दम आलु-- मिस्सी रोटी.

Submitted by सुलेखा on 31 December, 2012 - 03:03
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

दम आलु साठी--
३ मध्यम आकाराचे बटाटे.
१ टेबलस्पुन व १ टी स्पुन इतके तेल.
फोडणीसाठी हिंग-जिरे-मोहोरी.
१/२ टी स्पून हळद.
१ कांदा.
४ लसूण पाकळ्या.
१ टेबलस्पून किसलेले आले.
१ हिरवी मिरची.
२ टेबलस्पून किसलेले सुके खोबरे .
अर्धे चक्री फुल व २ किंवा ३ लवंगा यांची पुड.[मी खरड मधे पुड करुन घेतली.]
१ टेबलस्पून घट्ट दही.[मी अमुल चे "मस्ती "दही घेतले आहे.]
पाउण वाटी दूध.
३/४ टी स्पून लाल तिखट.
१ टी स्पून मीठ.
१ टी स्पून गरम मसाला.
६ काजु .
कोथिंबीर.
२ टेबलस्पून साय .

मिस्सी रोटी ---
१ वाटी कणीक .
पाव वाटी बेसन.
मीठ.
१ चमचा मोहनासाठी तेल.
गरम रोटी ला वरुन लावायला बटर किंवा तूप.

क्रमवार पाककृती: 

dam -alu..tur-kachori 30 th Dc 2012. 001.JPG
बटाट्याची साले सोलुन मध्यम आकाराचे चिरावे .थोड्या पाण्यात भिजवुन ठेवावे.
कांदा + लसूण + आले + सुके खोबरे + हिरवी मिरची यांची मिक्सरमधे पेस्ट करावी.
बटाटे पाण्यातुन काढुन मायक्रोवेव च्या काचेच्या बाऊल मधे ठेवावे..त्यावर १ टी स्पून तेल ओतुन ते चमच्याने सर्व फोडींना लावुन घ्यावे..आता बाऊलवर झाकण ठेवुन मावेत १-१ असे एकुण २ मिनिटे ठेवावे..पहिल्या १ मिनिटा नंतर फोडी चमच्याने वर्-खाली हलवुन घ्याव्या.व झाकण ठेवुन पुन्ह १ मिनिट ठेवावे.
काजु भिजतील इतके पाणी घालुन ते मावे.मधे ३० सेकंद गरम करावे. या काजुची त्यातील पाण्यासकट मिक्सरमधे पेस्ट करुन घ्यावी ..
एका वाटीत साय घेवुन ती चमच्याने फेटुन घ्यावी.
पॅन मधे तेल गरम करुन फोडणीत मोहोरी-जिरे-हिंग घालावे.
कांद्याचा वाटलेला मसाला घालावा.मसाला पॅन ला लागु नये म्हणुन सतत परतावा.
आता त्यात दही घालुन पुन्हा छान परतावे.
बटाटा फोडी घालुन परतावे ..मसाला फोडींवर लागला कि तिखट-मीठ-गरम मसाला-चक्री फुल+लवंग यांची पुड व दूध घालुन मिश्रण ढवळावे.
झाकण ठेवुन माध्यम आचेवर २ ते ३ मिनिटे ठेवावे.
काजु पेस्ट घालुन पुन्हा एकदा ढवळावे..गॅस बंद करावा.
थोडी कोथिंबीर घालुन परतावे.
भाजी बाऊल मधे काढुन त्यावर फेटलेली साय व कोथिंबीर घालावी.
अगदी कमी तेलात सुंदर चवीचे दम-आलु तयार आहेत.
मिस्सी रोटी-
मिस्सी रोटी साठी चे पिठ गव्हात देशी चणा मिसळुन दळवतात्.त्याचा पर्याय म्हणुन पिठात बेसन मिसळले आहे.थंडी त या गरम रोट्या खाण्याची पद्धत आहे.
गहू पिठ, बेसन , मोहनाचे तेल ,चवीपुरते मीठ घालुन पिठ घट्ट भिजवायचे. लहान लहान पुरीसारखे फुलके लाटुन ते भाजायचे. भाजलेल्या रोटी ला तूप किंवा बटर लावायचे.
दम आलु,मिस्सी रोटी ,पुलाव चे तयार ताट.
dam -alu..tur-kachori 30 th Dc 2012. 003.JPG

अधिक टिपा: 

हे दम-आलु नेहमीप्रमाणे बटाटे फोडी न तळता मावे त १ टी स्पुन तेलावर ठेवुन केले आहेत.त्यामुळे कमी तेलात अप्रतिम चव साध्य करता आली आहे.

माहितीचा स्रोत: 
पारंपारिक.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुलेखाताई, ताट वाढलंय, जेवायला या. असे लिहित जा बघू. ( तशी परवानगी न घेता जेवायला बसायला संकोच वाटतो. )

झंपी ,
तिखट,मीठ,हि.मिरची ,गरम/वाटलेला मसाला आवडीप्रमाणे घेता येईल.
मी तिखट फार कमी खाते.त्या अंदाजाने च लिहीलेले असते.
दिनेशदा,
खूप मोठ्ठा प्रश्न आहे ? तिथे काय लिहावे बरं !!!! [कि तयार ताटाचा फोटो च डकवु नये.....]

वरती अ‍ॅलर्ट घालत जा. भूक लागलेली अस्ताना फोटो पाहू नका!!!

रेसिपी सही आहे. बटाटे तळायचे असे रेसिपीत वाचले तरी मला वजन वाढायची भिती वाटते हल्ली!! त्यापेक्षा ही आयडीया बेस्ट आहे.