Submitted by जागू-प्राजक्ता-... on 24 December, 2012 - 00:32
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
४० मिनिटे
लागणारे जिन्नस:
१) दोन वाट्या पोहे
२) दोन वाट्या मुग
३) दोन वाट्या पिठी साखर
४) अर्धी वाटी सुक्या खोबर्याचा किस
५) १ ते १/१२ वाटी तुप
६) १ वाटी भाजके डाळे
७) १ वाटी मिक्स ड्रायफ्रुट
८) २ चमचे खसखस
९) १ चमचा वेलची पुड
क्रमवार पाककृती:
१) मुग, पोहे, डाळे, खोबर्याचा किस, खसखस हे वेगवेगळे मंद आचेवर खरपुस भाजून घ्यावेत.
२) मुग व डाळे वेगवेगळे मिक्सरमध्ये दळून त्याचे रवाळ पिठ करावे.
३) पोहे व खोबर्याचा किस एकत्र करून कुस्करून घ्यावे.
४) आता तुप सोडून सगळे साहित्य एकत्र करावे.
५) हळू हळू तुपाचा अंदाज घेत लाडू वळण्याइतपत मिश्रणात तुप घालावे.
६) मिश्रण झाले की लाडू वळावेत.
वाढणी/प्रमाण:
एका वेळी एक लाडू :स्मित:
अधिक टिपा:
हे लाडू पौष्टीक असुन रुचकरही लागतात.
पोहे मिक्सरमधुन काढलेत तरी चालेल.
माहितीचा स्रोत:
पुस्तकी ज्ञान
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त दिसतायत लाडू, नेक्की
मस्त दिसतायत लाडू, नेक्की करुन बघेन.
अरे वा ! पौष्टिक आहेत एकदम.
अरे वा ! पौष्टिक आहेत एकदम. गूळ घातला तरी चालेल ना साखरेऐवजी ?
वॉव मस्तच..... नक्की करुन
वॉव मस्तच..... नक्की करुन बघणार..... तुप पातळ करुन घ्यायचे आहे ना? यात थोडे सोयाबीन भाजुन पीठ करुन घातले तरी चालेल ना, चव फारशी बिघडणार नाही बहुतेक
वॉव ! जागूतै तुम्ही फोटो लईच
वॉव !
जागूतै तुम्ही फोटो लईच भारी टाकता राव !
अगदी हात पुढे होतो, अन तोंडातील लाळग्रंथी पेटतात अन पोटातला अग्नी चेतावतो.
दुष्ट कुठली
मस्त .....मी करते ...पण
मस्त .....मी करते ...पण पोहे नव्हते घातले... आता पोहे घालून करेन .... ( ओट्स आणी मुग पण हेल्दी होईल ) ...........
जागूले वरण आहे का दुसर्या
जागूले वरण आहे का दुसर्या फोटोतल्या वाटीत?

बाकी तुझा निषेध.. तोंपासु पदार्थ टाकतेस म्हणून..
बायदवे बरेच दिवसात मासे नाही टाकलेस
माझी आई फक्त मुग नि थोडे
माझी आई फक्त मुग नि थोडे सोयाबिन असे करते. आता हे वर्जन पण सांगेन तिला!
दक्षे, अगं गाईचे तूप आहे ते.
दक्षे, अगं गाईचे तूप आहे ते. आता दही लावायला शिकली आहेस ना? मग त्याचे लोणी अन तूप कढवायलाही शीक

खुपच छान.पौष्टीक आणि सुपाच्य.
खुपच छान.पौष्टीक आणि सुपाच्य.
अनु, सुलेखा धन्यवाद. रावी गुळ
अनु, सुलेखा धन्यवाद.
रावी गुळ घालून पण छानच होतील.
वर्षा अगदीच घट्ट असेल तुप तर पातळ करावे लागेल.
दुष्ट कुठली, तुझा निषेध
(अवल, दक्षे राक्षसी हसण्याची स्मायली समजा)
सृष्टी ओट्सची आयडीया पण छानच आहे.
स्वाती आम्ही तसे काळ्या मुगाचे पण लाडू करतो.
व्वा सहिच!!!!!!!!
व्वा सहिच!!!!!!!!
सॉलीड लागत अस्तील ना असे
सॉलीड लागत अस्तील ना असे लाडू. करून पहायला हवे.
जागू, ह्या पाकृ साठी अतिशय
जागू, ह्या पाकृ साठी अतिशय धन्यवाद!
नक्की करून पाहणार!
धन्स ग जागु नक्की करुन बघणार
धन्स ग जागु
नक्की करुन बघणार
किती ते सुरेख! मस्त पाकृ.
किती ते सुरेख! मस्त पाकृ. थंडीच्या सीझनला तर छानच!
छान लाडू. टिपीकल कोकणी घटक
छान लाडू. टिपीकल कोकणी घटक आहेत हे !
मस्त गं जागू! यात जाडे पोहे
मस्त गं जागू! यात जाडे पोहे तुपात तळून घातले तर मस्तच ! कणकेच्या लाडवात मी असे तळलेले पोहे घालते.
स्मितु, झंपी, निंबुडा, कविन,
स्मितु, झंपी, निंबुडा, कविन, अरुंधती, दिनेशदा, मानुषी धन्यवाद.
मस्त! फोटो तर फारच तोंपासु!
मस्त! फोटो तर फारच तोंपासु!
मस्त दिसताहेत. बेलापुरच्या
मस्त दिसताहेत. बेलापुरच्या कोकण-सरस मधुन कोकणातले लाल पोहे आणलेत. त्याचे करुन पाहिन.
वा! मस्तच आणि पौष्टीकही.
वा! मस्तच आणि पौष्टीकही. पिठीसाखर असल्याने पाक निट होण्याचे Tension नाही.
भाजके डाळे च्या बदली दुसरे काय घेता येईल??
जागू, छान वाटले तुला ईथे पुन्हा आलेले पाहुन.
मला स्वतःला मुगाचे लाडू खूप
मला स्वतःला मुगाचे लाडू खूप आवडतात... विशेष्तः गूळ घातलेले. पण तो पाक-बिक हमखास बिघडण्याचे उद्योग आहेत, माझ्यासाठी.
जागू.. अगदी मनापासून धन्यवाद ह्या रेसिपीसाठी. आजच करून बघणार. तू फोटो मात्रं अगदी मारू टाकतेस. रेसिपी करून बघायलाच हवी असं वाटण्याइतके झकास.
सही! आई करते असे लाडु, वडिल
सही! आई करते असे लाडु, वडिल त्याला गमतिने 'तहान-लाडु भुक-लाडु' म्हणतात.
अंशा, साधना, धन्यवाद. दाद
अंशा, साधना, धन्यवाद.
दाद केलेत की फोटो नक्की टाका.
प्राजक्ता खुप गोड नाव आहे लाडवांचे.
विद्या डाळे नाही घेतलेस तरी चालेल मग थोडे साखरेचे आणि तुपाचे प्रमाण कमी करावे लागेल. नाहीतर तितकेच पोहे किंवा मुगही घेउ शकतेस.
एकदम तोंपासु. नक्की करून
एकदम तोंपासु. नक्की करून बघणार जागू.
सोपे आहे...जागु ताई तुम्ही जे
सोपे आहे...जागु ताई तुम्ही जे पदार्थ माबो वर टाकता ते सोपी अस्तात...फोटो आणि पॉइंट वाईज रेसिपी टाकल्याने ते जास्त सोपे वाटतात...:) हे लाडु तुम्ही सांगितलेल्या रेसिपी प्रमाणे बनवले छान झालेत.....पहिला प्रयत्न म्हणुन कमी बनवले.....नवर्याला अवाडले...आता परत जास्त बनवेन...
सहीये! आता थंडी सुरु होतेय
सहीये!
आता थंडी सुरु होतेय आमच्याकडे. नक्की करणार!
अनिश्का, वत्सला धन्यवाद.
अनिश्का, वत्सला धन्यवाद.
छान लाडू आहेत. बाबाना(परालिस
छान लाडू आहेत. बाबाना(परालिस पेशट) खायला आवडले.
गूळ घातला तरी चालेल ना
गूळ घातला तरी चालेल ना साखरेऐवजी ?>>>>>>>
हेच म्हणायला आलो होतो !!!
एकदम झक्कास रेसिपी
धन्स या साठी
'तहान-लाडु भुक-लाडु'>>>>>> ही अगदी पारंपारिक नावे आहेत गमतीची नावे नाहीत त्याना अर्थ आहेत प्राजु !
तहान लाडूला तहान लाडूच का म्हणतात वगैरे यालाही कारणे आहेत
दोन्हीत फरक असतो पण नक्की रेसीपीज मला माहीत नाहीत
कोणास माहीत असेल / लिंक असेल तर द्या नक्की !!
Pages