Submitted by स्वाती आंजर्लेकर on 9 January, 2013 - 02:15
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
२ किलो आवळे
२.५ किलो साखर
क्रमवार पाककृती:
आवळे धुऊन घ्यावेत
आता त्याची बी काढुन तुकडे करुन ठेवा.
मिक्सरमधुन थोडे थोडे पाणी घालून आवळ्यांची बारिक पेस्ट करा.
स्वच्छ रुमालातुन गाळुन घ्या.
आता साखर भिजेल इतपतच पाणी घाला व मंद गॅसवर ठेवा.
चांगला २-३ तारी पाक व्हायला हवा. (पाण्यात टाकल्यास गोळी तयार होईल इतपत पाक हवा)
पाक तयार झाला कि त्यात आवळ्याचा गाळलेला रस टाका.
एक उकळी आली की गॅस बंद करा. थंड झाले कि बाटलीत भरुन फ्रिजमधे ठेवा. प्यायला घेताना पाण्यात साधारण १/४ भाग सरबत टाका.
वाढणी/प्रमाण:
या प्रमाणात साधारण साडेतीन लिटर सरबत तयार होईल.
अधिक टिपा:
पाकात रस टाकल्यानंतर वर थोडा फेस येऊ शकेल. तो चमच्याने अलगद काढुन टाका.
महिनाभर टिकेल.
माहितीचा स्रोत:
माझ्या नणंदबाई.
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान! बाजारात मिळणारी सरबते
छान! बाजारात मिळणारी सरबते खूप महाग असतात. शिवाय त्यात काय काय घालतात देवजाणे. ही कृती छान आहे.
छान कृती आहे. फक्त महिनाभरच
छान कृती आहे.
फक्त महिनाभरच टिकणार का पण?