Submitted by निंबुडा on 28 December, 2012 - 04:36
'आरोग्यम् धनसंपदा' ह्या ग्रूप मध्ये डोळे ह्या विषयावर परीपूर्ण चर्चा असलेला धागा न सापडल्याने हा धागा उघडत आहे.
डोळ्यांच्या समस्या व डोळ्यांचे विकार आणि त्यावरील उपाय, शल्यक्रिया, डोळ्यांचे डॉक्टर्स इ.संबंधी इथे चर्चा करू या.
डोळ्यांशी संबंधित विशिष्ट समस्यां/प्रश्नांसाठी खालील धागे 'आरोग्यम् धनसंपदा' ग्रूप मध्ये तसेच जुन्या मायबोलीवर ह्या आधी बनवले गेल्याचे दिसत आहे. लिंक इथे देत आहे.
डोळ्यांच्या लेझर सर्जरी विषयी माहिती हवी आहे
संगणकाशी दोन हात करताना ... - ह्या धाग्यावर 'संगणक वापरताना डोळ्यांवर येणारा ताण व त्यावरील उपाय' ह्यावर काही लेखन आहे.
त्या व्यतिरिक्त एकूणच डोळ्यांच्या आरोग्यासंबंधी इथे चर्चा करता येईल.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सध्या संगणकाच्या अति
सध्या संगणकाच्या अति वापरामुळे मधुमेह, ह्रुदयरोग याच्या पंगतीत डोळ्यांचे आजार पण येतीलच.
यापूर्वी मला वाटतं गजाननने डोळ्यांचे व्यायाम लिहिले होते इथे.
मस्त धागा निंबुडा. मला सध्या
मस्त धागा निंबुडा.
मला सध्या एक समस्या सतावते आहे. थंडीचे दिवस सुरू झाले की माझ्या डोळ्यांतून पांढरा स्राव बाहेर पडायला लागतो. त्यामुळे सकाळी उठल्यावर डोळे चिकटणे, पापण्या सुजणे वगैरे प्रकार होतात. हे गेले तीन-चार वर्ष अनुभवते आहे. आधी मला वाटायचं की लेन्स बदलायला झाल्या आहेत की काय... पण यंदा तर लेन्स अगदी नवीन आहेत, एक महिनाच झाला असेल वापरायला लागून.
हे उष्णतेचे विकार आहेत काय? यावर उपाय काय करता येतील?
मला असलेल्या डोळ्यांच्या एका
मला असलेल्या डोळ्यांच्या एका प्रॉब्लेम वर चर्चा करायची आहे. जवळपास शालेय जीवनापासून मी ह्या प्रॉब्लेमला सामोरी जात आहे. इथे कुणाला ह्या संबंधी माहिती असेल तर मला उपयोग होईल.
शाळेत असताना साधारण नववी किंवा दहावीच्या दरम्यान माझ्या दोन्ही डोळ्यांतून सारखे पाणी येण्यास सुरुवात झाली. रात्री झोपल्यावर ज्या कुशीवर वळत असे त्या साईडच्या डोळ्यातून अगदी पाण्याची धार लागत असेल. आई-बाबांना वाटले फार अभ्यास/ वाचन करते म्हणून डोळे खराब झाले असतील व नंबर लागला असेल. तेव्हा नेने म्हणून एक प्रसिद्ध व वयस्कर (जुन्या पिढीचे) डोळ्यांचे डॉ. आमच्या एरीयात होते. त्यांच्या कडे जाऊन माझे डोळे तपासून घेतले. त्यांनी नंबर असल्याचा निर्वाळा दिला. लगेच चष्मा बनवावयास टाकला. खरे म्हणजे मला चष्मा ह्या प्रकाराची खूप भीती होती. लहानपणी ज्या ज्या मत्रिणींना चष्मा असल्याचे पाहिले होते त्यांचे नंबर उत्तरोत्तर वाढत गेल्याचे पाहिले होते. म्हणून अजून एका चष्म्याच्या दुकानात डोळे तपासून देतात तिथे जाऊन चेक अप केले. त्यांनी ही नंबर असण्याला पुष्टी दिली.
तरीही माझ्या हट्टाखातर कुणाच्या तरी सांगण्यावरून आम्ही चुनाभट्टीचे प्रमुखस्वामी नावाचे डोळ्यांचे धर्मार्थ हॉस्पिटल आहे ते गाठले. खूप छान अनुभव आला तिथे. अक्षरशः काही रुपयांत (मला वाटते १० रुपयात) केस पेपर काढून मिळाला. डोळ्यांच्या चेक अप च्या ३ राऊंड झाल्या. डॉ. नी निदान केले की नंबर बिंबर काही नाहीये. (हुश्श झाले होते मला!) हिच्या दोन्ही डोळ्यांच्या खाली जे केस आहेत त्यातले २-३ केस आतल्या बाजूने वाढतात. जे डोळ्यांच्या सफेद भागाला किंवा बुब्बुळाला स्पर्श करतात, ज्यामुळे डोळ्यांत पाणी येते. त्यांनी नंतर डोळ्यांत लोकल अॅनास्थेशिया देणारे औषध घालून ते केस त्यांच्या कडील एका साधनाने काढले. त्यानंतर डोळ्यांत खुपल्या खुपल्यासारखी जी भावना होत होती, ती एक्दम नाहीशी झाली. एकदम आराम पडला. नंतरही परत असे केस वाढतील तेव्हा ते प्लक करून काढणे हाच उपाय असे त्यांचे म्हणणे होते. कारण त्यांनी ते केस मूळापासून उपटून काढलेले नव्हते व परत ते वाढणारच, असे ते म्हणाले. नंतर प्रत्येक वेळी कल्याण हून चुनाभट्टीला जाणे शक्य नव्हते. तेव्हा तुला स्वतःलाच हे करावे लागेल, असेही ते म्हणाले, तेव्हापासून आजतागायत हा त्रास होतोच आहे व प्रत्येक वेळी ते वाढलेले व डोळ्यांत खुपणारे केस एका प्लकर च्या सहाय्याने काढावे लागतात. सुरुवातीला १-२ वेळा ते डोळ्यांचे लोकल अॅनास्थेशिया देणारे औषध घालून हा प्रकार केला. आता डायरेक्ट प्लकर ने काढते. थोडेसे प्रिक केल्यासारखे दुखते. पण त्या केसांनाही सवय झाली असावी. पटकन येतात बाहेर जास्त कटकट न करता! अर्थात हे काम फार जपून , नीट उजेडात व कुणाचा चुकूनही धक्का लागेल अशी सिच्युएशन नसतानाच करावे लागते. (प्लकर मेडीकेडेट इन्स्ट्रुमेंट्स च्या किट मध्ये मिळतो तसला आहे व वेळोवेळी धुवून, आणि अधून मधून उकळून घेते.)
पण ह्या समस्येवर कायमस्वरुपी काही इलाज नाही का? इथे कुणाला अश्या प्रकारचा त्रास आहे का?
(त्या डॉ. नी हे निदान केले नसते तर आज मला चष्मा असता व न जाणो काय नंबरचा चष्मा असता!)
त्यामुळे सकाळी उठल्यावर डोळे
त्यामुळे सकाळी उठल्यावर डोळे चिकटणे, पापण्या सुजणे वगैरे प्रकार होतात. >>
अरे, मंजूडी राजसलाही सध्या असे होते आहे. ह्या आधी कधीच झाले नव्हते. पण फार थोड्या प्रमाणात आहे. मला वाटले की थंडीचा जास्त गाढ झोपतोय म्हणून असे होतेय.
यापूर्वी मला वाटतं गजाननने डोळ्यांचे व्यायाम लिहिले होते इथे.
>>>
लिंक मिळू शकेल का? मी हेडर मध्ये डकवेन. जुन्या मायबोलीत आहे की नव्या?
हे घ्या. माबोवर पडीक राहुन
हे घ्या. माबोवर पडीक राहुन वाचुन वाचुन डोळे दुखणं, डोळ्यावर सार (पडदा) येणं. खुपणं असे विकार सुरु झाले असतील तर उपचार/ उपायांसाठी पुन्हा माबोच वाचावे. काय?
http://www.maayboli.com/hitgu
http://www.maayboli.com/hitguj/messages/103387/108390.html?120155699 इथे महेश ची पोस्ट आहे त्यात लिहिलेत त्यांनी बरेच उपाय
धन्यवाद स्वाती. मी हेडर मध्ये
धन्यवाद स्वाती. मी हेडर मध्ये नमूद करते ही लिंक.
निंबूडा तुम्हाला ट्रिचिअॅसिस
निंबूडा
तुम्हाला ट्रिचिअॅसिस आहे. लेसर वा कॉटरीने केस मुळापासून काधता येतात. वा १ छोटे ऑप. पुन्हा डोळेवल्याकडे जा. तुम्हाला ट्रिचिअॅसिस आहे असं सान्गा. ते उपचार सन्गतील.
ट्रिचिअॅसिस >> धन्यवाद,
ट्रिचिअॅसिस >>
धन्यवाद, इब्लिस तुमची पोस्ट एक्स्पेक्टेड होतीच!
विकीपीडीयावर ट्रिचिअॅसिस शोधले. exactly तोच त्रास होतोय.
ट्रिचिअॅसिस ही विकीपीडीया
ट्रिचिअॅसिस ही विकीपीडीया ची लिंक.
हा त्रास माझ्या ओळखीच्यांत कुणालाच नाही. मैत्रिणींना (आणि सासरच्यांनाही) पहिल्यांदा माझा हा प्रकार कळला तेव्हा सगळ्यांसाठी 'अधून मधून डोळ्यांखाली उलट्या दिशेने वाढणारे असे केस' हा आश्चर्य व्यक्त करण्याचा विषय होता. त्यामुळे मला वाटायचे की माझ्याच बाबतीत ही उलटी गंगा आहे की काय!
बादवे, पण हे केस एकदा का पूर्ण वाढले की डोळ्यांत असले खुपतात की प्लकर जवळ नसेल तर अतिशय इरीटेट होते. त्यामुळे माझा हा प्लकर "जेथे जातो तेथे तू माझा सांगाती" ह्या प्रकारात मोडतो.
हल्ली हल्लीच तो कुठेतरी हरवलाय आणि गेल्या २-३ दिवसांपासून उजव्या डोळ्याला हा त्रास होऊ लागला आहे. म्हणून आज आठवणीने हा धागा काढला.
निंबुडा,.........केस
निंबुडा,.........केस जाळल्यावर परत वाढत नाहीत बघ प्रयत्न करुन
केस जाळल्यावर परत वाढत नाहीत
केस जाळल्यावर परत वाढत नाहीत बघ प्रयत्न करुन >>
ये इकडे, आधी तुझ्या डोळ्यांवर प्रयोग करते.
मेरे मस्त मस्त दो नैन, मेरे दिल का ले लेते है चैन (अधून मधून)
अशी थट्टा करू नकोस!
माझ्या डोळ्याचे केस बाहेरुन
माझ्या डोळ्याचे केस बाहेरुन आहेत..... :हाहा:.
.
.
इब्लिस म्हणतात तसे एकदा करुन बघ.......आणि ते केस वाढु नये त्यासाठी बघ काय करता येते का
रांजणवाडी येत असेल
रांजणवाडी येत असेल तर.............. सकाळी उठल्याबरोबर बाहेर च्या मुख्य दरवाजाची कडी त्या डोळ्यांना लावावी.... म्हणजे घासावी.......तसेच रात्री झोपताना सुध्दा तसेच करावे
रांजणवाडी येत असेल
रांजणवाडी येत असेल तर.............. सकाळी उठल्याबरोबर बाहेर च्या मुख्य दरवाजाची कडी त्या डोळ्यांना लावावी.... म्हणजे घासावी.......तसेच रात्री झोपताना सुध्दा तसेच करावे
>>
उदयन, हा तोडगा झाला ना! जसे माळीण झाली की सुवासिक फूल हुंगतात!
औषधी उपचार काय ते लिही ना! रांजणवाडी उष्णतेमुळे होते ना? मग माझ्या मते थंडाव्यासाठी हे घरगुती उपाय चालावेतः
१) तुळशीचे बी भिजत घालून गार दुधातून पिणे
२) डोळ्यांवर काकडीचे काप, गुलाबपाण्याच्या पट्ट्या ठेवणे
डोळ्यांच्या थंडाव्यासाठी माझ्याकडे एक सुपर सॉलिड उपाय आहे. शालेय जीवनात मी पुस्तकी कीडा असल्याने डोळ्यांवर जाम ताण येत असे. तेव्हा माझे बाबा हा प्रकार करत असत.
तांदूळ दिवसभर पाण्यात भिजत घालून मग पाणी निचरून मिक्सर मध्ये गार दूधासोबत भरड वाटायचे. मग ती पेस्ट एका सुती रुमालात/ कापडात घेऊन मस्त डोळ्यांवर ठेवायची. अशक्य गार वाटते. करून पहा.
ज्यांना सकाळी लवकर उठल्यावर डोळ्यांवर जडपणा जाणवतो (विशेषतः अभ्यासासाठी जाग्रणे करणारे विद्यार्थी) त्यांनी उठल्या उठल्या हा प्रकार करून पहावा. तोंडात जमेल तितके पाणी भरून गाल फुगवायचे आणि डोळे बंद करून गार पाण्याचे डोळ्यांवर हबकारे मारायचे. माझ्या शालेय जीवनात ह्या प्रकाराने मला खूप फायदा झाला आहे. अभ्यासाला बसल्यावर परत अजिबात झोप लागायची नाही. डोळे एकदम फ्रेश होतात.
मंजूडी,
कदाचित एखादे आयुर्वेदिक अंजन वापरून बघ. डोळ्यांतली घाण निघून स्वच्छ झाल्यानंतर त्रास थांबेल कदाचित.
बालाजी तांबेंचे डोळ्यांसाठीचे काही प्रॉडक्ट इथे दिले आहेत. त्यातले सॅन अंजन (काजळ) मी स्वतः वापरले आहे. अनुभव चांगला आहे. मस्त गार वाटते.
Oral and Eye Care
उदयन, हा तोडगा झाला ना! जसे
उदयन, हा तोडगा झाला ना! जसे माळीण झाली की सुवासिक फूल हुंगतात! >>>>> झाल्यानंतर सुध्दा केले तरी जाते.......वैयक्तिक अनुभव
कदाचित एखादे आयुर्वेदिक अंजन
कदाचित एखादे आयुर्वेदिक अंजन वापरून बघ>> डोळ्याचे डॉक्टर सांगतात डोळ्यात काही म्हणून काही घालू नये. आयुर्वेदीक असले तरी. कारण कितीही झाले तरी ते प्युअर फॉर्म मध्ये नसते. तसा दावा असलाच तरी, जमीनच किटकनाशकांमुळे इतकी खराब आहे की ज्या वनस्पतींपासून अंजन वगैरे तयार केले आहे, ते फार शुध्द असण्याची शक्यता जवळपास शून्य. डोळा हा फार नाजूक अवयव आहे, त्यामुळे ते नकोच. इती भाषण समाप्त...
डोळ्याचे डॉक्टर सांगतात
डोळ्याचे डॉक्टर सांगतात डोळ्यात काही म्हणून काही घालू नये.
<
+++1
***
उदयन.. | 28 December, 2012 - 16:36 नवीन
निंबुडा,.........केस जाळल्यावर परत वाढत नाहीत
<< +1
laser / cautery = burning the hair roots. same treatment as done for facial hair in women by dermatologists.
***
रांजणवाडी = chalazion or stye = hordeolum inturnum / exturnum see on wiki
http://en.wikipedia.org/wiki/Chalazion
http://en.wikipedia.org/wiki/Stye
डोळ्यांचा विषय चाललाय म्हणून
डोळ्यांचा विषय चाललाय म्हणून -
ज्यांना सारखा२ अॅसिडीटीचा त्रास होतो, डोळे जळजळतात, त्यांच्या करता अजून एक उपाय -
हा उपाय फुरसतीत करावा.
शक्यतो शेतातली काळी माती घ्यावी. चाळावी. खडे अजिबात नकोत. नंतर फरशीवर उन्हात ७/८ दिवस ठेवावी. ओली होऊ देऊ नये. (शॉर्ट्कट - माती सरळ भाजावी!)
नंतर या मातीत पाणी घालावं, कणकेसारखी भिजवावी आणि रात्रभर ठेवावी. आता ही माती तयार आहे. कितीही वेळा पाणी घालून पुनःपुन्हा वापरता येइल.
आता २ स्वच्छ कापडं घ्यावीत; शक्यतो सुती. साध्या पाण्यानी भिजवावीत. कापडाचा आकार-
पहिलं कापड - आपल्या लोअर अॅब्डॉमीन (ओटीपोट) पासून छातीपर्यंत. असा स्क्वेअर.
दुसरं कापड - फक्त दोन्ही डोळे झाकल्या जातील असं.
आता या ओल्या कापडांवर तयार मातीचा आंगठ्या एवढ्या जाडीचा केक करावा. ही झाली मातीची पट्टी तयार.
आता जरा कडक पृष्ठभागावर झोपावं. मोठी पट्टी लोअर अॅब्डॉमीन (ओटीपोट) पासून छातीपर्यंत आंथरावी. आणि छोटी पट्टी डोळ्यांवर ठेवावी.
मंद श्व्सन करीत, शवासन करावं जवळ२ ४० मिनिटे. नंतर पट्ट्या काढून डोळे स्वच्छ साध्या पाण्यानी धुवावेत.
-
हा उपाय आम्हाला नॅचरोपॅथीच्या सेशन ला शिकवला होता. वेळखाऊ अस्ल्याने केला जात नाही पण आहे मात्र जबरदस्त!
डोळ्याचे डॉक्टर सांगतात
डोळ्याचे डॉक्टर सांगतात डोळ्यात काही म्हणून काही घालू नये.
>>>
काजळ पण नाही? काही जण डोळ्यांत मध सुद्धा घालतात. पण नक्की कशासाठी ते आता आठवत नाहीये.
मी सौंदर्य प्रसाधने जास्त वापरत नाही. कधीतरी प्रसंगानुरुप मेकअप करताना काजळ आवर्जून घालते डोळ्यांत!
अजून एक आठवले! chloromycetin aplicap नावाची एक कॅप्सूल मिळते. डोळ्यांत कचरा वगैरे जाऊन कधी कधी खुपते, जळजळ किंवा इरीटेशन होते , किंवा इन्फेक्शन मुळे डोळे जळजळतात, तेव्हा रात्री ह्या कॅप्सूल मधला जेल सारखा चिकट द्राव दोन्ही डोळ्यांत टाकायचा. घशात थोडी कडवट चव येते. पण बेस्ट उपाय आहे हा! सकाळी डोळे एकदम स्वच्छ होतात. पण फॅमिली किंवा डोळ्यांच्या डॉ. च्या प्रीस्क्रिप्शन नेच मिळत असावे हे औषध.
chloromycetin aplicap << also
chloromycetin aplicap
<<
also called लसूण ट्यूब / लिंबोळी ट्यूब इ. क्लोराम्फेनिकॉल नवाच्य एन्तिबायोटीकचे मलम.
OTC milel. -over the counter. use half or less in each eye. safe in children too.
डोळ्यांचे ( खरोखरचे ) व्यायाम
डोळ्यांचे ( खरोखरचे ) व्यायाम करून बर्याच समस्या कमी होतात हे खरयं
ड्राय आईज वर काही उपाय माहीत
ड्राय आईज वर काही उपाय माहीत आहे का .. Artificial Tears वापरून झालेत.
डॉ इब्लिस, फुकट कन्सलटंसी
डॉ इब्लिस, फुकट कन्सलटंसी घेण्यात मी माहिर आहे. कालच एका एक्सपर्टकडुन दुसर्या धाग्यावर अशाच टीप्स मिळवल्यात. आता तुमचा नंबर.
माझे डोळे प्रखर प्रकाश, एसी/कुलर, फॅनची हवा सहन करु शकत नाहीत. डोळ्यातुन पाणी येतं. हल्ली कोल पेन्सिलच्या वापराने पण दिवसभर पाणी येतं. म्हणजे अगदी वहाण्याइतकं नाही, पण डोळे ओले असतात. ब्रॅन्ड्स बदलुन बघितले तरी तेच. पापण्या ही किंचीत स्वोलन असतात. फार नाही पण अती झोप झाल्यावर किंवा सकाळी झोपुन उठल्यावर असतात तशा किंचीतशा. पण हे वाढु नयी एवढीच इच्छा. मी डोळे चेक केले. नंबर अजिबात नाही. डॉक्टरांनी सांगितलं की सतत लॅपटॉपवर काम आणि टीपी केल्यामुळे डोळे ड्राय झाल्याने असं होतं आहे. मला टिअर ड्रॉप्स वापरायला सांगितले. एक बॉटल संपवली आणि पॉझिटीव फरक दिसला. १-२ महिने झाले आता परत पहिलेच प्रॉब्लेम्स चालु झाले आहेत. परत टिअरड्रॉप्स वापरु का? ते परत परत वापरण्याचे काही साइड इफेक्ट्स आहेत का? ( नेटचा कमी वापर करा, हा उपाय सोडुन) दुसरा काही उपाय आहे किंवा डोळ्यांचा व्यायाम?
कचा तु पण सांग रे तुला काय व्यायाम माहित आहेत.
चमकी, माझी लंबीचौडी पोस्ट
चमकी, माझी लंबीचौडी पोस्ट टाइप करता करता तुझी सेम पोस्ट आली.
डॉक्टर इब्लिस यांना न
डॉक्टर इब्लिस यांना न पटल्यानं संपादीत. मी लोकांच्या डोळ्यांचे वाईट करू इच्छीत नाही.
ok. am gonna type
ok. am gonna type this.
मनीमाऊ.
अश्रू हे डोळ्यांचे 'अन्न' आहे. इती डॉ. तात्याराव पी. लहाने. (गूगल dr. t. p. lahane)
अश्रू हे डोळ्यांचे 'रक्त' आहे. इती इब्लिस. (गूगल मायबोली)
पापणी न मिचकवता १०-१५ सेकंद थांबले तर डोळ्यास पाणी येते.
कार्ण डोळ्यातल्या कॉर्नियावरील अश्रू सुक्तात, मग डोळ्यची आग, मग कॉर्निया ओला करण्यासाठी अश्रू.
sorry difficult to type marathi on tab. please bear with me.
what u have got is computer vision syndrome. *cvs
your corneas do not have any blood vessels. it gets oxygen & nutrition through the tears. (that is why he called it 'food' i call it blood.)
when you work on computer you tend to 'stare' at screen. this reduces the number of times u blink. normally you blink 18--20 times a min.
this causes the tear film to break up. and the irritation and watering means that your eyes are trying to make up for the tears by makin more.
so dr give artificial tear eye drops. it wont have any side effects. use as much as u want.
better remedy : blink. remember to blink. give it a full blink with lids squeeze in ur case it will burn. cuz you got dry eye. it stops burnin when ur dry eye goes away.
keep your screen below eye level. that makes it easier to have complete blink. (blink restores the normal tear film. works like windshield wiper.
another prob in CVS*
you are focusin ur eyes at near dist.
so u get blurrin of vision for sum time after u stop using comp.
take frequent rest. 1 min / half hour. 5 min / 1 hr. 25 min/ 2 hrs & so on.
during rest look at distant object. beyond 20 feet. that will relax ur accommodation. meaning focusing power.
dunno if i made myself clear
but blink, blink blink, give rest. look away frm screen frqly. thts it. use arti tears, dnt wrry
just rem, THERES NO BAD RAYS COMING OUT OF THE COMPUTER SCRN OR TV TO HURT UR EYES.
ARC glasses are useless for computers. gud fr night drivin
(why lids are swollen in morning? puffy eyes? टोपसलेले डॉळे
in day time cornea gets oxygen from air direct, diffusion through tears. night, eyelid blood vessels dilate. means they become larger in thickness. carry more blood. this causes the lids to swell. if u had good sleep, the eyelids should come back to normal in few mins. max 5-10. older people maybe 20 mins. dont worry abt it. n take good sleep.)
pl 4giv sms english
chafa, theres two types of
chafa,
theres two types of organs in body.
sensory, motor.
ज्ञ्यानेन्द्रीय = sensory
see, hear, taste, smell, feel.
you cant enhance sensory powers by exercise. if i start moving tongue in certain directions, my taste wont improve. if i can move ears, my hearing wont improve. wriggling ur nose in certain ways wont improve ur smelling powers. or moving skin wont make it more sensitive.
how can moving eyes make ur sight better? it wont. as simple as that.
rubbing eyes makes feel better. rubbing other things make feel better. lol. dont it?
motor organs or muscles get better with exercise. including heart n breathing muscles. eye muscles do need exercise. but moving eyes helterskelter is wrogn exercise.
इब्लिस, तुम्ही डॉक्टर आहात
इब्लिस, तुम्ही डॉक्टर आहात तुम्हाला नक्कीच जास्त माहिती असणार पण हे थोडंफार नेहमीच्या व्यायाम तत्वांशी साधर्म्याचं वाटतं नाही का ? म्हणजे स्नायुंवर ताण दिल्यानं त्यांची लवचिकता वाढते या प्रकारे ?
मी हा प्रकार गेली कित्येक वर्षे करतोय, अजुनही पिसी समोर १० ते १६ तास बसूनही मला चष्मा नाही किंवा काही त्रास नाही. काहीतरी तथ्य नक्की असेल यात असं वाटतं,
blink. remember to blink. >>>
blink. remember to blink. >>> इथेच तर लोचा आहे ना. एकवेळ होती कि मी खुप ब्लींक करते म्हणुन मला सगळे चिडवायचे कि सारखी बाहुलीसारखी पापण्या फडफडवत असते. पण तुमचं बरोबर आहे, जेव्हापासुन नोकरी आणि नेट चालु झालं तेव्हापासुन मी एकटक स्क्रीनकडे स्टेअर करत असते. ब्लिंकिंग खुप कमी झालं आहे. सो यु सेड इट राइट !
dunno if i made myself clear >>> Now it is absolutely clear to me. No need to say sorry for writing in english, good for me. तुम्ही खुप छान आहात. मला एकदम व्यवस्थित समजलं. मला खात्री होती कि तुम्हाला विचारलं तर अगदी खात्रीशीर व्यवस्थित माहिती मिळेल. आता सगळे Dos n Don'ts लक्षात ठेवेन. थँक्स !
Pages