Submitted by निवांत पाटील on 23 December, 2012 - 04:31
या विषयावर बरेच गुगलुन झाल्यावर एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे वापरुन बघितल्याचा अनुभव असल्याखेरीज निवड करणे अवघड आहे.
माझ्यासाठी हेल्मेट आणल्यावर लक्षात आले की याच्या समोरील प्लॅस्टीक खुपच खराब आहे. रात्री प्रकाश स्कॅटर होतो आणि काही वेळा काही क्षण काहीच दिसत नाही.
तर कृपया आपले अनुभव शेअर करा, कोणते घ्यावे, कोणते टाळावे आणि घेताना काय पारखुन घ्यावे.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला स्वतः ला घमेलं दिसतं तसलं
मला स्वतः ला घमेलं दिसतं तसलं हेल्मेट आवडतं कारण कान मो़कळे राहतात. डोळ्यांच्या कोपर्यातून मागच्या गाड्यांचा अंदाज येतो. दोन्ही साईडला रेअर व्यू मिरर अस्तांना सुद्धा मला तरी हे आवश्यक वाटतं. पण शहराबाहेर ते चालत नाही, म्हणून मग मी आर्मी वाले लोक वापरतात तसलं हेल्मेट वापरतोय. २ फायदे - तोंड पूर्ण उघडं राहतं, कानही झाकले जातात. स्पेक्ट्स वरून पण वापरता येतं.
अजून एक शक्यतो, ब्रँड बघून
अजून एक शक्यतो, ब्रँड बघून घ्यावा... मग छोट्या२ गोष्टीं ची आपोआपच काळजी घेतली जाते, जसं की प्लास्टीक क्वालीटी, त्यात असलेल्या बेल्ट ची क्वालीटी वगैरे२... मी गेल्या२/३ वर्षांपासून स्ट्ड्स वापरतोय, सध्या तरी काही प्रॉब्लेम नाही...
धुम मधे जॉन ने घातलेले तसे
धुम मधे जॉन ने घातलेले तसे घ्या..त्यात आत मधे एअर कंडीशन पण असते छोट्या बॅटरी द्वारे...:)
गुगल मध्ये Ninja Helmet असा
गुगल मध्ये Ninja Helmet असा सर्च देउन बघा...
बरीच माहिती आहे. ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सर्वप्रथम आपले अभिनंदन की आपण
सर्वप्रथम आपले अभिनंदन की आपण हेल्मेट वापरण्याचा निर्णय घेतला. हेल्मेट वापरणे हे आपल्याच हिताचे असते.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हेल्मेट निवडतांना काही काळजी घेणे आवश्यक आहे. हेल्मेट मी गेल्या १५ वर्षांपासून (सतत) वापरत आहे त्यामुळे त्या बाबतीत माझे अधिकाराचे मत आहे हे लक्षात घ्या.
१) तूमच्या डोक्याला बसणारे हेल्मेट निवडा. (हेल्मेट हा शब्द यापुढे फक्त 'हे' असे लिहीणार आहे.) हे निवड करतांना डोक्याला एकदम फिट्ट बसणारे नको अन त्यातून तूमचे डोके त्याच्या आत फिरेल इतकेही ढिले नको.
२) हेल्मेटच्या बाह्यस्वरूपावर जरा लक्ष देणे गरजेचे आहे. उगाच मित्राकडे आहे म्हणून तसेच, भास मारण्यासाठी घेतलेले, स्वस्त, रस्त्यावरचे नको.
३) हे वर रंगीत रेडीयम असते. बर्याचदा रेडीयम विनाईल प्रकारातले असते. ते तसे नसावे. विनाईल कालांतराने फिके पडते. रेडीयम असेल तर रात्रीच्या वेळी प्रकाशमान होवून इतर वाहनांना ते दिसू शकते हा फायदा रेडीयममुळे मिळतो. बर्याच हे वर केवळ रंग लावलेले आकार असतात त्यांचा उपयोग तसा नसतो. केवळ हे आकर्षक दिसते व किंमत वाढते.
४) हे कोणत्या प्रकारात घ्यावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक निवडीचा प्रश्न असतो. शारिरीक गरज, खिशाचा सल्ला, चेहेर्याचा, डोक्याचा आकार आदी बरेच मुद्दे त्यात येवू शकतात. हे घेणे म्हणजे साडी घेण्यासारखे आहे. http://en.wikipedia.org/wiki/Helmet या लिंकवर याची जास्त माहीती करवून घ्या.
५) आपण ढोबळमानाने 'खुले' व 'बंद' प्रकाराचे हेल्मेट (Open and Closed Type of Helmets) असतात असे मानू. खुले म्हणजे केवळ कवटीचे संरक्षण करणारे व बंद म्हणजे कवटी अधिक जबड्याचे (चेहर्याचे) संरक्षण करणारे हेल्मेट होय. खुल्या हेल्मेटच्या प्रकारात तुम्ही खर्च केलेल्या पैशांमधून केवळ कवटीचे संरक्षण होते. त्या पैशात थोडी जास्त भर टाकून बंद प्रकारचे हेल्मेट खरेदी करता येवू शकते. पण काही जणांना बंद प्रकारच्या हे मध्ये कोंडल्यासारखे भासू शकते. (हो भासच.) कानांवर इतर वाहनांचे आवाज कमी येवू शकतात. त्यामुळे ज्याच्यात्याच्या प्रकृतीनुसार हे घ्यावे.
आता याबाबतीत माझी काही अधिकारीक सुचना:
माझ्या मते भारतातील प्रत्येक दुचाकी चालकाने 'बंद' प्रकारातलेच हे घ्यावे. सुरूवातीला नव्या नवरीच्या नखर्यांसारखे तुम्हाला वाटेल पण एकदाका त्या हे ची सवय झाली की मग चिंता नाही. आवाज कमी येणे, मानेला त्रास होणे, आजूबाजूचे न दिसणे, जीव घाबरणे आदी तक्रारी या 'बहाणे' या प्रकारात मोडतात. माझा तुम्हाला बंद प्रकारातील हे घेणे हाच आग्रह असणार आहे.
६) रस्त्यावरचे हेल्मेट, मिलीटरी कँन्टीनमध्ये स्वस्त मिळते म्हणून तेथले हेल्मेट कधीही घेवू नये. रस्त्यावरचे हेल्मेट हे रिसायकल केलेल्या हेल्मेटचे असू शकते. त्याचे प्लास्टीक, फायबर कमी दर्जाचे असू शकते. त्याचे पट्टे रिबीटने निट बसवलेले असू शकतात. त्याच्या आतील कापडाचा दर्जा कमी असू शकतो. त्यातील फोम, थर्मोकोल कमी दर्जाचे असू शकते. त्याची काच कमी ग्रेडची, अपारदर्शक असू शकते. तो विक्रेता पळून जावू शकतो. तो विक्रेता बिल देवू शकत नाही. आदी.
मिलीटरी कँन्टीनमध्ये कमी किंवा ठरावीक कंपन्यांचे, ठरावीक आकाराचे हे मिळू शकतात. त्यात तुमचे डोके 'निराळे' असल्यास ते तुमच्या डोक्याला निट बसणारे असू शकते.
७) हेल्मेट निवडतांनातली एक महत्वपुर्ण पायरी: हेल्मेटचे पुढील फोम किंवा कड तुमच्या भुवईच्या वरतीपर्यंत येवू द्या असेच हेल्मेट निवडा व त्या पद्धतीतच पुढे वापरत चला. पुढेपुढे आतील थर्मोकोलचा आकार तसा घडेल. ही एक जास्तीच्या संरक्षणासाठीची तरतूद आहे.
८) हेल्मेट घातल्यानंतर त्याचे पट्टे काळजीपुर्वक बांधा/ लावा. त्याच्या लॉकचा "टक्क" असा आवाज आल्याची खात्री करा. पट्टे न बांधता घातलेले हेल्मेट हे 'असुरक्षित xन संबंधा'सारखे आहे हे लक्षात घ्या. (येथे सगळेच मॅच्युअर्ड आहेत.)
९) कालांतराने हे पट्टे ढिले होतात. ते वेळोवेळी हनूवटीला घट्ट होतील असे करत चला.
८) हेल्मेटची काच जास्त वापरामुळे चरे पडलेली असेल, त्यातील गिअरमधून पडत असेल तर बदलवून घ्या.
९) काळ्या रंगाची काच कधीही लावू नका. फारच उन दिसत असेल तर हेल्मेटमध्ये गॉगल वापरा.
१०) एकच हेल्मेट हे आयुष्यभरासाठीचे नाही. दोन-पाच वर्षात, ऐपतीप्रमाणे बदलणे गरजेचे आहे.
हेल्मेट न वापरणार्यांसाठी: एकदा तुम्ही हेम्लेट गाडी चालवतांना सतत आठ दिवस वापरा. नवव्या दिवशी
हेल्मेट न घालता गाडी चालवणे तुम्हाला आवडणार नाही हे नक्की. मला हेल्मेटची इतकी सवय झाली आहे की मी झोपतांनादेखील हेल्मेट घालून झोपू शकत.
मुख्य म्हणजे रस्त्यावरचे नियम पाळा.
हॅप्पी ड्रायव्हींग.
पाषाणभेदातर्फे जनहितार्थ जारी.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पाषाणभेद, सर्व मुद्यांना
पाषाणभेद, सर्व मुद्यांना जोरदार अनुमोदन. मी २००० पासून हेल्मेट वापरायला सुरुवात केली. आता कधीही कुठेही, कितीही जवळ जायचं असलं तरी हेल्मेटशिवाय जायची कल्पनाही करू शकत नाही![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पाषाणभेद तुम्हाला एक
पाषाणभेद तुम्हाला एक हजारवेळेला अनुमोदन. मी सध्या हेल्मेट वापरत नाही कारण फार गाडी चालवत नाही. पुर्वी ऑफिस जवळ असताना रेग्युलरली वापरायचे. हेल्मेट्चे बरेच फायदे आहेत. काही गैरसमजही आहेत पण एकदा सवय झाली की काही वाटत नाही.
निपा शक्यतो आय एस आय मार्कचे, डोक्यावर फिट बसेल असे हेल्मेट वापरा, डुगडुगणारे नको.
पाषाणभेद... चांगली
पाषाणभेद... चांगली माहिती.
आता माझा प्रॉब्लेम सांगतो. आमच्या कलिगची एजन्सी आहे. व्होल्गा कं. ची. हेल्मेट घेणार असे बोलल्यावर त्याने दुसर्या दिवशीच एक आणुन दिले. दुसर्या एका कलिगला विचारल्यावर त्याने सांगितले मस्त आहे.
त्यादिवशी तेवढेच मस्त वाटले मला
मग एक गोष्ट लक्षात आली ती म्ह्णजे त्यातुन म्हणजे हनुवटी जवळुन आत वारे येते. सध्या आमच्याकडे धुरळ्याचा प्रचंड त्रास आहे त्यामुळे जेथुन वारे आत येते तेथे भरपुर मातीचे फराटे दिसतात.
आणि दुसरे म्हणजे त्याचे जे समोरील प्लॅस्टीक आहे त्यातुन रात्री समोरील वाहनाच्या हेडलाइट्चा प्रकाश स्कॅटर होतो आणि काही वेळा काही क्षण काहीच दिसत नाही. त्यामुळे ते जरी नविन असले तरी मला लगेच बदलायचे आहे.
आता तुम्ही इतके वर्ष वापरता तर चांगली कंपनीपण आणि मॉडेलपण रेकमंड करा
आणि कोणते टाळावे हे पण सांगा
अजुन एक महत्वाची गोष्ट लक्षात आली ती म्हणजे एखाद्या मोठ्या डोक्याच्या व्यक्तीने आपले हेल्मेट घालुन बघितले तर ते एकदम ढीलेच वाटु लागते. लोकंपण ना, अरे बघु कसं वाटतय या नावाखाली घालुन बघतात :रागः
नवव्या दिवशी हेल्मेट न घालता गाडी चालवणे तुम्हाला आवडणार नाही हे नक्की.>>> जोरदार अनुमोदन.
पाभेंना जोरदार अनुमोदन. मला
पाभेंना जोरदार अनुमोदन. मला चष्मा असल्याने मी इतकी वर्षे ओपन हेल्मेट वापरत होतो, कारण हेल्मेट काढ-घाल करताना वेळ वाचवण्यासाठी मी हाल्फ घेतलो होतो पण तोटा म्हणजे, धूळ-धूर यांचा त्रास व्हायचाच. कुठे ही गेलो गाडीवरुन तर हेल्मेट हातात घेउन हिंडावे लागते, आणि खरेदी करताना तर वैताग येतो. त्यात समोरची फायबर काच टिंटेड होती त्यामुळे रात्री ती वर करुनच ड्राइव्ह करायला लागायचे आणि पावसाळ्यात रात्री भयंकर समस्या यायची![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
फुल्ल/क्लोस्ड हेल्मेट गाडीला लॉक करून ठेवता येते, वारा/धूर पासून संरक्षण होते आणी रायडिंगची मजा जास्त येते.
फायबर ग्लास व्हाइट आहे त्यामुळे बंद करूनच वापरतो, पण त्यावर ओरखडे उमटलेत आणि एकदा जोरात पडल्याने त्याला तडा गेलाय. तो बदलून घ्यायचा आहे.
मी सध्या 'स्टड' कंपनीचे हेल्मेट वापरतोय. चांगले आहे.
शंका : हेल्मेटची काच कुठे बदलून मिळेल? ज्या दुकानातून घेतलेय तिथेच आणखी काही दुकाने असतात?
निपा, अभिनंदन. हेल्मेटचे
निपा, अभिनंदन. हेल्मेटचे महत्व ओळखल्याबद्दल.
पाषाणभेद यानी चांगली माहिती दिली आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माझे दोन शब्द,
मी सर्वात प्रथम लोकल कंपनीच स्वस्तात मिळणारं हेल्मेट घेतलं होतं.
अर्थात रस्त्यावरुन नाही चांगल्या दुकानातुन. साधारन ५०० रु च्या आसपास किमंत असलेलं.
यथावकाश ते ३ वर्षात बरचं खराब झालं.
त्यामुळे ठरवुन चांगल्या कंपनीच घेतलं.
आताच हेल्मेट १०३५ रुपयांच आहे. वेगा कंपनीच आहे.
फुल हेल्मेट जे जबडादेखील कव्हर करतं तेच आहे. त्याला जी ग्लास आहे ती कोटेड आहे. (त्यामुळे १०० रु किमंत वाढली अन्यथा ते ९३५ रुपयांच आहे)
दिवसा गॉगल लावल्यासारखं दिसतं, त्यामुळे डोळ्याला उन्हाचा त्रास वै होत नाही.
रात्री सिटीलाइट्स सुरु असतील तर काच खालीच ठेवौन गाडी चालवु शकतो पण व्हिजीबिलीटी थोडी कमी होतेच. विदाउट कोटिन्ग वाल्या ग्लासवर लाइट स्कॅटर होणे हा नॉर्मल प्रॉब्लेम आहेच. त्यामुळे रात्री ग्लास खाली ओढुन गाडी चालवता येतच नाही. मी फक्त ग्लास एकदा बदलुन घेतली आहे कारण त्यावर खुप स्क्रॅचेस पडले होते. (कोटिन्गवर लगेच स्क्रॅचेस येतात आणि स्क्रॅचेसमुळे व्हिजिबिलिटी कमी होते)
अजुन उच्च प्रतीची हेल्मेट्स देखील आहे. त्यामध्ये एल एस कंपनीच इन्टेरनॅशनल स्टॅन्डर्ड्सच हेल्मेट मिळतं. ते २००० प्लस किमतीचं आहे.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
हेल्मेटची सवय होतेच. मी तर कोल्हापुरातही आलो की हेल्मेट घालुनच गाडी फिरवतो. त्यावेळी बरेच लोकं येडपट हाये असा लुक देतात. पण माझा मेन्दु महत्वाचा असल्याने मी अशा लुकला भीक घालत नाही.
मी माझ्या डोळ्यानी ३०-४० स्पीडलादेखील बाइकवर पडलेला पोरगा पाहिलाय. विदाउट हेल्मेट.
फार लागलं नव्हतं पण त्याला वारंवार चक्कर येत होती डोक्याला मुका मार बसल्याने. हेल्मेट असतं तर असं काहि झालं नसतं.
हेल्मेट कोणते
हेल्मेट कोणते घ्यावे?>>>>>>>>> डोक्यात निट बसेल असे घ्या![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
निपा जिथे वारं लागतं तो भाग
निपा जिथे वारं लागतं तो भाग कव्हर होईल असा स्कार्फ बांधा आतमध्ये. प्रामाणिकपणे सांगतेय, चांगले संरक्षण होईल. शिवाय हेल्मेट थेट डोक्यावर घातल्याने टाळूला घासून केस गळतात अशी तक्रार मी ऐकली आहे त्यामुळे डोकं आणि हेल्मेटच्या मध्ये आवरण असू दे..
त्यामुळे डोकं आणि हेल्मेटच्या
त्यामुळे डोकं आणि हेल्मेटच्या मध्ये आवरण असू दे..>>>>>>>> हवेचं आवरण
निपा जिथे वारं लागतं तो भाग
निपा जिथे वारं लागतं तो भाग कव्हर होईल असा स्कार्फ बांधा आतमध्ये.>>>
मी सध्या रुमाल बांधतोय. पण तो उपाय काही बरोबर वाटत नाही.
दक्षिणा - योग्य सूचना...मी
दक्षिणा - योग्य सूचना...मी बंडाना सारखे रुमाल असतात ते आधी बांधून मगच त्यावर हेल्मेट घालतो. एकतर अंघोळ झाल्याझाल्या लगेच बाहेर जावे लागत असेल तर ओल्या केसांमुळे हेल्मेटला कुबट वास येतो. तसेच तेल वगैरे लावत असाल तर अजूनच.
माझ्याकडे आहे ते एजस्टेबल आहे. पाहिजे तर क्लोज पाहिजे तर ओपन...
हेल्मेटचे सुरक्षेव्यतिरिक्तचे फायदे म्हणेज
१. उन्हाळ्यात डोके झाकलेले राहीते. कडक उन्हाचा त्रास होत नाही.
२. हिवाळ्यात कान व डोके झाकले जातात. थंडी वार्याचा त्रास होत नाही
३. पावसाळ्यात डोके कोरडे राहते.
हा अजुन एक्, समोरुन डोळ्यावर
हा अजुन एक्, समोरुन डोळ्यावर उन्हं येत असतील तर काय उपाय करतात? त्यावेळी डोक्यावर टोपी असती तर बरे झाले असते असे वाटते. वीकीवर याबद्दल लिहलय, कि मोटोक्रॉस्च्या हेल्मेट्ला काहीतरी प्रोव्हीजन असते.
पाषाणभेदी जी, उत्तम
पाषाणभेदी जी,
उत्तम पोस्ट.
दोन मुद्यांवर विषेश अनुमोदन.
१. फुल फेस हेल्मेट वापरले पाहिजे.
२. हेल्मेट नीट बांधलेले असलेच पाहिजे. नुसते टोपीसारखे डोक्यावर ठेवलेले हेल्मेट हे हेल्मेट न घालण्यापेक्षा जास्त धोका दायक ठरते..
(थोडे शुद्धीकरण : मोटारसायकलवर वापरायच्या हेल्मेटसाठी पाषाणभेदींना ही लिंक द्यायची असावी..)
ता.क.
दररोज १ तासापेक्षा जास्त वेळ गाडी चालवत कम्यूट करत असाल, तर रायडींग जॅकेट व ग्लोव्ह्स इ. चा विचार केलेला चांगला.
समोरुन डोळ्यावर उन्हं येत
समोरुन डोळ्यावर उन्हं येत असतील तर काय उपाय करतात?>>>>>> हेल्मेटच्या आत गॉगल घालता येइल.. पण यापेक्षा सोपा उपाय मिळाला तर हवाच आहे..
हेल्मेट डोक्याच्या
हेल्मेट डोक्याच्या संरक्षणासाठी आहे, ते न वापरणार्यांना डोकं नसून त्याजागी नुसतच खोकं आहे असा माझा अंदाज![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मी LS2 चं हेलमेट घेतलय. त्यात हे आवडलं,
- व्यवस्थित बसतं.
- चांगली काच (scratch-resistant hard plastic), रात्रीदेखिल त्रास होत नाही. यासाठी काच कुठेही घासू न देण्याची खबरदारी घ्यावी लागते. पुसतानादेखिल चांगल्या मऊ कपड्यानी पुसली तर खराब होत नाही.
- आतलं कापड/स्पंज सगळं काढुन घुता येतं (ते वेल्क्रो, पुश बटननी आत बसवलय)
- पुढे/मागे हवा जायला जागा असल्याने अगदी उन्हाळ्यातही डोक्याला जास्त घाम येत नाही.
हेल्मेट्च्या आतुन काही घालायचे असेलच तर सुती Balaclava चा पर्याय बहूउपयोगी आहे.
तुमच्या डोक्यात नीट बसेल असे
तुमच्या डोक्यात नीट बसेल असे हेल्मेट घ्या... स्टड कंपनीची चांगली असतात... गाडी घेतल्याच्या दुसर्या दिवशी हेल्मेटची खरेदी केली होती..
रंगासेठ.. जिथून हेल्मेट घेतलेत तिथे किंवा कोणत्याही स्पोर्ट्सच्या दुकानात काच मिळेल...
प्लेन काच असलेलेच हेल्मेट वापरा.. कुठल्याही वेळेस वापरता येते..
समोरुन डोळ्यावर उन्हं येत
समोरुन डोळ्यावर उन्हं येत असतील तर काय उपाय करतात?
<<<
हेल्मेटच नसतं अन पायी चालत असतो,तेव्हा काय करतो आपण?
हे असं क्लिप ऑन सन व्हायजर मिळतं बर्याच हेल्मेटांसोबत.
![](http://cyclestyle.com.au/wp-content/uploads/Visorknockout_373x280.jpg)
हेल्मेटच्या आत गॉगल घालता
हेल्मेटच्या आत गॉगल घालता येइल.. >>> चष्मा असेल तर प्रॉब्लेम येतो ना...
इब्लिस, हे भारीय आता कुठे मिळत आणि ते बसवायच कसं हे शोधायला लागेल. आणि हो रायडींग जॅकेट बद्दल पण थोडी माहिती द्याच.
सॅम बहुतेक लिंक द्यायची राहिली आहे.
हि एक भारी साइट सापडली.
http://www.thehelmetshoppe.com/new-arrivals.html
मी सध्या रुमाल बांधतोय. पण तो
मी सध्या रुमाल बांधतोय. पण तो उपाय काही बरोबर वाटत नाही. >> निपा रूमाल अत्यंत तोकडा असतो.
![truth-sm-791405.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u2405/truth-sm-791405.jpg)
हे खालचं चित्र पहा, त्यात जसं कव्हर झालंय सगळं तसं कव्हर करणारा स्कार्फ लागेल तुम्हाला, आणि त्याचा नक्कीच उपयोग होईल.
हेल्मेटमूळे प्रवासाचा थकवा येत नाही शिवाय स्किनही चांगली राहते.
>> सॅम बहुतेक लिंक द्यायची
>> सॅम बहुतेक लिंक द्यायची राहिली आहे.
नक्की कुठली लिंक? मी लक्ष्मी ऑटो मधुन साधारण ३००० ला घेतलं. हे असं दिसतं.
- चश्म्याची अडचण मलापण आहे. पण आता सवय झालिये. जेंव्हा पूर्ण दिवस बाईक चालवायची असते तेंव्हा दुपारी गॉगल घालतो. नंबर कमी असल्याने फरक पडत नाही. जास्त नंबर असेल तर दोन्ही प्रकारच्या काचा बरोबर ठेवा! (रोज नाही पण लांबच्या प्रवासात बरेच जण हे करतात)
- Dual Visor वालेपण मिळतात (STUDDS Ninja 3G) पण त्यांचा जबडा उघडतो. त्यामुळे ते इतर फुल हेल्मेटइतके सुरक्षित नसतात.
>> रायडींग जॅकेट बद्दल पण थोडी माहिती द्याच.
- मी cramster चे BREEZER वापरतो... अगदी रोज. मेश जॅकेट असल्याने उन्हाळ्यातही वापरू शकतो. खांदे आणि कोपरे सुरक्षित राहातात. त्यांच्या कर्वे रोडवरच्या दुकानाच पत्ता त्यांच्या सायटीवर आहे.
- शिवाय DSG मधेही बघु शकता.
सॅम मस्त आणि उपयुक्त माहिती.
सॅम मस्त आणि उपयुक्त माहिती.
दक्षिणा, फोटो जबरी (अगदी डोळे हे जुल्मी गडे च्या धरतीवर)![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
माझेही दोन आणे: सुरुवातीला
माझेही दोन आणे:
सुरुवातीला एम८० वापरायचो तेंव्हा पॉवर कंपनीचं फुल फेस हेल्मेट वापरायचो.
ब्रॉड चिन गार्ड अन गालावर फिट बसणारे फोम पॅड्स या दोन वैशिष्ट्यांमुळे घेतलं होतं. तसं साधंच होतं तरी २-३ वर्ष मस्त राहिलं.
चिनगार्डच्या आतला फोम मात्र हेल्मेट लॉक घासल्यानी निघाला होता, तसंच नॉन रिमूव्हेबल इंटीरिअर कुशनिंगला घामाचा वास यायला लागला होता.
पुढे मी एम८० वरून कॅलिबर ११५ वर गेलो अन डोक्यावर स्टड्स निंजा आलं.
फुल-ओपनफेस ऑप्शन, यू-व्ही प्रोटेक्शन वालं वायझर, रिफ्लेक्टिव आर्टवर्क, एअर फ्लो सिस्टिम वगैरे प्लस पॉईंट्स होते.
पण कालांतरानी त्याचं चिनगार्ड लिफ्टिंग मेकॅनिझम वेअर झालं अन ओपनफेस ऑप्शन वापरता येईना. रीप्लेसेबल कुशनिंग अन वायझर बदलायचा खर्च पहाता मी गाडीसोबत हेल्मेट बदलायचं ठरवलं.
गेल्या महिन्यात हीरो इंपल्स ऑन-ऑफ रोडर घेतली अन त्याच वेळेला बर्याच रीसर्चनंतर वेगा ऑफ रोड बाईकिंगवालं हेल्मेट घेतलं.
आधी मी ब्लूटूथ वालं हेल्मेट शोधत होतो, नंतर असं समजलं की एक ब्लूटूथ किट (रु.२५०० आसपास) येतं जे कुठल्याही हेल्मेटला बसवता येतं.
एल एस २ ची हेल्मेट्स चांगली आहेत पण मला त्याचे ग्राफिक्स आवडले नाहीत.
स्टड्स ची हेल्मेट वेगा च्या तुलनेत बरीच जड आहेत.
त्यामुळे वेगावर सुई आली.
बायकिंग ग्लोव्ज आहेतच आता अल्पाईनस्टार्स चं बायकिंग जॅकेट घ्यायचं आहे, पण तीन वीकांत झाले, खरेदीला मुहूर्त लागत नाहिये. या जॅकेटला आतून डीटॅचेबल क्विल्टिंग आहे. थंडीत लावा, गर्मीच्या दिवसात काढून ठेवा.
फॉक्स स्पोर्ट्स चे आर्म अन लेगगार्डही घ्यावेत का असाही विचार चालू आहे. बघू काय काय घेतलं जातंय...
लिन्क काढली. हे बघा निपा.
लिन्क काढली.
हे बघा निपा. वेगळा वायजर बसवायची गरज नाही.
एन्कीच हेल्मेट मस्तय. त्यात वायजर डिफॉल्ट येतोच.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
झकासराव त्या हेल्मेटसग्यालरी
झकासराव त्या हेल्मेटसग्यालरी लिंकेत काही तरी किडे आहेत. माझ्या अँटीव्हायरसने 'थ्रेट रिमूव्ह्ड' अशी बोंब मारली इतक्यात.
त्या हेल्मेटसग्यालरी लिंकेत
त्या हेल्मेटसग्यालरी लिंकेत काही तरी किडे आहेत.>>![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
अॅन्कीच हेल्मेट बघा. तसच डिजाइन आहे मी दिलेल्या लिन्कमधील.
ती लिन्क काढुन टाकतो.
उगा कुणाच्या कॉम्पला त्रास नगो.
पाषाणभेद चांगली माहीती मलाही
पाषाणभेद चांगली माहीती
मलाही हेल्मेट घ्यायचे होतेच, आधी होते माझ्याकडे पण ते मी कोठेतरी विसरलो
>>> समोरुन डोळ्यावर उन्हं येत
>>> समोरुन डोळ्यावर उन्हं येत असतील तर काय उपाय करतात?>>>>>>
मी दिलेला सल्ला क्र. ७ वाचा.
७) हेल्मेट निवडतांनातली एक महत्वपुर्ण पायरी: हेल्मेटचे पुढील फोम किंवा कड तुमच्या भुवईच्या वरतीपर्यंत येवू द्या असेच हेल्मेट निवडा व त्या पद्धतीतच पुढे वापरत चला.
याने हे च्या कडा सरळ कपाळावर येतात. त्यामुळे उन्हाचा त्रास होत नाही. समोरचे उन जरी येत असेल तर काच वर केल्याने फरक पडतो. तसेही डोळ्यावर येणारे उन हे सकाळचे किंवा संध्याकाळचे असते. ते खुपत नाही. अन भारतातील शहरांमधील असे कोणते रस्ते एकदम सरळ पुर्व पश्चिम असतात? अन कोणता प्रवास इतका पुर्व पश्चिम दुर असतो?
सर्वात महत्वाचे हे वापरणे सुरूवात करणे. यामुळे आपल्या शरिराला, डोळ्याला हे ची सवय होते. आधीच पाण्यात पडून बुडेन की काय ह्याची भीती बाळगली तर पोहोता येणार नाही.
>>> शिवाय हेल्मेट थेट डोक्यावर घातल्याने टाळूला घासून केस गळतात अशी तक्रार मी ऐकली आहे त्यामुळे डोकं आणि हेल्मेटच्या मध्ये आवरण असू दे..
आवाज कमी येणे, मानेला त्रास होणे, आजूबाजूचे न दिसणे, जीव घाबरणे आदी तक्रारी आणि हे टाळूला घासून केस गळतात या तक्रारी 'बहाणे' या प्रकारात मोडतात.
हे मुळे केस गळतात असा कोणताही निश्कर्ष वैद्यकीय संशोधनाने निघालेला नाही. १५ वर्षांच्या हे च्या वापराने माझ्या टाळूचेच काय पण डोक्याच्या कोणत्याही भागाला टक्कल पडलेले नाही. हे मुळे झाला तर फायदाच होतो, तोटा नाही.
हे सोबत रीप्लेसेबल कुशनिंगची सुद्धा आवश्यकता नाही. वैयक्तिक स्वच्छता कितपत पाळायची हा ज्याचात्याचा प्रश्न असतो म्हणा.
आणखी एक सुचना:
१) हे सोबत दुचाकीला त्याचे लॉक येते ते बसवून घ्या. यामुळे हे बरोबर न नेणे हा 'बहाणा' टाळता येतो.
हेल्मेट निवडतांनातली एक
हेल्मेट निवडतांनातली एक महत्वपुर्ण पायरी: हेल्मेटचे पुढील फोम किंवा कड तुमच्या भुवईच्या वरतीपर्यंत येवू द्या असेच हेल्मेट निवडा व त्या पद्धतीतच पुढे वापरत चला.
याने हे च्या कडा सरळ कपाळावर येतात. त्यामुळे उन्हाचा त्रास होत नाही. समोरचे उन जरी येत असेल तर काच वर केल्याने फरक पडतो. >>>>>>>>>> हे ट्राय करुन बघेन मी..
धन्यवाद..
तसेही डोळ्यावर येणारे उन हे सकाळचे किंवा संध्याकाळचे असते. ते खुपत नाही. अन भारतातील शहरांमधील असे कोणते रस्ते एकदम सरळ पुर्व पश्चिम असतात? अन कोणता प्रवास इतका पुर्व पश्चिम दुर असतो?>>>>>>> याच्याशी असहमत.. मला उन्हाळ्यात सकाळ अन संध्याकाळी उन्हं डोळ्यावर येउन प्रचंड त्रास होतो. अन कधी कधी वळणावर अचानक उन्ह चमकतं अश्या वेळी सेकंदाकरता जरी उन्ह आलं तरी अपघात होउ शकतो. त्यामुळे प्रवास दुरचा असल्यासच याबबतीत जास्त काळजी करावी असं नाहिये..
टाळूला घासून केस गळतात या
टाळूला घासून केस गळतात या तक्रारी 'बहाणे' या प्रकारात मोडतात.
हे मुळे केस गळतात असा कोणताही निश्कर्ष वैद्यकीय संशोधनाने निघालेला नाही. १५ वर्षांच्या हे च्या वापराने माझ्या टाळूचेच काय पण डोक्याच्या कोणत्याही भागाला टक्कल पडलेले नाही.
>>>
हे माणसा माणसाच्या प्रकृतीवर अवलंबून आहे.
तुम्हाला टक्कल पडलं नाही कारण तुमची प्रकृती तशी.
वीरेंद्र सेहवाग, वीवीएस लक्ष्मण, सौरव गांगुली, मर्वान आटापट्टू, अरविंद डीसिल्वा आदि लोकांना हेल्मेटमुळे टक्कल पडलं. कुणाची प्रकृती अशीही असू शकते.
त्यामुळे सर्रास त्याला 'बहाणे' प्रकारात टाकू नका.
हे सोबत रीप्लेसेबल कुशनिंगची सुद्धा आवश्यकता नाही. वैयक्तिक स्वच्छता कितपत पाळायची हा ज्याचात्याचा प्रश्न असतो म्हणा.
आणखी एक सुचना:
१) हे सोबत दुचाकीला त्याचे लॉक येते ते बसवून घ्या. यामुळे हे बरोबर न नेणे हा 'बहाणा' टाळता येतो.
>>>
गाडीला हेल्मेट लावलं तर, रस्त्यावर असो वा पार्किंग लॉट मधे, प्रचंड प्रमाणात धूळ हेल्मेटच्या स्टॅटिक सिंथेटिक फोमकडे आकर्षित होते. हा धूळभरलेला फोम पूर्ण डोक्याच्या अन नाकाच्या सतत अवती भवती रहात असल्यानी कुशनिंग वर्षातून एकदा रीप्लेस करावं असं मला वाटतं.
बर्याच ठिकाणी कुठल्याही हेल्मेटचं कुशनिंग (नॉन रीप्लेसेबल सुद्धा) बदलून मिळतं, त्याचा खर्चही तीन-चारशे रुपयांच्या वर नसतो.