व्हिसा एजंट माहिती आहे का?

Submitted by रचु on 11 January, 2013 - 09:47

नमस्कार,
कुणाला मुंबई मधले चांगले व्हिसा एजंट माहिती आहे का? भारतातून अमेरिकेचा टुरीस्ट व्हिसा काढायचा आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी मध्ये एकदा चोकशी केली होती....तर २-३ जणांनी ठाण्याच्या घाणेकर यांचा रेफरंस दिला....ते VISA INTERVIEW ची तयारी पण करून घेतात...पण प्रत्यक्ष अनुभव घेतला नाहीये.

धन्यवाद तन्मय Happy
प्रिया, गुगलवर सगळ काही मिळेल पण व्हिसा करीता जी धावपळ करावी लागेल ती जे येणार आहेत त्यांना जमणार नाही आणि ही धावपळ करायला मी तिथे नाही ना म्ह्णुन व्हिसा एजंट शोधते आहे Happy

अहो रचु,

सगळे ऑनलाईन फॉर्म्स आहेत जे तुम्हाला भरता येतात. तुम्ही स्पॉन्सर करणार असाल तर सगळे डॉक्युमेंटस तुम्हालाच पाठवावे लागतात. जर ते स्व खर्चाने येणार असतील तर त्यांना त्यांच्या संपत्तीची यादी आणि कागदपत्रे सोबत ठेवावी लागतात. बाकी अवघड किंवा त्यांना धावपळ करण्यासरखं काही नाहिए.

रचु, प्रीति आणि प्रिया यांनी सांगितले आहे तसेच मी पण म्हणेन. मी पुण्यात विसा एजंट शोधत होते. पण आता application प्रोसेस बदलली असल्यामुळे बरेच एजंट अमेरिकन टूरिस्ट विसा करायला वेळ लागेल असे सांगत होते. त्यामुळे सर्व माझे मीच केले. थोडा तुम्हाला वेळ आणि शक्ती घालवावी लागते पण प्रोसेस खूप सरळ आहे. मुख्य म्हणजे फॉर्म भरण्यापासून ते appointment घेईपर्यंत सर्व गोष्टी तुम्ही इथे राहून करू शकता. त्यांना फक्त विसा फी भरावी लागेल बॅंकेत जावून.
खाली दिलेल्या लिंक वर तुम्हाला सर्व माहिती मिळेल.
http://www.ustraveldocs.com/in/

ज्यांचा विसा करायचा आहे त्यांचे प्रोफ़ाइल तुम्ही तयार करू शकता, या लिंकवर. मी माझ्या आई वडिलांचे gmail account उघडून त्यांचे इमेल वापरले प्रोफ़ाइल तयार करायला.
https://cgifederal.secure.force.com/?language=English&country=India

DS-१६० फॉर्म तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर भरू शकता.. हा फॉर्म भरताना तुम्ही मधून मधून सेव करत राहा कारण जर बराच वेळ काही activity नाही झाली तर सर्व data गायब होतो.
https://ceac.state.gov/genniv/

फॉर्म भरून झाल्यानंतर कन्फर्मेशन नंबर मिळेल तो वर तयार केलेल्या प्रोफ़ाइल वर टाकला कि तुम्हाला किती फी भरावी लागेल ( विसा type प्रमाणे ) ते कळेल. बँकेत पैसे भरायला जातील तेव्हा त्यांना हि रिसीट घेऊन जावे लागेल. पैसे भरले कि २ दिवसात रिसिट activate होते आणि तुम्ही त्यांच्या प्रोफ़ाइल मधून appointment बुक करू शकता. बदललेल्या प्रोसेस मध्ये २ दिवस appointment असते. पहिली appointment हि फोटो आणि fingerprints साठी असते, आणि दुसरी actual interview ची असते. दोन्ही appointment एका दिवशी घेता येत नाहीत.

तुम्ही प्रोफ़ाइल तयार केल्यावर provide feedback बटन वर click करून तुम्हाला असलेले सगळे प्रश्न विचारू शकता.. मला या सर्विसचा काही उपयोग होईल असे वाटले न्हवते पण surprisingly प्रश्न विचारला कि २-३ दिवसात उत्तर मिळत होते त्यामुळे खूप मदत झाली मला.

विसा एजेंट exactly हेच सर्व करणार पण जर तुम्ही परदेशात असाल तर communication प्रोब्लेम्स होऊ शकतात आणि तो जो मनस्ताप होतो त्यातून एक मैत्रीण गेली आहे.

होप धिस हेल्प्स!

Happy

धन्यवाद सगळ्यांना Happy

रामी, मला एक सांगा मी हे सर्व काही इथुन करु शकते का? का हे सर्व फॉर्म वैगरे मला मुंबईतुनच भरावे लागतील? जसं पासपोर्ट्चा फॉर्म कुठुन भरला आहे त्यावर ते appointment ठरवतात, ठाण्याचा फॉर्म मुंबईत चालत नाही आणि वाईस वर्सा, तसं तर काही नाही ना?

रचु, मी ही सर्व कामे इथे US मध्ये राहूनच केली. मागच्याच महिन्यात माझ्या आई वडिलांचा विसा झाला. पासपोर्टची सगळी कामे त्यांना पुण्याला जावून स्वतः करावी लागली. विसाची सर्व कामे मात्र मी आणि नवर्याने मिळून केली. तिथे तुम्हाला एक contact person लागेल मात्र थोडीफार मदत लागते जसे तुम्ही इकडून त्यांच्या प्रोफ़ाइल मध्ये तयार झालेली फी पेमेंट स्लीप इमेल केली तर त्याना त्याचे printout काढून देणे वगैरे जुजबी कामे करायला. माझ्या बहिणीने मला या कामात मदत केली. तिने वेळच्या वेळी मी पाठवलेले documents प्रिंट करून त्यांना देण्याचे काम केले. जो स्पोन्सर करणार असेल विसा त्याचे original birth certificate पाठवावे लागते ते USPS ने पाठवले. बाकी मग त्यांना २ दिवस मुंबईला जावून appointment attend करणे एवढेच काम राहिले. interview चे प्रश्न तयार करून पाठवले. ते वाचून त्यांनी तयारी केली. DS -१६० भरताना त्यांची बरीच माहिती लागते जसे कि शाळा कोणती, शिक्षण कधी संपले, जॉब कधी सुरु झाला, रिटायर कधी झाले इ. ही सर्व माहिती मी त्यांना विचारून फॉर्म मध्ये भरली. फॉर्म मध्ये सगळ्यात शेवटी कन्सेंट विचारतात कि हा फॉर्म तुम्हीच ( तुम्हीच म्हणजे ज्यांचा विसा करायचा आहे त्यांनी ) भरला आहे का, आम्ही त्या प्रश्नाला हो उत्तर दिले Wink

रचु फॉर्म मधे लोकेशन स्पेसिफिक काहि नाहिये असे.अमेरिकेच्या व्हिसा चे वेस्ट साईड्ला एकच ऑफिस आहे ते म्हणजे मुंबई मधे. पासपोर्ट्सारखे प्रत्येक मोठ्या शहरात त्यांचे ऑफिसेस नाहियेत.तुम्हि इथुन सुद्धा अपॉइंट्मेंट घेवु शकता. माझ्या आई साठि सुद्धा मि तेच केले होते. आई ने फक्त फोटो काढला जावुन आणि बँकेत पैसे भरले आणि मुंबईला इंटरव्हुसाठि गेलि होति. बाकि सगळि कामे मी इथुनच केलि. रामी ने वर सगळि डिटेल छान माहिति दिलिच आहे. ती फॉलो कर फक्त.
बरेचदा लोकांकडुन ऐकले आहे कि एजंट कडुन काम करुन घेतले तर व्हिसा लगेच मिळतो, पण खरेच असे काहि नाहिये.

माझ्या आईसाठी मी सहा महीन्यांपूर्वी ऑनलाईन विसा अ‍ॅप्लिकेशन सबमिट केले होते (DS-१६०) व विसा फी भरली होती. इंटर्व्यू झालेला नव्हता. पण तेव्हा तब्येतीच्या व इतर कारणांमुळे तिचे येणे रद्द झाले. त्यानंतर दोन-तीन महीन्यांनी आमचे स्टेट्स बदलले. परंतू आधी विसा फॉर्म सबमिट करताना त्यात मी आमचे स्टेट्स नॉन-इमिग्रंट लिहीले होते. आता परत आईला विसा इंटर्व्यू साठी पाहत आहे. तर आता ते स्टेट्स बदलावे लागेल ना ? ऑनलाईन बदलता येते असे इ-हाऊ वगैरे ठीकाणी लिहीलेय. व प्रोसिजर सुद्धा वाचली.
इथे कोणाला असा माहीती बदलण्याच्या अनुभव आहे का ? त्यामुळे काही प्रोब्लेम येतात का ? एजंट वगैरे केलेला नाहीये, आई/बहीण करणार आहे सर्व.