाही पाहिलं कधी रवा टाकताना. तेलावर केल्या असल्यामुळे पोळ्या सुरेख पातळ लाटता येतात आणि खरपूस भाजल्या पण जातात.
साक्षी, फोटो टाका ना
साक्षी, फोटो टाका ना तेलपोळीचा.
अविगा सॉरी बरं का..विसरुन्च
अविगा सॉरी बरं का..विसरुन्च गेलो गं ... आज काल तुझा बीबी बघुन परत आठवल.. आज सकाळी पुरण करुन आलेय.. उद्या-परवा सविस्तर टाकेन..
साक्षी, फोटो टाका ना
साक्षी, फोटो टाका ना तेलपोळीचा>>> फोटो नाहीये माझ्याकडे.
असंही पुरणपोळीसारखीच दिसते तेलपोळी. पण पुन्हा केल्या की टाकेन, कुणाकडे असेल तर टाका प्लीज.