ग्रेट झाली मॅच...
ह्या दोघांच्या मॅचेस आजकाल अश्याच होतात च्यायला... ५ सेट्स मध्ये गेली मॅच की हरतो फेडरर...
फेडररची सर्व्हिस इतकी प्रभावी नव्हती का आज? कारण गेम्सची ब्रेका-ब्रेकी खूप झाली...
फेडररची सर्व्हिस चांगली होत होती... पण एकूण ब्रेकाब्रेकी खूप झाली..
राफा नी फेडररच्या बॅक हँड वर concentrate केलं पूर्ण.. पण फेडरर ने ही अप्रतिम बॅकहँड रिटर्न आणि पासेस मारले... total points won फेडररचे जास्त होते...
पहिल्या सेट मधे रुरुवातीला राफा ला नीट लय सापडत नव्हती.. पण मध्या पासून त्याचे फटके नीट बसायला लागले होते... अकराव्या गेम मधे मिळालेल्या ब्रेकच्या जोरावर नदाल ने सेट घेतला.. पण त्या आधीही एकदा दोधांनी एकमेकांची सर्व्हिस ब्रेक केली होती... दुसर्या आणि चौथ्या सेट मधे फेडररची पहिली सर्व्हिस होती.. आणि दोन्ही वेळा एकेका ब्रेक च्या जोरावर त्याने सेट ६-३ असे जिंकले.. त्यामूळे पाचव्या सेट मधे पहिली सर्व्हिस नदाल ची होती हे बरच झालं...
चौथ्या सेट पासून पुढे नदाल ने न घाबरता फेडरर कडे फोरहँड पण मारायला सुरुवात केली आणि फेडररने उत्कृष्ठ फोरहँड विनर्स बरोबर unforced errors पण केल्या.. नदालच्या गेल्या २/३ मॅचेस मधे oppnent पेक्षा कमी winners मारलेत पण unforced errors पण बर्याच कमी होत्या.. नदाल ने आपल्या सर्व्हिस मधले pros and cons ओळखून त्याप्रमाणे सर्व्हिस केली...
बक्षिस समारंभाच्या वेळी फेडररला रडताना पाहून कसतरीच वाटलं.. त्याला आधी कधी अश्या रूपात पाहिलं नव्हतं..
US open मधे तो अँडी मरे आडवा आला नसता तर राफा चं गोल्डन स्लॅम with olympic gold झालं असतं.. फक्त australian open मागच्या वर्षीच्या ऐवजी ह्या वर्षीच ..
सर्वोत्तम खेळ, सर्वोत्तम खेळाडु आणि सर्वोत्तम खिलाडुवृत्ती म्हणजे आजची मॅच. कोणा एका खेळाडुची कड न घेता निखळ टेनिस बघायला आलेल्यांना आजचा सामना म्हणजे अक्षरशः मेजवानी होती. अगदी २००८ विंबल्डनच्या च्या तोडीस तोड. आज प्रदीर्घ क्रॉसकोर्ट रॅलीज आणि अप्रतीम विनर्सची नुसती खैरात होती. ११ एसेस मारल्या तरी एकुणात फेडररची फर्स्ट सर्व नीट जात नव्हती. नादालने अर्थातच त्याच्या सेकंड सर्वचा फायदा घेतला. स्वतः नादालने अगदी थोड्या (चार) एसेस मारल्या. परंतु दोघांचेही फोरहँड आणि बॅकहँड near to perfect वाटले मला. नादालचा खेळ तर खूपच सुधारला आहे. ह्या वेगाने जर त्याने टायटल्स जिंकली तर तो सहज सगळे विक्रम मोडीत काढेल. नादालचा मोठा plus point म्हणजे त्याची झुंजार वृत्ती. सामना सुरु असताना कॉमेंटेटर म्हणाला की जोपर्यंत सामन्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत तो लढत रहातो. He keeps coming back. त्याचे प्रत्यंतर फेडररला आज पाचव्या सेटमधे आले असणार. खरे तर बर्डिचविरुद्ध पाच सेटची तयारी ठेवणार्या फेडररने ह्या सामन्यात पाच सेटची अपेक्षा केली असणार पण त्याचा खेळ अगदीच अन्पेक्षित काही अंगावर आल्यासारखा झाला.
शेवटी फेडरर प्राइझ घेण्यासाठी स्टेजवर आला तेव्हा प्रेक्षकांनी त्याच्या नावाचा एव्हढा जल्लोश केला की त्याला भावना आवरल्या नाहीत. ("कर्क राशीचा पाल्हाळा दिसतोय, रडायच काय त्यात" असं मी एरवी म्हंटलं असतं पण not to Federer ) तीन वर्षापुर्वी ह्याच कोर्टवर सर्वांनी फेडररला रडताना बघितलं होतं, पण तेव्हाचं कारण वेगळं होतं. त्याला बोलणे अशक्य झाल्यावर मग नादालला कप घेण्यास बोलावण्यात आले. नादालने ही अतिशय शांततेत, आनंदाचे प्रदर्शन न करता कप स्वीकारला आणि जाउन फेडररच्या गळ्यात पडुन त्याचे सांत्वन केले. शेवटी तो म्हणाला, "Remember, you are one of the best players of history" पूढे तो असेही म्हणाला की फेडरर नक्कीच सँप्रसचे १४ टायट्ल्सचे रेकॉर्ड ब्रेक करेल. आज फेडररने सँप्रसच्या विक्रमाची बरोबरी केली असती तरी टेनिस जगतातल्या सँप्रसच्या स्थानाला धक्का लागला नसता तसेच तशी बरोबरी न केल्याने फेडररचे स्थानही ढळले नाहीये. तो one of the greatest players आहे आणि राहिलच.
दोघा खेळाडुंना येणार्या वर्षासाठी शुभेच्छा. आजच्या सारखे उत्तम टेनिस आपल्याला बघायला मिळो
Submitted by तृप्ती आवटी on 1 February, 2009 - 16:11
आदम आणि सिंडी, अनुमोदन!
सुरेख मॅच. शेवटच्या सेटपर्यंत कोण जिंकेल याचा अंदाज येत नव्हता. पण शेवटच्या सेटमध्ये नदालने पूर्ण वर्चस्व गाजवलं. फेडीने जवळजवळ मॅच सोडल्यासारखीच वाटली. मधूनच ढेपाळत होता, मधूनच त्याचे 'फेडेक्स' शॉट्स बसत होते... पण ओव्हरॉल त्याचे फायटींग स्पिरिट कमी वाटले
नदाल गोड आहे वय त्याच्या बाजूनी आहे. आणि गर्व, जेलसीचा स्पर्श नाही. जिंकल्यावर फेडी आणि प्रेक्षकांना उद्देशून म्हणाला, 'I am sorry for today!!!' किती मोठ्या मनाचा आहे! मस्त वाटलं, त्याने फेडीला मिठी मारली तेव्हा. ते दोघे कट्टर प्रतिस्पर्धी असूनही नेहेमीच एकमेकांचा आदर करतात, हे पाहून खूप छान वाटतं. Thats sportsman spirit in true sense!
फेडीला रडताना मात्र पाहवलं नाही. कसंतरीच वाटलं. Cmon, you can do it Fedex!!
-----------------------------------
तेरी उम्मीदपे ठुकरा रहा हूँ दुनियाको
तुझेभी अपनेपे यह ऐतबार है की नहीं..
अडम... बर्याच दिवसात इथे येता आले नाही.. पण आठवण काढल्याबद्दल धन्यवाद. या वर्षीचे ऑस्ट्रेलियन ओपनमधले सामने लाइव्ह बघता आले नाहीत..
पण सिंड्रेला व पुनमच्या पोस्टना अनुमोदन... असे दोन उच्च दर्जाचे व खिलाडूवृत्तिचे खेळाडु एकमेकात कोर्टवर झुंजताना पाहायला मिळणे म्हणजे आपल्यासारख्या टेनिसप्रेमींसाठी पर्वणिच असते. पण फेडररला रडताना पाहुन माझ्याही पोटात कसेसेच झाले. पूनम.. अग कालच्याच नाही पण याआधीच्या त्या दोघांमधल्या सर्व ग्रँड स्लॅम फायनल्समधे नादालने अश्याच दिलदार व खिलाडु वृत्तिचे प्रदर्शन केले होते. या दोघांना एकमेकांबद्दल असलेला आदर आपल्याला नेहमीच दिसुन येतो. आणि तो अजिबात कृत्रिम वाटत नाही... हेही इथे नमुद करावेसे वाटते.
सिंड्रेला.... तु एकदम बरोबर म्हणालीस की काल फेडररला सँप्रासच्या विक्रमाची बरोबरी करता आली नाही म्हणुन त्याने फेडररचा ग्रेटपणा कमी होत नाही किंवा त्याने पुढे कधी सँप्रासचा विक्रम मोडला तर त्याने सँप्रासचा ग्रेटपणा कमी होणार नाही... आता हे बघा... गावस्करचा १०,००० धावांचा विक्रम पुढे बर्याच जणांनी मोडला म्हणुन गावस्कर कमी ग्रेट होता असे म्हणता येइल का?
आणि या दोन महान टेनिसपटुंमधल्या अतिशय अटितटिच्या व रंजक लढती आपल्याला गेले ३-४ वर्षे बघायचे भाग्य लाभत आहे .. त्या पाहुन मला एक सांगावेसे वाटते... सध्या आपल्याला या दोनच खेळाडुंमधले असे अटितटिचे सामने पाहायला मिळत आहेत.. कारण त्यांच्यात व बाकीच्या खेळाडुंमधे बरेच अंतर आहे... (फेडरर्-रॉडिक सामने तर प्रेडिक्टेबल झाल्यामुळे पाहावेसेच वाटत नाहीत :)) पण तुमच्यापैकी किती जणांना लेट ७० व ८० च्या दशकातले... बोर्ग्-मॅकेन्रो, बोर्ग्-कॉनर्स, कॉनर्स्-मॅकेन्रो,लेंडल-मॅकेन्रो,बेकर्-लेंडल किंवा बेकर्-एडबर्ग यांच्यातले सामने पाहण्याचे भाग्य लाभले ते मला माहीत नाही पण ... जस्ट इमॅजिन.... सध्या फेडरर-नादाल मधेच होत असणारे चुरसीचे सामने त्या वेळेला त्या सर्वांमधे नेहमीच होत असत.... म्हणजे सध्या आपल्याला जो आनंद या दोघांच्या लढती बघण्यात मिळतो त्याला तुम्ही ६-७ पटीने गुणा.... तेवढा आनंद त्या वेळेला टेनिसप्रेमींना मिळत असे..:) लेट ७० व ८० च्या दशकामधे याच ५-६ जणात ग्रँड स्लॅम फायनल्स होत असत... त्यात महिलांमधे ख्रिस एव्हर्ट, मार्टिना नवरातिलोव्हा व स्टेफि ग्राफ त्या वेळेला खेळत होत्या.. म्हणुन मला तो टेनिसचा सुवर्णकाळ वाटतो.. (आणि एक.. एक मार्टिना नवरातिलोव्हा सोडली तर त्या वेळेला महिला टेनिसपटु महिला वाटायच्या... सध्या विलियम्स भगिनी बघुन त्या खुपच पुरुषी व दाणगट वाटतात... एक शॅरापोव्हा सोडली तर दिनारा सफीन,कुझेंस्टोव्हा वगैरे रशियन महिला सुध्हा खुपच दाणगट व पुरुषी वाटतात...)
अरे वा.. मुकूंद आलाच आहात तर आता एका तरी मॅच चं पूर्ण वर्णन लिहा..
ख्रिस एव्हर्ट, मार्टिना नवरातिलोव्हा व स्टेफि ग्राफ त्या वेळेला खेळत होत्या.. म्हणुन मला तो टेनिसचा सुवर्णकाळ वाटतो.. >>>>> ह्याच्याशी मात्र असहमत..
जरी खेळाडू दणकट असल्या तरी विल्यम्स भगिनी, रशियन ब्रिगेड, बेल्जियन्स आणि सर्ब्स.. मधे मधे येऊन जाऊन हिंगीस, कॅप्रिआती वगैरे ह्य सगळ्या एका वेळी जेव्हा खेळत होत्या त्या वेळ एतकी चूरस महिला टेनीस मधे कोणत्याच काळात नव्हती... त्यामूळे हेनीन रिटायर व्हायच्या आधीची २/३ वर्ष हा खरा महिला टेनीस चा सुवर्ण काळ होता असं मला वाटतं...
हम्म... सिंड्रेलाच्या पोस्टला पूर्ण अनुमोदन....
नदालची खिलाडूवृत्ती खरंच प्रशंसनीय... त्याने ती ट्रॉफी घेताना खरोखरच खूप संयम दाखवला..
मुकुंद,
सॅंप्रास, आगासी, जिम कुरियर, मायकेल चँग, मार्क फिलिपॉसिस हे लोक जेव्हा होते तेव्हाही मॅचेस चुरशीच्या व्हायच्याच की... तो काळ सुद्धा उत्तम होता...
आज फेडररने सँप्रसच्या विक्रमाची बरोबरी केली असती तरी टेनिस जगतातल्या सँप्रसच्या स्थानाला धक्का लागला नसता तसेच तशी बरोबरी न केल्याने फेडररचे स्थानही ढळले नाहीये. तो one of the greatest players आहे आणि राहिलच. >> एकदम बरोबर. Sampras was one of the great players, Federer is, and Rafal will be soon joining them.
सध्या विलियम्स भगिनी बघुन त्या खुपच पुरुषी व दाणगट वाटतात... एक शॅरापोव्हा सोडली तर दिनारा सफीन,कुझेंस्टोव्हा वगैरे रशियन महिला सुध्हा खुपच दाणगट व पुरुषी वाटतात... >> ह्याला अनुमोदन. Women टेनिस मधली नजाकत हरवली आहे.
अडम.. अरे मी एकही मॅच लाइव्ह बघितली नाही म्हणुन मॅचबद्दल लिहु शकणार नाही ... क्षमस्व..
आता तु जे म्हणतोस की सध्याच्या रशियन ब्रिगेडमधल्या महिला,कॅप्रिआटी,हिंगस,हेनन यांच्यात चुरसीचे सामने व्हायचे.. ते बरोबर आहे पण ज्यांनी ख्रिस एव्हर्ट ,मार्टिना नवरातिलोव्हा किंवा स्टेफी ग्राफला खेळताना पाहीले आहे ते तुला सांगु शकतील की तु जेव्हा त्यांच्याबद्दल बोलतोस तेव्हा तु टेनिसच्या ऑल टाइम ग्रेट.. लेजेंडरी महिला टेनिसपटुंबद्दल बोलतोस... त्यांची बरोबरी जेनिफर कॅप्रिआटी,हिंगस किंवा सध्याच्या रशियन ब्रिगेडबरोबर कदापीही होउ शकत नाही.... हे तु त्यांचा खेळ बघीतलेल्या कोणालाही विचार...
सँटीनो... तुझ्या सँप्रास,ऍगॅसी,करिअर्,चँग बद्दलच्या मुद्द्याचेही तसेच आहे. एक सँप्रास व ऍगॅसी सोडले तर बाकीच्यांचे नाव बोर्ग्,मॅकॅन्रो,कॉनर्स,लेंडल च्या बरोबरीने घेण्याचे धाडस...त्या जुन्या लेजेंड्सचा खेळ ज्यांनी पाहीला आहे.. ते कदापीही करणार नाहीत... आणि सध्याच्या खेळाडुत मी फक्त फेडरर व नादाल या दोघांनाच त्यांच्या पंगतीत बसवायला तयार आहे.. तुला टेनिस चॅनलवर जर त्या खेळाडुंच्या जुन्या मॅचेस बघायला मिळाल्या तर जरुर बघ...
त्यांच्याही वेळेला अजुन काही असे खेळाडु होते की ज्यांनी या महान खेळाडुंना काही काही वेळेला अटितटिची लढत दिली होती... उदाहरणार्थ... विटास गेरुलायटिस, गिलेर्मो विलास्,मॅट्स विलँडर व तुला खोटे वाटेल.. आपला भारताचा विजय अमृतराज यानेही.. (खासकरुन... बोर्गला विजय अमृतराजने बर्याच स्पर्धात हरवले आहे.. पण तो ग्रँड स्लॅम स्पर्धात तसे करु शकला नाही.. या गोष्टीचे मला नेहमी वाइट वाटायचे..) ९० च्या दशकात सँप्रास व ऍगॅसीच्या वर्चस्वाला जिम करिअर्,थॉमस मुस्टर्,गोरान इव्होनिव्होविच , पॅट्रिक रॅफ्टर वगैरेंनी थोड्या थोड्या काळापुरते आव्हान दिले पण त्यांच्या मॅचेसना.. बोर्गं-मॅकॅन्रो किंवा कॉनर्स -मॅकॅन्रो किंवा बेकर्-एडबर्गच्या मॅचेसची सर कधीच आली नाही.. हेच तुला या सर्व मॅचेस ज्यांनी बघीतल्या आहेत .. ते सांगतील...
महिलांमधेही त्या वेळेला नाव घेण्यासारख्या अजुन काही खेळाडु होत्या त्या म्हणजे.. हॅना मांडलीकोव्हा,ट्रेसी ऑस्टिन,अरांचा सँकेझ व्हिकारिओ,मॉनिका सेलेस व गॅब्रिएला सॅबॅटिनी.. पण ख्रिस एव्हर्ट्,मार्टिना नवरातिलोव्हा व स्टेफी ग्राफच्या तुलनेने त्यांची नावे म्हणजे एक साइड नोट म्हणुन घेतली जातील.तसेच अडम.. तु म्हणतोस त्यांच्यापैकी विलिअम्स भगिनी व जस्टिन हेनन सोडता.. बाकीच्यांची नावेही एक साइड नोट म्हणुन घेतली जातील...
मला पुण्यामध्ये लहान मुलिंना टेनीसचे प्रशिक्षण देणार्या शाळा (Sports Academy ) बद्द्ल माहिती हवी आहे. कुणाला माहिती असेल तर कृपया सांगा. ( Address or contact details.)
- मनी.
Submitted by mani_mani on 4 February, 2009 - 08:46
कोणी जाणार असेल तर Holiday twilight plan घ्या.. ! खूपच उपयोगी पडतो... दुपारी २ पर्यंत न्यूयॉर्क मधे फिरायचं.. आणि मग मॅचेस बघायला जायचं.. सेंटर कॉर्ट वर सिट असतात.. बाकी मॅचेस ना जर जागा असेल तर जाता येतं..
साईड कोर्टस वर भरपूर जागा असते.. तिथे डबल्सच्या मॅचेस (आणि खेळाडू पण. ) अगदी जवळून बघता येतात...
ज्ञाती,अडम.. अरे हे काय? अजुन फ्रेंच ओपन नाही झाली, विंबल्डन स्पर्धा नाही झाली आणि तुम्हाला आत्तापासुनच यु एस ओपनचे वेध लागले?:)
रोलँड गॅरसची रंगीत तालिम रोममधे चालु आहे.. बघत आहे का कोणी? उपांत्य फेरीत परत एकदा युज्वल सस्पेक्ट्स! नादाल विरुद्ध गोन्झालिस व फेडरर विरुद्ध जाकोव्हिक!:)
मी आत्ता नोल वि. फेडरर मॅच बघितली... फेडरर हरला.. खूप सही क्रॉसकोर्ट रॅली झाल्या... फेडरर नी unforced errors बर्याच केल्या.. !
मुकूंद ची 4 फेब्रुवारी, 2009 ची पोस्ट आत्ता वाचली.. मी नवरातिलोव्हा, स्टेफी ग्राफ आणि मोनिका सेलेसच्या मॅचेस live बघितलेल्या आहेत... त्यांची बरोबरी जेनिफर कॅप्रिआटी,हिंगस किंवा सध्याच्या रशियन ब्रिगेडबरोबर कदापीही होउ शकत नाही हे खरं असलं तरी एकाच कॅलिबरच्या एव्हडया खेळाडू एकाच वेळी खेळत असणं हे मी म्हंटलय त्या काळाच्या आधी कधीच नव्हतं..
आणि मोनिका सेलेस साईड नोट???????????????? हे तुमच्या सारख्या जाणकार टेनिस फॅन नी म्हणणं अगदीच शो. ना. हो. !! ९० ते ९३ मधे आठ ग्रँड स्लॅम विजेतेपद आणि एक उपविजेतेपद मिळवणारी खेळाडू साईडनोट म्हणून दुर्लक्ष करण्याजोगी नक्कीच नव्हती.. मोनिका चा स्टॅमिना आणि क्रॉस कोर्ट फोरहँड अ फा ट असायचे.. !! विंबल्डन वगळता सगळ्या स्पर्धांमधे तिनी स्टेफी ग्राफ ला नमवलं होतं..
मोनिका सेलेस वर तो दुर्दैवी हल्ला झाला नसता तर स्टेफी ग्राफ चं आज जे प्रोफाईल दिसतय ते बरच वेगळं दिसलं असतं.. ! जर-तर ला आता काही विशेष अर्थ नसला तरी स्टेफी ग्राफ ही महिला टेनिस मधली सगळ्यात जास्त लकी बाई होती असं माझं मत आहे.. तिच्या यशात तिच्या टॅलेंट इतकाच किंवा कणभर जास्तच तिच्या लकचा जास्त वाटा होता.. तीच्या करीयर चं टाइमिंग इतकं अचूक होतं आणि घटना ही अश्या घडत गेल्या की तिला फरशी चुसरच नव्हती..
असो..
नादालने जाकोव्हिक ला हरवुन इटालिअन ओपन जिंकुन रोलँड गॅरसला सावधान केले आहे... लागोपाठ ५ वेळा फ्रेंच ओपन जिंकुन बोर्गचा इतक्या वर्षाचा तिथला विक्रम बहुतेक तो या वर्षी मोडीत काढील अशीच चिन्ह दिसत आहेत... मॅच पाहीली का कोणी? नादालचा फिटनेस पाहीलात का? रोलँड गॅरसवर त्याच्याकडुन ३ सेट कोणी घेउ शकेल असे त्याच्या फिटनेसकडे व त्याच्या खेळाकडे बघुन वाटत नाही...
अडम तु जुन्या मायबोलीवरच्या माझ्या काही मॉनिका सेलेसबद्दलच्या पोस्ट वाचल्या होत्यास की नाही हे मला माहीत नाही पण त्यामधे बरेच वेळा मी मॉनिका सेलेसला तिचा ड्यु रिस्पेक्ट दिलेला आहे. वर मी जरा तिच्याबद्दल साइड नोट असे निष्काळजी स्टेट्मेंट केले हे मी मान्य करतो . पण तरीही तिला ख्रिस एव्हर्ट, मार्टिना नवरातिलोव्हा व स्टेफीच्या पंगतीत बसवायला माझे मन तयार होत नाही. तिच्या सारखे पॉवरफुल डबल हँडेड फोरहँड(व बॅकहँड सुद्धा) शॉट्स व विनर्स मी कधीच पाहीले नाहीत पण एक अॅथलिट म्हणुन मला ती कधीच इंप्रेसिव्ह वाटली नाही. जशी डॅव्हेनपोर्ट तशी ती पण ढेपाळलेली अॅथलिट वाटायची.. कोर्ट स्पिड व नजाकतीचा अभाव या दोन गोष्टींमुळे(व काही अंशी तिच्या त्रासदायक लाउड ग्रंटींग मुळेही असेल कदाचित्!)तिला लेजेंडरी म्हणणे माझ्या जिवावर येते.. पण हा माझा वैयक्तिक दृष्टिकोन... तो कदाचित चुकीचाही असु शकेल..:)
आता बाब राहीली स्टेफी ग्राफ लकी होती की टॅलंटेड? या तुझ्या मतावर एक व्ही. अँड सी(जुन्या!) वर होते तशी एक मस्त खडाजंगी होउ शकेल...:)
अडम तु जुन्या मायबोलीवरच्या माझ्या काही मॉनिका सेलेसबद्दलच्या पोस्ट वाचल्या होत्यास की नाही हे मला माहीत नाही पण त्यामधे बरेच वेळा मी मॉनिका सेलेसला तिचा ड्यु रिस्पेक्ट दिलेला आहे. >>> नाही मी नाही वाचलेल्या.. पण आता शोधून वाचेन नक्की...
मुकूंद, तुमचं मत वाचलं.. अश्या सगळ्या बाबतीत वैयक्तिक दृष्टिकोन हा असतोच.. आणि त्याला logical reasons पण काहीच देता येत नाहीत आणि काय चूक आणि काय बरोबर असं काही ठरवताही येत नाही.. फक्त आकडेवारी वरून ( आणि माझी आवडती खेळाडू असल्याने ) मोनिका सेलेसला साईडनोट म्हणणं मला खटकलं म्हणून पोस्ट प्रपंच..
आता स्टेफी ग्राफ बद्दल माझी खूप टोकाची मतं आहेत.. त्यामूळे ह्या विषयावर कधीही व्ही. अँड सी करायला मी तयारच असतो.. सांगा कधी करायचाय..
असो.. तुमचं पोस्ट वाचल्यानंतर मी युट्यूब वर बर्याच जून्या क्लीप्स शोधून पाहिल्या...
अडम... मग स्टेफी ग्राफने पंचांकडे मॉनिकाच्या ग्रंटिंगमुळे केलेली तक्रार व मॉनिकाचे ते लाऊड ग्रंटिंग यु ट्युबवर पाहायला मिळाले की नाही?:)
अडम.. वैयक्तिक दृष्टिकोन जरी असले तरी माझ्या मते "लेजेंडरी" म्हणायला काही ऑब्जेक्टिव्ह मोजमापे जरुर असतात. त्यातली काही म्हणजे.. खेळातली लाँजेव्हिटी, नंबर ऑफ चँपिअनशिप्स्(टेनिसमधे खासकरुन.. ग्रँड स्लॅम चँपिअनशिप्स) व ग्रेस अँड कॅलिबर ऑफ द प्लेयर. आणी ही मोजमापे म्युच्युअली इन्क्लूझिव्ह असायला लागतात. ही मोजमापे तु मॉनिका सेलेस व स्टेफी ग्राफ.. या दोघींना लावुन बघ. व मग तिच मोजमापे तू मार्गारेट स्मिथ्-कोर्ट(ग्रेटेस्ट एव्हर.. विथ २४ सिंगल्स ग्रँड स्लॅम्स व डबल्स व मिक्स डबल्स मिळुन ६२ टोटल ग्रँड स्लॅम टायटल्स्!),बिली जिन किंग,मार्टिना नवरातिलोव्हा व ख्रिस एव्हर्ट लॉइड या लेजेंड्सना लावुन बघ.... आता हे मला मान्य आहे( व मी ते वरच्या पोस्टमधे नमुदही केले आहे) की मॉनिकाला मी साइड नोट म्हणायला नको होते.ती नक्कीच एक चांगली खेळाडु होती.पण तिला लेजेंड म्हणता येइल का याबद्दल मी साशंक आहे..
मग स्टेफी ग्राफने पंचांकडे मॉनिकाच्या ग्रंटिंगमुळे केलेली तक्रार >>>>>> मला आठवतय त्याप्रमाणे हे विंबल्डन ९२ च्या फायनल मधे झालं होतं.... पावसाचा २ वेळा व्यत्यय आलेली लढत स्टेफी ग्राफ ने अगदी सहज जिंकली होती.. तेव्हा मी ते तक्रार प्रकरण live बघितलं होतं... आणि त्यावरून मला स्टेफी ग्राफ चा भयंकर राग आला होता... कारण आधी २ वर्षात बर्याच फायनल्स मधे ती मोनिका कडून हरली होती.. आणि ह्या फायनल मधे ग्रंटिंग बंद करून ती जिंकली होती... म्हणजे जे सरळ मार्गाने मिळत नाही ते वाकड्या मार्गाने साध्य करून घेतलं असं मला तेव्हा वाटलं होतं...
माझ्यामते ग्रेस सोडली तर तुम्ही सांगितलेले सगळे गुण मोनिका कडे होते... आणि ग्रेस हा भाग शेवटी खेळासाठी किती महत्त्वाचा आहे हे ही बघायला हवं...
असो.. तुमच्या मताचा पूर्ण आदर आहे... so no v&c on this..
जाता जाता... मोनिका आणि स्टेफी ग्राफ ची फ्रेंच ओपन फायनल (बहूतेक ९२ चीच) जिचा शेवटचा सेट काहितरी १०-८ असा जिंकून मोनिका ने स्पर्धा जिंकली ती मी तेव्हा VCR वर record केली होती.. काल ती शोधून काढून बघायचा प्रयत्न केला पण कॅसेट खराब झालीये.. !!!! तुम्ही ऑलिंपीकची जशी मालिका लिहिली होती तसचं टेनीस मधल्या महत्त्वाच्या लढतींबद्दल पण मालिका सुरू करा. !!
अडम.. मालिकेचा विचार करण्यासारखा आहे... २ वर्षापुर्वी त्याच हेतुने फ्रेंच ओपनच्या सुमारास लिहायला घेतले पण विंबल्डन पर्यंत माझा तो प्रयत्न वेळेअभावी तसाच बारगळला.. पण या वर्षी "ब्रेकफास्ट अॅट विंबल्डन" व "मेमरिज ऑफ फ्लशिंग मेडोज" या सदरांखाली त्या त्या टुर्नामेंट्सच्या वेळेला त्या टुर्नामेंट्सच्या आठवणि-वजा गोष्टी लिहायचा प्रयत्न करणार आहे. पाहुया कसे जमते ते...
मला माहीत आहे की मॉनिका सेलेस व पिट सॅन्प्रास हे तुझे आवड्ते टेनिस प्लेयर्स आहेत. मॉनिकाला साइड नोट म्हणुन तुला डिवचायचा मुळिच हेतु नव्हता.. मी माझे ते शब्द परत एकदा मागे घेत आहे..:)
आपण असे करुयात का? सगळयांनी इथे आपले आवडते टेनिसपटु..पुरुषांमधे १० व स्त्रियांमधे ५.. नमुद करायचे व का आवडतात याची कारणेही द्यायची.. पुरुषांमधे १० व स्त्रियांमधे ५ असे मला सेक्सिझम करायचे नव्हते पण पुरुषांमधे फक्त ५ नावे देणे मला जमले नसते..:) त्यामानाने स्त्रियांमधे एका हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच नावे देणे शक्य आहे असे मला वाटते..
मी सध्या भयंकर पॅसिव स्टेट मधे आहे. भारतात जाऊन आले की तुमच्या गप्पात भाग घेइन. तोवर हे वर दिलेले लोक काय करतात ते मला सांगा. टेनिस बाफवर त्यांची नावे आहेत म्हणजे टेनिस खेळत असावेत असा एक अंदाज
भारतात जाताना पॅरिसला थांबुन फेडीला शेवटचे क्ले वर खेळताना बघावे की काय ह्याबद्दल आपले काय मत ? सँटी, तुझ्याशी ह्या विषयावर ऑफलाइन बोलते
आदमा,अरे तुझ्या लिस्टमधील खेळाडु तुला का आवडतात याची कारणं मुकुंद कसे काय देऊ शकतील? >>>> मयुरेश.. अरे असं का झालय तुला??? मी मुकुंद ला त्यांची कारणं लिहायला सांगतोय रे.. उगाच इथे तिथे जाऊन "चर्चा" वाचू नकोस फार... कीस पाडायची सवय लागते अश्याने..
ग्रेट झाली
ग्रेट झाली मॅच...
ह्या दोघांच्या मॅचेस आजकाल अश्याच होतात च्यायला... ५ सेट्स मध्ये गेली मॅच की हरतो फेडरर...
फेडररची सर्व्हिस इतकी प्रभावी नव्हती का आज? कारण गेम्सची ब्रेका-ब्रेकी खूप झाली...
भूपति-मिर्झा जिंकले.... त्यांचं अभिनंदन !
शोककळा.... भू
शोककळा....
भूपती-नोल्स डबल्स मधे आणि फेडेक्स सिंगल्स मधे हारल्यामुळे...
भूपती-मिर्झा चा विजय तेवढा जरा दिलासा...
_______
एकदम झकास !
फेडररची
फेडररची सर्व्हिस चांगली होत होती... पण एकूण ब्रेकाब्रेकी खूप झाली..
राफा नी फेडररच्या बॅक हँड वर concentrate केलं पूर्ण.. पण फेडरर ने ही अप्रतिम बॅकहँड रिटर्न आणि पासेस मारले... total points won फेडररचे जास्त होते...
पहिल्या सेट मधे रुरुवातीला राफा ला नीट लय सापडत नव्हती.. पण मध्या पासून त्याचे फटके नीट बसायला लागले होते... अकराव्या गेम मधे मिळालेल्या ब्रेकच्या जोरावर नदाल ने सेट घेतला.. पण त्या आधीही एकदा दोधांनी एकमेकांची सर्व्हिस ब्रेक केली होती... दुसर्या आणि चौथ्या सेट मधे फेडररची पहिली सर्व्हिस होती.. आणि दोन्ही वेळा एकेका ब्रेक च्या जोरावर त्याने सेट ६-३ असे जिंकले.. त्यामूळे पाचव्या सेट मधे पहिली सर्व्हिस नदाल ची होती हे बरच झालं...
चौथ्या सेट पासून पुढे नदाल ने न घाबरता फेडरर कडे फोरहँड पण मारायला सुरुवात केली आणि फेडररने उत्कृष्ठ फोरहँड विनर्स बरोबर unforced errors पण केल्या.. नदालच्या गेल्या २/३ मॅचेस मधे oppnent पेक्षा कमी winners मारलेत पण unforced errors पण बर्याच कमी होत्या.. नदाल ने आपल्या सर्व्हिस मधले pros and cons ओळखून त्याप्रमाणे सर्व्हिस केली...
बक्षिस समारंभाच्या वेळी फेडररला रडताना पाहून कसतरीच वाटलं..
त्याला आधी कधी अश्या रूपात पाहिलं नव्हतं..
US open मधे तो अँडी मरे आडवा आला नसता तर राफा चं गोल्डन स्लॅम with olympic gold झालं असतं.. फक्त australian open मागच्या वर्षीच्या ऐवजी ह्या वर्षीच ..
हो... आणि
हो... आणि भूपती-मिर्झा चं ही अभिनंदन..
भूपती डबल्स मधे जिंकला असता तर अगदी चार चांद लागले असते त्याच्या करियर स्लॅम चे..
मी फेडरर
मी फेडरर हरल्या हरल्या बंद केली मॅच... रडल्याचं मला माहितीच नाही... आत्ता युट्युबवर पाहिलं...

पण नदालनेसुध्दा नंतर स्मार्टनेस दाखवला... त्याच्या स्पीचच्यावेळी सांत्वन केलं फेडररचं....
सर्वोत्तम
सर्वोत्तम खेळ, सर्वोत्तम खेळाडु आणि सर्वोत्तम खिलाडुवृत्ती म्हणजे आजची मॅच. कोणा एका खेळाडुची कड न घेता निखळ टेनिस बघायला आलेल्यांना आजचा सामना म्हणजे अक्षरशः मेजवानी होती. अगदी २००८ विंबल्डनच्या च्या तोडीस तोड. आज प्रदीर्घ क्रॉसकोर्ट रॅलीज आणि अप्रतीम विनर्सची नुसती खैरात होती. ११ एसेस मारल्या तरी एकुणात फेडररची फर्स्ट सर्व नीट जात नव्हती. नादालने अर्थातच त्याच्या सेकंड सर्वचा फायदा घेतला. स्वतः नादालने अगदी थोड्या (चार) एसेस मारल्या. परंतु दोघांचेही फोरहँड आणि बॅकहँड near to perfect वाटले मला. नादालचा खेळ तर खूपच सुधारला आहे. ह्या वेगाने जर त्याने टायटल्स जिंकली तर तो सहज सगळे विक्रम मोडीत काढेल. नादालचा मोठा plus point म्हणजे त्याची झुंजार वृत्ती. सामना सुरु असताना कॉमेंटेटर म्हणाला की जोपर्यंत सामन्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत तो लढत रहातो. He keeps coming back. त्याचे प्रत्यंतर फेडररला आज पाचव्या सेटमधे आले असणार. खरे तर बर्डिचविरुद्ध पाच सेटची तयारी ठेवणार्या फेडररने ह्या सामन्यात पाच सेटची अपेक्षा केली असणार पण त्याचा खेळ अगदीच अन्पेक्षित काही अंगावर आल्यासारखा झाला.
शेवटी फेडरर प्राइझ घेण्यासाठी स्टेजवर आला तेव्हा प्रेक्षकांनी त्याच्या नावाचा एव्हढा जल्लोश केला की त्याला भावना आवरल्या नाहीत. ("कर्क राशीचा पाल्हाळा दिसतोय, रडायच काय त्यात" असं मी एरवी म्हंटलं असतं पण not to Federer
) तीन वर्षापुर्वी ह्याच कोर्टवर सर्वांनी फेडररला रडताना बघितलं होतं, पण तेव्हाचं कारण वेगळं होतं. त्याला बोलणे अशक्य झाल्यावर मग नादालला कप घेण्यास बोलावण्यात आले. नादालने ही अतिशय शांततेत, आनंदाचे प्रदर्शन न करता कप स्वीकारला आणि जाउन फेडररच्या गळ्यात पडुन त्याचे सांत्वन केले. शेवटी तो म्हणाला, "Remember, you are one of the best players of history" पूढे तो असेही म्हणाला की फेडरर नक्कीच सँप्रसचे १४ टायट्ल्सचे रेकॉर्ड ब्रेक करेल. आज फेडररने सँप्रसच्या विक्रमाची बरोबरी केली असती तरी टेनिस जगतातल्या सँप्रसच्या स्थानाला धक्का लागला नसता तसेच तशी बरोबरी न केल्याने फेडररचे स्थानही ढळले नाहीये. तो one of the greatest players आहे आणि राहिलच.
दोघा खेळाडुंना येणार्या वर्षासाठी शुभेच्छा. आजच्या सारखे उत्तम टेनिस आपल्याला बघायला मिळो
कोणा एका
कोणा एका खेळाडुची कड न घेता निखळ टेनिस बघायला आलेल्यांना आजचा सामना म्हणजे अक्षरशः मेजवानी होती. >>> अगदी अगदी... १०० % सहमत.. good post..
आदम आणि
आदम आणि सिंडी, अनुमोदन!
सुरेख मॅच. शेवटच्या सेटपर्यंत कोण जिंकेल याचा अंदाज येत नव्हता. पण शेवटच्या सेटमध्ये नदालने पूर्ण वर्चस्व गाजवलं. फेडीने जवळजवळ मॅच सोडल्यासारखीच वाटली. मधूनच ढेपाळत होता, मधूनच त्याचे 'फेडेक्स' शॉट्स बसत होते... पण ओव्हरॉल त्याचे फायटींग स्पिरिट कमी वाटले
नदाल गोड आहे
वय त्याच्या बाजूनी आहे. आणि गर्व, जेलसीचा स्पर्श नाही. जिंकल्यावर फेडी आणि प्रेक्षकांना उद्देशून म्हणाला, 'I am sorry for today!!!' किती मोठ्या मनाचा आहे!
मस्त वाटलं, त्याने फेडीला मिठी मारली तेव्हा. ते दोघे कट्टर प्रतिस्पर्धी असूनही नेहेमीच एकमेकांचा आदर करतात, हे पाहून खूप छान वाटतं. Thats sportsman spirit in true sense!
फेडीला रडताना मात्र पाहवलं नाही. कसंतरीच वाटलं. Cmon, you can do it Fedex!!
-----------------------------------
तेरी उम्मीदपे ठुकरा रहा हूँ दुनियाको
तुझेभी अपनेपे यह ऐतबार है की नहीं..
अडम...
अडम... बर्याच दिवसात इथे येता आले नाही.. पण आठवण काढल्याबद्दल धन्यवाद. या वर्षीचे ऑस्ट्रेलियन ओपनमधले सामने लाइव्ह बघता आले नाहीत..
पण सिंड्रेला व पुनमच्या पोस्टना अनुमोदन... असे दोन उच्च दर्जाचे व खिलाडूवृत्तिचे खेळाडु एकमेकात कोर्टवर झुंजताना पाहायला मिळणे म्हणजे आपल्यासारख्या टेनिसप्रेमींसाठी पर्वणिच असते. पण फेडररला रडताना पाहुन माझ्याही पोटात कसेसेच झाले. पूनम.. अग कालच्याच नाही पण याआधीच्या त्या दोघांमधल्या सर्व ग्रँड स्लॅम फायनल्समधे नादालने अश्याच दिलदार व खिलाडु वृत्तिचे प्रदर्शन केले होते. या दोघांना एकमेकांबद्दल असलेला आदर आपल्याला नेहमीच दिसुन येतो. आणि तो अजिबात कृत्रिम वाटत नाही... हेही इथे नमुद करावेसे वाटते.
सिंड्रेला.... तु एकदम बरोबर म्हणालीस की काल फेडररला सँप्रासच्या विक्रमाची बरोबरी करता आली नाही म्हणुन त्याने फेडररचा ग्रेटपणा कमी होत नाही किंवा त्याने पुढे कधी सँप्रासचा विक्रम मोडला तर त्याने सँप्रासचा ग्रेटपणा कमी होणार नाही... आता हे बघा... गावस्करचा १०,००० धावांचा विक्रम पुढे बर्याच जणांनी मोडला म्हणुन गावस्कर कमी ग्रेट होता असे म्हणता येइल का?
आणि या दोन महान टेनिसपटुंमधल्या अतिशय अटितटिच्या व रंजक लढती आपल्याला गेले ३-४ वर्षे बघायचे भाग्य लाभत आहे .. त्या पाहुन मला एक सांगावेसे वाटते... सध्या आपल्याला या दोनच खेळाडुंमधले असे अटितटिचे सामने पाहायला मिळत आहेत.. कारण त्यांच्यात व बाकीच्या खेळाडुंमधे बरेच अंतर आहे... (फेडरर्-रॉडिक सामने तर प्रेडिक्टेबल झाल्यामुळे पाहावेसेच वाटत नाहीत :)) पण तुमच्यापैकी किती जणांना लेट ७० व ८० च्या दशकातले... बोर्ग्-मॅकेन्रो, बोर्ग्-कॉनर्स, कॉनर्स्-मॅकेन्रो,लेंडल-मॅकेन्रो,बेकर्-लेंडल किंवा बेकर्-एडबर्ग यांच्यातले सामने पाहण्याचे भाग्य लाभले ते मला माहीत नाही पण ... जस्ट इमॅजिन.... सध्या फेडरर-नादाल मधेच होत असणारे चुरसीचे सामने त्या वेळेला त्या सर्वांमधे नेहमीच होत असत.... म्हणजे सध्या आपल्याला जो आनंद या दोघांच्या लढती बघण्यात मिळतो त्याला तुम्ही ६-७ पटीने गुणा.... तेवढा आनंद त्या वेळेला टेनिसप्रेमींना मिळत असे..:) लेट ७० व ८० च्या दशकामधे याच ५-६ जणात ग्रँड स्लॅम फायनल्स होत असत... त्यात महिलांमधे ख्रिस एव्हर्ट, मार्टिना नवरातिलोव्हा व स्टेफि ग्राफ त्या वेळेला खेळत होत्या.. म्हणुन मला तो टेनिसचा सुवर्णकाळ वाटतो.. (आणि एक.. एक मार्टिना नवरातिलोव्हा सोडली तर त्या वेळेला महिला टेनिसपटु महिला वाटायच्या... सध्या विलियम्स भगिनी बघुन त्या खुपच पुरुषी व दाणगट वाटतात... एक शॅरापोव्हा सोडली तर दिनारा सफीन,कुझेंस्टोव्हा वगैरे रशियन महिला सुध्हा खुपच दाणगट व पुरुषी वाटतात...)
चला आता डोळे रोलँड गॅरसकडे....:)
अरे वा..
अरे वा.. मुकूंद आलाच आहात तर आता एका तरी मॅच चं पूर्ण वर्णन लिहा..
ख्रिस एव्हर्ट, मार्टिना नवरातिलोव्हा व स्टेफि ग्राफ त्या वेळेला खेळत होत्या.. म्हणुन मला तो टेनिसचा सुवर्णकाळ वाटतो.. >>>>> ह्याच्याशी मात्र असहमत..
जरी खेळाडू दणकट असल्या तरी विल्यम्स भगिनी, रशियन ब्रिगेड, बेल्जियन्स आणि सर्ब्स.. मधे मधे येऊन जाऊन हिंगीस, कॅप्रिआती वगैरे ह्य सगळ्या एका वेळी जेव्हा खेळत होत्या त्या वेळ एतकी चूरस महिला टेनीस मधे कोणत्याच काळात नव्हती... त्यामूळे हेनीन रिटायर व्हायच्या आधीची २/३ वर्ष हा खरा महिला टेनीस चा सुवर्ण काळ होता असं मला वाटतं...
खरच फेडीला
खरच फेडीला रडताना बघून कससच झालं.
बाकी नादाल - फेडीच्या sportsman spirit बद्दल पूनमला अनुमोदन.
हम्म...
हम्म... सिंड्रेलाच्या पोस्टला पूर्ण अनुमोदन....
नदालची खिलाडूवृत्ती खरंच प्रशंसनीय... त्याने ती ट्रॉफी घेताना खरोखरच खूप संयम दाखवला..
मुकुंद,
सॅंप्रास, आगासी, जिम कुरियर, मायकेल चँग, मार्क फिलिपॉसिस हे लोक जेव्हा होते तेव्हाही मॅचेस चुरशीच्या व्हायच्याच की... तो काळ सुद्धा उत्तम होता...
आज फेडररने
आज फेडररने सँप्रसच्या विक्रमाची बरोबरी केली असती तरी टेनिस जगतातल्या सँप्रसच्या स्थानाला धक्का लागला नसता तसेच तशी बरोबरी न केल्याने फेडररचे स्थानही ढळले नाहीये. तो one of the greatest players आहे आणि राहिलच. >> एकदम बरोबर. Sampras was one of the great players, Federer is, and Rafal will be soon joining them.
सध्या विलियम्स भगिनी बघुन त्या खुपच पुरुषी व दाणगट वाटतात... एक शॅरापोव्हा सोडली तर दिनारा सफीन,कुझेंस्टोव्हा वगैरे रशियन महिला सुध्हा खुपच दाणगट व पुरुषी वाटतात... >> ह्याला अनुमोदन. Women टेनिस मधली नजाकत हरवली आहे.
अडम.. अरे मी
अडम.. अरे मी एकही मॅच लाइव्ह बघितली नाही म्हणुन मॅचबद्दल लिहु शकणार नाही ... क्षमस्व..
आता तु जे म्हणतोस की सध्याच्या रशियन ब्रिगेडमधल्या महिला,कॅप्रिआटी,हिंगस,हेनन यांच्यात चुरसीचे सामने व्हायचे.. ते बरोबर आहे पण ज्यांनी ख्रिस एव्हर्ट ,मार्टिना नवरातिलोव्हा किंवा स्टेफी ग्राफला खेळताना पाहीले आहे ते तुला सांगु शकतील की तु जेव्हा त्यांच्याबद्दल बोलतोस तेव्हा तु टेनिसच्या ऑल टाइम ग्रेट.. लेजेंडरी महिला टेनिसपटुंबद्दल बोलतोस... त्यांची बरोबरी जेनिफर कॅप्रिआटी,हिंगस किंवा सध्याच्या रशियन ब्रिगेडबरोबर कदापीही होउ शकत नाही.... हे तु त्यांचा खेळ बघीतलेल्या कोणालाही विचार...
सँटीनो... तुझ्या सँप्रास,ऍगॅसी,करिअर्,चँग बद्दलच्या मुद्द्याचेही तसेच आहे. एक सँप्रास व ऍगॅसी सोडले तर बाकीच्यांचे नाव बोर्ग्,मॅकॅन्रो,कॉनर्स,लेंडल च्या बरोबरीने घेण्याचे धाडस...त्या जुन्या लेजेंड्सचा खेळ ज्यांनी पाहीला आहे.. ते कदापीही करणार नाहीत... आणि सध्याच्या खेळाडुत मी फक्त फेडरर व नादाल या दोघांनाच त्यांच्या पंगतीत बसवायला तयार आहे.. तुला टेनिस चॅनलवर जर त्या खेळाडुंच्या जुन्या मॅचेस बघायला मिळाल्या तर जरुर बघ...
त्यांच्याही वेळेला अजुन काही असे खेळाडु होते की ज्यांनी या महान खेळाडुंना काही काही वेळेला अटितटिची लढत दिली होती... उदाहरणार्थ... विटास गेरुलायटिस, गिलेर्मो विलास्,मॅट्स विलँडर व तुला खोटे वाटेल.. आपला भारताचा विजय अमृतराज यानेही.. (खासकरुन... बोर्गला विजय अमृतराजने बर्याच स्पर्धात हरवले आहे.. पण तो ग्रँड स्लॅम स्पर्धात तसे करु शकला नाही.. या गोष्टीचे मला नेहमी वाइट वाटायचे..) ९० च्या दशकात सँप्रास व ऍगॅसीच्या वर्चस्वाला जिम करिअर्,थॉमस मुस्टर्,गोरान इव्होनिव्होविच , पॅट्रिक रॅफ्टर वगैरेंनी थोड्या थोड्या काळापुरते आव्हान दिले पण त्यांच्या मॅचेसना.. बोर्गं-मॅकॅन्रो किंवा कॉनर्स -मॅकॅन्रो किंवा बेकर्-एडबर्गच्या मॅचेसची सर कधीच आली नाही.. हेच तुला या सर्व मॅचेस ज्यांनी बघीतल्या आहेत .. ते सांगतील...
महिलांमधेही त्या वेळेला नाव घेण्यासारख्या अजुन काही खेळाडु होत्या त्या म्हणजे.. हॅना मांडलीकोव्हा,ट्रेसी ऑस्टिन,अरांचा सँकेझ व्हिकारिओ,मॉनिका सेलेस व गॅब्रिएला सॅबॅटिनी.. पण ख्रिस एव्हर्ट्,मार्टिना नवरातिलोव्हा व स्टेफी ग्राफच्या तुलनेने त्यांची नावे म्हणजे एक साइड नोट म्हणुन घेतली जातील.तसेच अडम.. तु म्हणतोस त्यांच्यापैकी विलिअम्स भगिनी व जस्टिन हेनन सोडता.. बाकीच्यांची नावेही एक साइड नोट म्हणुन घेतली जातील...
मला
मला पुण्यामध्ये लहान मुलिंना टेनीसचे प्रशिक्षण देणार्या शाळा (Sports Academy ) बद्द्ल माहिती हवी आहे. कुणाला माहिती असेल तर कृपया सांगा. ( Address or contact details.)
- मनी.
यु एस ओपन
यु एस ओपन ची तिकिटे मिळायला सुरुवात झाली आहे , कोण्कोण जाणार आहात यावेळी?
कोणी जाणार
कोणी जाणार असेल तर Holiday twilight plan घ्या.. ! खूपच उपयोगी पडतो... दुपारी २ पर्यंत न्यूयॉर्क मधे फिरायचं.. आणि मग मॅचेस बघायला जायचं.. सेंटर कॉर्ट वर सिट असतात.. बाकी मॅचेस ना जर जागा असेल तर जाता येतं..
) अगदी जवळून बघता येतात...
साईड कोर्टस वर भरपूर जागा असते.. तिथे डबल्सच्या मॅचेस (आणि खेळाडू पण.
ज्ञाती,अडम.
ज्ञाती,अडम.. अरे हे काय? अजुन फ्रेंच ओपन नाही झाली, विंबल्डन स्पर्धा नाही झाली आणि तुम्हाला आत्तापासुनच यु एस ओपनचे वेध लागले?:)
रोलँड गॅरसची रंगीत तालिम रोममधे चालु आहे.. बघत आहे का कोणी? उपांत्य फेरीत परत एकदा युज्वल सस्पेक्ट्स! नादाल विरुद्ध गोन्झालिस व फेडरर विरुद्ध जाकोव्हिक!:)
मी आत्ता
मी आत्ता नोल वि. फेडरर मॅच बघितली... फेडरर हरला.. खूप सही क्रॉसकोर्ट रॅली झाल्या... फेडरर नी unforced errors बर्याच केल्या.. !
मुकूंद ची 4 फेब्रुवारी, 2009 ची पोस्ट आत्ता वाचली.. मी नवरातिलोव्हा, स्टेफी ग्राफ आणि मोनिका सेलेसच्या मॅचेस live बघितलेल्या आहेत...
त्यांची बरोबरी जेनिफर कॅप्रिआटी,हिंगस किंवा सध्याच्या रशियन ब्रिगेडबरोबर कदापीही होउ शकत नाही हे खरं असलं तरी एकाच कॅलिबरच्या एव्हडया खेळाडू एकाच वेळी खेळत असणं हे मी म्हंटलय त्या काळाच्या आधी कधीच नव्हतं..
आणि मोनिका सेलेस साईड नोट???????????????? हे तुमच्या सारख्या जाणकार टेनिस फॅन नी म्हणणं अगदीच शो. ना. हो. !!
९० ते ९३ मधे आठ ग्रँड स्लॅम विजेतेपद आणि एक उपविजेतेपद मिळवणारी खेळाडू साईडनोट म्हणून दुर्लक्ष करण्याजोगी नक्कीच नव्हती.. मोनिका चा स्टॅमिना आणि क्रॉस कोर्ट फोरहँड अ फा ट असायचे.. !! विंबल्डन वगळता सगळ्या स्पर्धांमधे तिनी स्टेफी ग्राफ ला नमवलं होतं..
मोनिका सेलेस वर तो दुर्दैवी हल्ला झाला नसता तर स्टेफी ग्राफ चं आज जे प्रोफाईल दिसतय ते बरच वेगळं दिसलं असतं.. ! जर-तर ला आता काही विशेष अर्थ नसला तरी स्टेफी ग्राफ ही महिला टेनिस मधली सगळ्यात जास्त लकी बाई होती असं माझं मत आहे.. तिच्या यशात तिच्या टॅलेंट इतकाच किंवा कणभर जास्तच तिच्या लकचा जास्त वाटा होता.. तीच्या करीयर चं टाइमिंग इतकं अचूक होतं आणि घटना ही अश्या घडत गेल्या की तिला फरशी चुसरच नव्हती..
असो..
रोलँड गॅरोस ला एकूणात मजा येणार असं दिसतय...
अडम.. फरशी
अडम.. फरशी चुसरच नाही रे बाबा... फारशी चुरस....:)
नादालने जाकोव्हिक ला हरवुन इटालिअन ओपन जिंकुन रोलँड गॅरसला सावधान केले आहे... लागोपाठ ५ वेळा फ्रेंच ओपन जिंकुन बोर्गचा इतक्या वर्षाचा तिथला विक्रम बहुतेक तो या वर्षी मोडीत काढील अशीच चिन्ह दिसत आहेत... मॅच पाहीली का कोणी? नादालचा फिटनेस पाहीलात का? रोलँड गॅरसवर त्याच्याकडुन ३ सेट कोणी घेउ शकेल असे त्याच्या फिटनेसकडे व त्याच्या खेळाकडे बघुन वाटत नाही...
अडम तु जुन्या मायबोलीवरच्या माझ्या काही मॉनिका सेलेसबद्दलच्या पोस्ट वाचल्या होत्यास की नाही हे मला माहीत नाही पण त्यामधे बरेच वेळा मी मॉनिका सेलेसला तिचा ड्यु रिस्पेक्ट दिलेला आहे. वर मी जरा तिच्याबद्दल साइड नोट असे निष्काळजी स्टेट्मेंट केले हे मी मान्य करतो . पण तरीही तिला ख्रिस एव्हर्ट, मार्टिना नवरातिलोव्हा व स्टेफीच्या पंगतीत बसवायला माझे मन तयार होत नाही. तिच्या सारखे पॉवरफुल डबल हँडेड फोरहँड(व बॅकहँड सुद्धा) शॉट्स व विनर्स मी कधीच पाहीले नाहीत पण एक अॅथलिट म्हणुन मला ती कधीच इंप्रेसिव्ह वाटली नाही. जशी डॅव्हेनपोर्ट तशी ती पण ढेपाळलेली अॅथलिट वाटायची.. कोर्ट स्पिड व नजाकतीचा अभाव या दोन गोष्टींमुळे(व काही अंशी तिच्या त्रासदायक लाउड ग्रंटींग मुळेही असेल कदाचित्!)तिला लेजेंडरी म्हणणे माझ्या जिवावर येते.. पण हा माझा वैयक्तिक दृष्टिकोन... तो कदाचित चुकीचाही असु शकेल..:)
आता बाब राहीली स्टेफी ग्राफ लकी होती की टॅलंटेड? या तुझ्या मतावर एक व्ही. अँड सी(जुन्या!) वर होते तशी एक मस्त खडाजंगी होउ शकेल...:)
अडम तु
अडम तु जुन्या मायबोलीवरच्या माझ्या काही मॉनिका सेलेसबद्दलच्या पोस्ट वाचल्या होत्यास की नाही हे मला माहीत नाही पण त्यामधे बरेच वेळा मी मॉनिका सेलेसला तिचा ड्यु रिस्पेक्ट दिलेला आहे. >>> नाही मी नाही वाचलेल्या.. पण आता शोधून वाचेन नक्की...
मुकूंद, तुमचं मत वाचलं.. अश्या सगळ्या बाबतीत वैयक्तिक दृष्टिकोन हा असतोच.. आणि त्याला logical reasons पण काहीच देता येत नाहीत आणि काय चूक आणि काय बरोबर असं काही ठरवताही येत नाही.. फक्त आकडेवारी वरून ( आणि माझी आवडती खेळाडू असल्याने
) मोनिका सेलेसला साईडनोट म्हणणं मला खटकलं म्हणून पोस्ट प्रपंच..
आता स्टेफी ग्राफ बद्दल माझी खूप टोकाची मतं आहेत.. त्यामूळे ह्या विषयावर कधीही व्ही. अँड सी करायला मी तयारच असतो..
सांगा कधी करायचाय.. 
असो.. तुमचं पोस्ट वाचल्यानंतर मी युट्यूब वर बर्याच जून्या क्लीप्स शोधून पाहिल्या...
अडम... मग
अडम... मग स्टेफी ग्राफने पंचांकडे मॉनिकाच्या ग्रंटिंगमुळे केलेली तक्रार व मॉनिकाचे ते लाऊड ग्रंटिंग यु ट्युबवर पाहायला मिळाले की नाही?:)
अडम.. वैयक्तिक दृष्टिकोन जरी असले तरी माझ्या मते "लेजेंडरी" म्हणायला काही ऑब्जेक्टिव्ह मोजमापे जरुर असतात. त्यातली काही म्हणजे.. खेळातली लाँजेव्हिटी, नंबर ऑफ चँपिअनशिप्स्(टेनिसमधे खासकरुन.. ग्रँड स्लॅम चँपिअनशिप्स) व ग्रेस अँड कॅलिबर ऑफ द प्लेयर. आणी ही मोजमापे म्युच्युअली इन्क्लूझिव्ह असायला लागतात. ही मोजमापे तु मॉनिका सेलेस व स्टेफी ग्राफ.. या दोघींना लावुन बघ. व मग तिच मोजमापे तू मार्गारेट स्मिथ्-कोर्ट(ग्रेटेस्ट एव्हर.. विथ २४ सिंगल्स ग्रँड स्लॅम्स व डबल्स व मिक्स डबल्स मिळुन ६२ टोटल ग्रँड स्लॅम टायटल्स्!),बिली जिन किंग,मार्टिना नवरातिलोव्हा व ख्रिस एव्हर्ट लॉइड या लेजेंड्सना लावुन बघ.... आता हे मला मान्य आहे( व मी ते वरच्या पोस्टमधे नमुदही केले आहे) की मॉनिकाला मी साइड नोट म्हणायला नको होते.ती नक्कीच एक चांगली खेळाडु होती.पण तिला लेजेंड म्हणता येइल का याबद्दल मी साशंक आहे..
मग स्टेफी
मग स्टेफी ग्राफने पंचांकडे मॉनिकाच्या ग्रंटिंगमुळे केलेली तक्रार >>>>>> मला आठवतय त्याप्रमाणे हे विंबल्डन ९२ च्या फायनल मधे झालं होतं.... पावसाचा २ वेळा व्यत्यय आलेली लढत स्टेफी ग्राफ ने अगदी सहज जिंकली होती.. तेव्हा मी ते तक्रार प्रकरण live बघितलं होतं... आणि त्यावरून मला स्टेफी ग्राफ चा भयंकर राग आला होता... कारण आधी २ वर्षात बर्याच फायनल्स मधे ती मोनिका कडून हरली होती.. आणि ह्या फायनल मधे ग्रंटिंग बंद करून ती जिंकली होती... म्हणजे जे सरळ मार्गाने मिळत नाही ते वाकड्या मार्गाने साध्य करून घेतलं असं मला तेव्हा वाटलं होतं...
माझ्यामते ग्रेस सोडली तर तुम्ही सांगितलेले सगळे गुण मोनिका कडे होते... आणि ग्रेस हा भाग शेवटी खेळासाठी किती महत्त्वाचा आहे हे ही बघायला हवं...
असो.. तुमच्या मताचा पूर्ण आदर आहे... so no v&c on this..
जाता जाता... मोनिका आणि स्टेफी ग्राफ ची फ्रेंच ओपन फायनल (बहूतेक ९२ चीच) जिचा शेवटचा सेट काहितरी १०-८ असा जिंकून मोनिका ने स्पर्धा जिंकली ती मी तेव्हा VCR वर record केली होती.. काल ती शोधून काढून बघायचा प्रयत्न केला पण कॅसेट खराब झालीये.. !!!!
तुम्ही ऑलिंपीकची जशी मालिका लिहिली होती तसचं टेनीस मधल्या महत्त्वाच्या लढतींबद्दल पण मालिका सुरू करा. !!
अडम..
अडम.. मालिकेचा विचार करण्यासारखा आहे... २ वर्षापुर्वी त्याच हेतुने फ्रेंच ओपनच्या सुमारास लिहायला घेतले पण विंबल्डन पर्यंत माझा तो प्रयत्न वेळेअभावी तसाच बारगळला.. पण या वर्षी "ब्रेकफास्ट अॅट विंबल्डन" व "मेमरिज ऑफ फ्लशिंग मेडोज" या सदरांखाली त्या त्या टुर्नामेंट्सच्या वेळेला त्या टुर्नामेंट्सच्या आठवणि-वजा गोष्टी लिहायचा प्रयत्न करणार आहे. पाहुया कसे जमते ते...
मला माहीत आहे की मॉनिका सेलेस व पिट सॅन्प्रास हे तुझे आवड्ते टेनिस प्लेयर्स आहेत. मॉनिकाला साइड नोट म्हणुन तुला डिवचायचा मुळिच हेतु नव्हता.. मी माझे ते शब्द परत एकदा मागे घेत आहे..:)
आपण असे करुयात का? सगळयांनी इथे आपले आवडते टेनिसपटु..पुरुषांमधे १० व स्त्रियांमधे ५.. नमुद करायचे व का आवडतात याची कारणेही द्यायची.. पुरुषांमधे १० व स्त्रियांमधे ५ असे मला सेक्सिझम करायचे नव्हते पण पुरुषांमधे फक्त ५ नावे देणे मला जमले नसते..:) त्यामानाने स्त्रियांमधे एका हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच नावे देणे शक्य आहे असे मला वाटते..
१० पुरुष टेनिसपटु...
१: रॉजर फेडरर
२: जिमी कॉनर्स
३: बिऑर्न बोर्ग
४: इव्हान लेंडल
५:बोरिस बेकर
६:जॉन मॅकॅन्रो
७:पिट सॅन्प्रास
८: राफिएल नादाल
९: आंड्रे अॅगॅसी
१०: स्टिफान एडबर्ग
हॉनरेबल मेन्शन: गोरान इव्होनेव्हिक व मॅट्स विलँडर
५ महिला टेनिसपटु....
१:ख्रिस एव्हर्ट
२: स्टेफी ग्राफ
३: मार्टिना नवरातिलोव्हा
४:मॉनिका सेलेस
५:अरांचा सँकेज व्हिकारिओ
हॉनरेबल मेन्शन: मरिया शॅरापोव्हा व जस्टिन हेनन
कारणे पुढच्या पोस्ट्मधे...:)
लिहा लिहा
लिहा लिहा मुकुंद, सिरीज लिहा.... खूप मजा येईल वाचायला...
मी सध्या
मी सध्या भयंकर पॅसिव स्टेट मधे आहे. भारतात जाऊन आले की तुमच्या गप्पात भाग घेइन. तोवर हे वर दिलेले लोक काय करतात ते मला सांगा. टेनिस बाफवर त्यांची नावे आहेत म्हणजे टेनिस खेळत असावेत असा एक अंदाज
भारतात जाताना पॅरिसला थांबुन फेडीला शेवटचे क्ले वर खेळताना बघावे की काय ह्याबद्दल आपले काय मत ? सँटी, तुझ्याशी ह्या विषयावर ऑफलाइन बोलते
फेडररने
फेडररने नदालला हरवून माद्रिद टेनिस मास्टर्स स्पर्धा जिंकलेली आहे... नदालची क्ले कोर्टावरची ३३ सलग सामने जिंकणारी मालिका अशा रितीने संपुष्टात आली आहे.
मुकूंद
मुकूंद चांगली कल्पना आहे..
मी पण लिहीतो लिस्ट जरा निवांतपणे.. आणि तुम्ही कारणं लिहा..
सँट्या..
आदमा,इतका
आदमा,इतका हताश नको होऊस
फेडिने माद्रिद ओपन जिंकली आहे.. फ्रेंच नाही.. तेव्हा सॅंप्रासचा विक्रम अजुन थोडा काळ तरी अबाधित राहिल हो :).. पण थोडा काळच 
मी पण लिहीतो लिस्ट जरा निवांतपणे.. आणि तुम्ही कारणं लिहा...>>> आदमा,अरे तुझ्या लिस्टमधील खेळाडु तुला का आवडतात याची कारणं मुकुंद कसे काय देऊ शकतील?
आदमा,अरे
आदमा,अरे तुझ्या लिस्टमधील खेळाडु तुला का आवडतात याची कारणं मुकुंद कसे काय देऊ शकतील? >>>>
मयुरेश.. अरे असं का झालय तुला??? मी मुकुंद ला त्यांची कारणं लिहायला सांगतोय रे.. उगाच इथे तिथे जाऊन "चर्चा" वाचू नकोस फार... कीस पाडायची सवय लागते अश्याने.. 
Pages