Submitted by वैवकु on 14 July, 2012 - 06:05
आमचे प्रेरणास्थान http://www.maayboli.com/node/36419
______________________________________________
म्हणवशी मीच बलशाली
तुझी ही गुंडई* झाली
"करून घे लग्न" म्हणता का...
...जिवा होतोस वर-खाली
सपकसे वरण चाखवते
म्हणवते आमटी साली
कश्या सदनात ह्या माझ्या
निपजल्या एवढ्या पाली
मराठी मी ;कसा वाचू ..
तिचे डोळेच बंगाली ???
________________________________________________________
पळा रे '..लावुनी टाचा' .................
पळा माझी विझल* आली !!
________________________________________________________
गुंडई*= गुंडपणा हा शब्द भोजपुरी हिंदी आहे शब्दाच्या अर्थासाठी मराठी शब्द्संग्रह चाळू नयेत याची संबंधितानी नोंद घ्यावी
विझल*= विडंबन+गझल
टीप: हझल, चझल, प्रझल ,खझल, पझल तशी विझल असते !!
गुलमोहर:
शेअर करा
विझल*= विडंबन+गझल टीप: हझल,
विझल*= विडंबन+गझल
टीप: हझल, चझल, प्रझल ,खझल, पझल तशी विझल असते !!>>>>
कायच्या काय.........कविता सुद्धा!
हझल आवडली.
हझल आवडली.
छान पझल नसणारी विझल कविता.
छान पझल नसणारी विझल कविता.
खूप खूप धन्यवाद समीरजी व मुटे
खूप खूप धन्यवाद समीरजी व मुटे सर
मी विसरलोच होतो की अशीही एक रचना मी केली आहे ते!:)
विभाग्रजजी आपलेही खूप खूप आभार