बनूताईंची मनवामनवी

Submitted by एम.कर्णिक on 14 May, 2009 - 15:34

आजोबा माला आणखिन एक चॉकलेट पायजेलाय
द्या नं आजोबा, द्या नं
आई? नाय देत ती. उठत नाई
तुमी द्या नं. द्या नं आजोबा

म माझ्या वेण्या बांधून द्याल ?
आई नाई बांधत. क्लीप लावते नुस्ती
तुमी बांधा. हं अश्शा
बघा. दिल्या नं बांधायला ?
मं आतां द्या चॉकलेट

आजोबा, बघा नं इकडं
भो ऽ ऽ ऽ! नाई घाबरत? नाई घाबरत?
बघा आता मी डोळ्यांचा बागुलबुवा केलाय
घाबरलात की नाय? आतां द्या
द्या आता चॉकलेट

आजोबा, तुमी मला काय हाक मारता?
बागड-बन-बनूताई, न?
आता हाक मारा, म्हणा, आता म्हणा.
बघा. दिलं न म्हणायला.
म आतां तरी द्या नं माला चॉकलेट
द्या नं आजोबा. द्या नं.

आजोबा, तुमाला एक सांगू?
मला नं ऽ ऽ बाबा इडली खायला नेनाल आएत
तुमाला पन नेईल मी. येनाल?
हापिसातनं आले नं म्हनजे जायचय त्यांच्या गाडीतनं, येनाल?
हं? हं? येनाल काय?
म आता द्या माला चॉकलेट.
द्या नं, द्या नं.

गुलमोहर: 

फारच गोड, फारच लाडिक, फारच निरागस. अगदी समोर उभी आहे छोटीशी निरागस बनूताई असे वाटले.
असे वाटते कवितेत शिरून बनूताईचा गोड पापा घ्यावा आणि बनुताईला आणि या सुंदर कवितेबद्दल मुकुंदजींना पण खुप सारे चॉकलेट द्यावेत.
.............................................................................
किती पायी लागू तुझ्या
किती आठवू गा तुते
किती शब्द बनवू गा
अब्द अब्द मनी येते (मर्ढेकर)

कस्सली ग्गोड मनवामनवी ! Happy Happy

खुप गोड.. Happy
---------------------------------
देणार्‍याचे हात हजारो दुबळी माझी झोळी

कविता चांगली आहे पण तिसर्‍या कडव्यातले शुद्ध बोल खटकताहेत..
=========================
"हाती घ्याल ते घरीच न्याल"

महा डँबिस आहे हो ही बनूताई ! पण असूदे माझ्याकडून तिच्या या डँबिसपणासाठी एक मोठं चॉकलेट !
आवडली बनूताई ! माझ्या लहानपणी तुम्ही कुठे आजुबाजुला राहात होता का? नाही सहज आपलं विचारलं Happy

सर्वांचे आजोबांतर्फे आणिबनूताईंतर्फेही मनःपूर्वक आभार.
हिमांशु, तुमचे निरिक्षण अचूक आहे. मी संपूर्ण कविता आधी बोबड्या बोलांत लिहिली होती पण नंतर वाटले की वाचकांना कदाचित त्याचा अतिरेक वाटून गोडी कमी होईल म्हणून थोडेच बोबडे शब्द ठेवले.
मुकुंद कर्णिक
मुकुंदगान:- http://mukundgaan.blogspot.com
भगवद्गीता:- http://marathi-bhagavadgita.blogspot.com