Submitted by वर्षा_म on 4 June, 2010 - 04:43
स्पेशल रिया के लिये
घेशीलच
http://www.maayboli.com/node/39997
================================
एक लाडकीशी मैत्रीण माझी
त्याच्यावर कविता करते म्हणायची
नसतात ग असं करत म्हणाल्यावर
चिड चिड चिडायची
इतकं का ते सोप्प आहे
तूच सांग राणी आता
पहिल्या वहिल्या प्रेमावरती
जालावर वाचावी अशी कविता?
तुझी भावना, तुझी लाली
काय काय आणी कसं अडवु
तुझं हसणंच लाख मोलाचं
त्याला बुरख्याआड कसं लपवु?
तरी करावाचं म्हणली छोटासा Try
द्यावी लागेल कवितेला झप्पी
मग कदाचित तुझ्यासाठीही
कविता होईल सहज सोप्पी
पण मी म्हणते हवीच कशाला
इतकी सारी उठाठेव
तुझं मन त्याच्यासाठी,
मुठीमधे राखुन ठेव
आणि समजा तुझ्या भावनांना
शोधलेस तू शब्द जर
न जाणो तुझ्या प्रियकराच्या
वाचकच प्रेमात पडली तर?????
गुलमोहर:
शेअर करा
व्वा! वर्षे
व्वा! वर्षे ______________/\________________.
मस्त
मस्त
वर्षे __/\__
_____/\____ साष्टांग घ्यावा
_____/\____
साष्टांग घ्यावा
धन्यवाद
धन्यवाद
विडंबन क्विन.. साष्टांग
विडंबन क्विन.. साष्टांग _____/|\_____ तुला
आता "आमची कविता तिच्या आणि
आता "आमची कविता तिच्या आणि त्याच्यावर" ......असे एक कविता यायला हवी
______________/\_____________
______________/\______________
मस्त
मस्त
धन्यवाद
धन्यवाद
व्वा!! सहीच जमलयं
व्वा!! सहीच जमलयं