मासे आणि आरोग्य

Submitted by ssaurabh2008 on 21 December, 2012 - 22:59

स्वस्थ आरोग्यासाठी मासे (सी-फूड) खावेत असे बर्‍याच ठिकाणी वाचले आणि ऎकले आहे.
आमच्या भागात फक्त गोड्या पाण्यातलेच मासे मिळतात. उदा. रोहू, कतला, मरळ

या तीन माशांपैकी कोणता मासा सगळ्यात चांगला आहे ? चवीलाही आणि आरोग्यालाही.

आणि मी असे वाचले आहे की फिश फ्राय केली तर त्यातले ओमेगा-३ ऍसिड कमी होते.
हे खरे आहे का ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सामी ताई, त्वचेचे रोग कोण-कोणते असतात? यापैकी कोणते रोग अशा अन्नामुळे होतात नक्की? ४-२ रोगांची नावे कळलीत तर माझ्या ज्ञानात थोडी भर पडेल - इब्लिस तुमच्या ज्ञानात भर टाकण्या एवढा वेळ आणि इच्छा माझ्याकडे नाही.

नीलू , साधना दूध,भात आणि मिठ हे खूप जण आवडीने खातात. त्यामुळे चालत ही असेल पण काही काही गोष्टी डोक्यात एवढ्या पक्क्या बसलेल्या असतात कि चेन्ज करायला नाही जमत.

इब्लिस तुमच्या ज्ञानात भर टाकण्या एवढा वेळ आणि इच्छा माझ्याकडे नाही.
<<
धन्यवाद.
मग मायबोलीवर अशा गैरसमज पसरवणार्‍या सांगीवांगीतून आलेल्या पोस्टी टंकत जाऊ नका, हे विनंती.
दुसरे म्हणजे प्रयत्न केलात, तरी तुम्हाला ते (ज्ञानात भर टाकणे) जमणार नाही हे नम्रपणे नमूद करू इच्छितो.

नितीनचंद्र,
तुम्हास टीबी झाला तर तो मायकोबॅक्टेरियम ट्यूबरक्युलोसिस या जंतूंमुळे होत असतो. अमुक तमुक खाल्ल्यामुळे नाही. हे सिम्पल ज्ञान सोडून जर तुम्ही चरकसंहिता मला दाखवून टीबी बद्दल विचारू लागलात, तर तुमची कीव करावी तेवढी थोडी आहे.

विषमाशन म्हणजे विषम भोजन हे त्याच पानावर लिहिलेले आहे.

आयुर्वेदात टीबी/क्षयरोग हा असाध्य मानलेला आहे. (एम.डी.आर. टीबीच्या काही केसेस सोडल्यास इतर बहुतेक टी.बी. आम्ही संपूर्ण बरे करू शकतो.)

तुम्हाला टीबी (च कशाला, कोणताही आजार) झाला तर कृपया कोणताही आधुनिक वैद्यकोपचार घेऊ नका, ही नम्र विनंती.

धन्यवाद!

मरळ रिव्हर फिश ना? तुमच्या जवळ कोणी आंध्रातील असतील तर त्यांना रेसीपी विचारा. मी मरळ खाल्लेला आहे चांगली रेसीपी बनवितात तेलुगु पद्धतीने. तंदुरी फिश फार मस्त लागते जमाना झाला खाउन.

ते फिश अम्रितसरी असते त्यात काय मासा अस्तो?

@ अश्विनीमामी

हो, मरळ नदीतलाच.
रेसिपी तर इंटरनेटवरसुद्धा मिळतील ना, त्यात काय.

आणि एकदा शिकल्यानंतर तंदूरी फिश खायला मीच बोलवतो तुम्हाला. Happy

फिश अम्रितसरी हा प्रकार मीसुद्धा पहिल्यांदाच ऎकला/वाचला आहे.
गुगल बाबा म्हणताहेत की कोणताही बोनलेस मासा चालेल, पण त्यातला त्यात सुरमई चांगला

<< आणि एकदा शिकल्यानंतर तंदूरी फिश खायला मीच बोलवतो तुम्हाला >> चला, आतां सौरभजी मार्गाला तर लागले; अभी मंजील दूर नही !!! Wink

अय्या मी ते सौर भजी असेच वाचले. Happy

महत्त्वाचे म्हणजे सौरभ, शेल फिश जसे लॉबस्टर वर्गीय,
खेकडे ( क्रॅब) याची भयानक अ‍ॅलर्जी असू शकते. तरी टेस्टिन्ग करून मगच ते खावे. अगदी तब्येतीस गंभीर धोका होऊ शकतो.

शिंपले - नुसते ताजे खरवडून खातात ते ही अगदी फ्रेश असले तरच खावे. नाहीतर पास. पोट बिघडू शकते. जाणकार सांगतीलच.

व्हेनेवर इन डाउट घरी वरण भाताचा कुकर लावावा.

<< अय्या मी ते सौर भजी असेच वाचले. >> वरण भाताचा पर्याय डोक्यात घेऊनच आल्याने
कदाचित तसं झालं असावं ! Wink

अधिक वा कमी मात्रेत जेवणे अथवा योग्य वेळ येण्यापूर्वी [छान भूक लागण्यापूर्वी] किंवा वेळेनंतर जेवणे, म्हणजे विषमाशन होय. ·

आंतरजालावर अनेक ठिकाणी वाचल्या वरील अर्थ सापडला.

श्री बालाजी तांबे यांनी सुध्दा विषमाशन चा अर्थ वर लिहल्याप्रमाणेच सांगीतला आहे.

मी अनवधानाने विरुध्द अन्न याचा उल्लेख विषमाशन म्हणुन केला आहे त्याची ही दुरुस्ती.

रच्याकने.... विरुध्द अन्न म्हणुन ज्याचा उल्लेख झाला आहे तो लेख खालील लिंक वापरुन वाचावयास हरकत नसावी.

http://www.esakal.com/esakal/20110610/5081425340279484655.htm

विरुद्ध अन्न म्हणजे दूध-फळे, दूध-मासे, मीठ-दूध, वगैरे एकमेकांना विरुद्ध असणाऱ्या पदार्थांचे एकत्र सेवन करणे. असा उल्लेख श्री बालाजी तांबे यांच्या वरील लेखात आहे.

विषमाशनाने काय रोग होतात हे आता लिहणे मुद्याला धरुन होणार नाही म्हणुन हा उल्लेख टाळतो आहे.

साथीच्या रोगाची लागण सर्वांनाच होत नाही. म्हणुन साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव असताना आपण कसे वागावे आपण ठरवावे.

प्रतिकार शक्तीचा नाश झाल्याने कोणत्याही जंतुंचा प्रभाव शरीरावर होतो हे कोणत्याही पॅथीचे तज्ञ मान्य करतीलच. पण प्रतिकार शक्तीच कमी होऊ नये ह्या साठी बहुदा विषमाशनाचा विचार आयुर्वेदात सांगितला असावा. आजकाल प्लाझमा/रक्त ( तांत्रिक द्रूष्ट्या शब्द प्रयोग चुकीचा असल्यास अर्थ लक्षात घ्यावा ) देण्याची सोय ज्या काळात आयुर्वेद निर्माण झाले त्या काळात नव्हती जेणेकरुन आजारकाळात पांढर्‍या पेशींची संख्या वाढवता येते.

आजही काही विषीष्ठ गटाचे रक्त उपलब्ध होणे त्रासदायक आहे हे सांगणे नको.

सामी ताई, त्वचेचे रोग कोण-कोणते असतात? यापैकी कोणते रोग अशा अन्नामुळे होतात नक्की? ४-२ रोगांची नावे कळलीत तर माझ्या ज्ञानात थोडी भर पडेल >>>

मग मायबोलीवर अशा गैरसमज पसरवणार्‍या सांगीवांगीतून आलेल्या पोस्टी टंकत जाऊ नका, हे विनंती.
दुसरे म्हणजे प्रयत्न केलात, तरी तुम्हाला ते (ज्ञानात भर टाकणे) जमणार नाही हे नम्रपणे नमूद करू इच्छितो.>>>

इब्लिस या दोन्ही पोस्ट्स किती विसंगत वाटतात ना? तुमचा मायबोलिवरच वावर फक्त दुसर्यांची खिल्ली उडवणे आणि गरज नसताना काहीतरी सारकास्टिकली लिहिणे यासाठीच जास्त असतो हे एव्हाना लक्षात आले आहे. यापुढे तुम्हाला उद्देशून काही लिहायची गरज मला वाटत नाही.

ssaurabh2008 अवांतर चर्चेसाठी माफ करा. तंदूर फिश केलात कि नक्की रेसिपी टाका Happy

सामी | 26 December, 2012 - 15:35 नवीन
sadly light has not fallen.. प्रकाश पडला नाही.

Pages