Submitted by Shruti_J on 5 January, 2013 - 08:12
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
१ पेंडी मेथी- बरिकक चिरून, धुवून
७-८ भिजवलेले काजू, १ चमचा खसखस भिजवलेली, पाव वाटी ओल खोबर, अर्धा इंच आल, ७-८ लसूण पाकळ्या, २ टोमॅटो- सर्व नीट वाटून
तेल, साखर, मिठ, २-३ चमचे मलई (साय), लाल तिखट, हळद, गरम मसाला
क्रमवार पाककृती:
१. कढई मधे थोडे तेल घेऊन बारीक चिरलेली मेथी छान परतून घ्यावी. तळुन घेतली तरी चालेल.
२. मटार अर्धवट उकडून घ्यावेत
३. कढई मधे तेल गरम करून त्यात हळद घालून नंतर त्यात ओल खोबर-टोमॅटो-खसखस-काजू-आल-लसूण वाटण घालावे.
४. तेल सुटेपर्यंत छान परतून घेणे
५. आता यात मटार, परतलेली मेथी घालावी. चवीनुसार मिठ, थोडी साखर, लाल तिखट, गरम मसाला घालावे. १-दीड वाटी पाणी घालावे
६. झाकन टाकून छान शिजवून घ्यावे. शिजल्यावर यात मलई घालून छान घोटावे आणि गॅस बंद करून खाली उतरवावे.
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
माझी कृती थोडी वेगळी आहे.
माझी कृती थोडी वेगळी आहे. टोमॅटो, लाल तिखट, गरम मसाला वगैरे अजिबात घालत नाही. त्यामुळे काजू, मटार यांची गोडसर चव येते. मलई एवजी अमूलचे फ्रेश क्रीम वापरते. भाजी दिसताना एकदम क्रीमी दिसते.
पंजाबी भाज्यांमध्ये खोबरं?
पंजाबी भाज्यांमध्ये खोबरं? पहिल्यांदाच ऐकलं. मला मेथी मटर मलईची चव गोड्सर आवडते त्यामुळे गरम मसाला वगैरे नाही घालत. थोडा खवा आणि वरुन फ्रेशक्रिम.
मी केली आज ह्या रेसिपीने छान
मी केली आज ह्या रेसिपीने छान झाली आहे. मेथी तेलावर परतुन घेण्याची टीप अगदी योग्य आहे. त्यामुळे कडवट पणा न येता स्वाद चान आलाय. खोबर आणि गरम मसाला दोन्हि.न्चा वेगळा स्वाद येतो पण खटकत नाही अजीबात. टोमॅटो ची प्युरी वेगळी करुन घेतली होती आधी. त्यान्चा आम्बटपणा क्रीम चा स्वाद बॅल्न्स करतोय. क्रीम मात्र ज्यास्त घातलय मुळ रेसिपीत दिलय त्यापेक्षा. त्यावतिरिक्त काजु आणि खसखस दुधात वाटुन घेतले पेस्ट करण्यासाठी. ओव्हरऑल भाजी ची चव खुप मस्त आलीय. रेसीपी साठी धन्यवाद.